सोप्या पद्धतीने मराठीत लेखन (भाग २ - युबंटू लाईव्ह सीडी)

Submitted by shantanuo on 28 November, 2014 - 08:41

माझा "सोप्या पद्धतीने मराठीत लेखन" हा लेख ज्यांनी वाचला असेल त्यांना मराठीत स्पेल चेक, अ‍ॅटो करेक्ट वगैरे कसे वापरायचे ते लक्षात आलेच असेल.

http://www.maayboli.com/node/39752

पण त्यासाठी कितीतरी सॉफ्ट्वेअर टाकावी लागतात. कॉन्फ्युगरेशन शिकावे लागते. हाताशी विंडोजची सिडी असावी लागते. विंडोजमध्ये मराठीत टाईप करायचे असेल तर किती सव्य / अपसव्य करावे लागतात ते इथे पहा.

http://www.google.co.in/intl/mr/inputtools/windows/windowsxp.html

हे सर्व वापरून नवीन माणूस मराठीत टाईप करायला लागेपर्यंत थकून जातो. त्याचा इंटरेस्ट संपतो. हे सर्व टाळण्यासाठी मी युबंटूमध्ये आवश्यक ती सर्व सॉफ्ट्वेअर आधीच इन्स्टॉल करून एकच एक पॅकेज बनविले आहे.

खाली दिलेल्या लिंकवरून युबंटूची आव्रुत्ती डाऊनलोड करून त्याची सीडी बनवा. ही सीडी आपल्या कॉम्प्युटरमध्ये टाकून तो सुरू करा. आता युबंटू सुरू होईल आणि सर्व मराठी आयुधे आपोआप उपलब्ध होतील. काम झाले की ही सिडी काढून टाका व कॉम्प्यूटर परत चालू करा. आपली आधीची विंडोजची प्रणाली सहीसलामत परत मिळेल.

64 bit:
gamabhana.s3.amazonaws.com/ubuntu-14.10-desktop-customised-amd64.iso

32 bit:
gamabhana.s3.amazonaws.com/ubuntu-14.10-desktop-customised-i386.iso

३२ की ६४ बिटची व्हर्जन टाकावी असा प्रश्न असेल तर सरळ वर दिलेली ३२ बिटची व्हर्जन ट्राय करा. या लाईव्ह सिडीमुळे आपल्या सध्याच्या प्रणालीला कसलाही धक्का न लावता युबंटू आणि मराठी स्पेल चेक असे दोन्ही लाभ मिळवता येतात. अर्थात हे फक्त मराठी सॉफ्टवेअर नसून ही पूर्ण युबंटू ऑपरेटिंग सिस्टिम असल्यामुळे ही फाईल साईज आहे सुमारे २ जीबी ! आता इतकी मोठी फाईल नेटवरून उतरवून घेणे शक्य नसेल तर मला आपला पत्ता कळवा म्हणजे मी ही डीव्हीडी पोस्टाने पाठवून देईन. आणि हो, हे सॉफ्टवेअर पूर्णपणे मोफत आणि मुक्त स्त्रोत आहे.

युबंटूच्या लिबर ऑफिसमध्ये मराठी टाईप आणि स्पेल-चेक कसा दिसेल ते खालील चित्रावरून स्पष्ट होईल.

https://s3.amazonaws.com/gamabhana/aaa1.png

या चित्रात सर्वात वरच्या बाजूला मराठी इनपुट मेथड (इन्स्किप्ट / फोनेटिक) निवडण्याचा पर्याय दिसत आहे. मधल्या भागात लाल रंगावर राईट क्लिक केल्यावर शुद्ध शब्दांचे पर्याय दिसत आहेत.

आपल्याला काही सुधारणा सुचवायच्या असल्या तर त्या देखील कळवा म्हणजे पुढच्या आवृत्तीत सुधारणा करता येतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"अश्व, आश्चर्य, विश्लेषण, प्रश्न" हे शब्द बहुतेक सर्व फॉंटमध्ये उभ्या मांडणीत दिसतात. याचा अर्थ श बरोबर "व, च, ल, न" आले तर उभी मांडणी नाहीतर आडवी असा अलिखित नियम असावा. त्यामुळे "आवश्यक, काश्मीर, इश्क, रिश्टर, नाश्ता" या शब्दांना उभ्या मांडणीची सोय मिळत नाही. त्याचे कारण एकतर ते परभाषी शब्द असावेत किंवा जागा वाचविण्याइतके वारंवार येत नसावेत. कागद वाचविण्यासाठी कमी जागेत जोडाक्षरे बसविण्याची ही कसरत हल्लीच्या ऑनलाईन जगात करायची गरज आहे का? उभी जोडाक्षरे सुबक दिसतात हा सवयीचा भाग असू शकतो. कोणाचा आक्षेप नसेल तर ह्या चार ओळी की-बोर्डच्या सोर्स कोडमध्ये टाकता येतील.

("shv" "श्‍व्")
("shch" "श्‍च्")
("shl" "श्‍ल्")
("shn" "श्‍न्")

याचा अर्थ हा की-बोर्ड वापरत असाल तर हे शब्द असे दिसतील - अश्‍व आश्‍चर्य विश्‍लेषण प्रश्‍न
नवीन प्रवाहाशी जुळवून घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्‍न कितपत यशस्वी होतो ते पाहू.

sudo add-apt-repository ppa:gamabhana-team/gamabhana
sudo apt-get update
sudo apt install gamabhana
----------------------
ह्या वरील आज्ञा ज्या तुम्ही दिल्या आहेत, त्या कृपया गमभन.कॉम वेबसाईटवर द्याल का? जे मायबोली वापरत नाहीत, त्यांनाही उपयोगी पडेल. मलाही हे शोधून काढायला फारच प्रयास पडले. शेवटी प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे ह्या गटणीय वाक्याला स्मरून शोधून काढले. परंतू वेबसाईटवर असते तर सोपे गेले असते.

भविष्यात फेडोरा ३७ ही आवृत्ती वापरण्याचा विचार असेल तर या सर्व कमांडची काहीच गरज नाही कारण गमभन कीबोर्ड बाय-डिफॉल्ट उपलब्ध होणार आहे. येथे पहा...

https://bodhi.fedoraproject.org/updates/FEDORA-2022-d73b68e274

फेडोरा ३६ किंवा त्याआधीच्या व्हर्जनसाठी ही कमांड आहे...

sudo dnf upgrade --refresh --advisory=FEDORA-2022-4c138bad79

युबंटू व इतर लिनक्ससाठी हा कीबोर्ड m17n पॅकेजमधून उपलब्ध करून देता यावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. तसे झाले की या कमांडची गरज भासणार नाही.

गमभन.कॉम वेबसाईटवर या कमांड देण्याची कल्पना चांगली आहे. आपण तशी विनंती त्या संकेतस्थळाच्या प्रचालकांना करावी. मी तशी विनंती केली असती पण आधीच त्यांनी मला इतके सहकार्य केले आहे की आणखी काही मागणे प्रशस्त वाटत नाही.

गमभन पॅकेजसोबत आपोआप मिळणारे पाच - पन्नास मोफत फाँट नको असतील तर खाली दिलेली कमांड वापरा.

apt install --no-install-recommends gamabhana

वर दिलेल्या कमांडमध्ये फक्त गमभन की-बोर्ड इन्स्टॉल होईल. फाँटचे पॅकेज हवे तर नवीन कमांड देऊन वापरता येईल. आणि गमभन (फाँटसह) काढून टाकण्यासाठी ही कमांड आहे...

apt remove gamabhana gamabhana-fonts

फाँटची लिस्ट खूप मोठी झाली की हवा असलेला टंक शोधण्यात वेळ जातो. म्हणून मी माझ्या संगणकावर फक्त की-बोर्ड ठेवला आहे.

ह्या पॅकेजमध्ये खाली दिलेले फाँट आहेत. यातील कोणते नको असले तर किंवा अधिक हवे असतील तर तसे सुचवावे. हे लिनक्स/ युबंटू पॅकेज असल्यामुळे त्यात फक्त मोफत आणि मुक्त स्रोत फाँटच घेता येतात.

Akshar Aksharyogini* Amiko* Amit* Anek* Ary* Asar* Baloo* Biryani* Cambay* chandas* Dekko* Eczar* Gargi Glegoo* Gotu* Halant Hind IBMPlex Jaini* Kadwa* Kalam kalimati Khand Khula Laila Lohit* Martel* Modak* Mukta* nakula* NotoSans* NotoSerif* Poppins* Pragati* Rajdhani RhodiumLibre* RozhaOne* sahadeva SakalBharati samanata Samyak Sanskrit2003* Sarai Sarala* shobhika* Sumana* Sura* Teko Tillana Tiro* VesperLibre* Yantramanav Yashomudra* Yashovenu* YatraOne*

चुकीचे ऱ्य आणि ऱ्ह दर्शविणारे फाँट (मराठीसाठी अयोग्य)
BakbakOne InknutAntiqua* Jaldi* Karma Kurale Palanquin* Ranga* Sarpanch Sahitya*

ज्या फाँटच्या नावापुढे स्टार * आहे त्यातील श आणि ल शासनाच्या नियमाप्रमाणे म्हणजे शेंडीवाला आणि लसणातला आहे. असे सुमारे 42 फाँट आहेत (एकूण 65)

१) गूगल डॉक्स वापरत असाल तर यातील कोणताही फाँट निवडून टाईप करू शकता तसेच फाईल - डाउनलोड या पर्यायात पी.डी.एफ. हा पर्याय वापरू शकता.
२) लिब्रे ऑफिस वापरत असाल तर हवा तो फाँट गूगल फाँटच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यावा लागेल तसेच डबल क्लिक करून इन्स्टॉल करावा लागेल.

लोहित, मुक्त, संस्कृत२००३, टिरो, शोभिका किंवा अक्षरयोगिनी हे कुठेही वापरता येण्यासारखे फाँट आहेत.

खाली दिलेले चार निकष लावून पाहिले तर फक्त १६ फाँट खरोखर वापरता येण्यासारखे आहेत.
१) ऱ्य आणि ऱ्ह नीट काढता आले पाहिजेत
२) कल्याण हा शब्द कल्‌याण असा दिसता कामा नये.
३) श आणि ल शासनमान्य पद्धतीने काढता आले पाहिजे.
४) अंतर्द्वारे हा शब्द अंतद्वरि असा दिसू नये.

या सोळा फाँटचे सोयीसाठी दोन दोन चे असे आठ ग्रुप बनवून खाली दिले आहेत. त्यामुळे हवे तर यशोमुद्रा किंवा यशोवेणू यातील कोणताही एक फाँट डाउनलोड करता येईल.

१) 'संस्कृत२००३' आणि 'छांदस' हे दोन फाँट येथून डाउनलोड करता येतील.
http://www.sanskritweb.net/itrans/#SANS2003

२) 'नोटो सॅन्स' आणि 'नोटो सेरिफ' हे दोन फाँट गूगलच्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करता येतील.
https://fonts.google.com/noto/specimen/Noto+Sans+Devanagari
https://fonts.google.com/noto/specimen/Noto+Serif+Devanagari

३) एक टाईपने बनविलेले 'अनेक' आणि 'मुक्त' हे दोन फाँट
https://github.com/EkType/Anek
https://github.com/EkType/Mukta

४) आय. टी. फाउंड्रीचे 'पॉपिन्स' आणि 'रोझावन'
https://github.com/itfoundry/Poppins
https://github.com/itfoundry/rozhaone

५) राज्य मराठी विकास संस्थाचे 'यशोमुद्रा' आणि 'यशोवेणू'
https://github.com/RajyaMarathiVikasSanstha/Yashomudra
https://github.com/RajyaMarathiVikasSanstha/Yashovenu

६) प्रवीण सातपुते यांचा 'लोहित मराठी' तर आय. आय. टी द्वारे 'शोभिका'
https://github.com/pravins/lohit
https://github.com/Sandhi-IITBombay/Shobhika

७) 'एक्झर' आणि मायक्रोसॉफ्ट प्रायोजित 'टिरो मराठी'
https://github.com/rosettatype/Eczar
https://github.com/TiroTypeworks/Indigo

८) 'नकुल' आणि 'अक्षरयोगिनी' या दोन फाँटची अधिकृत वेबसाईट (जिटहबवर) सापडली नाही. पण हे दोन्ही फाँट फारच छान आहेत.

गमभन युबंटूच्या पुढील आवृत्तीत काही लहान-सहान बदल करण्याचा विचार आहे.

२८ फेब्रुवारी २२ या दिवशीच्या पोस्टमध्ये दिलेली "श" ची आडवी मांडणी काढून टाकणार आहे. म्हणजे अश्व या शब्दातील श्व आडव्या मांडणीत "श्‍व" असा दिसणार नाही. जोडाक्षर उभ्या मांडणीत दाखवायचे की आडव्या याचा निर्णय त्या त्या फाँटला घेऊ द्यावा. शोभिकासारखा फाँट हे जोडाक्षर उभ्या मांडणीत दाखवत आहे. मला जर ही मांडणी बदलून हवी असेल तर नॉन जॉइनर वापरता येईल. आडव्या मांडणीसाठी युबंटू मध्ये कंट्रोल + शिफ्ट + २ (१, २, ३ या अंकातील २) वापरावे लागते. उदा.

अश्व : ashv
अश्‍व: asha.h (Ctrl + Shift + 2) v

.h ने श चा पाय मोडला जाईल आणि नॉन जॉइनरमुळे श आणि व मध्ये सुरक्षित अंतर राखले जाईल.
_____

खाली दिलेले स्वर काढून टाकण्यात येणार आहेत.

ऱ्हस्व ऌ (U+090C) / "ॢ" (U+0962)
दीर्घ ॡ (U+0961) / "ॣ" (U+0963)
दीर्घ ॠ (U+0960) / "ॄ" (U+0944)

कारणे:
१) हे स्वर वापरात नाहीत. (ऱ्हस्व ऌ फक्त कॢप्ती ह्या एकाच शब्दात वापरतात. तो शब्द हवाच असेल तर येथून कॉपी पेस्ट करता येईल. किंवा अ‍ॅटो करेक्ट / अ‍ॅटो टेक्स्ट अशा सोयी वापरता येतील.)
२) हे स्वर जर कळफलकात ठेवले तर काही लोकं चुकून (काही मुद्दाम) वापरतात.
३) हे स्वर स्पेलचेकमध्ये चुकीचे दिसतात आणि तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्या चुका तशाच राहण्याचा संभव वाढतो.
४) "काय हरकत आहे पडून राहिले तर?" असा विचार घातक आहे. कारण "पडून राहण्यासाठी" त्यांना जागा लागते. दीर्घ ॠ ची सोय RRI ने केली आहे. तो स्वर काढला तर RRI दुसर्‍या कोणाला देता येईल.
५) जास्त सोयी ठेवल्या तर गोंधळही जास्त होतो. उदा. RRI मधील RR टाईप केला तर तो इंग्रजीतच राहतो आणि पुढचे I अक्षर टाईप होईपर्यंत त्याचा दीर्घ ॠ होत नाही. असे झाले की अत्यंत वेगाने टाईप करत जाणे शक्य होत नाही.
६) कळफलकाच्या सोर्स कोडची (mim file) लांबी विनाकारण वाढते.
७) तर मग वैदिक संस्कृत लिहिताना कदाचित अडचणी येतील. हे बरोबर पण त्यासाठी इतर कळफलक आहेत.
८) नुक्ता काढून टाकलेला नाही. उर्दू / हिंदी सारख्या भाषा लादण्याचा हा प्रयत्न नाही. तर च, ज यासारख्या अक्षरांच्या उच्चारातील भेद जर कोणाला लिखाणातून दाखवायचा असेल तर नुक्त्याची सोय ठेवणे आवश्यक आहे.
९) र्‍य साठी Ry आणि र्‍ह साठी Rh उदा. लहान r आणि कॅपिटल R इतकाच फरक आहे या दोन शब्दातः (आचार्यांनी aachaaryaaMnI आचाऱ्यांनी aachaaRyaaMnI )
१०) इंग्रजी शब्द लिहिणे अधिक सोपे: अ‍ॅ साठी कॅपिटल E आणि ऑ साठी कॅपिटल O (अ‍ॅप Ep / ऑन On / ऑफ Of / बॉक्स bOks)

काहीच प्रतिसाद आला नाही तर या सुधारणांना कोणाचा काही आक्षेप नाही असे समजून युबंटूच्या गमभनमध्ये आवश्यक ते बदल केले जातील. मायबोलीच्या गमभनमध्ये काय बदल करायचे ते इथले प्रशासक ठरवतील.

युबंटूमधील गमभन की-बोर्ड कसा वापरायचा ते खाली दिले आहे.
शंका / सूचना असल्यास तसे लिहावे म्हणजे सुधारणा करता येईल.

अ आ इ ई उ ऊ ऋ ए अ‍ॅ ऐ ओ ऑ औ अं अ:
a A i I u U R e E ai o O au M :

क ख ग घ ङ
k kh g gh NG
च छ ज झ ञ
ch Ch j jh JN
ट ठ ड ढ ण
T Th D Dh N
त थ द ध न
t th d dh n
प फ ब भ म
p ph b bh m

य र ल व श ष स ह ळ
y r l v sh Sh s h L

क्ष ज्ञ ऱ्य ऱ्ह
kSh dny Ry Rh

@ shantanuo आपल्या गमभन याने कैक वर्ष मराठी माणसाची लिहिण्याचीभन्नाट सोय करुन दिली. पहिल्याछुट तहे दिलसे शुक्रिया.

फायरफॉक्स ब्राऊजराला मराठी शुद्धलेखन डिक्शनरी अ‍ॅडवन होतं. फायरफॉक्सच्या जुन्या आवृत्तीतच चालते. आता ज्या जुन्या आवृत्तीत ते चालायचं ती आवृत्ती कालबाह्य झाली आहे. आता लोक क्रोम आणि एज ब्राऊजरला रुजू झालेत तर, यांच्यासाठी अ‍ॅडवनचं काही जुगाड जमवता येत असेल तर, पाहावे.

अवांतर : एन.एम.एच. रायटर, विंडोज अकराला चालत नाही. होरायझन मिडियाचा हा "एन.एच.एम. रायटर" "बराहा" वगैरे चालत नाही, नवं काही अद्ययावत असेल तर कळवावे. आभार.

बाकी, धाग्यावर लक्ष ठेवून असेन. खुप खुप आभार.

-दिलीप बिरूटे

बिरूटे सर, गमभनच्या सुरुवातीच्या काळापासूनचे तुम्ही नुसते साक्षीदार नव्हे तर सक्रिय सहयोगी आहात. हा प्रोजेक्ट तुमच्यासारख्या हितचिंतकांमुळेच खूप लोकांपर्यंत पोहोचू शकला. खरे तर मीच तुमचे आभार मानायला पाहिजे!
विंडोज अकरा या नवीन आवृत्तीविषयी आपले निरीक्षण बरोबर आहे. पण त्याचा एक अर्थ असाही आहे की विंडोज जर आता सिक्युरिटीच्या नावाखाली काहीच इन्स्टॉल होऊ देणार नसेल तर एज ब्राऊजरला काही जुगाड कसे करू देईल? त्यामुळे मी सध्या "marathi spell check" हे अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप वापरतो आहे. तुम्ही ते वापरून पहा आणि आवडले तर ५ स्टार द्या म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत ते अ‍ॅप पोहोचू शकेल. टेलिग्राम / व्हॉट्स-अ‍ॅप च्या माध्यमातून येणारे मराठी डॉक्युमेंट / पीडीएफ अथवा इमेज फाईल गूगल लेन्समधून युनिकोडमध्ये बदलून घेतो आणि मग त्या अ‍ॅपमध्ये कॉपी-पेस्ट करून स्पेल चेक घेतो. ही पद्धत मला तरी अतिशय सोयीची वाटत आहे.
तुम्ही जर आयफोन वापरत असाल तर अर्थातच हे अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप इन्स्टॉल करू शकणार नाही. त्यासाठी मी टेलिग्रामचा बॉट बनविला आहे. marathispellbot तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये अ‍ॅड करा.

https://t.me/Marathispellbot

ह्या बॉटला तुमचा मजकूर दिला की तो त्यातील चुका शोधून देतो. टेलिग्राम आणि गूगल लेन्स ही दोन अ‍ॅप तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतातच. नसतील तर सहजपणे इन्स्टॉल करता येतात. टेलिग्राम आणि लेन्सची वेब आवृत्ती विंडोज अकरा मधील क्रोम किंवा एज ब्राउजरमध्ये देखील वापरता येते. आपले मराठी लेखन निर्दोष असावे असे वाटत असेल तर इतके तर केलेच पाहिजे!
अर्थात ह्यातील स्पेलचेक अगदी शंभर टक्के अचूक नाही. त्यातील त्रुटी इथे प्रतिसादात किंवा ई-मेलने कळविल्या तर पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल.

सातत्य आणि सुधारणा आवडल्या. माझ्याकडे संगणक नव्हता.. नाही..फक्त Android मोबाईल. त्यावर या अडचणी येत नव्हत्या. तरीही मी वाचतो. आता टॅबलेटला कीबोर्ड लावला की हे धडे गिरवावे लागणार. कीबोर्ड बंद करून स्क्रीनवरचा वापरल्यास स्क्रीनवरची जागा खाते. इंग्रजीसाठी अडचण नसते पण कीबोर्डचा आग्रह धरल्यास धडे शिकावे लागतील.

मी टेलिग्रामसाठी दोन बॉट बनविले आहेत. तुम्ही Marathispellbot ह्या बॉटला कोणताही मराठी मजकूर दिला की तो त्यातील चुका आणि त्यांना पर्यायी शब्द सुचवेल. SanskritSandhibot हा बॉट दोन किंवा अधिक शब्दांची (पाणिनीय सूत्रानुसार) संधी करून देईल. उदाहरणार्थ "कर्मणि एव अधिकारः ते" असे शब्द संस्कृत बॉटला दिले की तो त्याची "कर्मण्येवाधिकारस्ते" अशी संधी करून देईल. किंवा "हिम आलय" असे लिहून पाठविले तर "हिमालय" असा शब्द मिळेल. दोन किंवा अधिक शब्दांची संधी होते. पण एकच शब्द दिला असेल तर विग्रह होतो. उदा. "गणेशोत्सव" असा एकच शब्द लिहिला तर गणेश + उत्सव अशी त्याची फोड करून मिळेल. हे दोन्ही शब्द स्पेल चेकच्या दृष्टीने योग्य असल्यामुळे गणेशोत्सव या शब्दात काहीही स्पेलिंग मिस्टेक नाही असा संदेश देखील येईल (no spelling error found)

अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप मध्ये मराठी / संस्कृत अशा दोन्ही सोयी आहेत. पण आयफोनसाठी टेलिग्राम बॉट हाच पर्याय आहे. कारण आयफोन अ‍ॅप बनविण्यासाठी खर्च खूप येतो. आयफोन वापरणारी व्यक्ती मराठी / संस्कृत भाषेत काही स्वारस्य दाखवेल असे वाटत नाही आणि पैसे देऊन आयफोन अ‍ॅप खरेदी करेल अशी शक्यता नाही. अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅपला ५ स्टार द्या असे अनेकांना आवाहन केल्यावर वर्षभरात ७ प्रतिसाद मिळाले. त्यातील ४ जणांनी ५ स्टार रेटिंग दिले. (त्यातील २ व्होटर माझ्या घरातले आहेत हे शिक्रेट कोणाला सांगू नका)

विषयांतराचा दोष पत्करून विस्तृत प्रतिसाद देत आहे कारण काही वेळा लोक "हे आधीच का नाही सांगितले" असे नंतर विचारतात.

"telegram", "google lens" आणि "marathi spell check" ही ॲप ज्यांनी अवश्य वापरावी अशी उदाहरणे...

१) डी. टी. पी. ची कामे करणार्‍यांना स्पेल चेकचे तंत्र आणि मंत्र शिकत बसायला वेळ नसतो ही गोष्ट खरी आहे. पण स्क्रिनवरील मजकुराचा एक फोटू काढून या ॲपद्वारे स्पेल चेक करायला तरी जमेल की नाही? वृत्तपत्रात येणारी आपली जाहिरात हजारो लोकं वाचत असतात याचे भान ठेवावे. कोणाचीच तक्रार नाही मग कशाला ही मगजमारी अशी भूमिका घेऊ नये. कारण तक्रार नाही म्हणजे सगळे आलबेल आहे असे नव्हे. नागरिक हा शब्द "नागरीक" असा लिहिला तर काय मोठासा फरक पडतो? मोठासा नाही पण छोटासा तर फरक नक्कीच पडतो. भातात एखाद-दुसराच खडा निघाला तरी जेवणाचा बेरंग होऊ शकतो. जाहिरातीच्या किंवा बॅनरच्या डिझाईनच्या बाबतीत जितका काटेकोरपणा दाखविता त्याच्या १ टक्का तरी भाषेच्या बाबतीत दाखवायला काय हरकत आहे?

२) हे ॲप वापरून विद्यार्थी आपले निबंध स्वतःच तपासू शकतील. मात्र त्यासाठी त्यांना आपले अक्षर सुधारावे लागेल. मी "दिवाळी" असे लिहिले तर गूगलने "विवाळी" असे वाचले. त्याचा अर्थ मला "द" या अक्षरावर मेहनत घ्यावी लागेल असे दिसते. गूगलचे आर्टिफिशिअल इंटलिजन्स आणि मशीन लर्निंगचे मॉडेल जिथे माझे अक्षर नीट वाचू शकत नाही तिथे ते नुसत्या संदर्भाने वाचणाऱ्या शिक्षकांबद्दल थोडा आदर दाखवायला हवा. सुवाच्य अक्षर आणि जमेल तितके निर्दोष लेखन वाटते तितके कठीण नाही.

३) वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी मराठी कागदावर सही करण्यापूर्वी एकदा ते पान गूगलच्या नजरेखालून घालावे. त्यानंतर स्पेल चेक करून चटकन नजरेत भरणारी / अर्थाचा अनर्थ करणारी एखादी चूक झाली आहे का ते पाहावे. यात कदाचित दोन चार मिनिटे जातील पण निर्दोष भाषेसाठी आपण इतकेही करू शकत नाही का?

४) "प्रतिलिपी" सारख्या ॲपमध्ये लेखन करणार्‍या लेखकांनी तर स्पेल चेक वापरणे अत्यावश्यक आहे. वाचक जर पैसे देऊन आपले लेखन वाचणार असतील तर ते अधिकाधिक निर्दोष व्हावे यासाठी प्रयत्न करणे हे लेखकाचे कर्तव्य आहे. केवळ उत्तम कथेच्या जोरावर प्रतिलिपीचे वाचक पैसे देतील असे मला वाटत नाही.

विंडोज इलेव्हन मध्ये (अकरावी आवृत्ती) फायरफॉक्स (किंवा इतर कोणतेही) सॉफ्टवेअर सहजासहजी इन्स्टॉल होऊ शकत नाही. अशा वेळी क्रोम किंवा एज मधून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास फायरफॉक्स उघडता येईल. VNC server ची डेमो आवृत्ती यासाठी वापरू शकता.

https://kasmweb.com/kasmvnc

आता मी नेहमीसारखा मराठी स्पेल चेक वापरू शकतो. अशा पद्धतीत काही फायदे - तोटे आहेत ते खाली दिलेल्या चित्रावरून स्पष्ट होतील.

गूगल मराठीच्या ऑनलाईन पानावर जाऊन आपण टाईप करू शकतो. कॉपी - पेस्ट करण्यासाठी क्लिपबोर्ड ही सुविधा आहे. त्यात तुम्हाला हवा तो मजकूर तुमच्या कॉम्युटर वरून कॉपी करून पेस्ट करता येतो. असा पेस्ट केलेला मजकूर फायरफॉक्समध्ये परत पेस्ट करावा लागतो. एरवी जसे आपण थेट कॉपी-पेस्ट करतो तसे यात करता येत नाही.
तुमच्या स्वतःच्या सर्व्हरवर ही सोय हवी असेल तर खाली दिलेली डॉकर कमांड वापरावी लागेल.

docker run -d \
--name=firefox \
-e PUID=1000 \
-e PGID=1000 \
-e TZ=Etc/UTC \
-p 3000:3000 \
-p 3001:3001 \
-v /path/to/config2:/config \
--shm-size="1gb" \
--restart unless-stopped \
lscr.io/linuxserver/firefox:latest

@शंतनु सर, मराठी स्पेल चेक अँड्रॉइड फोनला उतरवले आहे. आयफोन नाय आमच्याकडे. बाय द वे, फार रुळलो नाही अजून त्या अप्लीकेशनवर कारण ते अजून तितकं युजर फ्रेंडली वाटले नाही अर्थात अजून जसं जसं सुधारणा होतील तसं तसा त्याचा फायदा होईल तेव्हा अधिक उपयोगी होईल.

'आनी' असे चुकीचे लिहिले तर त्याने 'आनी नी आईनी आठी आढी' असे सुचवले. अर्थात हे एवढेच तपासले. अजून छान छान जे असेल ते पाहिलेले नाही. पण मी वापरत राहीन. अ‍ॅप्लीकेशन्सला प्लेस्टोरला पाच स्टार देऊन टाकले. अजून वेगवेगळ्या आयडींनी रेट्स वाढवीन.
( आपल्यातच ठेवा)

बाय द वे, तुम्हालाच इथे इतक्या वर्षानंतर पाहुन मला आनंद झाला. आता नाही म्हटलं तरी, पंधरा एक वर्ष झालीच. भला मोठा काळ गेला. फायरफॉक्सच्या अडतीसाव्या आवृत्तीला आणि अ‍ॅडवनला अजूनही सांभाळून ठेवले आहे. आणि ऑफलाइन गमभन सुद्धा. Happy

अवांतर : शुद्धलेखन ठेवा खिशातचे शब्द आपण या अ‍ॅपला वापरावे असे सुचवतो कसे जमेल कॉपीराईट वगैरे मला माहिती नाही. पण ते जमत असेल तर जमवावे. जमेल तसे बोलत राहूच Happy

- दिलीप बिरुटे

१) सर्वप्रथम पाच स्टार दिल्याबद्दल धन्यवाद. ("अजून वेगवेगळ्या आयडींनी रेट्स वाढवीन." तसे काही करण्याची अजिबात आवश्यकता नाही.)

२) 'आनी' असे चुकीचे लिहिले तर त्याने 'आनी नी आईनी आठी आढी' असे सुचवले. आपले हे निरीक्षण बरोबर आहे. या चुकीचे कारण P हा टॅग आहे. तो बदलून T असा दुरुस्त केला आहे.
जुनी नोंदः
आणे/NP

नवी नोंदः
आणे/NT
पुढील आवृत्तीत आपल्याला अपेक्षित सुधारणा पहायला मिळेल. अर्थात त्याला वेळ लागेल कारण फक्त एका सुधारणेसाठी नवीन अ‍ॅप आवृत्ती बनविणे कठीण असते. आपल्यासारख्या हितचिंतकांनी अधिकाधिक चुका काढणे अपेक्षित आहे.

>> बाय द वे, तुम्हालाच इथे इतक्या वर्षानंतर पाहुन मला आनंद झाला. आता नाही म्हटलं तरी, पंधरा एक वर्ष झालीच. भला मोठा काळ गेला. फायरफॉक्सच्या अडतीसाव्या आवृत्तीला आणि अ‍ॅडवनला अजूनही सांभाळून ठेवले आहे.

या वरील परिच्छेदातील बर्‍याच गोष्टी मला नीट कळल्या नाहीत.
A) लष्कराच्या भाकऱ्या आणि मराठीत ऑफलाईन टंकलेखन या दोन धाग्यात मी मराठी शुद्धलेखन या विषयावर गेल्या अनेक वर्षांत बरेच लेखन केले आहे त्यातील एकही पोस्ट आपण वाचलेली नाही?
B) फायरफॉक्स अ‍ॅडऑन वापरणारे बहुतेक सर्व यूजर्स अगदी आधुनिक म्हणजे १३० / ११५ ही आवृत्ती वापरत आहेत. अडतीसावी आवृत्ती सांभाळून ठेवण्याचे कारण समजले नाही.
C) तुम्ही पंधरा वर्षांपूर्वी जमा केलेले शब्द आणि केलेले मार्गदर्शन अमूल्य आहे. पण त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. इतर स्वयंसेवकांनी विविध कोशातील शब्द दिले आहेत त्यात माझ्या मते अरूण फडके यांच्या कोशातील बरेचसे शब्द देखील आले असतीलच.
D) आता या सर्वाची मुळात आवश्यकता आहे का असा प्रश्न आहे कारण चॅट जीपीटी किंवा गूगल डॉक्समध्ये देखील मराठी स्पेलचेक अंतर्भूत आहे.
E) गूगल लेन्समधून मराठी मजकूर युनिकोडमध्ये वाचून तो या अ‍ॅपमध्ये कॉपी-पेस्ट करणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे मोठा / संपूर्ण मजकूर स्पेल चेक करायचा असेल तर मी हे अ‍ॅप किंवा टेलिग्रामचा बॉट हे दोन पर्याय वापरतो. टेलिग्रामची वेब आवृत्ती काँप्युटरवर वापरतो तर अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप अर्थातच मोबाईलवर.
F) ऑफलाईन गमभन युबंटू (म्हणजे लिनक्सच्या सर्व आवृत्त्यांमध्ये जसे की फेडोरा) उपलब्ध आहे. याला देखील बरीच वर्षे झाली आहेत कदाचित आपल्याला ते माहीत नसेल म्हणून मुद्दाम लिहित आहे.
G) तुम्ही जर लिब्रे ऑफिस वापरत असाल तर "मराठी स्पेल चेक प्लस" या नावाचे अ‍ॅड ऑन उपलब्ध आहे. त्यात चुकीचे शब्द एका नवीन फाईलमध्ये वेगळे काढून दाखविले जातात. मोठ्या मजकुराचा पटकन स्पेल चेक घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हे अ‍ॅड ऑन इंग्रजी/ हिंदीसह अनेक भाषांत उपलब्ध आहे.

तुमची प्रतिक्रिया वाचल्यावर इंग्रजीतील "living under the rock" या शब्दप्रयोगाची आठवण झाली (हलकेच घ्या!). खूप लोकांना कदाचित यातील अनेक गोष्टी माहीत नसतीलही पण गमभनच्या अगदी सुरुवातीच्या काळातील सहयोगींना देखील याविषयी फार कमी माहिती आहे हे कळल्यावर आश्चर्य वाटले.

सर्वच जुने धागे वाचलेले नाहीत. मायबोलीवर काही कविता गझला वाचनापुरता येत जात असतो. अधुन-मधुन आवडले, छान, इतकंच. बाकी, तुम्ही आणि तुमचे गमभन इकडेही असाल असे वाटले नाही. उपक्रम नंतर, जरा पांगापांग झाली.

अरुण फडके यांच्या कोशातले किती शब्द आलेत ते बघत राहीन. लिब्रे ऑफिस वापरत नाही, एचटीएमल टेबल फॉन्ट ते आता नव्या कोणत्या ऑफलाईन टूल्स मधे किंवा ऑनलाइन टूल्स मधे वापरायला मिळेल हे मला नीटसे समजले नाही. पण वेळ घेऊन हे सर्व समजून घेईनच.

बाय द वे, सर्व धागे प्रतिसाद वाचतोय. धन्स.

-दिलीप बिरुटे

गमभनची अद्ययावत आवृत्ती आली आहे काय ? क्षमस्व जरा मी मागे पडलोय याबाबतीत पण आपण समजून सांगालच.

Shantnu.jpg

-दिलीप बिरुटे

अडतीसावी आवृत्ती सांभाळून ठेवण्याचे कारण समजले नाही.

अडतीसाव्या आवृत्तीत ऑफलाईन गमभन मधील टेबलमधील एचटीएमएल टॅब कोडससहित उघडतो तो फायरफॉक्सच्या अन्य आवृत्तीत उघडत नाही असे वाटते म्हणून ती आवृत्ती अधुन मधून वापरतो.

सर्व जरा बाळबोधच चाललंय माझ्या बाजूने पण समजून घ्यालच. :/

-दिलीप बिरुटे

फायरफॉक्सची पुष्कळ जुनी आवृत्ती देखील काही कारणाने जपून ठेवणारी मंडळी देखील लिब्रे ऑफिस वापरत नाहीत. लिनक्स / युबंटू रोजच्या वापरात असून देखील काही लोकं लिब्रेला नाक मुरडतात तेव्हा मला आश्चर्य वाटते. लिब्रे ऑफिस आवडत नाही / गरज वाटत नाही / इतर पर्याय जास्त चांगले वाटतात यापैकी एखादे कारण असेल तर त्यांनी आपल्या मताचा फेरविचार करावा असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.

लिब्रे ऑफिस न आवडण्याची कारणे:
१) लिब्रे ऑफिसच्या वेबसाईटवर आणि डाउनलोड पानावर ते लोकं डोनेशन मागतात ही गोष्ट काही लोकांना आवडत नाही.
२) लिब्रे ऑफिसचा चेहरा (युजर इंटरफेस) काही लोकांना आवडत नाही.
३) लिब्रे ऑफिसचा सर्व भर स्टाईल वापरण्यावर असतो. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये डायरेक्ट फॉरमॅटिंग केलेली फाईल लिब्रे मध्ये स्टाईल वापरून बदलता येते. अशी भेसळ झाली म्हणजे त्या फाईलचा सत्यानाश झालाच म्हणून समजा. या एका कारणाने कॉर्पोरेट जगताला लिब्रे विषयी संशय, भीती, दहशत आणि काही वेळा घृणा वाटते.
४) मायक्रोसॉफ्ट ऑफिस असेल तर इतर कोणत्या सॉफ्टवेअरची गरज वाटत नाही. ते नसेल तर गूगल डॉक्स सारखे ऑनलाईन पर्याय वापरले तर त्यानेही काम भागू शकते. म्हणून लिब्रेची आवश्यकता वाटत नाही.

माझे मत मात्र पूर्णपणे लिब्रेच्या बाजूने आहे. त्याची कारणे:
१) मोफत : सर्व खर्च देणग्यांमधून भागवला जातो.
२) ओपन सोर्स : कोणीही योगदान देऊ शकतो. मी एक्स्टिंशनच्या रूपाने माझा सहभाग दिला आहे.
३) एक्स्टिंशन : लिब्रे मध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक्स्टिंशन उपलब्ध आहे. नसेल तर बनविता येते. मी विविध भाषांसाठी स्पेल चेक बनविले आहेत.
४) सोपे इन्स्टॉलेशन : लिब्रे वापरण्याचे ठरविल्यावर अतिशय कमी वेळेत लिब्रे वापरण्यास सुरुवात करता येते.
४) युबंटू / विंडोज : लिनक्स किंवा विंडोज या दोन्हीत लिब्रे अतिशय चांगले चालते.
५) वर्ड फाईल सपोर्ट : लिब्रे मध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट सहज उघडता येतात. पण वर्डमध्ये लिब्रेची फाईल उघडली जाईलच याची शाश्वती नसते. म्हणूनच लिब्रेमध्ये उघडलेली फाईल मायक्रोसॉफ्ट वर्ड फॉरमॅटमध्ये साठवून ठेवण्याची सोय देखील दिलेली आहे.
६) युनिकोड सपोर्ट : इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत जर काही टाईप करायचे असेल तर लिब्रे सारखा दुसरा चांगला पर्याय नाही.
७) विविध आयुधे : डॉक्युमेंट फॉरमॅट करण्यासाठी लिब्रे कडे अफाट शस्त्रभांडार आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डच्या तुलनेत कित्येक पट अधिक. उदाहरणार्थ वर्डमध्ये अ‍ॅटोकरेक्ट चांगला चालतो पण त्याचा उपयोग फक्त शब्द टाईप करतानाच होतो. इतर कुठुन कॉपी-पेस्ट केलेल्या मजकुरावर अ‍ॅटो करेक्टची मात्रा चालत नाही. पण लिब्रे मध्ये अ‍ॅटोकरेक्ट - "अप्लाय" असा पर्याय आहे. तसेच पायथॉन वापरून मॅक्रो देखील लिहिता येतात.
८) डी.टी.पी. अथवा प्रबंधासाठी उपयुक्त : एक किंवा दोन पानांचा मजकूर असेल तर गूगल डॉक्स उपयुक्त आहे हे खरे. पण कोणी दोन - तीनशे पानांचा प्रबंध (तो देखील मराठीत) गूगल डॉक्समध्ये लिहून पाहिला आहे का? अशा कामांसाठी लिब्रे अतिशय उपयुक्त आहे.
९) ऑनलाईन आवृत्ती : लिब्रे ऑफिस गूगल डॉक्स सारखे ऑनलाईन देखील वापरता येते. त्यासाठी तुमच्या लिनक्स सर्व्हरवर खाली दिलेली कमांड वापरावी लागेल.

docker run -d \
--name=libreoffice \
--security-opt seccomp=unconfined `#optional` \
-e PUID=1000 \
-e PGID=1000 \
-e TZ=Etc/UTC \
-p 3000:3000 \
-p 3001:3001 \
-v /path/to/config:/config \
--restart unless-stopped \
lscr.io/linuxserver/libreoffice:latest

आता तुमच्या सर्व्हरवर पोर्ट नंबर ३००० वर लिब्रे ऑफिस चालू झाले आहे. ते आता ऑनलाईन कोणालाही वापरता येईल. जर तुमच्या सर्व्हरचा आय. पी. तुम्हाला माहीत असेल तर गूगल क्रोम मध्ये तुम्हाला या पानावर जावे लागेल, उदा.
http://your-server-ip.com:3000/

पासवर्ड वापरून तुम्ही ठरावीक लोकांना त्याचा अ‍ॅक्सेस देऊ शकता. त्यांनी सेव्ह केलेल्या फाईल्स तुमच्याच सर्व्हरवर
/path/to/config/ या ठिकाणी जमा होतील. docker ही कमांड उपलब्ध असेल तर हे फक्त पाच मिनिटांचे काम आहे.

१०) हेडलेस आवृत्ती: लिब्रे ही एक कमांड वापरून आपण काही कामे "घंटोका काम मिनिटोंमे" करू शकतो. उदाहरणार्थ वर्ड फाईलची पीडीएफ बनविण्यासाठी ही एकच कमांड पुरेशी आहे...
libreoffice --headless --convert-to pdf myfile.doc

लिब्रे ऑफिस न वापरण्याची इतर काही (मला माहीत नसलेली) कारणे असतील तर मला ती कारणे वाचायला आवडतील.

https://www.libreoffice.org/

बरं. विंडोज अकराला लिब्रे ऑफीस टाकलं. स्पेल चेक एक्स्टेंशन पण टाकलं आता त्याचा उपयोग कसा करायचा ते पण सविस्तर सांगा. आत्ता काही शब्द सुचवतंय पण त्यातही काही अडचणी दिसत आहेत. किंवा काही अजून एक्सटेंशन डालो करायची असतात का ? तेही कळवावे.

PramukhIME टंकायला डालो केले. अ‍ॅ आणि ऑ हे शब्द अ‍ॅड करावे लागतील असे दिसते.

-दिलीप बिरुटे

तुम्ही फायरफॉक्समध्ये ज्या प्रकारे स्पेल चेक वापरत होतात अगदी तसेच लिब्रे मध्ये देखील वापरायचा आहे. पण लिब्रे ऑफिसमध्ये तुम्हाला जास्त सोयी - सुविधा मिळतात. उदाहरणार्थ अ‍ॅटो - करेक्ट, सिनॉनिम (समानार्थी शब्द) वगैरे. "मराठीत ऑफलाईन टंकलेखन" या धाग्यात मी या विषयावर सविस्तर लिहिले आहे. "मराठी स्पेल चेक प्लस" हे आणखी एक अ‍ॅड - ऑन मी नेहमी वापरतो. पण तुम्हाला पहिल्या एक्स्टिंशन मध्येच काही अडचणी दिसत आहेत तेव्हा तुम्ही दुसरे कोणते अ‍ॅड ऑन इतक्यात वापरू नका. काय अडचणी दिसत आहेत ते सांगितलेत तर मी त्यानुसार सुधारणा करू शकेन.
प्रमुख आय. एम. ई. मध्ये ॲ साठी A_ आणि ऑ साठी O (कॅपिटल o) आहे.

Pages