१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
ऊस डोन्गा परी रस नव्हे
ऊस डोन्गा परी रस नव्हे डोन्गा, काय भुललासी वरलीया रन्गा.
अहो कोकणस्थ माझे ठीक होते की मी त्याना ज्येष्ठ समजले आणी त्या परदेशात राहील्यत असे वाटल्याने म्हणले मायबोलीशी नाते निर्माण झाले असेल. पण तुम्ही स्वतःची अशी अवस्था का करुन घेतलीत?
तर वीणा ताई/ दादा आता तुम्ही प्रकट व्हा. तुमचा हा अवतार म्हणावा तितकासा कार्यसिद्ध झालेला नाहीये. अजून उणीव भासत आहे. ती पूर्णत्वाला न्या, नाहीतर पार राणी पद्मिनीपासुन डायना पर्यन्त सगळ्यान्चे फोटु लावावे लागतील.
आणी मग सगळे मृतात्मे येऊन एकच गाणे म्हणतील. तुम पुकार लो, तुम्हारा इन्तजार है!
रश्मी ताई मी सहज म्हणून
रश्मी ताई
मी सहज म्हणून प्रोफाईल चाळले आणि धक्काच बसला. इथं गुमनाम वावरणारे किती तरी जण आहेत. सुरेख बाई पण कोण आहेत हे नक्की माहीती नाही. इब्लीस यांचे पण नाव नाही. गामा पैलवानांचे नाव नाही. असे बरेच आहेत. आणि इथे मी माझ्या नावानिशी, फोटोसहीत वावरतेय ते सहन होत नाहीये असं दिसतंय लोकांना.
मी पुन्हा सांगणार नाही की हे डबल रोल सारखं प्रकरण आहे ते. काय बै एकेकाचं .
रश्मी ताई तुम्ही तरी स्त्री च
रश्मी ताई तुम्ही तरी स्त्री च आहात ना ख-या खु-या ?
हो आहे. पण तुम्ही गेलेल्या
हो आहे. पण तुम्ही गेलेल्या बाईन्चा ( मयेकरानी दिलेल्या लिन्कमधला) फोटो लावल्याने सन्शय वाढणार नाही का?
मी पुन्हा सांगणार नाही की हे
मी पुन्हा सांगणार नाही की हे डबल रोल सारखं प्रकरण आहे ते. काय बै एकेकाचं .>>
"क्रिम रोल" आणि "डबल रोटी" हे दोन वेगवेगळे पदार्थ माहिती होते, आता हे "डबल रोल" काय प्रकरण आहे ब्वॉ????
सारख्या दिसणा-या व्यक्तीत
सारख्या दिसणा-या व्यक्तीत एखाद्याचा आधी म्रुत्यू होऊ शकत नाही का रश्मी तै ?
(संशयकल्लोळ राहू द्या. पण मी महिला आहे हे नक्की) .
अग्निपंख मला तुमच्याइतकी
अग्निपंख
मला तुमच्याइतकी विनोदबुद्धी नाही हो. लगेच कळत नाहीत विनोद.
त्या मयेकरांना काही कामधंदा
त्या मयेकरांना काही कामधंदा नाही का ? खूप राग आलाय त्यांचा.
.उगीच फुकट फौजदारी बिनपैशाची.
(हे म्हणजे ते कॉंग्रेसी लोक संशयाचं पिल्लू सोडून दंगली घडवून आणतात तसचं झालं).
Mayekar ji
To become truly happy We must have a sense of humor.
वीणा ताई एक आठवडयात पक्क्या
वीणा ताई एक आठवडयात पक्क्या मायबोलीकर झालेल्या आहेत. आणि विनोदाबद्दल म्हणाल तर "टवाळा आवडे विनोद" असे एक मराठी वचन आहे, आम्ही सर्व टवाळ आहोत तुम्ही नका एवढं मनावर घेऊ ताई.
माने तुम्ही किती संयमित
माने तुम्ही किती संयमित व्यक्तीमत्व आहात. देवी तुमच्यावर प्रसन्न होवो.

सकाळी सकाळी सुरु का
सकाळी सकाळी सुरु का
अरेच्च्या थोड्या वेळापुर्वी
अरेच्च्या थोड्या वेळापुर्वी हा धागा बंद झाला होता, पुन्हा चालू कसा काय झाला ?
अग्गं बाई !! कोकणस्थ तुम अजुन
अग्गं बाई !! कोकणस्थ तुम अजुन जिवंत ?
किती कपडे बदलून येशील रे 
दिसली बाई की विपुत पचकलेच पाहीजे का हो कोके भावोजी.
उगीच फुकट फौजदारी बिनपैशाची.

माजी आटवण कुणी काडली दक्शिना ताई
अगं बाई ! आता माझ्यावरून
अगं बाई !
आता माझ्यावरून भांडणं सुरू झालीत का ?
( मी निमित्त असेन. भांडणाची खुमखुमी जुनीच असावी असं वाटतंय). मी काही कुणाला सांगितलेलं नाही . आता हे कळायावर गंमतीत केलेल्या कॉमेण्ट्स मी एडीट करून टाकतेय.
सुरु वैनी तो फोटो बदला बै.
सुरु वैनी तो फोटो बदला बै.
त्या पेक्षा आलिया भट चा लावा
त्या पेक्षा आलिया भट चा लावा
सुट होईल
See You in the Morning.. tc.
See You in the Morning.. tc.
माझ्या फोटोअवरून तुमच्यात
माझ्या फोटोअवरून तुमच्यात एव्हढी भांडणं होत असतील तर बदलूनच निघते आता. समाजहित बघायलाच पाहीजे. कोकणस्थ ला तुम्ही उगाच दुखावलं. जमल्यास त्याची माफी मागा. छान मित्र मिळाला होता.
कोकणस्थ ना धागा १००० न्यायचा
कोकणस्थ ना धागा १००० न्यायचा आहे.मदत करतोच आहोत आम्ही.
बाईच्या वेशात जिव गुदमरत असेल नाही?
सुरेख तुम्ही कोण आहात हे
सुरेख
तुम्ही कोण आहात हे एखाद्याला माहीत असेल ना ? प्लीजच सांगा हो.
मी कोकणस्थ नाही. मला मिळालेला मित्र तुमच्या उथळपणामुळे गेला याचं मनापासून वाईट वाटतंय.
मी महिलाच आहे हे वर सांगितलेलं आहे. तुम्ही जर पुरूष असाल तर काही भलतं सलतं लिहू नये ही विनंती.
लता बाई नी एका मुलाकातित
लता बाई नी एका मुलाकातित पुढचा जन्म पुरषाचा मिळू दे अशी ईच्छा प्रगट केली होती .म्हणजे बाई पेक्षा पुरषाचा
जन्म श्रेष्ठ असावा असे वाटते.पण पुरषाची बाई होण अरे देवा...कशासाठी जिवाचा एवढा आटापिटा..
सुरेखतै तुमचा फोन नंबर मला
सुरेखतै
तुमचा फोन नंबर मला कळवा. आपण बोलूयात, भेटूयात. मग ठरवा.
कदाचित तुम्हीच पुरूष असायच्या..
तुम्ही मला पुरुष ठरवत आहात
तुम्ही मला पुरुष ठरवत आहात याचे मला अजिबात वाईट वाटत नाहिय. तुम्ही काहिही म्ह्णु शकता पण तुम्हाला वीणातै बनल्याच वाइट वाटत आहे वाटत.जौ दे.
मी तुम्हाला काहीच ठरवलेले
मी तुम्हाला काहीच ठरवलेले नाही. तुम्ही कोण आहात हे गूढ आहे, तुम्हाला कुणीच काही म्हणत नाहीये. तुम्ही का दुस-याबद्दल बोलता सुरेख "ताई" ? माझ्याकडून बंद बरं का हा विषय.
मला या पातळीला येता येत नाही क्षमस्व.
एक पोस्ट पारंपारिक्तेच्या
एक पोस्ट पारंपारिक्तेच्या बाजुने
'योगाने रक्तदाब नियंत्रित होउ शकतो' असं डॉ. डेबी कोहेन, पेनसिल्व्हानिया विद्यापिठ. यांच म्हणणं आहे.
आतातरी अखिल ब्रम्हांडाचे योगगुरु बाबा रामदेव यांना नोबेल मिळायलाच हवं....
माले इतके दिवस कुठे गडप
माले इतके दिवस कुठे गडप होतीस?
वीणाताई, >> गामा पैलवानांचे
वीणाताई,
>> गामा पैलवानांचे नाव नाही.
असं कसं म्हणता आपण! गामा पैलवान हेच माझं नाव!! फोटोदेखील माझाच आहे. १९६० साली मेलो तरीही परत २०१३ साली मरायला टेकलो होतो. असंच असतं मायबोलीवर!
आ.न.,
-गा.पै.
अरेरे किती हा नारदीय उद्योग!
अरेरे किती हा नारदीय उद्योग!
जनाची वा मनाची कसलीच न बाळगता आपल्या डुप्लिकेट आयडीचा पर्दाफाश झाला, तरी तितक्याच निगरघट्ट्पणे आपला अजेंडा रेटत रहाण्याचा कार्यक्रम करणार्या व्यक्तीची ओळख इथे सगळ्यांना ठाऊक झालेली आहेच. मयेकरांना नावं ठेवताना हळूच फुसकुल्या सोडण्याची कुज(बुज)कट वृत्ती कुणाची बरे?
विपुतला आपुला संवाद कुणाशी बरे?
आतातरी आपला फुटका तंबोरा बंद करा, ही विनंती.
*
@ पैलवान : "वीणा"ताई नाहीत, (तंबोरा)दादा आहेत ते.
इब्लिस तुमचं खरं नाव कळू शकेल
इब्लिस
तुमचं खरं नाव कळू शकेल का ?
इब्लिस हे स्त्री आहेत असं मला
इब्लिस हे स्त्री आहेत असं मला कळालं तेव्हां धक्काच बस्सला. असो. त्यांची अडचण त्यांच्यापाशी. पण मग कशाला भोचकपणा करावा आणि कुजकट लिहावं.
या आयडीची एखादी प्रसन्न शब्द वापरलेली पोस्ट कुणी दाखवली तर एक लाख रुपये इनाम द्यायला तयार आहे मी. किती गलिच्छ भाषा आणि मनोवृत्ती सुद्धा ! श्शी !!
Pages