आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्द जपून वापरा मित्रांनो, अन्यथा तुम्ही ज्या पक्षाचे समर्थन करत असता त्यांचीच प्रतिमा मलीन होते.

शब्द जपून वापरा मित्रांनो, अन्यथा तुम्ही ज्या पक्षाचे समर्थन करत असता त्यांचीच प्रतिमा मलीन होते. >>>>+७८६

ऋन्मेऽऽष,

>> शब्द जपून वापरा मित्रांनो, अन्यथा तुम्ही ज्या पक्षाचे समर्थन करत असता त्यांचीच प्रतिमा मलीन होते.

+ॐ

आ.न.,
-गा.पै.

http://bollywood.bhaskar.com/news/ENT-BOL-ranbir-parineeti-arjun-kapoor-...

भरत मयेकरांनी संगीत संशयकल्लोळ सुरू करून दिले जे विषयाशी अगदीच धरून नव्हते. माझ्या वैयक्तिक दिसण्याशी आणि माझ्यासारख्या दिसणा-या कुणाशी या बाफचा काय संबंध ? मी पहिल्यापासून सांगत राहीले की एकसारखे दिसणे हा अपराध नाही. पण कुणी माझं एक ऐकेल तर शप्पथ !

पण जिचं कुणीही नसतं तिची देवी असते. देवीच्या कृपेनेच ही बातमी एका प्रतिष्ठित वृत्तपत्रात छापून आलेली आहे जी माझ्या म्हणण्याच्या पुष्टी करते. या शिवाय आणखी मोठा पुरावा काय हवा ? या लिंकवर फोटोवर क्लिक केल्यास आणखी ब-याच स्टार्स सारख्या दिसणा-या सेम टू सेम ड्युप्लिकेट्सचे फोटो दिलेले आहेत. तुमचे सर्वांचे ड्युप्लीकेट्स या क्षणी कुठे न कुठे असू शकतील.

( माझ्या फोटोवर , दिसण्यावर अनेक टिप्पण्या झाल्याने इथून पुढे माझा कोणताही फोटो मायबोलीवर मी लावणार नाही. मी व्यथित झालेले आहे. तसंच मला मदत करणारे मित्रही काही कारण नसताना दुखावले गेले आहेत).

Lol

याशिवाय आमीरचा ड्युप्लीकेट टॉम हँक्स.
जॉन अब्राहम चा ड्युप्लीकेट मुबाशीर मलिक (ब्रिटीश ब्रॉडकास्टरव लेखक)
अरबाज खानचा ड्युप्लीकेट रॉजर फेडरर (व्यवसाय माहीत नाही).
दिया मिर्झा ची ड्युप्लीकेट अ‍ॅना हॅथवे (हॉलीवूडची अभिनेत्री)
आसीन ची ड्युप्लीकेट काईला ईवेल (हॉलीवूडची अभिनेत्री)
अनुपम खेरचे ड्युप्लीकेट दिवंगत मनमोहन देसाई
पुरुषोत्तम बेर्डेचे ड्युप्लीकेट जयवंत दळवी

हे सर्व उल्लेखनीय आहेत.

राजेश के , धन्यवाद या माहीतीबद्दल.

पण शंका आहे या संज्ञेबद्दल. लूक अलाईक ही सर्वात सोपी आणि कॉमन संज्ञा आहे. प्रतिरूप या शब्दाबद्दल काही सांगता येणार नाही.

तुम्ही म्हणता ती संज्ञा जर्मन आहे आणि तिथल्या लोककथेनुसार आपल्यासारखे दिसणारे भूत जर आपल्याला किंवा कुणाला दिसले तर आपला म्रुत्यू संभवतो. थोडक्यात ती मृत्यूघंटा असते.चुकभूल देणे घेणे.
इथे आपण एकसारख्या दिसणा-या मानवी अस्तित्वाबद्दल बोलत होतो.

वीणाजी,

आपण राजेश के यांना दिलेला प्रतिसाद किंवा त्याआधी लिहीलेला प्रतिसाद ज्यात आपण इतक्या अनेक प्रसिद्ध व्यक्तिंचे लूक अलाईक कोण हे नमूद केले आहे ते पाहता आपल्याला बरीच माहिती ज्ञात आहे असे जाणवते. असे असतानाही आपणांस रॉजर फेडरर यांचा व्यवसाय माहीत नाही असे जे आपण नमूद केले आहे ते पटत नाही. आपल्या या अशा प्रतिसादांमुळेच येथील सदस्यांस आपल्या ओळखीविषयी शंका / संशय निर्माण होत आहे.

वीणाबाई, तुमच बरोबर आहे..........सारख्या दिसणार्या व्यक्ती असतात.....पण तुमच तर सगळच सारख आहे..........दोन्ही फोटोतले कपडे, गाडी, मागचे पड्दे, चेहर्यावरचे भाव, हसताना दाखवलेले दात सुद्धा.... . Uhoh ................ तुमच बहुदा त्या सलमान खानच्या जुड्वा सारखे दिसतय..... एकाने जे केल तेच दुसरा करणार..... Lol Proud ................
ह्मम........झोपलेल्याला जाग करता येत झोपेच सोंग घेतलेल्याला कस करणार ...... Uhoh

अरबाज खानचा ड्युप्लीकेट रॉजर फेडरर (व्यवसाय माहीत नाही).
>>>>>>>>>>>>>>>>>

Namaskar.jpg

रच्याकने हा कोणाचा डुप्लीकेट दिसतो सांगता का?
(ओरीजनल सांगितलात तरी चालेल)

Matt Dickinson.jpg

नाही माहीत. मी इथे फक्त माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी उदाहरणे दिली होती.
हनुवटी, ओठ, दात अक्षयकुमारखे आहेत. अजून एक हिंदी अभिनेता थोडा थोडा आठवतोय. पण अलिकडचे मूवीज बघितलेले नाहीत.

<<<<< पण शंका आहे या संज्ञेबद्दल. लूक अलाईक ही सर्वात सोपी आणि कॉमन संज्ञा आहे. प्रतिरूप या शब्दाबद्दल काही सांगता येणार नाही.

तुम्ही म्हणता ती संज्ञा जर्मन आहे आणि तिथल्या लोककथेनुसार आपल्यासारखे दिसणारे भूत जर आपल्याला किंवा कुणाला दिसले तर आपला म्रुत्यू संभवतो. थोडक्यात ती मृत्यूघंटा असते.चुकभूल देणे घेणे.
इथे आपण एकसारख्या दिसणा-या मानवी अस्तित्वाबद्दल बोलत होतो. >>>>>

हो, तो मुळचा शब्द जर्मन आहे. पण इंग्रजीमध्ये पण वापरला जातो. एकसारखे दिसणाऱ्या माणसांसाठी. लुक अलायिक हे लक्षात ठेवायला व समजायला पण सोपे आहे.
डॉपलग्यांगर चा हा एक विडीओ:
https://www.youtube.com/watch?v=9CGIG6Zy_QA

अले काय चाल्लय ले? नुश्ता धुमाकुल घालतात इथे मोथे लोक. आनी आमी लहान मुलानी काही केले की लग्गेच अन्गावर ओललतात.:अरेरे: आनी वल कुनाकुनाचे फोतो लावलेत. ते वलचे उदय चोप्ला अन्कल आहे ना? मग मी बघीतल होत त्याना धुम शिनीमात. ओलखल की नाही?

रश्मी तै Rofl
आणखी एक कलाकार आहे ना बी ग्रेड की सी ग्रेड. मागे एका सीरीयल मधे की जाहीरातीत पाहीलेला ते आठवत नाही.

कुणी तरी सिनेटर दिसतो असा असं वाटतंय. तुम्हीच सांगून टाका.
मला त्याच्यासारख्या दिसणा-या हिंदीतल्या कलाकाराचं नाव आठवल्याशिवाय चैन पडणार नाही आता. उदय चोप्राला छिन्नी हातोड्याने ठीकठाक केल्यावर कसा दिसेल तसा आहे तो.

देस्खमुख सर
सचिन तेंडुलकर माहीत नाही असं मारीया म्हणाली होतीच की.

टेनिस मधे मला इटरेस्ट नाही. क्रिकेट मधे पण नाही. एक टेनीस खेळणारी अ‍ॅना कुर्निकोव्हा मॉडेलिंग मुळे लक्षात राहीली आणि मारीया शारापोव्हा तिच्या फोटोंमुळं. मार्टिना नवरातिलोव्हा वर खूप लिहून आलेलं. तिच्यापासून प्रेरणा मिळत असल्याने ती सुद्धा माहीत आहे आणि लहान असताना बोरीस बेकर खूप आवडलेला. टेनीस च्या घडामोडी फॉलो नाही करत.

Pages