१. गव्हाचे पीठ - २ वाट्या
२. मैदा - अर्धी वाटी
३.तूप/बटर - ४ मोठे चमचे
४.जिरा - १ चमचा पूड करून
५.धने - १ चमचा पूड करून
६.गरम मसाला - चिमूटभर
७.हळद - १ छोटा चमचा
८.अंडे - १
९.कणीक मळण्यासाठी पाणी
१०. साखर आणि मीठ - १ छोटा चमचा
१.मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करून घ्यावे. त्यात अंडे फोडून टाकावे. त्यातच २ चमचे तूप/बटर टाकून मिसळून घ्यावे.
२.वरच्या मिश्रणात जिरेपूड, धनेपूड, हळद, मीठ, गरम मसाला आणि साखर टाकून नीट मिसळावे.
३.कोमट पाणी हळूहळू टाकत मळून घ्यावे. मळलेली कणीक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावी.
४.अर्ध्या तासानंतर कणीक बाहेर काढून तुपाचा हात लावून चांगली तिंबून घ्यावी.
५.कणकेचे चपातीला करतो त्यापेक्षा थोडे मोठे गोळे करावेत. वरच्या मिश्रणाचे ७ ते ८ गोळे होतील.
६.एक गोळा घेऊन घडी न घालता लाटून घ्यावा. त्यावर एक चमचा तेल पसरून लावावे. वरून मैदा भुरभुरावा. या मैद्यामुळे पराठ्याला छान पदर सुटायला मदत होते.
७.मग लहानपणी जसे कागदाचे पंखे करताना घड्या घालायचो तशा या लाटीच्या घड्या घालाव्यात.
घड्या घालताना असे दिसेल
सर्व घडया घातल्यावर असे दिसेल
८. आता ही घडया घातलेली पट्टी दोन्ही बाजून हलकेच ओढून लांबवावी. मग तिची गुंडाळी करावी.
गुंडाळी करताना
शेवटचे टोक खेचून गुंडाळीच्या मध्यावर दाबावे.
९.असे सर्व गोळे तयार करून घ्यावेत.
तयार गोळे
१०.हलक्या हाताने पराठे लाटावेत. तूप/ बटर टाकून खरपूस भाजावेत.
तयार पराठे
पराठे भाजताना तव्याचे तापमान मध्यम ठेवावे. कमी झाल्यास पराठ्याचे पदर सुटत नाहीत.
तूप वापरताना हात आखडता घेऊ नये, त्याची चव अप्रतिम लागते.
बटाट्याची तिखट गोड भाजी/ चटणी/दही/सॉस सोबत गट्टम करावेत.
सर्वांना धन्यवाद नक्की करून
सर्वांना धन्यवाद
नक्की करून पहा आणि फोटोज टाका ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>दही घातल तरी मस्त पदर सुटतात.>>>धन्यवाद प्राजक्ता
ज्यांना अंडं नको आहे त्यांनी दही घालून करून बघा ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>>>एक शंका - केरळा पराठे असतात ते असेच लच्छा पराठेच असतात ना..>>>> हो ऋन्मेऽऽष, लच्छा पराठेच असतात ते.
वॉव..सुप्पर्ब , प्रोफेशनल
वॉव..सुप्पर्ब , प्रोफेशनल दिस्ताहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रोफेशनल दिस्ताहेत <<, +१११
प्रोफेशनल दिस्ताहेत <<, +१११
एकदम मस्त! ब्रे फा च्या
एकदम मस्त! ब्रे फा च्या वेळेला हे बघितल्याने आत्ता तयार असलेल्या भिजवलेल्या कणकेचे अशा पद्धतीने लाटून परांठे करते लगेच. नंतर कधीतरी साग्र संगीत करीन!
(मनातला प्रतिसाद- एखादी
(मनातला प्रतिसाद- एखादी रेसीपी आली की, थोड्या फार फरकाने बर्याच रेसीप्या येतात.(अगदी चढाओढच लागते, बघा मला सुद्धा येते एक वेगळी रेसीपी असे दाखवत असेच वाटते. थोडा फार फरक असला तरी. आता लच्छा पराठावर पाच सहा बीबी दिसणार...
).
साक्षी, छान आहे रेसीपी (वरचे तुम्हाला उद्देशून नाही).![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहेत फोटो. करून बघणार.
मस्त आहेत फोटो.
करून बघणार.
यम्मी
यम्मी
वा सहज करुन बघता येईल. ह्याच
वा सहज करुन बघता येईल. ह्याच विकांताला करुन पहातो.
छान दिसतोय पराठा. अंडं न
छान दिसतोय पराठा.
अंडं न वापरता केला आहे आत्तापर्यंत.
एकदा अंडं वापरून करून पाहिलं पाहिजे.
छानच झाले आहेत. मस्त फोटो.
छानच झाले आहेत. मस्त फोटो. उद्या करते. हळद घालायचे काय लॉजिक?
ह्या बरोबर किमान पक्षी पनीर बटर मसाला किंवा बटर चिकन हवे. पचरंगा अचार व कांदा लिंबू. आमच्याकडे वेंकीज चे बटर चिकन फ्रीज मध्ये नेहमीच असते. त्या बरोबर करता येइल.
मस्त दिसतोय पराठा............
मस्त दिसतोय पराठा............
मस्तच झालेत पराठे आणि
मस्तच झालेत पराठे आणि करायलाही सोपे आहेत.
वा, अप्रतिम पराठे!
वा, अप्रतिम पराठे!
सर्वांना धन्यवाद करून बघा
सर्वांना धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
करून बघा आणि फोटोज डकवा लोक्स!
हळद घालायचे काय लॉजिक?>>> अमा, हळद रंगासाठी घातली आहे, हलकी पिवळसर झाक खरपूस भाजल्यावर छान खुलून येते म्हणून. मला आवडते. घातली नाही तरी चालेल.
ह्या बरोबर किमान पक्षी पनीर बटर मसाला किंवा बटर चिकन हवे>>>> सत्यवचन!
खुप मस्त झाले saakshi, एकदम
खुप मस्त झाले saakshi, एकदम खुसखुशीत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमच्या पराठ्यासारखे पदर नाही सुटले, पण आधी करत होते त्यापेक्षा फारच सुंदर झालेले.
छानच... फोटु एकदम tempting
छानच... फोटु एकदम tempting !!!
आमचा झब्बू! फक्त बटर ऐवजी २
आमचा झब्बू!
![DSC00592.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u25802/DSC00592.JPG)
फक्त बटर ऐवजी २ चमचे तूप घेतले. मुळ पाककृतीच्या प्रचि १ च्या वेळेस दोन पराठ्यांना ब्लू चीज लावले, एकाला दालचिनी पावडर आणि दोन साधेच केले.
असे विचार आले. दालचिनी पावडरवाल्याला वरुन मध लावून खाल्ले (सर्दी झाली आहे ना!). अतिशय सुंदर लागले! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ब्लू चीज प्रकरण साधे चीज नसल्याने ट्रायल बेसिस वर केले होते. खाल्ल्याबरोबर 'ये मैने क्या किया'
मी दही घालून केले. मस्त
मी दही घालून केले. मस्त खुसखुशीत झाले. आता फ्लेवर्स ट्राय करेन पुढल्या वेळी.
मी सुद्धा बिनअंड्याचे , फक्त
मी सुद्धा बिनअंड्याचे , फक्त कणीकेचेच दही अथवा साअर क्रीम घालून करते.
नुसतं देसी घी घालून सुद्धा मस्त तोंडात विरघळतात असे होतात. साअर क्रीम किंवा लोणी घालून करून पहा.
हे मी केलेले माझी वरची रेसीपी वापरून कणीक आणि दही, जीरा भरड वाटून.
मटणा बरोबर मस्त लागले.
गरमगरम पराठे आणि जॅम लावून सुद्धा मस्त लागले.
चहात बुडवून सुद्धा मस्त लागतात.
मस्त झाले होते. मी अंडे व दही
मस्त झाले होते. मी अंडे व दही दोन्ही घातले. घी घातले नाही. बटर चिकन बरोबर अफलातून लागले.
वर स्वीट म्हणून नवे होकी पोकी आइस्क्रीम मॅड किंग अल्फान्सो !!! आता झोप!!!
मी सुद्धा आत्ताच केले होते.
मी सुद्धा आत्ताच केले होते. मस्त खुसखुशीत झाले होते.
धन्यवाद लोक्स! करून पाहिलेत
धन्यवाद लोक्स!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
करून पाहिलेत खाल्लेत खिलवलेत
साक्षी फोटो आणि पदार्थ
साक्षी फोटो आणि पदार्थ तोंपासु!
झरबेरा उरक्याची गं अगदी! लगेच करून पाहिले! मस्त हं !
मी फक्त साध्या कणकेचे करुन
मी फक्त साध्या कणकेचे करुन पाहिले. घरी तुप बटर सगळं काही होतं पण माझी काही धीर झाला नाही हे सर्व घ्यायला. मी प्रत्येक लप्याला अर्धा चमचे ऑलिव्हचे तेल वापरले. काही प्रचि जोडत आहे.
देवीका
धन्य! तू तर अगदी त्या जाहिरातीची आठवण करुन दिलीस.. व्हर्र्पुल व्हर्र्पुल
झरबेरा परत करुन बघ... तुझा पंखा चुकला का
आधी कागदाचा पंखा करुन बघ ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी जेमतेल तेल वापरले म्हणून खूप चक्राकार जरी नाही दिसत असला तरी ते गोल गोल बोटावरीन चक्रासारखे वलय मला दिसले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साक्षी, धन्यवाद हा सोप्पा पराठा शिकवल्याबद्दल.
देवीका मस्तच दिसतायत पराठे
देवीका मस्तच दिसतायत पराठे
आता तुमच्या पद्धतीने करून बघेन. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झरबेरा मस्तच
बी, छान फोटोज
मस्त दिसतोय
मस्त दिसतोय पराठा....बिनअंड्याचे करण्यासाठी कोणी प्रमाण सांगणार का?
masta recipe!
masta recipe!
masta recipe!
masta recipe!
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
मस्त पाककृती, फोटो आणि सर्व
मस्त पाककृती, फोटो आणि सर्व झब्बु एकदम झक्कास.
Pages