आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The film's earnings on second Tuesday remained rock steady at collection centers. On its second Tuesday the film minted ₹9.11 crore, which is slightly lesser than Monday's figure.
"PK" or "Peekay" 12 days domestic box office income has now surpassed the ₹250 crore mark in India.
The film in its first week minted over ₹183 crore, from second weekend it minted more than ₹53 crore, on second Monday it raked in ₹10.08 crore and on Tuesday it raked in ₹9.11 crore. The film's total now stands at ₹255.77 crore, according to Bollywood Hungama.
The film, which shattered several records, will soon become the highest grossing Bollywood film ever, if it maintains the same pace at collection centers.

"Dhoom 3" holds the record of being the highest grossing Bollywood movie worldwide. But with the ongoing trend, it looks like "PK" will soon break that record as well.

ओ च्रप्स ह्ये पीकेचे हिथ कुट लिवल? गल्ली चुकली ना!

सुरेख धन्यवाद.:स्मित:

माझ्या विडम्बनाचा बाकी लोकानी अन्नुलेख केला.:राग::अरेरे:

तर लोकहो, असलेल्या, नसलेल्या मायबोलीकरहो सर्वाना येत्या नवीन वर्षाच्या अनेकोनेक, भारम्भार शुभेच्छा!

सर्व प्रवासी तसेच पायलट याना हे नवीन वर्ष सेफ जावो.
सर्व राजकीय नेत्याना हे वर्ष पळापळीच जावो.
सर्व विद्यार्थ्याना हे वर्ष सोपे जावो.
सर्व नोकरदाराना ( खाजगी, सरकारी) हे वर्ष भरभराटीचे जावो.
सर्व डॉक्टराना हे वर्ष आरोग्याचे जावो.
सर्व बायकाना हे वर्ष त्यान्च्या नवर्‍याकडुन भेटी मिळण्यात जावो.
सर्व नवर्‍याना हे वर्ष त्यान्च्या मित्रान्बरोबर पार्ट्या करण्यात जावो.

अ‍ॅन्ड लास्ट बट नॉट द लिस्ट, हे वर्ष सर्व तळीरामाना झुलण्यात जावो.:खोखो:

तर चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. हे गाणे लक्षात ठेऊन आपले पाय जमिनीवर सेफ लॅन्ड करण्यात घालवा. शुभरात्री, गुडनाईट, शब्बा खैर!

रश्मीतै,
विडंबन मस्तच झालय.
अनुल्लेख नाही हो. इसवी नववर्षारंभाच्या तयारीत सगळं जग आहे. शेजारधर्म म्हणून जराशी व्यस्त झाले होते. संध्याकाळी एका कार्यक्रमाला जायचेय.

रश्मी.. | 31 December, 2014 - 10:07
ओ च्रप्स ह्ये पीकेचे हिथ कुट लिवल? गल्ली चुकली ना!

--->

अहो रश्मी ... गल्ली नाही चुकली ... इथे कोणीही काहीपण लिहून जातो न.. म्हटला आपण पण हातभार लावावा...
तुमच्या विदाम्बानाचा मी पण पंखा आहे....

पोष्टर बोय एक नवीन धागा नाही aala आज ... येओ दे कि राव...

विना तै .. शिकागो मध्ये कुठे asata tumhi ...

हल्ली गूगलने सगळं सोपं करून ठेवलंय नाही ?
मी जर म्हटलं की मी Loyola विद्यापीठापासून दोन किमी अंतरावर राहते तर लगेचच गूगलवरून पत्ता काढता येऊ शकतो. मी असंही म्हणू शकेन की ऑर्लेण्ड पार्कच्या आसपास आहे तरी सुद्धा तेच. तेव्हां प्रचंड अशा शिकागोत पेईंग गेस्ट म्हणून मी आहे हे पुरेसं आहे.

आता तुमचं सांगा.

चला मग कोण कोण येतो आहे संगमनेरला? आपलीच काळी पिवळी आहे. त्या विमानाचा रंग चुकला विणा ताई.

हो पण मला कुठेय माहीत तुम्ही कुठे असता ते ?
मला तर तुमचं नाव सुद्धा माहीत नाही. खरं तर त्याची आवश्यकता ही नाही वाटली. असो.

धनि | 31 December, 2014 - 11:15 नवीन
चला मग कोण कोण येतो आहे संगमनेरला? आपलीच काळी पिवळी आहे.\\

-->

म्या पन येनार ...

सुरेख | 31 December, 2014 - 11:40
संगमनेरच्या जवळच शिर्डी आहे तिकडे काळी पिवळी वळणार असेल तर म्या पण येनार...

-->

गुड थॉट ... आपण वळवूया तिकडे ... मी बाबांचा भक्त आहे ... ओम साईराम !

>>धनि अगं ,मला मेल मधे आलाय फॉर्वर्ड.. >> वीणा सुरू @ धनि हे पुरुष आहेत त्यांचे अवलोकन पहा . Proud

ह्ये पीकेचे हिथ कुट लिवल?....इथे कोणीही काहीपण लिहून जातो न >> पीके मुळे अवताराची गोष्ट कडे कोणाचं लक्ष गेलं नाही तो तर जास्त संवेदनशीलतेला बनवलेला वाटतोय, विषय पण जवळपास तसाच होता. जाउद्या , आता नवीन येणारा चित्रपट 'लोकमान्य 'च पाहा ,प्रोमो अगदि जबरी आहे .आणि सुबोध भावे पण.

. जाउद्या , आता नवीन येणारा चित्रपट 'लोकमान्य 'च पाहा ,प्रोमो अगदि जबरी आहे .आणि सुबोध भावे पण

+११११

Good morning.
Kaal ratri २ vajale zopayala. Pan barobar ५ vajata jag alich.

Grand new year celebration ..

खाली दिलेल्या लिन्कमधील लेख वाचा. प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते, असा लेखकाचा दावा आहे. हा नियम लावला तर वीणा सुरू ज्या श्रद्धांबद्दल बोलत आहेत, त्या श्रद्धाही अंधश्रद्धाच ठरतात. मग एवढा सारा काथ्याकूट कराच कशाला?

http://suryakant-palaskar.blogspot.in/2013/09/blog-post_1283.html

Pages