भारतातील टफेस्ट 200 BRM ! - माझी लाँग डिस्टन्स सायकलींग कहाणी

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

भारतातील टफेस्ट 200 BRM !

मी गेले अनेक वर्षे सायकलींग करतो आहे, पण कधी ब्रेव्हे मध्ये भाग घेतला नव्हता. लाँग डिस्टन्स सायकलींगच्या स्पर्धा AUDAX ही संस्था जगभरात आयोजित करते. ब्रेव्हे ह्या २०० किमी ते १००० किमीच्या असतात. ह्या बद्दल तुम्हाला भारतातील वेब साईट - http://www.audaxindia.org वरून बरीच माहिती मिळू शकेन.

स्पर्धेत भाग घ्यायचे थोडक्यात नियम असे आहेत.

१. BRM ही सेल्फ सपोर्ट राईड असते. ( सोबत सपोर्ट कार घेऊ शकत नाहीत.)

२. स्पर्धा ही दुसर्‍या स्पर्धकांशी नसून वेळेशी असते.

३. रस्त्यात अनेक कंट्रोल पाँईट असतात, प्रत्येक कंट्रोल पाँईट वर त्या वेळेत पोचलो तरच आपण क्वालिफाय होतो. एक ब्रेव्हे कार्ड सुरूवातीला मिळते. प्रत्येक पॉईंटवर मग आपण स्टॅम्प घ्यायचा व शेवटच्या कंट्रोलला ते कार्ड जमा करायचे.

४. मध्येच जर एखाद्या ट्रकला / मोटारसायकलला धरून प्रवास केला असे आढळल्यास तो स्पर्धक बाद होतो.

५. प्रत्येक BRM चे तास असतात्, २०० किमी हे १३ तासात पार करायचे असतात, सायकल पंक्चर झाली किंवा बिघडली तरी ते तास बदलत नाहीत.

६. तुमच्या सायकलची तपासणी राईड सुरू व्हायच्या आधी होते. पुढचा, मागचा लाईट, हेल्मेट आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट आवश्यक. त्या शिवाय राईड सुरू करता येत नाही.

ह्या वर्षीचा सिझन आक्टोबर २०१४ ला सुरू झाला त्यामुळे मी निदान ह्या वर्षीतरी भाग घेऊ असे ठरविले. २०१३ च्या आधी मला BRM बद्दल माहिती नव्हती. नोव्हेंबर महिन्यात २०० ची एक BRM होती पण मी नेमका व्यवसायानिमित्त प्रवास करत असल्यामुळे पुण्यात नव्हतो. पण त्याचवेळी डिसेंबर ७ ला असणारी भारतातील "द टफेस्ट २०० किमी" BRM ला जायचे नक्की केले.

टफेस्ट का? तर त्या २०० किमी मध्ये ७७०० फुट गेन होता. म्हणजे एका दिवसात तुम्हाला ७७०० फुट चढावे लागणार होते म्हणून ही टफेस्ट !

शिवाय २० डिसे किंवा जानेवारी २०१५ मधील ३०० ची BRM मला करायची होती. त्यामुळे २०० ची एक केलेली असेल तर तेवढाच मानसिक आधार म्हणून मी टफेस्ट असली तरी भाग घ्यायचे ठरविले. आणि मांढरदेवी एकदा स्केल करूया असे लिहिले आमचा सायकल राईड ग्रुप तसा बराच अ‍ॅक्टिव्ह आहे. ( १०० किमी च्या राईडला २०० मेसेज येतात ते जाऊ द्या !) आमच्या वॉटस अ‍ॅप ग्रूपच्या काही मेंबर्स नी (सुधाकर, मनोज ह्यांनी २०० BRM च्या केल्या आहेत. पण जेंव्हा सगळ्यांना ही प्रॅक्टीस राईड करायला जमणार होते, तेंव्हा मला जमले नाही. त्यामुळे मला "साईट सिईंग" ची संधी मिळाली नाही.

होता होता रजिस्ट्रेशन सुरू झाले. मी आणि अमित ऑलमोस्ट फिक्स होतोच पण इतरांचे नक्की होत नव्हते. तेंव्हा ग्रूप मॉरल वाढविण्यासाठी अमित ने " What are you scared off" असा संदेश पाठविल्यामुळे लोकं पटापट तयार झाले. मनोजच्या बाईकला थोडा अपघात झाल्यामुळे तो येणार नव्हता. अमित, केदार दीक्षित, राहूल (लान्स) लोखंडे व सुधाकर आणि मी असे आम्ही ५ जण एकाच ग्रूपचे सोबत असणार होतो.

BRM मार्ग !

फेसबुक पेज !

वेळ सकाळी ६ ते रात्री ७:३०

मार्ग - बानेर - कात्रज (घाट) - कापुरहोळ - भोर - मांढरदेव घाट (चढ व उतार) - वाई - परत मांढरदेव घाट (चढ व उतार) - भोर - कात्रज, बानेर

Rating Start/End Points Length Start/End Elevation Avg Grade
Cat 2 18.21 km/28.42 km 10.21 km 560 m/972 m 4.0%
Cat 1 64.34 km/83.75 km 19.41 km 600 m/1,237 m 3.3%
Cat 2 99.96 km/117.97 km 18.01 km 705 m/1,238 m 3.0%
Cat 2 149.09 km/173.20 km 24.11 km 600 m/982 m 1.6%

मी खरे तर BRM साठी काही तयारी केली नाही ! त्या आधीच्या नोव्हेंबर २०१४ मध्ये मी ऑलरेडी ५ सेन्चूरी प्ल्स राईड करून ९१३ किमी अंतर पार केले होते त्यामुळे मला विशेष काही करतोय असे वाटले नाही. त्या आधीच्या आठवड्यात सोलो सिंहगड नॉनस्टॉप क्लाईंब राईड केली.

होता होता ६ डिसें उजाडला आणि मी ५ ला घरून निघून बाणेरला सायकल घेऊन पोचलो. यथावकाश सर्व चेक्स झाले पण माझे रिफ्लेक्टिव्ह जॅकेट मनोज आणणार होता. तो आलाच नाही. त्याला कॉल केला तर तो तेंव्हा उठला ! ऑलमोस्ट सकाळचे ६ वाजत आले होते पण माझ्याकडे वेस्ट नव्हते. तितक्यात केदार दीक्षित आला नी म्हणाला के त्याच्याकडे आहे ते. थँक गॉड. ती अडचण पण टळली.

बाणेरला पोचायचे कसे, ह्यावरून ग्रूप मध्ये बरीच चर्चा झाली होती आणि काहींनी ते वेळापत्रक नीट न पाळले किंवा कन्फुजन झाले त्यामुळे लोक नेमके उशीरा येऊन पोचले. अगदी ६ च्या सुमारास अमित आणि राहूल पोचले. आम्ही सर्व ऑलरेडी तयार होतो. आयोजकांनी सुरू करा असे सांगीतले पण अमित आणि राहूलच्या सायकलचे चेक अजून व्हायचे होते, तो दिलदार पण म्हणाला, की पुढे व्हा. आम्ही मग सर्व स्पर्धक पुढे निघालो.

एकूण १९ स्पर्धकांनी भाग घेतला. आम्ही त्यांना सोडून कात्रजच्या दिशेने निघालो, तेंव्हा ग्रुप मधील सुधारकरला मी म्हणालो की आपण एकमेकांचा ड्राफ्ट घेऊ शकतो. त्याला ड्राफ्ट कन्सेप्ट संमजावून सांगताना दुसरा एक स्पर्धक अर्जून हे सर्व ऐकत होता.

चढ असले की मला बहुदा जोम चढतो. चांदणी चौक पार करेपर्यंतच माझ्यात अन सोबत चालविणार्‍यांमध्ये अंतर वाढले. आणि बिलिव्ह इट ऑर नॉट चांदणी चौक चढताना तो सुधारकच्या पाठीमागे ड्राफ्ट मध्ये होता. मी अर्थातच पुढे. सिंहगड रोड येईपर्यंत सुधाकर आणि माझ्यात अंतर पडले.

मी आणि अर्जून आता सोबत होतो. (पेक्षा तो माझ्या ड्राफ्ट मध्ये होता. आणि एनर्जी सेव्ह करत होता). कात्रज जसा लागला तसा मी लोअर गिअर मध्ये हाय कॅडन्स घेऊन कात्रज पार केला आणि अर्जूनला व आणखी एकाला खूप मागे सोडले.

नसरापूरला मी एकाला विचारायला थांबलो की कापूरहोळ किती किमी आहे, तितक्यात ( त्या ५ एक मिनिटात) अर्जून परत आला आणि परत एकदा ड्राफ्ट मध्ये ! आता मला त्याचा त्रास होऊ लागला. पार्टनर म्हणून करायचे असेल तर माझी हरकत नव्हती, पण मग मलाही ड्राफ्ट मिळायला हवा होता.

आम्ही दोघे पहिल्या कंट्रोलला येऊन पोचलो तेंव्हा सकाळचे ८:४० झाले होते. पहिला कंट्रोल ५९ किमी अंतरावर होता. हा कंट्रोल पाँईट केवळ १० वाजे पर्यंतच असणार होता. स्पर्धा २० मिनिटे ऊशीरा सुरू झाली त्यामुळे मी हे अंतर साधारण २ तास २० मिनीटात कापले होते. ज्यात एक घाट होता. माझ्या सोबत तेथे बाकी ५ लोक पोचले. तिथे साधारण १०-१५ मिनिटे ब्रेक घेऊन ज्युस व एक केळ घेऊन मी परत तयार झालो.

तिथून अर्जून, दुसरा एक राहूल, होले अण्णा आणि त्यांचे मित्र (नाव विसरलो) असे आम्ही सोबत निघालो. निघताना मला सुधाकर दिसला. "जोशी, पळू नका असे त्याने म्हणल्यावरही मी त्याला "जय महाराष्ट्र" करून निघालो. Happy

भोर ते मांढरदेवी (घाट सुरू होईपर्यंत) देखील चढच चढ आहे. हलका चढ असला तरी सारखे चढ असल्यामुळे ऑलरेडी थकायला झाले. होता होता आणखी २० किमी संपले आणि मी घाटाच्या पायथ्याशी येऊन पोचलो. इथून पूर्ण घाट चढायचा होता !

पायथ्याशी थांबून एक डार्क चॉकलेट काढले आणि पाण्यासोबत गट्टम केले. इथे मी एकटाच होतो. कारण अर्जूनच्या ड्राफ्ट टॅक्टिज मुळे मी वैतागलो आणि भोर पासून जोरात निघालो ते सोलो पुढे गेलो. तो खूप पाठीमागे राहिला. माझ्या कैलास यात्रेतील " ॐ नमो पार्वती पते" अशी जोरात हाळी देऊन परत स्वार झालो. (आय बिलिव्ह थकल्यावर असे जोरात ओरडेल की स्ट्रेस कमी होतो. बट अगेन इट माय थिंग, यु डोन्ट निड टू बिलिव्ह Happy ) आणि पहिलाच हेअर पीन लागला. लागला म्हणजे काय, जोरात लागला ! सॅडल मधून उठून जोरात पैडल मारत निघालो. पाठीमागे दोघे जण दिसले. थोड्यावेळाने त्यांनी जोरात येऊन मला पाठीमागे टाकले. मी विचार केला की हाय गिअर मध्ये का मारत आहेत? बसणार हे लगेच. आणि ते खरेच झाले समोरच्या दोन डोंगरांनंतर थकून बसलेले दिसले. त्यांच्यापाशी हळू करून व्यवस्थित आहे का हे विचारून पुढे निघालो आणि टॉप पाशी येऊन थांबलो. सुंदर दृष्य दिसत होते. तितक्यात ते दोघे ही आले. मग आम्ही तिघे सोबत निघालो. होले अण्णा आणि त्यांचे मित्र दोघेही हडपसरला राह्तात. ५० शी मध्ये आहेत. पण काय स्टॅमिना !! आम्ही मग वाईला येऊन पोचलो तेंव्हा ११:४० झाले होते. वाई आले म्हणजे १०० किमी संपंले होते. हुर्रे !

चेक पाँईटला यायच्या ८ किमी आधी मला डॉन दिसला, तो परत जात होता. तो पहिला होता म्हणजे त्याच्यात अन माझ्यात किमान १६ किमीचे अंतर होते. सकाळी जेंव्हा डॉन सोबत गप्पा मारल्या तेंव्हा तो म्हणाला दुपारच्या आत भोर - वाई अन मांढरदेवी कर. तर बर पडेल. हा माणूस प्रो लिग मध्ये आहे. त्यामुळे ही कॅन डू इट. बट द गूड पार्ट इज मी रूकी असूनही त्याच्यात अन माझ्या १६ एक किमीचे अंतरच होतो. गुड !

चेक पाँईटला आम्ही तिघे पोचलो. वाई गावात स्पिड पूर्णच गेली. बस स्टॅन्डपाशी हा पाँईट आहे. तिथे ज्याने गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये सलग १६५०० किमी चालवून स्वतःची नोंद करवून घेतली तो प्रसाद एरंडे होता. त्यानेही सांगीतले की तुम्ही व्यवस्थित स्पिड मध्ये आहात. कॅरी ऑन. तिथे आम्ही तिघे अन दुसरा एक केदार टी (रादर तिसरा केदार) आणि त्याचा मित्र होता. म्हणजे डॉन नंतर आम्ही ५ जण एकत्र तिथे. सेकंड बॅच. नॉट बॅड ऑन पर्सनल फ्रंट. तिसरा केदार न त्याचा मित्र काही न खाता निघाले.

मी, अण्णा आणि त्यांचे मित्र ह्यांनी वेळ असल्यामुळे इडली खायचा निर्णय घेतला जो खूप चांगला ठरला. आम्ही तिघांनी इडली खाल्ली आणि निघालो माझ्या ग्रूप मधील सुधाकर, केदार दीक्षित, राहूल अन अमित ह्यांचा पत्ता नव्हता आणि मला त्यांची काळजी वाटू लागली की हे लोकं कुठे आले असावेत.

आम्ही तिथे परत निघालो. भोर - मांढरदेवी - वाई मध्ये एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे दोन्ही कडून टॉप पर्यंत, भोर ते मांढरदेवी अन वाई ते मांढरदेवी घाट सुरू व्हायच्या आधी देखील चढच आहे. साधारण १२-१३ किमी परतीच्या प्रवासात मला अमित दिसला. किप इट रोलींग असे ओरडून मी त्याला बाय केले. पुढे आणखी ३-४ किमी मध्ये राहूल, सुधाकर पण दिसले. दुसरा राहूल जो मला पहिल्या चेक पाँइटपाशी भेटला तो मी चढत असताना परत भेटाला, तो म्हणाला, की मी सोडतोय, खांदा दुखतोय माझा.

आम्ही तिघे घाट सुरू व्हायच्या आधी थांबलो. आणि परत चढायला सुरू केले. ते दोघे माझ्या पुढे गेले. मी घाटात ह्यावेळी दोन मिनिटे परत थांबून इलेक्ट्रॉल घेतले आणि निघालो. समोरच्या टर्न वर मला चार लोकं दिसले असे वाटले. कदाचित तो गोंधळ असेल (थकल्यामुळे) असे वाटले पण मी जसे जसे पुढे जाऊ लागलो तसे तसे स्पष्ट झाले की पुढे तिसरा केदार आणि त्याचा मित्र व होले अण्णा व ते त्यांचे मित्र आहेत.

तितक्यात केदार दिक्षीत दिसला. तो घाट उतरून वाई कडे निघाला होता. त्याने जोरात ओरडून, " केदार डोन्ट गिव्ह अप" असे काहीतरी मला म्हंटले. त्याच्या त्या शब्दाचा खूप आधार मिळाला. तो ऑलमोस्ट स्पर्धेतून बाद होऊनही वाई कडे जातोय हे बघून मलाही चैतन्य मिळाले. थंब्स अप करून घाट चढायला सुरू केली.

तिसरा केदार आणि त्याचा मित्र हे पण प्रो आहेत. होले अण्णा व त्यांच्या मित्र ह्यांनी ऑलरेडी ६००, २००, ३०० च्या बिआरएम केल्या आहेत. आणि डॉन तर डॉनच आहे. म्हणजे मी एकटाच त्या सगळ्यासोंबत होतो, ज्याने एकही BRM केली नाही. तिसरा केदार निदान चार वेळा म्हणाला, की तू फारच स्ट्राँग आहेस, यु आर रायडिंग सुपर्ब. मग आम्ही टॉप वर कंट्रोल पाँईटपाशी थांबलो आणि विश्रांती घेतली. आता घाट चढून झाले होते. भोर येई पर्यंत उतार आणि मग बायपास. फक्त ८० किमी राहीले होते.

तिसरा केदार पुढे निघाला. ५ एक मिनिटांनंतर आम्ही तिघे निघालो. केदारचा मित्र जेवण्यासाठी थांबला. आम्ही पुढे आल्यावर ते दोघे परत थांबले आणि मी घाटात टाईम रिकव्हरी करायचे ठरवून ५० किमीच्या स्पिडने खाली आलो. भोरच्या आधी मी तिसर्‍या केदारला क्रॉस केले. त्यासोबत थोडावेळ सायकल चालवली. तो म्हणाला की पुढे जा, तो येईन दमाने. मग मी पुढे निघालो. भोर आता १० किमी होते. स्पिड मेंटेन करून मी भोर मध्ये पोचलो.

आता मी सोलोच होतो.

आणि घोळ झाला ! इथून दोन रस्ते पुण्याकडे येतात. आणि मी आल्यावाटेने कापूरहोळचा रस्ता न घेता दुसर्‍या रस्त्याने पुढे निघालो. पुढे गेल्यावर मला आठवले की भोर मध्ये पुलापाशी कुठे तरी वळायचे होते हे वाचले. मी एकाला विचारले पुण्याकडे हाच का? तर तो ही हो म्हणाला. पुणे ७२ किमी असे दिसत होते. अजून पुढे गेलो. पण मनात गणित जुळत नव्हते घाटापासून ८० जायचे होते आणि मी २० क्रॉस केल्यावरही अजून ७२ ! मग एकाला विचारले की कापूरहोळ इकडंच का? तो म्हणाला, नाही !! झाले ! मी ५-७ किमी पुढे आलो होतो. मग काय? परत मागे फिरलो. एका दुचाकी स्वाराने सांगीतले की दोन लोकं कापूरहोळ कडे गेलेली त्याने पाहिली. म्हणजे मी घाटापासून ५-६ किमी गेन केले होते ते तर गेलेच आता उलट जाऊन परत जायचे !! मग काय. भोर कडे निघालो परत.

भोर मध्ये पोचून दोनदा कापूरहोळचा रस्ता विचारला आणि निघालो. भोर ते कापूरहोळ मध्ये एक छोटा घाट आहे. ( तो नेकलेस पाँईटचा) तिथे आलो आणि अचानक थकलो. हा थकवा कुठून आला हे माहिती नाही. कारण ऑलमोस्ट मी दुसरा होता आणि आता ६ वा झालो असणार आणि फुटकात एनर्जी घालविली हे कुठे तरी मनात चालू होते.

तिथे ५ मिनिट उकिडवा बसलो आणि जोरात एकदा ओरडून चल केदार, फक्त ५२ असे म्हणून टांग मारली. ही एनर्जी बायपास लागे पर्यंत टिकली. बायपास लागला. आता पुणे ४० किमी होते आणि मी परत गळाठलो होतो. कारण गेले ३० एक किमी मी " सोलो रायडींग, अगेन्स्ट द विंड " करत होतो.

तिथे एक रसवंतीगृह दिसले. तिथे थांबलो. तोंड धुतले. मस्त पैकी थंडगार पाणी डोक्यावर टाकले आणि थंड्गार (बर्फाच्या क्वालिटीची पर्वा न करता) रस प्यालो दॅट वॉज इट ! सुगर इनटेक मुळे इनर्जी मिळाली आणि " जय बजरंगा, हुप्पा हुय्या" करत मी परत टांग मारली.

तेंव्हा ४:४५ वाजले होते. आता घाई करणे मस्ट होते. अजूनही ३ तास असले तरी मला बेस्ट पॉसिबल टाईम द्यायचा होता.

मी सहज जी पीस मध्ये पाहिले. तर मी ऑलरेडी ९५०० फुट गेन केले होते. म्हणजे BRM राईड मध्ये जे ७७०० फुट होते ते केवळ घाटाचे होते, इतर चढ नाही !! आणि अजून कात्रज यायचा होता. तसेच जोरात निघालो.

एका कारवाल्याने येऊन सांगीतले की तुमचे जॅकेट रसवंतीवर विसरले. च्यायला, म्हणत मागे आलो आणि रसवंतीवर येऊन जॅकेट पाहिले तर ते माझे नव्हतेच. फुकट मागे आलो! म्हणलं चल भाऊ आता जी काही एनर्जी रिझर्व्ह मध्ये आहे, ती येऊद्यात.

कात्रज अजून पार करायचा होताच. थोडा पुढे आलो तर टेम्पो मध्ये चौघे स्पर्धक सायकली घेऊन परत जात होते. राहूल की केदार ने मला हाक मारली आणि किप इट अप असे म्हणाले. ते ऐकून मी स्पिड वाढवला आणि पाहतो तर काय, आय वॉज अ‍ॅट वारजे माळवाडी !! सहा वाजले होते. अजून दोन तास होते आणि केवळ ११ किमीच जायचे होते.

आणि इथेच एका हौशी सायकल वाल्याने मला ऑलमोस्ट यमसदनास पाठविले ! तो माळवाडीहून माझ्या पाठीमागे लागला. (कारण मी त्याला पाठीमागे टाकले होते.) त्याला एका रेस वाल्याला ( कारण सायकलवर नंबर्स होते!) हारवायचे होते. त्याने मला ओव्हरटेक केले आणि तो हळू चालवू लागला. मला पुढे जायचे होते म्हणून मी त्याला ओव्हरटेक करणार इतक्यात त्याने सायकल उजव्या बाजूला घेतली आणि (मी त्याच्या उजव्या बाजूला होतो) मी एका मोठ्या कंटेनरला संमातर झालो. माझा खांदा घासला गेला. मी त्या सायकलवाल्याकडे पाहिले आणि पुढे येऊन थांबलो कारण त्या गडबडीत माझा आधीच दुखत असलेला उजवा पाय, त्याची काफ मसल एकदम एका बाजूला गेली होती. मी थांबून पाय चोळू लागलो, तो ही थांबला. त्याने सॉरी म्हणले. इथे माझे १०-१५ मिनिटे गेले कारण पाय खूपच दुखत होता.

तेथून निघालो. चांदणी चौकाचा चढ् पार करून बाणेरला आलो. शनिवारची प्रचंड ट्रॅफिक होती. बानेरला ट्रॅफिक पोलीसांनी नेमक्या माझ्याकडच्या लोकांना तेंव्हाच थांबवले.पोलिसाला विनंती केली, भाऊ, माझी रेस चालू आहे, जाऊ द्या. त्याने मग तात्काळ सगळ्यांना थांबवून मला सोडले !

मी कॅफे नूकला ( लास्ट पाँईट) आलो तेंव्हा ६:५० झाले होते. वेळेच्या सव्वा तास आधी मी पोचलो होतो.

तिथे पाहतो तर अण्णा आणि त्यांचे मित्र माझी वाट पाहत थांबले होते. त्यांना तिसर्‍या केदारने मी रस्ता चुकलो हे सांगीतले त्यामुळे मी वेळेत येईल की नाही ह्याची त्यांना खात्री नव्हती. बट देअर आय वॉज! आम्ही एकमेकांना अभिनंदन देत निरोप घेतला.

मी तिथे थांबून चहा प्यायचा निर्णय घेतला. सोपस्कार आटवले आणि चहा पिऊन ७.७ मिनिटाने मी आमच्या वॉटस अ‍ॅप ग्रूपला मेसेज करत होतोच, तितक्यात मनोजचा मेसेज आला " केदार इज टायपिंग असा" मी ग्रूपला कळवले की मी आलो. मला कळाले केदार दीक्षित, सुधाकर आणि राहूल ह्यांनी वाईला रेस सोडली.

अमित बद्दल अजूनही कळाले नव्हते. अमितने उशीरा सुरू करूनही वाईला मी जेंव्हा त्याला क्रॉस केले तेंव्हा १५-१७ किमीचे अंतर आमच्या दोघात होते. म्हणजे अमित येत्या एक तासात सहज येईल असे मला वाटले. त्याला शक्ती मिळू देत असे मनात म्हणून मी घरी निघालो.

घरी आल्यावर कळाले की अमितने ही वेळेत बीआरएम पार पाडली ! वे टू गो अमित !!

माझे ३०-२५ मिनिटे रस्ता चुकल्यामुळे अन १५ एक मिनिटे त्या दीडशहाण्या सायकलवाल्यामुळे गेले. मी अजून लवकर म्हणजे ६ लाच पोचू शकलो असतो बहुदा.

जी पी एस चेक केले तर मी आज एकुण ११८४६ फुट चढलो होतो !! ३६१० मिटर्स !! आणि आय वॉज मेन्टली प्रिपेअर्ड फॉर ७७००! ह्यातील एक्स्ट्रा ३५०० ने नक्कीच वाट लागली.

मला घ्यायला बाणेरला बायको गाडी घेऊन आली. तिथून गाडीत सायकल टाकून घरी आलो नी गरम पाण्याच्या शेक बॉडीला दिला. दुसरे दिवशी मस्त पैकी मसूज कडे जाऊन मसाज घेतला. सेकंड डे नाइटमेअर्स मला तरी नाही आले. अनेक सेंच्युरीज मुळे आता बॉडीला सवयही झाली असावी. आणि बॉडी हायड्रेट ठेवली होती.

एकूण १९ जणांनी भाग घेतला. पैकी फक्त १३ जण वाईला वेळेत पोचले. आणि फक्त १० जण परत पुण्याला वेळेत पोचले. त्यापैकी दोघे म्हणजे अमित आणि मी.

BRM.jpg

ब्रेक्स सहीत साडे अकरा तासात मी ही बीआरएम पार पाडली. द अ‍ॅव्हरेज स्पिड डोन्ट डू जस्टिस हिअर कारण ११८०० फुट तुम्ही ३० किमी प्रति तासाने चढू शकत नाहीत. द टफेस्ट बिआरम (११८०० फुट क्लाईंब)ची ही कहाणी सफळ,संपूर्ण. आता वेध आहेत ते ६०० किमी BRM चे !!

शब्दखुणा: 

केदार भाउ, तुम्हाला मानाचा मुजरा ! मी मरत मरत पुर्ण केली. तु रस्ता चुकुन पण निवान्त मारलीस. रोड बाइक घेतलीस कि मग विचारायलाच नको. अत्तच तुझी स्वाक्षरी घेउन ठेवतो.
लेख मस्तच जमलाय बाकी. परत एक्द अभिनन्दन रे.

खतरोंके खिलाडी >> Lol हे म्हणजे आता मी आगीच्या गोळ्यातून वगैरे सायकल चालवत आहे असे वाटले.

दोन स्टॉप उलटे चालत जाऊ शकतो. >>. चालाल तरच चालाल. Happy

अमित भाऊ तुम्हालाही मानाचा मुजरा. तू पूर्ण केलीस ह्यातच सर्व आले. तुझी कहाणी लिहून काढ आता. Happy

मला शारिरीक क्षमतेपेक्षाही जास्त कौतुक, असलेल्या क्षमतेचा सलग दहाबारा तास वापर करताना आलेले मानसिक ताणतणाव, एकलेपण, धाकधूक यावर कोणत्या निश्चयाने व कशी मात केली असेल, याचेच कौतुक जास्त वाटते.
अनेकवेळा वाटून गेले असेल की परत फिरावे, काय हा वेडेपणा करतोय आपण, हो अन आपण एकटेच जातोय रस्त्याने, बाकि कुणीच नाही, थकावटीमुळे, वेळेचे गणित प्रसंगी चूकल्यामुळे निराशाही दाटून आली असेल, हे करतोय, याचा फायदा काय मला असा व्यावहारिक विचारही मनात रेंगाळून गेला असेल, या सगळ्या विरुद्ध विचारप्रवाहांशी सामना करणे हे उलट्या वार्‍याशी सामना करण्यापेक्षाही अवघड.
ते कसे केले ते वाचायला आवडेल.

ऑटोग्राफ प्लीज केदार ! वाचतांना दम लागला.... ग्रेट आहात !
तुमच्याकडे पाहुन खूप स्फुर्ती मिळतेय.

अभिनंदन, अभिनंदन आणि पुनश्च अभिनंदन ....
अमित, तुमचेही अभिनंदन!

वर्णन मस्त जमलंय ... Happy

पुढच्या रेस साठी अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ...

तुम्हा लोकांच्या सायकलिन्गच्या कहाण्या वाचून त्यापासून स्फुर्ती घेऊन व इर्ष्या जागवत एक छोटा प्रयत्न केला.
काल २६ जानेवारिला आमच्या कंपनीची सायकल रॅली चांदणी चौक ते पुणे युनिव्हर्सिटी अशी असते सकाळी.
ती दोन तास रेंगाळत पुर्ण करून, मग मात्र पुणे युनिव्हर्सिटी ते निगडी हे १८ कि.मी अंतर औंध रोडने सायकलने ५५ मिनिटात कापले, ताशी १९ किमी वेग पडला.
आधीची रेंगाळत वाया गेलेली २ तासातील एनर्जी व तुडुंब नाष्टा करुन लगेच निगडीस निघणे वगैरे कारणांमुळे वेग कमी पडला. तसेच औंधयेथील नदीवरील राजीव गांधी पुलापासून पुढे अगदी निगडीत पोहोचेस्तोवर सतत सलग चढच आहे, वारा उलटा होता वगैरे अन्य कारणे.
तरीही बर्‍याच म्हणजे वीसबावीस वर्षांनंतर पहिल्यांदाच सायकलने इतके मोठे अंतर चालविलेले, तेव्हा मनात धाकधूक होतीच की कितपत झेपेल/जमेल. दोन आघाड्यांवर शर्थ करावी लागते, एक म्हणजे शारिरीक व दुसरी मानसिक. ते जमले. आता हळू हळू दहा पंधरा किमी अंतराच्या जवळपासच्या फेर्‍या मारून स्टॅमिना वाढवीत न्यायचे मनात आहे.
एकना एक दिवस, या केदार किंवा अजुन असेच कुणा सोबत कोणत्यातरी बर्‍यापैकी मोठ्या रेसमधे भाग घ्यायची इच्छा आहे. बघु, जेव्हा शक्य होईल तेव्हा होईल.

धन्यवाद हर्पेन.
या अशा शर्यतीत भाग घेताना रजिस्ट्रेशन फी वगैरे खर्च कितीक असतो? मला त्या साईटवर ती माहिती मिळत नाहीये. (कायेना, की आधी खर्चाचे बजेट/तरतुद बघावी लागते, मग त्यानुसार स्वप्ने रचावी लागतात Proud नशीब आमचे ! )

खतरनाक !!!
कधी सायकल, कधी कार.... नोकरी काय फावल्या वेळात करता की काय? Happy

स्टॅमिना झकास .... शब्दच नाही.

धन्यवाद ललिता, अग पण हा धागा केदारचा आहे.
आपण त्याचे अभिनंदन करू अन त्याला इथे ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देऊ.
त्याने दिलेली साईट बघुन घेतली. आता रजिस्टर वगैरे करेन निवांतपणे. एकतरी २०० ची करायचीच असा बेत आहे. सलग दोनचार महिने सराव करावा लागेल. किमान साधी गिअरची तरी सायकल पैदा करावी लागेल. आत्ता विदाऊट गिअर वापरतोय मुलाची. साधी आहे एकदम पण पळते मस्त. मोठ्या शर्यतीत चढावर/घाटात हाल होतील म्हणुन गिअरची.

अरे मी त्या अ‍ॅडॉक्सच्या साईट वर रजिस्टर केले मगाशी. पेमेंट डेबिट पडल्याचा मेसेज आला बॅन्केकडून. पण नेमकी तेव्हा आमच्या इथले नेट कनेक्शन बोम्बलल्याने पुढे काहीच कळले नाही. आता वाट बघु ना इमेल ची?

हो येईल पण आता का रजिस्टर केले उगाच. एन्ड ऑफ सिझन आहे हा. आक्टो मध्ये केल्यावर त्याचा जास्त फायदा होतो. प्रत्येक राईडचे रजि. चे पैसे द्यावे लागत नाहीत, फक्त राईडचे द्यावे लागतात. पर राईड प्रमाणे (मार्च २९ -२००) १५० रु देऊनही रजी. करता आले असते की.

अस आहे का? मला वाटले की ५०० चे रजिस्ट्रेशन कम्पलसरी आहे. अन काये ना, की आता निदान ते ५०० वसुल करण्याकरता तरी भाग घेतला जाईल... Proud
अरे गिअर बसवले मागल्या चाकाचे, ते चांगले आहेत, पण मांडीपासचे पुढले गिअर बरोबर नाहीयेत, सर्वात मोठे चाकही फारच छोटे, वीतभर व्यासाचेही नाही. त्यामुळे विदाऊट गिअर सहज ३०/३२ चा स्पीड घेत होतो, तर आज २४/२५ घेतानाही घाम फुटला. आता काहीतरि जुगाड करुन पुढे मान्डीपाशी मोठे व्हिल बसवायचे बघतो. कोपर्‍यावरच्या फुटपाथवरील सायकल वाल्याने बहुधा त्याचेकडचे असलेले जुने लहान मुलांच्या सायकलचे बसवलेले दिसते. त्याला नै जमले तर सरळ मीच जाऊन आणिन. पण दुकानात फार किमती सांगतात रे उगाचच्या उगाचच, ते ही गिर्‍हाईक बघुन. एनिवे.
गिअरच्या लिव्हर कुठे सेट करणे सोईस्कर ठरेल?

पुणे गृपचे टाईमटेबल बघितले, मार्च मधिल जमणे अशक्य आहे. २ मेची ऐन उन्हाळ्यातिल, कसे शक्य होणार? नंतर जून मधिल तारीख आहे (१५ जुन?), पण पावसाळा अन भन्नाट वारे..... एकंदरीत या सिझनला इथुन पुढे भाग घेणे अवघडच आहे, तरी रजिस्ट्रेशन करुन ठेवले ! तेव्हडेच मानसिक दडपण राहील की ५०० वसुल करायला हवेत. (व्हायलाच हवेत असे नाही) पण किमान ऑक्टो. पासूनच्या नविन सिझन पर्यंत जे साताठ महिने जातिल तोवर डोक्यातील सायकलिंगची हवाच निघुन जायला नको, म्हणुन रजिस्टर करुन ठेवले.

त्यामुळे विदाऊट गिअर सहज ३०/३२ चा स्पीड घेत होतो >>

आयला ३० -३२? तू मग लै भारी आहेस. पुण्यातले रेसर म्हणवणारे ३२-३५ च्या स्पिडचे आहेत.
सलग एक तास ३० ठेवणे हे आता मी करतोय. ३०, ३१ . आणि मध्येच ४० चे काही मिनिट पण जर तुला आत्ताच जमतेय तर तू मुळातच फास्ट दिसतोयस. सायकलींग मध्ये करियर करायला हवे होते.

धन्यवाद मानुषी

>>>> सलग एक तास ३० ठेवणे हे आता मी करतोय. <<<<
अरे यार, दम्यामुळे हे सलग ठेवणेच जमले नाही/जमत नाही ना... Sad त्याचाच सराव करतोय. सलग २२ ते २५ दरम्यान राहू शकलो तरी खूप झाले अन तरच भाग घेईन. पूर्वी रग होती अंगात तेव्हा २४" सायकलवर सुसाट जायचो. पण सराव केला अन सायकल चांगली मेंटेन केली तर ३० अवघड नाही.

माझा एक मित्र आहे, जोशीच, माझ्यापेक्षा ४/५ वर्षानेच लहान, पण त्याचे सायकलिंग अजुनही चालूच आहे २२" जुन्या सायकलवरून, चढ असो की उतार, तो रेटत रेटत माझ्याही पुढे जातो ताकदीने. आता त्यानेही गिअर बसवुन घेतलेत मागल्या चाकाचे त्याच सायकलला. फरक पडतोय म्हणाला.
मी त्याला सांगितले की आपल्याला लहान मुलांच्या सायकलीसारखे चढावरचे गिअर फार लागणारच नाहीत, हातापायाची मस्क्युलर पॉवर/शरिराच्या वजनाची ताकद व मागचे गिअरचे एखादे मोठे व्हील यावर चढ निभावुन नेऊ, खरा प्रश्न उतारावरील नैसर्गिक वेगापेक्षा जास्त वेग घेताना पुढे मोठे, मागे लहानात लहान व्हील हवे, तर पुढला पायाच्या व्हीलचा आरपीएम आधीच वेगात असलेल्या मागिल चाकाला अजुन गती देऊ शकेल. आपल्या वयाला आपण चढावर फार शाणपट्टी करुन चालणारच नाही अन चढावर (घाटात वगैरे) वेळ जास्त लागणार तो भरुन काढायला सपाट/उताराच्या रस्त्यावर जास्त वेग घेण्याशिवाय पर्याय नाही.
बघु, काय काय करता येतय ते. साईड बाय साईड दम्यावरही मात करत जावे लागेल. त्याला उपाय एकच की सुरवातीस वार्म अप होईस्तोवर हलकेच जायचे, व हळू हळू दमा दमाने वेग वाढवित न्यायचा जेणेकरून एकदम धाप लागणार नाही. अन एकदा ("टेम्पो आला"- टेम्पो आला, साखळी धरली, टेम्पोत गाडी चढवली अशा गामांच्या शंकेमुळे हे खोडलय... Proud उगाच गैरसमज नकोत) लय सापडली/रुळलो की मग अवघड जात नाही. नंतर बॉडीपेक्षाही माईण्ड कन्ट्रोलच जास्त करावा लागतो.

limbutimbu,

>> एकदा टेम्पो आला की मग अवघड जात नाही.

आधी वाटलं की टेम्पोच्या मागची साखळी धरून की काय! Lol लय सापडली की असं पाहिजे ना?

आ.न.,
-गा.पै.

गामा.... Rofl
मजकुरात सुधारणा केलि बरका... नशिब तुम्ही टेम्पोत सायकल चढवली की बरे वाटते ना? असे नै विचारले.. Lol

limbutimbu, अहो, खरंच की! विचारायचं राहून गेलं! Rofl

हेही वाक्यं त्याच शंकेला पुष्टी देतंय : >> नंतर बॉडीपेक्षाही माईण्ड कन्ट्रोलच जास्त करावा लागतो.

Lol

आ.न.,
-गा.पै.

केदार, नेक्स्ट BRM २०० करताचा पुढील मजकुराचा अर्थ प्लिज समजावशील का?
पुढील वाक्यातील bear शब्दाचा अर्थ left वा right शी कसा लावायचा? मराठीतून सांग ना...
Dehu Rd. bear left to Lonavla
Bear left for Ravet Rd. Jnct. of NH4 & Expway
Pune Univ bear right on Ganeshkhind Rd for SB Rd
Bear left on BMCC Rd towards Roopali

तसेच, CONTROLS च्या वेळा दिलेल्या आहेत
OPEN CLOSE
19:00 20:00 सुरु होण्याचि वेळ.
तर पुढील टप्प्याचे कंट्रोल असे दिले आहेत.
20:20 22:16
समजा एखाद्याची सुरुवात १९:३० ला झाली, तर पुढील ओपन/क्लोज कंट्रोलची वेळ ही तीस मिनिटांनी वाढेल का?
क्लोजच्या वेळेचे गणित काय आहे?

Pages