आम्हाला जपानला येवुन दीड महिना झाला. एक महिना खुप आनंदात गेला. त्यानंतर माझी मान सारखी अकडायची. खुपच त्रास होत होता. फोमच्या गादी, उशीने असेल म्हणुन मानेचे , हाताचे व्यायाम करुन बघितले. पण काहीच आराम नाही. उलट त्रास वाढतच होता. नंतर खांदा, व उजवा हात खुपच दुखायला लागला. असह्य वेदना-- सहनच होईना. येथे मेडिकल प्रॉब्लेम. काय कराव कळेना.. पेन-किलरचाहि उपयोग होईना. हातावर रॅश दिसायला लागली. शेवटी जापनीज डॉ. कडे गेलो. ते म्हणाले 'हरपिस ' आहे. ट्रीटमेंट चालु केली. आता थोडा आराम आहे. एव्हड भयानक दुखण प्रथमच अनुभवते. मानेपासुन तळ-हातापर्यंत जळाल्यासारख्या जखमा, बर्निंग-पेन. औषध चालु आहेच. आत ५ ता. ला भारतात परत जायचय वेदनेसह.. केव्हा आराम पडेल कळत नाही. मान, खांदा दुखतोच आहे. येथील डॉ. म्हणतात. पुढची ट्रीट्मेंट भारतात घ्या. काय काळजी घ्यावी लागेल/ कश्यामुळे होतो हा आजार, कुणाला कल्पना आहे का. कळल तर बर होईल.
नागिण [हरपिस ]
Submitted by प्रभा on 3 December, 2014 - 04:31
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद मायबोलीकर मित्र-
धन्यवाद मायबोलीकर मित्र- मैत्रिणिंनो .तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. आता मला थोडा आराम वाटतो आहे. दुखण्याची तिव्रता थोडी कमी झाली आहे.. औषध नियमित घेते आहे. पुढे तुमच्या सांगण्याप्रमाणे काळजी, व उपचार घेइन. पुन्;;च्य धन्यवाद.
इब्लिस, माहितीसाठी अनेकानेक
इब्लिस, माहितीसाठी अनेकानेक धन्यवाद!
नैसर्गिकरित्या कांजिण्या
नैसर्गिकरित्या कांजिण्या आल्यास आयुष्यभराची इम्युनिटी मिळते असे वाचले होते.>>>>>> हो. लहानपणी कांजिन्या येउन गेलेल्या चांगल्या.. जास्त त्रास होत नाही.. मोठेपणी कांजिण्या आल्या तर खुप त्रास होतो.. कांजिण्याच्या लसीचा बुस्टर असतो की नाही माहित नाही पण इम्युनिटी साधारण १० वर्षाची असते. त्यामुळे मोठेपणी कांजिण्या होण्याची शक्यता जास्त असते..
प्रभाताई, मानेच्या जवळ अथवा
प्रभाताई,
मानेच्या जवळ अथवा मानेवरील भागात नागीण पोहोचली असेल तर लगेच उपचार करा. भिऊ नका, पण तातडी करायला हवी.
आ.न.,
-गा.पै.
प्रभा, भारतात या लवकर. योग्य
प्रभा, भारतात या लवकर. योग्य ते उपचार होऊन लवकर त्रास कमी होईल.
इब्लिस, सोप्या भाषेत छान लिहिले आहे. सामान्य लोकांत हा आजार भयानक आहे असाच समज आहे. ( हा आजार झाला असेल तर कोर्ट देखील पुढची तारीख पटकन देतात ) वेळ मिळाल्यास अवश्य सविस्तर लिहा.
इब्लिस, माहितीकरता धन्यवाद.
इब्लिस, माहितीकरता धन्यवाद.
अगो, एकच बुस्टर द्यावा
अगो,
एकच बुस्टर द्यावा लागतो. माझ्या मुलाला कांजिण्या न आल्याने द्यावा लागला होता मिडलस्कूल सुरु करायच्या आधी.
धन्यवाद स्वाती२.
धन्यवाद स्वाती२.
इब्लिस चांगली माहिती दिलीत.
इब्लिस चांगली माहिती दिलीत.
धन्यवाद. मी भारतात आले
धन्यवाद. मी भारतात आले आहे. दुखणे स्लो गतीने बरे होते आहे. दुखण्याची तिव्रता कमी आहे. पण त्रास होतोच. आग भयंकर आहे. भोग हे भोगुनच संपवावे लागतात हेच खरे.. असो.
हे सगळे वाचल्यावर मी थोडी
हे सगळे वाचल्यावर मी थोडी कन्फ्युज झाले.
नुकतीच ग्रुपमधे दोन जणांना नागिण झाली आहे त्यामुळे ग्रुपात तीच चर्चा म्हणून इथली चर्चा वाचून काढली.
कांजिण्या लहानपणी येऊन जाणे चांगले असे म्हणलेय. पण कांजिण्या येऊन गेल्या असतील तर नागीण होण्याची शक्यता जास्त (व्हायरस डॉर्मंट असतो म्हणून) की शक्यता कमी(सॉर्ट ऑफ नैसर्गिकरित्या व्हॅक्सिनेशन झाल्यामुळे) ?
तुम्ही म्हणताय कांजिण्या येऊन
तुम्ही म्हणताय कांजिण्या येऊन गेल्यावर नागीण होण्याची शक्यता जास्त असते.
मग कांजिण्या लहानपणी येऊन जाणे चांगले का असते?
व्यावसायिक कारण असावे. एकदा
व्यावसायिक कारण असावे. एकदा कांजिण्या येऊन गेल्या की नागीण होण्याची शक्यता बळावते. एकदाची नागीण झाली की आयता पेशंट मिळेल.
लहानपणीच्या माइल्ड असतात.
लहानपणीच्या माइल्ड असतात. मुलांना फारशा त्रासदायक नसतात. मोठ्या माणसात पहिल्यांदाच आल्या तर जीवघेण्या ठरू शकतात. म्हणून.
ओके. धन्स!
ओके. धन्स!
बेफि, तुमची न काढता
बेफि,
तुमची न काढता दिसली.
अभिनंदन.
मोठ्या माणसात पहिल्यांदाच
मोठ्या माणसात पहिल्यांदाच आल्या तर जीवघेण्या ठरू शकतात. म्हणून.>>> म्हणजे लहानपणी कांजण्या आलेल्या माणसाला मोठेपणी हर्पिस झाली तरी परवडेल अशी माइल्ड असते का? हे तर इकडे आड तिकडे विहिर आहे.
>>>तुमची न काढता दिसली<<<
>>>तुमची न काढता दिसली<<<
सवय जात नाहीच
सवय जात नाहीच
केश्विनी नगिण ही (एड्स
केश्विनी
नगिण ही (एड्स नसलेल्या माणसात) फक्त वेदनादायक असते. कधीही जीव घेत नाही. लवकर निदान व उपचार केले तर फार दुखतही नाही.
ओके. मग मोठेपणी कांजण्या
ओके. मग मोठेपणी कांजण्या आल्या तर नक्की काय होतं आणि कश्याप्रकारे त्या जीवघेण्या ठरतात? मोठाल्या येतात की डोळ्यात तोंडात येतात?
http://m.rediff.com/getahead/
http://m.rediff.com/getahead/2005/jun/22chick.htm एक बरी लिंक.
न्युमोनिया मेंदूत ताप इ. चे चांसेस जास्त. एडल्ट चिकनपॉक्स गुगला
थँक्स. मी आतापर्यंत
थँक्स. मी आतापर्यंत कांजण्यांना लल्लूपंजू रोग समजत होते. मला लहानपणी होऊन गेल्या आहेत. वाडीतील सगळ्याच पोरांना लागोपाठ आल्या होत्या. माझ्या भावाला त्याच्या सी.ए.च्या परिक्षेच्या जवळपास आल्या होत्या. कांजण्यांच्या खपल्या पूर्ण सुकलेल्या अवस्थेत तो परिक्षेला गेला होता. पण मोठेपणी येऊनही त्याला खूप त्रास नव्हता झाला. नशिबच म्हणायचं.
नागिण अजुन वळवळते आहे.
नागिण अजुन वळवळते आहे.
अश्विनी मला कॉलेजात टी वायला
अश्विनी मला कॉलेजात टी वायला असताना प्रिलीम परीक्षेच्या आधी कांजिण्या झाल्या होत्या जोरदार. डोक्यापासून तळपायापर्यंत. तोंडात फोड. तो एक उष्णता दूर करणारा काढा (परिपाठादी बहुतेक) + डॉ.च्या गोळ्यांनी गेल्या त्या अर्थातच पण भरपूर वेळ लागला.
विकिवर सविस्तर माहिती सापडली-
विकिवर सविस्तर माहिती सापडली- http://en.wikipedia.org/wiki/Herpes_zoster
कान्जण्या बर्या झाल्या की
कान्जण्या बर्या झाल्या की सात-आसरा ला दहि-भाताचा नैवेद्य दाखवावा, याने परत कान्जण्या येत नाही म्हणे!!
तो त्यांना रोजच दाखवतात काही
तो त्यांना रोजच दाखवतात काही जण
प्राजक्ता, एकदा होऊन गेल्या
प्राजक्ता, एकदा होऊन गेल्या की कांजण्यांना लाइफ़टाइम इम्युनिटी येते. पुन्हा त्या होउ शकत नाहित.
प्राजक्ता, एकदा होऊन गेल्या
प्राजक्ता, एकदा होऊन गेल्या की कांजण्यांना लाइफ़टाइम इम्युनिटी येते. पुन्हा त्या होउ शकत नाहित.>> ओह!
मग बरय!
Pages