भारतातील टफेस्ट 200 BRM ! - माझी लाँग डिस्टन्स सायकलींग कहाणी

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

भारतातील टफेस्ट 200 BRM !

मी गेले अनेक वर्षे सायकलींग करतो आहे, पण कधी ब्रेव्हे मध्ये भाग घेतला नव्हता. लाँग डिस्टन्स सायकलींगच्या स्पर्धा AUDAX ही संस्था जगभरात आयोजित करते. ब्रेव्हे ह्या २०० किमी ते १००० किमीच्या असतात. ह्या बद्दल तुम्हाला भारतातील वेब साईट - http://www.audaxindia.org वरून बरीच माहिती मिळू शकेन.

स्पर्धेत भाग घ्यायचे थोडक्यात नियम असे आहेत.

१. BRM ही सेल्फ सपोर्ट राईड असते. ( सोबत सपोर्ट कार घेऊ शकत नाहीत.)

२. स्पर्धा ही दुसर्‍या स्पर्धकांशी नसून वेळेशी असते.

३. रस्त्यात अनेक कंट्रोल पाँईट असतात, प्रत्येक कंट्रोल पाँईट वर त्या वेळेत पोचलो तरच आपण क्वालिफाय होतो. एक ब्रेव्हे कार्ड सुरूवातीला मिळते. प्रत्येक पॉईंटवर मग आपण स्टॅम्प घ्यायचा व शेवटच्या कंट्रोलला ते कार्ड जमा करायचे.

४. मध्येच जर एखाद्या ट्रकला / मोटारसायकलला धरून प्रवास केला असे आढळल्यास तो स्पर्धक बाद होतो.

५. प्रत्येक BRM चे तास असतात्, २०० किमी हे १३ तासात पार करायचे असतात, सायकल पंक्चर झाली किंवा बिघडली तरी ते तास बदलत नाहीत.

६. तुमच्या सायकलची तपासणी राईड सुरू व्हायच्या आधी होते. पुढचा, मागचा लाईट, हेल्मेट आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट आवश्यक. त्या शिवाय राईड सुरू करता येत नाही.

ह्या वर्षीचा सिझन आक्टोबर २०१४ ला सुरू झाला त्यामुळे मी निदान ह्या वर्षीतरी भाग घेऊ असे ठरविले. २०१३ च्या आधी मला BRM बद्दल माहिती नव्हती. नोव्हेंबर महिन्यात २०० ची एक BRM होती पण मी नेमका व्यवसायानिमित्त प्रवास करत असल्यामुळे पुण्यात नव्हतो. पण त्याचवेळी डिसेंबर ७ ला असणारी भारतातील "द टफेस्ट २०० किमी" BRM ला जायचे नक्की केले.

टफेस्ट का? तर त्या २०० किमी मध्ये ७७०० फुट गेन होता. म्हणजे एका दिवसात तुम्हाला ७७०० फुट चढावे लागणार होते म्हणून ही टफेस्ट !

शिवाय २० डिसे किंवा जानेवारी २०१५ मधील ३०० ची BRM मला करायची होती. त्यामुळे २०० ची एक केलेली असेल तर तेवढाच मानसिक आधार म्हणून मी टफेस्ट असली तरी भाग घ्यायचे ठरविले. आणि मांढरदेवी एकदा स्केल करूया असे लिहिले आमचा सायकल राईड ग्रुप तसा बराच अ‍ॅक्टिव्ह आहे. ( १०० किमी च्या राईडला २०० मेसेज येतात ते जाऊ द्या !) आमच्या वॉटस अ‍ॅप ग्रूपच्या काही मेंबर्स नी (सुधाकर, मनोज ह्यांनी २०० BRM च्या केल्या आहेत. पण जेंव्हा सगळ्यांना ही प्रॅक्टीस राईड करायला जमणार होते, तेंव्हा मला जमले नाही. त्यामुळे मला "साईट सिईंग" ची संधी मिळाली नाही.

होता होता रजिस्ट्रेशन सुरू झाले. मी आणि अमित ऑलमोस्ट फिक्स होतोच पण इतरांचे नक्की होत नव्हते. तेंव्हा ग्रूप मॉरल वाढविण्यासाठी अमित ने " What are you scared off" असा संदेश पाठविल्यामुळे लोकं पटापट तयार झाले. मनोजच्या बाईकला थोडा अपघात झाल्यामुळे तो येणार नव्हता. अमित, केदार दीक्षित, राहूल (लान्स) लोखंडे व सुधाकर आणि मी असे आम्ही ५ जण एकाच ग्रूपचे सोबत असणार होतो.

BRM मार्ग !

फेसबुक पेज !

वेळ सकाळी ६ ते रात्री ७:३०

मार्ग - बानेर - कात्रज (घाट) - कापुरहोळ - भोर - मांढरदेव घाट (चढ व उतार) - वाई - परत मांढरदेव घाट (चढ व उतार) - भोर - कात्रज, बानेर

Rating Start/End Points Length Start/End Elevation Avg Grade
Cat 2 18.21 km/28.42 km 10.21 km 560 m/972 m 4.0%
Cat 1 64.34 km/83.75 km 19.41 km 600 m/1,237 m 3.3%
Cat 2 99.96 km/117.97 km 18.01 km 705 m/1,238 m 3.0%
Cat 2 149.09 km/173.20 km 24.11 km 600 m/982 m 1.6%

मी खरे तर BRM साठी काही तयारी केली नाही ! त्या आधीच्या नोव्हेंबर २०१४ मध्ये मी ऑलरेडी ५ सेन्चूरी प्ल्स राईड करून ९१३ किमी अंतर पार केले होते त्यामुळे मला विशेष काही करतोय असे वाटले नाही. त्या आधीच्या आठवड्यात सोलो सिंहगड नॉनस्टॉप क्लाईंब राईड केली.

होता होता ६ डिसें उजाडला आणि मी ५ ला घरून निघून बाणेरला सायकल घेऊन पोचलो. यथावकाश सर्व चेक्स झाले पण माझे रिफ्लेक्टिव्ह जॅकेट मनोज आणणार होता. तो आलाच नाही. त्याला कॉल केला तर तो तेंव्हा उठला ! ऑलमोस्ट सकाळचे ६ वाजत आले होते पण माझ्याकडे वेस्ट नव्हते. तितक्यात केदार दीक्षित आला नी म्हणाला के त्याच्याकडे आहे ते. थँक गॉड. ती अडचण पण टळली.

बाणेरला पोचायचे कसे, ह्यावरून ग्रूप मध्ये बरीच चर्चा झाली होती आणि काहींनी ते वेळापत्रक नीट न पाळले किंवा कन्फुजन झाले त्यामुळे लोक नेमके उशीरा येऊन पोचले. अगदी ६ च्या सुमारास अमित आणि राहूल पोचले. आम्ही सर्व ऑलरेडी तयार होतो. आयोजकांनी सुरू करा असे सांगीतले पण अमित आणि राहूलच्या सायकलचे चेक अजून व्हायचे होते, तो दिलदार पण म्हणाला, की पुढे व्हा. आम्ही मग सर्व स्पर्धक पुढे निघालो.

एकूण १९ स्पर्धकांनी भाग घेतला. आम्ही त्यांना सोडून कात्रजच्या दिशेने निघालो, तेंव्हा ग्रुप मधील सुधारकरला मी म्हणालो की आपण एकमेकांचा ड्राफ्ट घेऊ शकतो. त्याला ड्राफ्ट कन्सेप्ट संमजावून सांगताना दुसरा एक स्पर्धक अर्जून हे सर्व ऐकत होता.

चढ असले की मला बहुदा जोम चढतो. चांदणी चौक पार करेपर्यंतच माझ्यात अन सोबत चालविणार्‍यांमध्ये अंतर वाढले. आणि बिलिव्ह इट ऑर नॉट चांदणी चौक चढताना तो सुधारकच्या पाठीमागे ड्राफ्ट मध्ये होता. मी अर्थातच पुढे. सिंहगड रोड येईपर्यंत सुधाकर आणि माझ्यात अंतर पडले.

मी आणि अर्जून आता सोबत होतो. (पेक्षा तो माझ्या ड्राफ्ट मध्ये होता. आणि एनर्जी सेव्ह करत होता). कात्रज जसा लागला तसा मी लोअर गिअर मध्ये हाय कॅडन्स घेऊन कात्रज पार केला आणि अर्जूनला व आणखी एकाला खूप मागे सोडले.

नसरापूरला मी एकाला विचारायला थांबलो की कापूरहोळ किती किमी आहे, तितक्यात ( त्या ५ एक मिनिटात) अर्जून परत आला आणि परत एकदा ड्राफ्ट मध्ये ! आता मला त्याचा त्रास होऊ लागला. पार्टनर म्हणून करायचे असेल तर माझी हरकत नव्हती, पण मग मलाही ड्राफ्ट मिळायला हवा होता.

आम्ही दोघे पहिल्या कंट्रोलला येऊन पोचलो तेंव्हा सकाळचे ८:४० झाले होते. पहिला कंट्रोल ५९ किमी अंतरावर होता. हा कंट्रोल पाँईट केवळ १० वाजे पर्यंतच असणार होता. स्पर्धा २० मिनिटे ऊशीरा सुरू झाली त्यामुळे मी हे अंतर साधारण २ तास २० मिनीटात कापले होते. ज्यात एक घाट होता. माझ्या सोबत तेथे बाकी ५ लोक पोचले. तिथे साधारण १०-१५ मिनिटे ब्रेक घेऊन ज्युस व एक केळ घेऊन मी परत तयार झालो.

तिथून अर्जून, दुसरा एक राहूल, होले अण्णा आणि त्यांचे मित्र (नाव विसरलो) असे आम्ही सोबत निघालो. निघताना मला सुधाकर दिसला. "जोशी, पळू नका असे त्याने म्हणल्यावरही मी त्याला "जय महाराष्ट्र" करून निघालो. Happy

भोर ते मांढरदेवी (घाट सुरू होईपर्यंत) देखील चढच चढ आहे. हलका चढ असला तरी सारखे चढ असल्यामुळे ऑलरेडी थकायला झाले. होता होता आणखी २० किमी संपले आणि मी घाटाच्या पायथ्याशी येऊन पोचलो. इथून पूर्ण घाट चढायचा होता !

पायथ्याशी थांबून एक डार्क चॉकलेट काढले आणि पाण्यासोबत गट्टम केले. इथे मी एकटाच होतो. कारण अर्जूनच्या ड्राफ्ट टॅक्टिज मुळे मी वैतागलो आणि भोर पासून जोरात निघालो ते सोलो पुढे गेलो. तो खूप पाठीमागे राहिला. माझ्या कैलास यात्रेतील " ॐ नमो पार्वती पते" अशी जोरात हाळी देऊन परत स्वार झालो. (आय बिलिव्ह थकल्यावर असे जोरात ओरडेल की स्ट्रेस कमी होतो. बट अगेन इट माय थिंग, यु डोन्ट निड टू बिलिव्ह Happy ) आणि पहिलाच हेअर पीन लागला. लागला म्हणजे काय, जोरात लागला ! सॅडल मधून उठून जोरात पैडल मारत निघालो. पाठीमागे दोघे जण दिसले. थोड्यावेळाने त्यांनी जोरात येऊन मला पाठीमागे टाकले. मी विचार केला की हाय गिअर मध्ये का मारत आहेत? बसणार हे लगेच. आणि ते खरेच झाले समोरच्या दोन डोंगरांनंतर थकून बसलेले दिसले. त्यांच्यापाशी हळू करून व्यवस्थित आहे का हे विचारून पुढे निघालो आणि टॉप पाशी येऊन थांबलो. सुंदर दृष्य दिसत होते. तितक्यात ते दोघे ही आले. मग आम्ही तिघे सोबत निघालो. होले अण्णा आणि त्यांचे मित्र दोघेही हडपसरला राह्तात. ५० शी मध्ये आहेत. पण काय स्टॅमिना !! आम्ही मग वाईला येऊन पोचलो तेंव्हा ११:४० झाले होते. वाई आले म्हणजे १०० किमी संपंले होते. हुर्रे !

चेक पाँईटला यायच्या ८ किमी आधी मला डॉन दिसला, तो परत जात होता. तो पहिला होता म्हणजे त्याच्यात अन माझ्यात किमान १६ किमीचे अंतर होते. सकाळी जेंव्हा डॉन सोबत गप्पा मारल्या तेंव्हा तो म्हणाला दुपारच्या आत भोर - वाई अन मांढरदेवी कर. तर बर पडेल. हा माणूस प्रो लिग मध्ये आहे. त्यामुळे ही कॅन डू इट. बट द गूड पार्ट इज मी रूकी असूनही त्याच्यात अन माझ्या १६ एक किमीचे अंतरच होतो. गुड !

चेक पाँईटला आम्ही तिघे पोचलो. वाई गावात स्पिड पूर्णच गेली. बस स्टॅन्डपाशी हा पाँईट आहे. तिथे ज्याने गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये सलग १६५०० किमी चालवून स्वतःची नोंद करवून घेतली तो प्रसाद एरंडे होता. त्यानेही सांगीतले की तुम्ही व्यवस्थित स्पिड मध्ये आहात. कॅरी ऑन. तिथे आम्ही तिघे अन दुसरा एक केदार टी (रादर तिसरा केदार) आणि त्याचा मित्र होता. म्हणजे डॉन नंतर आम्ही ५ जण एकत्र तिथे. सेकंड बॅच. नॉट बॅड ऑन पर्सनल फ्रंट. तिसरा केदार न त्याचा मित्र काही न खाता निघाले.

मी, अण्णा आणि त्यांचे मित्र ह्यांनी वेळ असल्यामुळे इडली खायचा निर्णय घेतला जो खूप चांगला ठरला. आम्ही तिघांनी इडली खाल्ली आणि निघालो माझ्या ग्रूप मधील सुधाकर, केदार दीक्षित, राहूल अन अमित ह्यांचा पत्ता नव्हता आणि मला त्यांची काळजी वाटू लागली की हे लोकं कुठे आले असावेत.

आम्ही तिथे परत निघालो. भोर - मांढरदेवी - वाई मध्ये एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे दोन्ही कडून टॉप पर्यंत, भोर ते मांढरदेवी अन वाई ते मांढरदेवी घाट सुरू व्हायच्या आधी देखील चढच आहे. साधारण १२-१३ किमी परतीच्या प्रवासात मला अमित दिसला. किप इट रोलींग असे ओरडून मी त्याला बाय केले. पुढे आणखी ३-४ किमी मध्ये राहूल, सुधाकर पण दिसले. दुसरा राहूल जो मला पहिल्या चेक पाँइटपाशी भेटला तो मी चढत असताना परत भेटाला, तो म्हणाला, की मी सोडतोय, खांदा दुखतोय माझा.

आम्ही तिघे घाट सुरू व्हायच्या आधी थांबलो. आणि परत चढायला सुरू केले. ते दोघे माझ्या पुढे गेले. मी घाटात ह्यावेळी दोन मिनिटे परत थांबून इलेक्ट्रॉल घेतले आणि निघालो. समोरच्या टर्न वर मला चार लोकं दिसले असे वाटले. कदाचित तो गोंधळ असेल (थकल्यामुळे) असे वाटले पण मी जसे जसे पुढे जाऊ लागलो तसे तसे स्पष्ट झाले की पुढे तिसरा केदार आणि त्याचा मित्र व होले अण्णा व ते त्यांचे मित्र आहेत.

तितक्यात केदार दिक्षीत दिसला. तो घाट उतरून वाई कडे निघाला होता. त्याने जोरात ओरडून, " केदार डोन्ट गिव्ह अप" असे काहीतरी मला म्हंटले. त्याच्या त्या शब्दाचा खूप आधार मिळाला. तो ऑलमोस्ट स्पर्धेतून बाद होऊनही वाई कडे जातोय हे बघून मलाही चैतन्य मिळाले. थंब्स अप करून घाट चढायला सुरू केली.

तिसरा केदार आणि त्याचा मित्र हे पण प्रो आहेत. होले अण्णा व त्यांच्या मित्र ह्यांनी ऑलरेडी ६००, २००, ३०० च्या बिआरएम केल्या आहेत. आणि डॉन तर डॉनच आहे. म्हणजे मी एकटाच त्या सगळ्यासोंबत होतो, ज्याने एकही BRM केली नाही. तिसरा केदार निदान चार वेळा म्हणाला, की तू फारच स्ट्राँग आहेस, यु आर रायडिंग सुपर्ब. मग आम्ही टॉप वर कंट्रोल पाँईटपाशी थांबलो आणि विश्रांती घेतली. आता घाट चढून झाले होते. भोर येई पर्यंत उतार आणि मग बायपास. फक्त ८० किमी राहीले होते.

तिसरा केदार पुढे निघाला. ५ एक मिनिटांनंतर आम्ही तिघे निघालो. केदारचा मित्र जेवण्यासाठी थांबला. आम्ही पुढे आल्यावर ते दोघे परत थांबले आणि मी घाटात टाईम रिकव्हरी करायचे ठरवून ५० किमीच्या स्पिडने खाली आलो. भोरच्या आधी मी तिसर्‍या केदारला क्रॉस केले. त्यासोबत थोडावेळ सायकल चालवली. तो म्हणाला की पुढे जा, तो येईन दमाने. मग मी पुढे निघालो. भोर आता १० किमी होते. स्पिड मेंटेन करून मी भोर मध्ये पोचलो.

आता मी सोलोच होतो.

आणि घोळ झाला ! इथून दोन रस्ते पुण्याकडे येतात. आणि मी आल्यावाटेने कापूरहोळचा रस्ता न घेता दुसर्‍या रस्त्याने पुढे निघालो. पुढे गेल्यावर मला आठवले की भोर मध्ये पुलापाशी कुठे तरी वळायचे होते हे वाचले. मी एकाला विचारले पुण्याकडे हाच का? तर तो ही हो म्हणाला. पुणे ७२ किमी असे दिसत होते. अजून पुढे गेलो. पण मनात गणित जुळत नव्हते घाटापासून ८० जायचे होते आणि मी २० क्रॉस केल्यावरही अजून ७२ ! मग एकाला विचारले की कापूरहोळ इकडंच का? तो म्हणाला, नाही !! झाले ! मी ५-७ किमी पुढे आलो होतो. मग काय? परत मागे फिरलो. एका दुचाकी स्वाराने सांगीतले की दोन लोकं कापूरहोळ कडे गेलेली त्याने पाहिली. म्हणजे मी घाटापासून ५-६ किमी गेन केले होते ते तर गेलेच आता उलट जाऊन परत जायचे !! मग काय. भोर कडे निघालो परत.

भोर मध्ये पोचून दोनदा कापूरहोळचा रस्ता विचारला आणि निघालो. भोर ते कापूरहोळ मध्ये एक छोटा घाट आहे. ( तो नेकलेस पाँईटचा) तिथे आलो आणि अचानक थकलो. हा थकवा कुठून आला हे माहिती नाही. कारण ऑलमोस्ट मी दुसरा होता आणि आता ६ वा झालो असणार आणि फुटकात एनर्जी घालविली हे कुठे तरी मनात चालू होते.

तिथे ५ मिनिट उकिडवा बसलो आणि जोरात एकदा ओरडून चल केदार, फक्त ५२ असे म्हणून टांग मारली. ही एनर्जी बायपास लागे पर्यंत टिकली. बायपास लागला. आता पुणे ४० किमी होते आणि मी परत गळाठलो होतो. कारण गेले ३० एक किमी मी " सोलो रायडींग, अगेन्स्ट द विंड " करत होतो.

तिथे एक रसवंतीगृह दिसले. तिथे थांबलो. तोंड धुतले. मस्त पैकी थंडगार पाणी डोक्यावर टाकले आणि थंड्गार (बर्फाच्या क्वालिटीची पर्वा न करता) रस प्यालो दॅट वॉज इट ! सुगर इनटेक मुळे इनर्जी मिळाली आणि " जय बजरंगा, हुप्पा हुय्या" करत मी परत टांग मारली.

तेंव्हा ४:४५ वाजले होते. आता घाई करणे मस्ट होते. अजूनही ३ तास असले तरी मला बेस्ट पॉसिबल टाईम द्यायचा होता.

मी सहज जी पीस मध्ये पाहिले. तर मी ऑलरेडी ९५०० फुट गेन केले होते. म्हणजे BRM राईड मध्ये जे ७७०० फुट होते ते केवळ घाटाचे होते, इतर चढ नाही !! आणि अजून कात्रज यायचा होता. तसेच जोरात निघालो.

एका कारवाल्याने येऊन सांगीतले की तुमचे जॅकेट रसवंतीवर विसरले. च्यायला, म्हणत मागे आलो आणि रसवंतीवर येऊन जॅकेट पाहिले तर ते माझे नव्हतेच. फुकट मागे आलो! म्हणलं चल भाऊ आता जी काही एनर्जी रिझर्व्ह मध्ये आहे, ती येऊद्यात.

कात्रज अजून पार करायचा होताच. थोडा पुढे आलो तर टेम्पो मध्ये चौघे स्पर्धक सायकली घेऊन परत जात होते. राहूल की केदार ने मला हाक मारली आणि किप इट अप असे म्हणाले. ते ऐकून मी स्पिड वाढवला आणि पाहतो तर काय, आय वॉज अ‍ॅट वारजे माळवाडी !! सहा वाजले होते. अजून दोन तास होते आणि केवळ ११ किमीच जायचे होते.

आणि इथेच एका हौशी सायकल वाल्याने मला ऑलमोस्ट यमसदनास पाठविले ! तो माळवाडीहून माझ्या पाठीमागे लागला. (कारण मी त्याला पाठीमागे टाकले होते.) त्याला एका रेस वाल्याला ( कारण सायकलवर नंबर्स होते!) हारवायचे होते. त्याने मला ओव्हरटेक केले आणि तो हळू चालवू लागला. मला पुढे जायचे होते म्हणून मी त्याला ओव्हरटेक करणार इतक्यात त्याने सायकल उजव्या बाजूला घेतली आणि (मी त्याच्या उजव्या बाजूला होतो) मी एका मोठ्या कंटेनरला संमातर झालो. माझा खांदा घासला गेला. मी त्या सायकलवाल्याकडे पाहिले आणि पुढे येऊन थांबलो कारण त्या गडबडीत माझा आधीच दुखत असलेला उजवा पाय, त्याची काफ मसल एकदम एका बाजूला गेली होती. मी थांबून पाय चोळू लागलो, तो ही थांबला. त्याने सॉरी म्हणले. इथे माझे १०-१५ मिनिटे गेले कारण पाय खूपच दुखत होता.

तेथून निघालो. चांदणी चौकाचा चढ् पार करून बाणेरला आलो. शनिवारची प्रचंड ट्रॅफिक होती. बानेरला ट्रॅफिक पोलीसांनी नेमक्या माझ्याकडच्या लोकांना तेंव्हाच थांबवले.पोलिसाला विनंती केली, भाऊ, माझी रेस चालू आहे, जाऊ द्या. त्याने मग तात्काळ सगळ्यांना थांबवून मला सोडले !

मी कॅफे नूकला ( लास्ट पाँईट) आलो तेंव्हा ६:५० झाले होते. वेळेच्या सव्वा तास आधी मी पोचलो होतो.

तिथे पाहतो तर अण्णा आणि त्यांचे मित्र माझी वाट पाहत थांबले होते. त्यांना तिसर्‍या केदारने मी रस्ता चुकलो हे सांगीतले त्यामुळे मी वेळेत येईल की नाही ह्याची त्यांना खात्री नव्हती. बट देअर आय वॉज! आम्ही एकमेकांना अभिनंदन देत निरोप घेतला.

मी तिथे थांबून चहा प्यायचा निर्णय घेतला. सोपस्कार आटवले आणि चहा पिऊन ७.७ मिनिटाने मी आमच्या वॉटस अ‍ॅप ग्रूपला मेसेज करत होतोच, तितक्यात मनोजचा मेसेज आला " केदार इज टायपिंग असा" मी ग्रूपला कळवले की मी आलो. मला कळाले केदार दीक्षित, सुधाकर आणि राहूल ह्यांनी वाईला रेस सोडली.

अमित बद्दल अजूनही कळाले नव्हते. अमितने उशीरा सुरू करूनही वाईला मी जेंव्हा त्याला क्रॉस केले तेंव्हा १५-१७ किमीचे अंतर आमच्या दोघात होते. म्हणजे अमित येत्या एक तासात सहज येईल असे मला वाटले. त्याला शक्ती मिळू देत असे मनात म्हणून मी घरी निघालो.

घरी आल्यावर कळाले की अमितने ही वेळेत बीआरएम पार पाडली ! वे टू गो अमित !!

माझे ३०-२५ मिनिटे रस्ता चुकल्यामुळे अन १५ एक मिनिटे त्या दीडशहाण्या सायकलवाल्यामुळे गेले. मी अजून लवकर म्हणजे ६ लाच पोचू शकलो असतो बहुदा.

जी पी एस चेक केले तर मी आज एकुण ११८४६ फुट चढलो होतो !! ३६१० मिटर्स !! आणि आय वॉज मेन्टली प्रिपेअर्ड फॉर ७७००! ह्यातील एक्स्ट्रा ३५०० ने नक्कीच वाट लागली.

मला घ्यायला बाणेरला बायको गाडी घेऊन आली. तिथून गाडीत सायकल टाकून घरी आलो नी गरम पाण्याच्या शेक बॉडीला दिला. दुसरे दिवशी मस्त पैकी मसूज कडे जाऊन मसाज घेतला. सेकंड डे नाइटमेअर्स मला तरी नाही आले. अनेक सेंच्युरीज मुळे आता बॉडीला सवयही झाली असावी. आणि बॉडी हायड्रेट ठेवली होती.

एकूण १९ जणांनी भाग घेतला. पैकी फक्त १३ जण वाईला वेळेत पोचले. आणि फक्त १० जण परत पुण्याला वेळेत पोचले. त्यापैकी दोघे म्हणजे अमित आणि मी.

BRM.jpg

ब्रेक्स सहीत साडे अकरा तासात मी ही बीआरएम पार पाडली. द अ‍ॅव्हरेज स्पिड डोन्ट डू जस्टिस हिअर कारण ११८०० फुट तुम्ही ३० किमी प्रति तासाने चढू शकत नाहीत. द टफेस्ट बिआरम (११८०० फुट क्लाईंब)ची ही कहाणी सफळ,संपूर्ण. आता वेध आहेत ते ६०० किमी BRM चे !!

शब्दखुणा: 

बापरे, मी नुसते वाचुनच दमले. Happy

मस्त वाटले पण. तुम्ही खुप एन्जॉय केली असणार ही राईड. आता ६०० चे वर्णन येऊ दे.

मला पण लेख वाचताना बराच कळत नव्हता ड्राफ्ट प्रकरण माहित नसल्याने!! ती लिन्क दिल्याबद्दल अगो ला धन्यवाद !

जिज्ञासा अगो ने लिंक दिली आहे. http://www.wikihow.com/Draft-on-a-Bike

अर्थात आम्ही काही सुपर सायकलिस्ट नाही आहोत पण हेड विंन्ड / स्पिड गेन मध्ये मागच्यांना खूप फायदा होत असतो. पक्षी उडताना ड्राफ्ट घेत असतात आणि हीच टेक्निक कार रेस, मोटारसायकल रेस मध्ये वापरली जाते. जितका हवेचा रेझिस्टन्स कमी तितकी स्पिड वाढते. एरो डायनामिक स्टफ. आमच्या लेव्हलला अगदीच बेसिक. पण तुका म्हणे त्यातल्या त्यात Happy

ज ब री केदार ! मस्त वृत्तांत.. बरं झालं केलीस बिआरएम ते.. मला कधी पासून वाटत होतं की तू बिआरएम करावीस ते.. मी त्या सायमोरच्या राईडला जाऊन आल्यावरच तुला म्हटलं होतं ना..

हे वाचताना वाटलं की उद्या-परवा परागचा पण लेख येणार यावर >>>> ललिता, तुम्हारे मुह मे घी.. तुम्हारे मुह मे शक्कर ! Lol बिआरएम आहे विशलिस्टवर.. बघु कधी पार पडते आहे ते... Happy

भारी. अभिनंदन Happy

रस्त्यातल्या ट्रॅफिकचा - विशेषकरून घाटात मोठे ट्रक्स आणि कंटेनर्स जातात त्याचा किंवा रस्त्यांवर बैलगाड्यांच्या रांगा लागलेल्या असतात त्याचा- आणि खाचखळग्यांचा त्रास होत असेल. ते कसं डील करता तुम्ही बायकर्स?

बापरे, भारीच!! ज.ब.र.द.स्त!!
केदार हे सगळं करत असताना, आहार आणि व्यायाम कार काय करता हे लिहाल का?

खतरनाक, केदार! अभिनंदन. १३ तासांत २०० म्ह्णजे जबरी आहे, त्यात चढण, वार्‍याच्या विरूद्ध दिशेला वगैरे मुळे आणखीच.

आहार आणि व्यायाम कार काय करता हे लिहाल का? >>

राईडच्या आदल्या दिवशी भरपूर कार्ब, राईडच्या दिवशी एनर्जी बार, चॉकलेट, भरपूर पाणी,केळी.
व्यायाम : कोअर, हॅमस्ट्रींग आणि ग्लुटस साठी व्यायाम. खरेतर नेहमी सायकलींग हाच मोठा व्यायाम. त्यासोबत स्ट्रेचेस बास होतात. नेहमी सायकलींग केले तर पाय आपोआप बिल्ड होत जातात.

रस्त्यातल्या ट्रॅफिकचा - विशेषकरून घाटात मोठे ट्रक्स आणि कंटेनर्स जातात त्याचा किंवा रस्त्यांवर बैलगाड्यांच्या रांगा लागलेल्या असतात त्याचा- आणि खाचखळग्यांचा त्रास होत असेल. ते कसं डील करता तुम्ही बायकर्स? >>

आता बैलगाड्या नसतातच रोड वर. लाईन वगैरे दुरच. एखादीच गावात वगैरे असते. (निदान मी जितका भारत परतोनि आल्यावर पाहिला) मुख्य त्रास हा मोटारसायकल, कार आणि ट्रकवाल्याच्या आहे. त्यांना वाटते सायकलवाल्याने बाजूलाच व्हावे. ती काळजी नक्कीच घ्यावी लागते. ओव्हरटेक करताना, फास्ट जाताना उजवीकडे बघावेच लागते. खाच खळगे सगळ्यांना कॉमन Happy पण स्पिड मध्ये जाताना हाताला हादरे बसतात. त्यामुळे लक्ष नेहमी रोडवर ठेवावे लागते.

१३ तासांत २०० म्ह्णजे जबरी आहे, त्यात चढण, वार्‍याच्या विरूद्ध दिशेला वगैरे मुळे आणखीच. >>.

खरयं ज्यांनी ज्यांनी ही टफेस्ट पूर्ण केली ते सगळेच मेंटली आणि फिजिकली टफ आहेत. इनफॅक्ट मेंटल टफनेस जास्त हवा.

माझ्या सुदैवाने मी सव्वा तास आधीच पूर्ण केली. पण असे ऐकले की एकाने १०-१५ मिनिट लेट पूर्ण करूनही त्याला मेडल मिळणार नाही कारण वेळेत पूर्ण नाही केली. त्याबद्दल वाईट वाटले.

मला आणि सायकलला कुठलाही त्रास झाला नाही. ( माझ्या मसल्स अडकणे सोडून ) पंक्चर वगैरे झाले असते तर माझीही वाट लागली असतीच. किट होताच, पण वेळ जातो. मॉरल डाऊन होते.

सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद !

अभिनंदन!!

>>आता वेध आहेत ते ६०० किमी BRM चे !!

जरुर करा, मी आताच (२९-३० नोव्ह. ) दोन मित्रासाठी अ‍ॅज अ सपोर्ट क्रू म्हणुन गेलो होतो, मस्त मजा आली. [ पुणे - गोवा : ६४५ किमी ] .

सिद्धार्थ त्या ६४५ च्या रेस मध्ये माझ्याओळखीचे दोघे सपोर्ट सायकलिस्ट म्हणून होते. प्रशांत आणि सिद्धार्थच. Happy

तुझे आणि अमितचे प्रचंड अभिनंदन.

सध्या काही कारणास्तव मला कुठल्याही रेसमध्ये भाग येत नाहीये. पण अजून आशा धरुन आहे की कधीतरी सोबत येईन.

जबरदस्त! इतकी रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक कहाणी आहे की काल वाचता वाचता मी उतरायचे विसरून दोन स्टॉप पुढे गेले बसने! म्हटले केदार एवढे करू शकतो तर आपण दोन स्टॉप उलटे चालत जाऊ शकतो. इथेही रेस वेळेशी आहे. Happy
कीप गोईंग केदार!

Pages