१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
हा गप्पांचा धागा झालाय का ?
हा गप्पांचा धागा झालाय का ?
>>> सुजा | 4 January, 2015 -
>>> सुजा | 4 January, 2015 - 09:30
हा गप्पांचा धागा झालाय का ?
<<<
नव्हता कधी? पहिलाच प्रतिसाद वाचा.
>>> नंदिनी | 15 December, 2014 - 20:56
पॉपकॉर्न.
<<<
हा गप्पांचा धागा झालाय का ?
हा गप्पांचा धागा झालाय का ? >>>> खूप लवकर विचारलाय नै हा प्रश्न ?
धागा चालवणे हे लोकांवर अवलंबून असते. मग लेखकाच्या मनात नसेल तरी त्याचे काही चालत नाही, याउलट लेखकाला खूप वाटले की धागा चालावा पण लोकांची इच्छा नसेल तर तो पळणार नाही हे माझे आतापर्यंतचे मत होते/ त्यात आता भर टाकते.
धागा कसा चालावा हे सुद्धा धागा लेखकाच्या हाती नसते. पुढे तो जसा चाललाय हे एकतर बघत रहावे किंवा मग स्वतःच त्यात सामील व्हावे. (आप सिस्टीम को बदल नही सकते तो सिस्टीम के लिए अपने आप को बदलो ).
हा धागा पहील्यापासून
हा धागा पहील्यापासून शेवटपर्यंत वाचणा-यांची अवस्था कशी होतेय हे या फोटोत पहा.
सुरु .. आता असे वाटू लागले
सुरु .. आता असे वाटू लागले आहे कि तुम्हालाच हा धागा वरती राहावा यात आनंद मिळत आहे...
धागा खाली गेला रे गेला कि तुमच्या कॉम्मेंत्स येतात आणि धागा वर ...
नव्या नव्या माहीतीसाठी वेगळा
नव्या नव्या माहीतीसाठी वेगळा धागा उघडण्यापेक्षा हे सोयीचं आहे.
सध्याचे देशाचे पंतप्रधान हे अवतारी पुरूष आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे. माझा राजकारणाशी संबंध नाही तसंच मी नमोभक्तही नाही. पण गुजरातमधली त्यांची सामाजिक, राजकीय आणि विकासाची कामगिरी ही अभूतपूर्व असल्याने लोकांचं असं मत झालं. याचा प्रत्यय देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीत आला आणि पक्षाला अभूतपूर्व यश मिळालं. हे यश म्हणजे योगायोग नव्हे हे त्या आधीच्या आणि नंतरच्या विधानसभांच्या निवडणुकांनी सिद्ध केले. काश्मीरसारख्या राज्यात भाजपने इतक्या जागा जिंकाव्या हे आश्चर्यकारक आहे.
नमो अवतारी पुरूष आहेत यावर मी विश्वास ठेवला नाही. पण नुकतीच जी माहीती मिळाली ती थक्क करणारी आहे. काळजीपूर्वक पहा.
हे छायाचित्र ओळखीचं आहे. हडप्पा संस्कृतीतला हा कुणी विकास पुरूष असावा. त्या काळी त्याने हडप्पा संस्कृतीचा विकास केला असावा. आज मोदी हे विकास पुरूष म्हणून ओळखले जातात. त्यांच्यातलं हे साम्य पाहून काय वाटतं ?
(No subject)
महेशजी ?
महेशजी ?
(No subject)
अगदी बरोबर विणातै. तुम आगे
अगदी बरोबर विणातै.
तुम आगे बढो हम हैच तुम्हारे साथ.
शायरन जन्मला ग बाई.
रावण देखील र वरुन होता आणि
रावण देखील र वरुन होता आणि राईट बंधु देखील र वरुनच आहे.
हा योगायोग नसुन रावणातील वैमानिक रावणाचा पुनर्जन्मच होता फक्त जन्म घेताना दिशा चुकली आणि देश दुसरा मिळाला. अन्यथा त्या पुनर्जन्मी रावणाने भारतातच पुन्हा आपले पुष्पक विमान बनवले असते आणि जगभरात भारताचे नाव चमकले असते.
श्रीलंका देखील प्राचिन काळी भारताचाच भाग असल्याने अखंड भारतच म्हणने उपयुक्त आहे
तं
तं
https://www.facebook.com/Boll
https://www.facebook.com/BollywoodGandu/photos/a.637132779645079.1073741...
नक्कि वाचा
सध्याचे देशाचे पंतप्रधान हे
सध्याचे देशाचे पंतप्रधान हे अवतारी पुरूष आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे.
------ या अनेकान्मधे मी नाही....
श्री. नरेन्द्र मोदी हे देशाचे प्रधानमन्त्री आहेत, पण अवतारी पुरुष अजिबातच नाही.
उदय हा अपमान समजला जाईल. संशय
उदय हा अपमान समजला जाईल. संशय घेणे अथवा व्यक्त करणे म्हणजे राष्ट्रद्रोहच. तुम्ही द्रोहीच आहात. मी तुमचा निषेध करतो.
>>श्री. नरेन्द्र मोदी हे
>>श्री. नरेन्द्र मोदी हे देशाचे प्रधानमन्त्री आहेत, पण अवतारी पुरुष अजिबातच नाही.
सहमत.
पण सरकार बदलल्यापासुन अनेक लोकांची तंतरलेली दिसतेय
वीणा, माझी अवस्था
वीणा, माझी अवस्था करीनामातेसारखी अजीबात झालेली नाहीये.:फिदी: हा धागा मी सारखा उसवुन बघीतलाय, पण अगदी नव्याने तो मला नवा वाटलाय. हेच ह्या नूतन वर्षाचे गमक असावे.
तर लोकहो, सरत्या वर्षाच्या अखेर कुणी कुणी काय काय गम्मत-जम्मत केली ते कुणी लिहीलेच नाही.:अरेरे::अओ:
वर्षा अखेर मी झक्कपैकी कॉफी घेतली आणी गुडुप झाले.( निद्राधीन, कृपया वेगळा अर्थ काढु नये)
यन्दाच्या नव्या वर्षात आम्ही उथळपणा बाजूला ठेऊन आधुनीकतेच्या आहारी जाणार आहोत,कारण जूने तेच सोने असे असतेच असे नव्हे. तर लोकहो,कडक शिस्त व कर्मठपणा बाजूला सारुन आम्ही नवीन वर्षात नवे नवे उपक्रम मायबोलीवर राबवणार आहोत, ते पण रोज नवीन पोस्ट टाकुन. नवीन धागा काढणे आमच्या शिस्तीत बसत नसल्याने आम्ही आधीच दुसर्या कुणीतरी माबोकराने काढलेल्या नवीन धाग्यावर धुमाकुळ घालणार आहोत.
धाग्याशी सम्बन्धीत नसलेले मजकूर टाकुन आम्ही धागा भरकटवुन टाकण्याचे प्रयत्न करणार आहोत, तर मग भेटुच पुन्हा. तोपत्तुर, राम राम!
महेश, नको तिथे तं वर करण्याची
महेश,
नको तिथे तं वर करण्याची सवय सोडा आता.
तं.....
या बीबी वर एकदम इर्रेलेवन्ट
या बीबी वर एकदम इर्रेलेवन्ट आहे पण इथे खूप माणसे येतात म्हणून. ऑटिझम बाबत स्वमग्नता एकलकोंडेकर आणि मदर वॉरिअर यांचे दोन धागे आहेत . ते कुठे तळाला गेले आहेत सापडत नाहीत .कृपया ते कॉमेन्ट देऊन वर काढावे . जनहिताचे काम आहे. त्यावर पॉलिसी बनवणे आहे. इथे बाष्कळ धूर काढण्यापेक्शा धागा बुडी मारून वर काढावा ही आज्ञा .......
हडप्पा संस्कृतीतला हा कुणी
हडप्पा संस्कृतीतला हा कुणी विकास पुरूष असावा. त्या काळी त्याने हडप्पा संस्कृतीचा विकास केला असावा. >>>>>>> सगळ्याच असंबद्धतेचा कंटाळा आला.
चांगले धागे तळाशी जाणे ही
चांगले धागे तळाशी जाणे ही तक्रार खूपदा ऐकायला मिळतेय. ते पण याच धाग्यावर. हे योग्यच आहे म्हणा. पण गेल्या काही दिवसांत मी इथे पण पहा या सदरात दिसणा-या खालील धाग्यांवर प्रतिसाद दिले ( वर काढले - इथल्या भाषेत).
अनु. धाग्याचे नांव लेखक
१. माझे हृदयधमनीरुंदीकरण - नरेंद्र गोळे
२. बाबा रामदेव यांचा उदय एक आकलन - अतुल ठाकूर
३. मुलांचा अभ्यास कसा घ्यावा - राजेंद्र
४. भारताला कसे सुधारावे - झक्की
५. सदाशिव अमरापूरक यांच्याविषयीचे अनुभव - कोकणस्थ
६. धर्मरक्षण - विक्रमादित्य पणशीकर
७. हृदयोपचार घेत असताना मी वाचलेली पुस्तके - नरेंद्र गोळे
८. लेडीsज (अँड जंटलमन) ऑफ द ज्युरी.. - लोला
हे धागे वर आल्यानंतर प्रतिसाद जवळपास न येताच ते पुन्हा मागे गेले. जर हे धागे चांगले असतील तर तक्रार करणा-यांनी त्याची दखल का घेऊ नये ?
स्वमग्नता हा धागा पुढे मागे वाचला गेला असताच. एकाच वेळी शक्य आहे का ते ? शिवाय सर्वांनाच या विषयाची आवड असेल का ?
तंतरणे असं आहे होय ते
तंतरणे
असं आहे होय ते महेशजी ? माहीतच नव्हतं
तं......!
तं......!
रश्मी तै, सेम हिअर आम्ही पण
रश्मी तै, सेम हिअर
आम्ही पण जुनं ते(च) सोनं असं म्हणत नाही तर जुन्यातल्या सोन्याला सोनं म्हणा इतकंच म्हणतो. बातम्या वाचताय की नाही ?
http://www.mumbaimirror.com/mumbai/others/Ancient-sciences-exhibition-He...
देवकी, >> सगळ्याच असंबद्धतेचा
देवकी,
>> सगळ्याच असंबद्धतेचा कंटाळा आला.
त्याचं काये की पप्पूकंपू पप्पूप्रमाणेच बथ्थड आहे. मोदींना पर्याय खडा करण्याची त्यांची औकात नाही. मग त्यांना विदुषकी पद्धतीने रंगवणं एव्हढंच कंपूच्या हातात उरतं. तुम्हाला भले कंटाळा आला असेल, पण कंपूचं मनोरंजन होतंय की!
आ.न.,
-गा.पै.
गामा, वरील विधान (हा धागा
गामा,
वरील विधान (हा धागा राजकीय नाही ह्याची जाणीव असूनही हे लिहीत आहे की) आजकाल काऊंटर अर्ग्यूमेंट म्हणून ठीक आहे, पण मोदी आणि त्यांचे सरकारही १६ मे आधीची लोकप्रियता गमावून बसलेले आहे हे नक्की! पुढच्या निवडणूकीच्या आधी मोदी काहीतरी निराळाच करिष्मा करून पुन्हा भारतीयांना मते द्यायला भाग पाडतील हे नक्की, कारण तो माणूस पक्का गुजराथी आहे.
बेफिकीर, >> पण मोदी आणि
बेफिकीर,
>> पण मोदी आणि त्यांचे सरकारही १६ मे आधीची लोकप्रियता गमावून बसलेले आहे हे नक्की!
प्रश्नच नाही. कोणीही राजकारणी सदैव लोकप्रिय असूच शकत नाही. त्याच्या लोकप्रियतेतल्या फटी शोधून त्याला पर्याय देणाराच गंभीर आव्हान उभं करू शकेल. ते होतांना दिसत नाहीये. फक्त बदनामी आणि आचरट वक्तव्ये दिसताहेत. नुसत्या बदनामीने काय साध्य होणार?
आ.न.,
-गा.पै.
>>>फक्त बदनामी आणि आचरट
>>>फक्त बदनामी आणि आचरट वक्तव्ये दिसताहेत. नुसत्या बदनामीने काय साध्य होणार?<<<
काहीही नाही.
पर्याय नसण्याची वेळ काँग्रेसवर प्रथमच आलेली आहे. प्रामुख्याने नरसिंह रावांनंतर!
एक लक्षात घ्या गामा, एखादा पक्ष नेस्तनाबूत होणे हे काही फार स्वागतार्ह नसते. जसे, काँग्रेस नेस्तनाबूत होणे हे आपल्या देशाच्या राजकीय भवितव्यासाठी चांगले नाही आहे. पण सोनियाजी आणि इतर अनुयायांमध्ये निवडून येण्याचा करिष्मा आजही नाही आहे आणि पाच वर्षांनीही नसेल हे स्पष्ट दिसत आहे.
देअर विल बी ऑर गोईंग टू बी अ लॉट ऑफ पीपल हू 'विल हॅव टू' बिलीव्ह इन मोदी जस्ट बिकॉझ ही डझन्ट हॅव अॅन अल्टरनेटिव्ह! धिस इज डेंजरस!
आस्क दोज हू लिव्ह लाईफ इन ईन्डिया!
धग्या चे नाव बद्लुन कत्ता
धग्या चे नाव बद्लुन कत्ता थेवा
तम्बोरा ... नाव मस्त थेवले
तम्बोरा ... नाव मस्त थेवले आहे .... जब्रि ...
Pages