हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.
प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.
तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्या घडणार्या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.
काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.
चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?
(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)
या धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
जुनी मायबोली: http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676
या कारणांनी "मायबोलीकडे न
या कारणांनी "मायबोलीकडे न फिरकणे" असे निदान माझे तरी व्हायचे नाही.
अस आहे बघा, संध्याकाळी/रात्री उशीरा अन पहाटे पहाटे कुत्र्यांचे मालक कुत्र्यांना फिरवायला पट्ट्याला बांधुन रस्त्यावरुन फिरत असतात, कुत्री पट्ट्यासहित मालकास खेचत असतात व त्यान्ना हव्या त्या सोईस्कर ठिकाणापर्यंत मालकांस फरफटत नेतात. बरे नेतात तर नेतात, पण नेमके लोकांच्या घरासमोर/दारासमोर हगून ठेवतात, व ती कुत्री तशी हगत ( माफ करा, प्रातर्विधी असा तुलनेत संसदीय शब्द वापरणार होतो, पण ही कुत्री व मालक रात्रीचेही येतात, प्रातः या शब्दाचा अडथळा होऊ लागला, अन नैसर्गिक विधीने नक्की काय ते कळत नाही, म्हणून शुद्ध मराठी वापरले) असताना मालक इकडेतिकडे लोकांच्या उघड्या दारे खिडक्यातुन आतिल काही दिसते का याचा अदमास घेता घेता कंटाळून जातात. कुत्र्यांची विष्ठा उचलुन टाकण्याचा नियम ये देशी नाही. तेव्हा दुसरे दिवशी सकाळी घरमालकास आपल्या दारासमोरील लोकांच्या कुत्र्यांनी केलेली गूघाण साफ करावी लागते. नशिब इतकेच थोर, की कुत्र्यासोबत कुत्र्यांचे मालक/मालकिणीही नैसर्गिकविधीला तिथेच कुत्र्याशेजारी बसत नाहीत.
आता मला सांगा, माझ्या घरासमोर, जवळपास रोजच्या रोज कोण ना कोण तरी कुत्रा त्याच्या मालकासहित येऊन घाण करुन जात असेल, तर काय मी माझे घर सोडावे? की ती घाण काढून आपल्या कामाला लागावे?
नै, कुत्रा अन त्याच्या मालकांना "हाड हाऽड" करीत दगड हाणून हाकललेही असते, पण ते नेमके आमच्या विश्रांतीच्या वेळेस येऊन घपला करतात ना... चोरदरवडेखोरांकरताचा पहारा या कुत्रे व मालकांकरताही लावणे शक्य नाही हो होत..... !
इथेही तस्सेच काहिसे होते बघा.... कोणतरी अतृप्त आत्मा कुठल्यातरी आयडीने येऊन कोणत्याही धाग्यावर घाण करुन जातो, होय, त्या वर उल्लेखिलेल्या कुत्र्यांसारखीच, तर मग आपण काय करू शकतो? आपल्याला ती घाण साफ करणे भाग आहे. तशी व्यवस्था उभारणे गरजेचे आहे असे नाही वाटत?
असो.
दुर्दैवाने, माझ्या या धाग्यावर, कुत्र्यांनी दारासमोर केलेल्या घाणी प्रमाणे असलेल्या व मला नको असलेल्या पोस्ट्स उडविण्याची सुविधा इथे दिलेली नाहीये. तशी सुविधा मागावी काय? ज्याने धागा उघडला, तर त्या धाग्यापुरता तोच "मॉडरेटर" या भुमिकेत असेल असे केले तर काय हरकत आहे?
लिंबू भाउ समाजजीवनात ट्रोल्स
लिंबू भाउ समाजजीवनात ट्रोल्स असतातच. यावर मी एक लेख नेहमी सांगत असतो. प्लीज डू नॉट फीड द ट्रोल्स
माबोकरांनी जरुर वाचावा. खर तर प्रत्येक नेटिझनने वाचावा.
घाटपांडेजी, लिन्क बद्दल आभार.
घाटपांडेजी, लिन्क बद्दल आभार. सगळ्यांनी वाचावी अशीच आहे.
फक्त मला समोर आलेल्या "ट्रोल्सना" फीडिन्ग करायचे नाही तर खराट्याच्या फटकार्याने झुरळ झटकून टाकू तसे त्यांच्या पोस्टी उडवायच्या आहेत. असो. (लिम्ब्या, दिवास्वप्नेही बघु नयेत)
मायबोलिवरुन जाऊ अशी धमकी
मायबोलिवरुन जाऊ अशी धमकी देणारे खरोखर जात नाहीत.
ते गाणे ऐकलेय का ?
मैं मायके चली जाउंगी तुम देख्ते रहियो.
घाटपांडेजी, धन्यवाद. अतिशय
घाटपांडेजी, धन्यवाद. अतिशय मार्मिक विवेचन
हिंदुनी निस्षिद्ध मानलेले
हिंदुनी निस्षिद्ध मानलेले गोमांस खाण्यास इतराना का प्रतिबंध असावा ?>>>
आपल्याला प्रतिसाद वाचण जमत नसेल आणि डोक्यात शिरवून घेणं त्याहून हि जमत नसेल तर प्रतिसाद देवूहि नयेत . इतरांनी खावू नये असं कुठं म्हणलंय दाखवून द्या . इतरांना गोमांस काय शेण पण खावू द्या कि … मुद्दा हिंदू (सनातनी) बद्दल आहे .
आणि गोमांस खाउनही वमेरिका युरोप ही सर्व सुख भोगण्याची भुमी आहे म्हणे !>>>
ती त्यांच्या चांगल्या पुर्वकर्मांमुळे . त्यांना गोमांस का खायचं नसतं हे माहित नसल्यामुळे त्यांना त्याचं तेवढं पाप लागत नाही . हे आधीही अनेक वेळा सांगितलय . पण तुझ्या डोक्यात शिरत असेल तर ना
दुसरे शेण खातात मग आपण हि का मागे राहावं असं म्हणण्या सारखं आहे हे
काउ, जिथं जावू तिथं घाण करू हा तुमच्या समाजाचा जन्मसिद्ध हक्क असल्यामुळे तुम्ही तो बजावणारच . म्हणून हिंदूंच्या धाग्यावर सारखा पच्कत असतोस . तुझ्या समाजाचं संकेतस्थळ असेल तिथे जावून कर ना काय घाण करायचीये ती . इथे कशाला पडलायेस
त्यांना गोमांस का खायचं नसतं
त्यांना गोमांस का खायचं नसतं हे माहित नसल्यामुळे त्यांना त्याचं तेवढं पाप लागत नाही
......
माझ्या लग्नात मी पाय धुणे अन
माझ्या लग्नात मी पाय धुणे अन कन्यादानाला फाटा दिला होता , घरचा टोटल पाठिंबा होता, पण गुरजी कुरकुरत होते , आजकाल ची पोरे फाडिस्ट असतात वगैरे
तेव्हा बाबा हात जोडून म्हणाले "घरची लक्ष्मी आम्ही दान घेत नसतो, पोराचे नशीब पालटेल असली सुन आहे तितकी अन एक नारळ पुरे"
सासुरवाड़ी ची conservative माणसे ऐकेनात तेव्हा मी रुद्रावतार धारण केला अन गुरजी अन त्यांच्याकडली म्हातारी कोतारी सगळ्यांना निक्षुन बजावले तेव्हा ते लोक मानले,
फर कॅप घालण्याबद्दल तसेच , मला ती टोपी ज़रा "बाई आज वाड्यावर या" टाइप वाटते तेव्हा मी त्याला मना केले व् सरळ आमची परंपरा असलेली खादी टोपी घातली तेव्हा पार मित्र ही सालटी काढत होते,
"तुला लेका लग्नच सापड़ते का क्रांति करायला न काय काय"
पण मी नाही म्हणले, मुलाकडले जसे बरेचवेळी हटवादी असतात तसेच वधूपक्ष ही असू शकतो, थोड़े एडजस्ट करायचे अन थोड़े जे पटनार नाही ते स्पष्ट सांगावे!
बाकी पंजाबी लग्ने तूफ़ान असतात! ऐन लग्नात भिकार मानपानाला नो प्लेस!!
माझ्या आत्याकडे लग्नाळु अशी
माझ्या आत्याकडे लग्नाळु अशी दंतकथा आहे (हि खरी असु शकत नाही)..
आत्याकडील (घरण्यातील कोणि पुराण व्यक्ती) मुलाचे लग्न ठरले. लग्न मुलीच्या गावी ठरले. तयारी सुरु झाली. वर्हाडी मंडळी जमु लागली. देवब्राह्मण इतर पुजा झाले. आता प्रत्यक्ष लग्नासाठी निघण्याचा दिवस आला. सामान सुमान घेवुन बैल गाडीत रचले. बायका, पोर, पुरुष मंडळी बसली.
नवरा अजुन घरात होता. तो ही निघाला स्पेशल बैलगाडीत बसयला. एक जेष्ठाने शंका काढली. इतके लग्नाचे घर पुर्णपणे कुलुप घालुन बंद कसे ठेवायचे. तर कोणी राख़ण करयला मागे रहायला हवे. तर तो जेष्ठ, नवर्या मुलाला म्हणाला, अरे तुच थांब. घर राखत बस. त्याने हि ऐकले आणि वर्हाड निघुन गेले..कोणाच्या लग्नाला.. त्यांनाच माहित.
मला ती टोपी ज़रा "बाई आज
मला ती टोपी ज़रा "बाई आज वाड्यावर या" टाइप वाटते >
बाकी पंजाबी लग्ने तूफ़ान
बाकी पंजाबी लग्ने तूफ़ान असतात! ऐन लग्नात भिकार मानपानाला नो प्लेस!!
<<
व्हो.....व्हो!
भौ,
एंगेजमेंटलाच मुलाच्या सगळ्या "जवळच्या" नातेवाईकांना सोनेच गिफ्ट द्यावे लागते असा "नियम" आहे, असं ऐकलंय बर्का. सोनं दिलं. लगीन व्हायचं बाकी आहे अजून.
सोन्याबापू . लई झ्याक .
सोन्याबापू . लई झ्याक . असल्या बिनडोक प्रथा बंद करायला सगळ्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे . मुलीच्या आईने मुलाचे पाय धुणं बघून माझं तर डोकच फिरतं . तो मुलगाही खुशाल आपल्या आईसारख्या सासू कडून पाय धुवून घेतो .
मला ती टोपी ज़रा "बाई आज वाड्यावर या" टाइप वाटते>>> +१११
माझ स्वतःच लग्न शुद्ध नोंदणी
माझ स्वतःच लग्न शुद्ध नोंदणी पद्धतीने झाल. त्यामुळे अशा गोष्टींना थारा नव्हता.नातेवाईकात नाराजी होती हा भाग वेगळा. पण परंपरा चाली रिती झुगारुन द्यायला जरा अवघड वाटणारे लोक असंख्य आहेत. त्यात सुसंस्कृत सुविद्यही आहेत. त्यांना पाय धुणे वा वरदक्षिणा हा प्रकार कालबाह्य वाटला तरी चाली रितीचा भाग म्हणून 'शास्त्रापुरते' तो विधी करतात. त्यात पाय धूउन घेणारा श्रेष्ठ व धुणारा कनिष्ठ अशी भावना वधू - वर अशा दोन्ही पक्षात नसते.त्यात परस्पर सामंजस्य असत. एकदा धार्मिक पद्धतीने लग्न करायचे असे ठरवल्यावर तेवढी अॅडजेस्टमेंट करतात लोक. थोडक्यात लुटुपुटीचे विधी करतात. त्यामुळे नातेवाईकातल्या काही ज्येष्ठ मंडळींनाही बर वाटत. अस माझ निरिक्षण आहे.
त्यात पाय धूउन घेणारा श्रेष्ठ
त्यात पाय धूउन घेणारा श्रेष्ठ व धुणारा कनिष्ठ अशी भावना वधू - वर अशा दोन्ही पक्षात नसते>>>
ह्या सगळ्या प्रथा भावनेच्या बेसिस वरच निर्माण झाल्या आहेत .
मग मुलाच्या आईनेही मुलीचे पाय धुवावेत आणि अशी कोणतीही भावना ठेवू नये. तुमच्या आईने सगळ्यांदेखत तुमच्या बायकोचे पाय धुतलेले तुम्हाला आवडतील का ?
>>>> मग मुलाच्या आईनेही
>>>> मग मुलाच्या आईनेही मुलीचे पाय धुवावेत आणि अशी कोणतीही भावना ठेवू नये. <<<<
माफ करा, पण शास्त्रसंमत रुढींनुसार "वधुअवलोकनावेळेस" वराच्या आईने वधुचेही पाय धुतले पाहिजेत.
मात्र वरपक्ष, तो श्रेष्ठ, वधुपक्ष म्हणजे कनिष्ठ असल्या भिक्कार/भ्रामक कल्पनांमुळे वधुचे पाय धुण्याचा विधी महाराष्ट्रातून तरी जवळपास हद्दपार झाला आहे. अन्य राज्यांचे माहित नाही.
माफ करा, पण शास्त्रसंमत
माफ करा, पण शास्त्रसंमत रुढींनुसार "वधुअवलोकनावेळेस" वराच्या आईने वधुचेही पाय धुतले पाहिजेत.
>>
हा विधी बघितला आहे ३ ४ लग्नांमध्ये.
ज्येष्ठ/कनिष्ठ वगैरे वाद
ज्येष्ठ/कनिष्ठ वगैरे वाद टाळून "पाय धूण्यामागची" संकल्पना खरोखरच जर अनुभवायची झाली, तर अशा विधींचे आधी येतानाच किमान चार/पाच किलोमीटर तरी फुफाट्यातून/रस्त्यातून अनवाणी चालत/धावत/पळत यावे, अन मग स्वागताला उभारलेल्या कुणी धूळभरल्या/पोळलेल्या/सोलपटलेल्या पायांवर गारेगार पाणी ओतल्यावर जो स्वर्गीय आनंद होतो तो अनुभवावा असे मला वाटते.
वधू वा वर वा त्यांचे आईबापच नव्हे, तर कोणीही बाहेरून लांबून प्रवास करून आलेला असल्यास त्यास पाय धुण्यास पाणि नेऊन देण्याची पद्धत आजही खेडेगावातून (जिथे पाणी सहज/मुबलक उपलब्ध आहे तिथे) सर्रास आहे (व बाहेर पाय न धूता घरात शिरण्याचीही मनाई आहे). याचेच सुसंस्कारीत/शोभेसे/अलंकारिक रूप म्हणजे वर्हाडातील वरमाय/वरबाप/वर/सगेसोयरे यांचे पायधुणे होय.
देवपूजेतही, देवाचे ध्यान, आवाहन, आसन हे उपचार झाल्यानंतरचा तत्काळचा प्रथम उपचार म्हणजे पाय धूणे होय. हिंदू धर्म "मानवातही देव" बघतोच, अन म्हणुनच देवासाठी असलेला पाय धुण्याचा उपचार आलेल्या अतिथी/पाहुणा यांचेबाबतही केला जातोच जातो.
आता कालपरत्वे त्यात किती किती तर्हा आल्या, किती आडमुठेपणा भरला हा वेगळा विषय. पण मूळ प्रथा, समोरील "मानवातही" देव बघणे, किंवा समोरील मानवातील "देवस्वरुप" जागे करणे, किंवा समोरील मानवातील "देवस्वरुपास" भजणे, हाच आहे.
[ज्यांनी हिंदुस्थानच्या या देवभूमित राहून, हिंदू धर्मात असुन, हिंदू धर्मात असण्याचे अन्य सर्व फायदे लाटूनही, स्वतःस हिंदू म्हणवून घेण्याचे नाकारले आहे अथवा धर्म वगैरे सर्व झूठ, देव वगैरे सर्व झूठ, देवास रिटायर करा अशी सोईस्कररित्या स्वतःची मनोभुमिका करुन घेतली आहे त्यांना वरील विवेचन कळेल/कळावे अशी अपेक्षा नाही.]
[ज्यांनी हिंदू धर्मात असुन,
[ज्यांनी हिंदू धर्मात असुन, हिंदू धर्मात असण्याचे अन्य सर्व फायदे लाटूनही, स्वतःस हिंदू म्हणवून घेण्याचे नाकारले आहे अथवा धर्म वगैरे सर्व झूठ, देव वगैरे सर्व झूठ, देवास रिटायर करा अशी सोईस्कररित्या स्वतःची मनोभुमिका करुन घेतली आहे त्यांना वरील विवेचन कळेल/कळावे अशी अपेक्षा नाही.]
>> आता
.<<आता कालपरत्वे त्यात किती
.<<आता कालपरत्वे त्यात किती किती तर्हा आल्या, किती आडमुठेपणा भरला हा वेगळा विषय. पण मूळ प्रथा, समोरील "मानवातही" देव बघणे, किंवा समोरील मानवातील "देवस्वरुप" जागे करणे, किंवा समोरील मानवातील "देवस्वरुपास" भजणे, हाच आहे >>
लिम्बु जी हे विशेष पटले!
पाय धुताना धुणार्याने जर हे सांगितले की..'अपल्यातील चांगल्या गुणांचा हा आदर सत्कार करत आहोत'..तर फ़ारसे अवघडलेपण राहणार नाही.
देवपूजेतही, देवाचे ध्यान,
देवपूजेतही, देवाचे ध्यान, आवाहन, आसन हे उपचार झाल्यानंतरचा तत्काळचा प्रथम उपचार म्हणजे पाय धूणे होय. हिंदू धर्म "मानवातही देव" बघतोच, अन म्हणुनच देवासाठी असलेला पाय धुण्याचा उपचार आलेल्या अतिथी/पाहुणा यांचेबाबतही केला जातोच जातो. >>> लिंबू, हे छान लिहीले आहेस.
देवाचे पाय धुणे आणि कुठल्याही
देवाचे पाय धुणे आणि कुठल्याही सोम्यागोम्याचे पाय धुणे ह्यात फरक आहे .आपण आपल्या घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे पाय धुतो का?मग वधू सासरी गेल्यावर गृहप्रवेश करताना सासर्च्यांनीही तिचे पाय धुवावेत
. खरं तर आईवडील , देव आणि गुरु सोडून उठसुठ कोणाच्या पाया सुधा पडू नये .
धूळ काय, उन्हात चालून आलेले
धूळ काय, उन्हात चालून आलेले पाय काय..
च्यामारी त्या पोरीच्या बापाकडून लक्झरी गाडीचे पैसे वसूल करून दारू पीत उशीरा आलेलं वर्हाड दमून भागून उन्हातान्हात धूळीत अनवाणी पायी आलेलं अस्तं अन तिथे दारातच त्यांचे पाय धुतात, असे भासवून, स्वतःलाच मूर्ख बनवणे सुरु आहे लिंबूरामांचे.
"धर्मा"तल्या कर्मकांडाच्या अवडंबरातल्या चुकीच्या गोष्टींना भादरून/छाटून टाकण्याऐवजी, त्याचे समर्थन करत रहायचे, अन त्यासाठी सुधारणावादी लोकांना विकृत ठरवायचा प्रयत्न करायचा, ही लिंबारामांची हास्यास्पद सवय जाणार नाही, हेही खरेच.
आजकाल यांच्या बाष्कळपणाचा प्रतिवादही करावासा वाटत नाही. मूड लागेल तेव्हा अधिक वाभाडे काढीन, सध्या होल्डवर टाकतो.
इथे चक्क ट्रिपल तिर्रीशी सहमत
इथे चक्क ट्रिपल तिर्रीशी सहमत
.
.
लिंबूकाका, संपूर्ण
लिंबूकाका, संपूर्ण सहमत.
[ज्यांनी हिंदू धर्मात असुन, हिंदू धर्मात असण्याचे अन्य सर्व फायदे लाटूनही, स्वतःस हिंदू म्हणवून घेण्याचे नाकारले आहे अथवा धर्म वगैरे सर्व झूठ, देव वगैरे सर्व झूठ, देवास रिटायर करा अशी सोईस्कररित्या स्वतःची मनोभुमिका करुन घेतली आहे त्यांना वरील विवेचन कळेल/कळावे अशी अपेक्षा नाही.]>>
हे सगळ्यात मस्तय.
ज्यांनी हिंदू धर्मात असुन,
ज्यांनी हिंदू धर्मात असुन, हिंदू धर्मात असण्याचे अन्य सर्व फायदे लाटूनही, स्वतःस हिंदू म्हणवून घेण्याचे नाकारले आहे अथवा धर्म वगैरे सर्व झूठ, देव वगैरे सर्व झूठ, देवास रिटायर करा अशी सोईस्कररित्या स्वतःची मनोभुमिका करुन घेतली आहे त्यांना वरील विवेचन कळेल/कळावे अशी अपेक्षा नाही >>
ज्यांनी काँग्रेसच्या राज्यात राहुन काँग्रेसतर्फे सर्व फायदे लाटूनही स्वतः मात्र सगळे झुठ असे काही घडलेच नाही अशी सोईस्कररित्या स्वतःची विकृतमनोवृत्तीभुमिका करून घेतली आहे त्यांना कळेल अशी अपेक्षा नाही
>>>> च्यामारी त्या पोरीच्या
>>>> च्यामारी त्या पोरीच्या बापाकडून लक्झरी गाडीचे पैसे वसूल करून दारू पीत उशीरा आलेलं वर्हाड <<<<<
हे असे काही पोरीच्या बापाकडून वसुल करावे असे हिंदू धर्मात सांगितलेले नाही, सबब, "वाभाडे(?)" काढण्याच्या निमित्तानचे नालायक स्वार्थांध लोकांनी रचलेल्या चालिरितींची उदाहरणे धार्मिक बाबतीत देऊन वडाचि साल वान्ग्याला चिकटवायचे तुमचे प्रयत्न फसणारेत इब्लिसराव.
(No subject)
हिंदू धर्म की सनातन धर्म ?
हिंदू धर्म की सनातन धर्म ? खर्या धर्मात काहीच उलटे सुलटे सांगितले नाही पण काही नतद्रष्ट नालायक लोकांनी स्वत:च्या स्वार्थाकरीता मुर्ख चालिरिती मधे घुसवल्या आहे. आणि त्याचालीरीतींना त्यांचे अंध अनुयायी बरोबर सांगत सर्वत्र फिरत आहे. एवढेच याचे महत्त्व. ज्या चाली हिंदू धर्मात नाही आहे त्या चिटकवण्याचा वेडगळ प्रयत्न लिंबू सोडा
काही नतद्रष्ट नालायक लोकांनी
काही नतद्रष्ट नालायक लोकांनी स्वत:च्या स्वार्थाकरीता मुर्ख चालिरिती मधे घुसवल्या आहे. आणि त्याचालीरीतींना त्यांचे अंध अनुयायी बरोबर सांगत सर्वत्र फिरत आहे. >>>+११११११११
बिनडोक चालीरीती सांगणारे जेवढे नालायक तेवढेच त्या पाळणारे सुधा .
सनातन धर्माला चुकीच्या मार्गावर नेनार्यांच्यात २ गटांचा फार मोठा वाटा आहे . एक म्हणजे पुरोहित -भटुकडे (अस्सल ब्राह्मण नाही . ब्रह्मज्ञान असणारा तो ब्राह्मण ) आणि दुसरा म्हणजे स्त्री समाज . पुरोहितांनी कैच्या काई सांगायचं आणि इतरांनी अक्कल गहाण टाकून कान ,डोळे बंद ठेवून ते स्वीकारायचं . पूर्वीच्या काळी भट समाजाने क्षत्रियांना हाताशी धरलं असल्यामुळे इतरांना मान्य करण्यावाचून पर्याय नसेल . पण आत्ता सुधा ? बिनडोक प्रथा पाळण्यात स्त्री वर्ग सगळ्यात पुढे असतो . असं का , कुणी , कशासाठी सांगितलंय ? असं केलं किवा तसं नाही केलं तर काय होईल ? खरच असं होतं का हे प्रश्न कसे पडत नाहीत ? मुकाट निमुटपणे कसं काय सगळं केलं जातं ?
Pages