१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
कोब्रा फिमेल असेल आणि चॅटींग
कोब्रा फिमेल असेल आणि चॅटींग करत असेल
इथे चॅटींग कुठुन आले ?
इथे चॅटींग कुठुन आले ?
पण ते चॅटींग मध्ये हम्म्म
पण ते चॅटींग मध्ये हम्म्म हम्म येते ना .. शक्यतो मुलींकडून
चांगलाच अनुभव दिसतोय
चांगलाच अनुभव दिसतोय चॅटिंगचा!!
है शाब्बास! आता गर्लफ्रेण्ड
है शाब्बास!
आता गर्लफ्रेण्ड येईल
मग फक्त एमएनसी राहिलं
शाहरुख पण.
शाहरुख पण.
चॅटींग मोस्टली मैत्रीणींशी
चॅटींग मोस्टली मैत्रीणींशी करतो, ग'फ्रेंडशी फोनवर वा प्रत्यक्ष!
सगळी मुले असेच करत असावीत.
बाकी अनुभव म्हणाल तर एकावेळी ४-५ विंडो ओपन करून सहज करू शकतो, इतका स्पीड आणि शार्पनेस आहे.
लगे हाथ एमएनसीचा उल्लेख करून
लगे हाथ एमएनसीचा उल्लेख करून घ्यायचा ना भावड्या.
चॅटींग मी काम करत असलेल्या एमएनसीमधल्या मैत्रीणींशे करतो. गर्लफ्रेण्डशी फोनवर गप्पा.
चिरंजीव ऋन्मेष, तुमचा
चिरंजीव ऋन्मेष, तुमचा पोटापाण्याचा व्यवसाय काय असावा किंवा काहीतरी असावा का असा विचार चमकून गेला मनात.
(No subject)
सॉरी रिया, नो एमएनसी गर्ल्स
सॉरी रिया, नो एमएनसी गर्ल्स प्लीज. खूप भाव खातात, आणि फक्त ईंग्लिशच बोलतात, आणि आपणही ईम्ग्लिशच बोलावे असाच हट्ट धरतात.
निरिक्षक, वाडवडिलांची एवढी
निरिक्षक,
वाडवडिलांची एवढी प्रॉपर्टी आहे की सात पिढ्या बसून खातील,
आणि मला ती चौदा पिढ्या बसून खाता येतील अशी करण्यात ईंटरेस्ट नाही.
छ्या! मी नाही बुवा ईंग्लिशमधे
छ्या! मी नाही बुवा ईंग्लिशमधे बोलत. आणि भाव तर मुळीच खात नाही
)
(एमएनसीत काम करते हे सांगायची माया स्टाईल पद्धत
थोडक्यात रि.न्हा.भिं.तु.ला.
थोडक्यात रि.न्हा.भिं.तु.ला. केस आहे.
नेमकी कशावर आणि कसली चर्चा
नेमकी कशावर आणि कसली चर्चा चालली आहे कहिच कळेना
.एमएनसी गर्ल्स आणि रि.न्हा.भिं.तु.ला. केस आहे.म्हणजे काय???
रि.न्हा.भिं.तु.ला.
रि.न्हा.भिं.तु.ला. >>>>>>रिकामा न्हावी,भिन्तीला तुम्बड्या लावी. आता तुम्बड्या म्हणजे काय हेच नाही माहीत.
निरिक्षक, न्हावी आणि केस एका
निरिक्षक, न्हावी आणि केस एका पोस्टीत साधल्याबद्दल अभिनंदन
रि.न्हा.भिं.तु.ला. हे
रि.न्हा.भिं.तु.ला. हे निरिक्षक णे स्वता:बद्द्ल लिहले आहे की पोष्टी टाकनार्या बद्द्ल.
पोस्टी टाकणार्याबद्दल.
पोस्टी टाकणार्याबद्दल.
कळाले! त्यांनी लिहलय ते
कळाले! त्यांनी लिहलय ते निरिक्षण आणि बाकिच्या पोष्टी.
निरिक्षक, वाडवडिलांची एवढी
निरिक्षक,
वाडवडिलांची एवढी प्रॉपर्टी आहे की सात पिढ्या बसून खातील,
आणि मला ती चौदा पिढ्या बसून खाता येतील अशी करण्यात ईंटरेस्ट नाही.>>>>> मला वाटत निरीक्षक ऋन्मेष बद्दल बोलतायत.
आपले निरिक्षण अचूक आहे,
आपले निरिक्षण अचूक आहे, रश्मी..जी.
चहा उकळायला ठेवलीय, गप्पा
चहा उकळायला ठेवलीय,
गप्पा मारायला कोणी असेल तर या..
अहो निरीक्षक माझ्या नावाच्या
अहो निरीक्षक माझ्या नावाच्या पुढे जी लावु नका, मी त्या पदाच्या लायक नाही.:स्मित:
ऋन्मेष, चहात आले नाहीतर सुन्ठ घाल, थन्डीचा एकदम कड्डक चहा होईल.:फिदी: गरम गरम पी.
येस आले तर मस्ट'च हवे. सुंठ
येस आले तर मस्ट'च हवे. सुंठ नाय चालत, अॅलर्जी आहे.
ती चहा नाही रे तो चहा. मागे
ती चहा नाही रे तो चहा.
मागे पण एका लेखात सांगितलेलं तुला हे
तो चहा. ती कॉफी. ते पेय.
तो चहा.
ती कॉफी.
ते पेय.
काही लोक चाय प्यायली, मध
काही लोक चाय प्यायली, मध खाल्ली, लाईट गेली असे म्हणतात.
लिंगनिरपेक्षता!
लिंगनिरपेक्षता! लिंगनिरपेक्षता!! लिंगनिरपेक्षता!!!
मास्तरः- बन्ड्या, व्याकरणातील
मास्तरः- बन्ड्या, व्याकरणातील तीन लिन्गा न्चा एका वाक्यात उपयोग कर.
बन्ड्या:- गुरुजी मग ऐका. ती शाळा, तो फळा, ते मास्तर.
बन्ड्या जमिनीवर, गुरुजीन्च्या हातात छ्डी.
Pages