विवाहाच्या निमित्ताने....

Submitted by limbutimbu on 26 November, 2014 - 02:31

हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.

प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.

तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्‍या घडणार्‍या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.

काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.

चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?

(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्‍या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)

या धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
जुनी मायबोली: http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इवान , तुम्ही असं बोलताय जसा काही आम्ही तुमच्या प्रतिसादाची वाटच पहात असतो :हहगलो:. खुशाल दुर्लक्ष करा आमच्याकडे . त्यांनी काय फरक पडणारे ? कारण तुमच्याकडे आमच्या योग्य असं उत्तरच नाहीये ना

खरे सान्गायचे तर नॉनव्हेज व्हेज खाणे हे ज्याच्या त्याच्या पिन्डावर अवलम्बुन असते>>>
माझा नॉनव्हेज खाण्याला विरोध नाहीच्चे . विरोध आहे तो गोमांस खाण्याला . आता लोक कोंबड्या , बोकड , मासे , खेकडे , डुकर , बदकं मारून खातातच कि . तेवढ्याने जिभेचे चोचले पुरत नाहीत म्हणून गाय सुधा मारून खाण्या इतके खालच्या थराला जाल काय ? माणसाचं मांस सुधा चांगलं लागत असेल कि . ह्याचा अर्थ तुम्ही माणसं सुधा मारून खाल कि काय ? कोणाला मारायचं आणि कोणाला नाही ह्यात सद्सद विवेक बुद्धीचा वापर कराल कि नाही ? आणि दुसर्या देशात , दुसर्या धर्माचे लोक काय करतात ह्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाहीये . मी आधीच म्हणल्याप्रमाणे त्या लोकांना ह्या गोष्टींचं नॉलेज नाही . मुद्दा हिंदू लोक नीच होत चाललेत हा आहे .
आता मुसल्मानांच्यात डुक्कर खात नाहीत. हा नियम प्रत्येक जन पाळतो. कुठलाही मुसलमान चांगलं लागतंय म्हणून डुक्कर खाणार नाही . आणि कुणी तसं केलं तर बाकीचे त्याला जिवंत ठेवणार नाहीत . मग हिंदूंमध्ये काही चांगले आणि पाप टाळण्याचे नियम पाळण्याची एकी का नाहीये ? हिंदू चांगल्या वाईटाचा विचार का करेनासे झालेत ? हिंदूंमध्ये एकी नाही . धर्माभिमान नाही .वाईट गोष्टींना विरोध करायची हिम्मत नाही (त्यात सामील होण्याची मात्र आहे ) उगीच का मुस्लिम , इंग्रज इतके वर्ष राज्य करू शकले ? सगळी संपन्नता लुटून नेवून हिंदूंना दरिद्री करू शकले ….
असो आता मी माझे प्रतिसाद थांबवत आहे . एवढ्याने हि काही मूर्ख हिंदू आपला हेका कायम ठेवणार असतील तर . कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच असंच म्हणावं लागेल .

हिंदु गाय खातात म्हणुन मुस्लिम , इंग्रज इतके वर्ष राज्य करू शकले ? सगळी संपन्नता लुटून नेवून हिंदूंना दरिद्री करू शकले??

बरं, मग आपले वैदिक पूर्वज आणि भारतातील बहुतेक सर्व प्रदेशांतील आद्य समाज - ज्यांच्यापासून आपण आलो आहोत - मस्तपैकी गोमांस खात होते, नळ्या चोखत होते त्याचं काय करणार? आणि दलित समाजातही मोठ्या प्रमाणावर गोमांस, म्हशीचं मांस पारंपरिक रीत्या खाल्लं जायचं, जातं - त्याचं काय करायचं? का त्यांना तुम्ही हिंदू मानत नाही/मानणार नाही?

आणि हिंदू म्हणजे नक्की कुठला धर्म म्हणायचाय? अहो, म्लेंच्छांनी नाव दिलंय हो हिंदू म्हणून.. सनातन धर्म म्हणा.. आणि अहिंसेची शिकवण सनातन (हिंदू) धर्माची नव्हे. ती मूळची बौद्ध धर्माची.

वरदा,

१.
>> आपले वैदिक पूर्वज आणि भारतातील बहुतेक सर्व प्रदेशांतील आद्य समाज - ज्यांच्यापासून आपण आलो आहोत -
>> मस्तपैकी गोमांस खात होते, नळ्या चोखत होते त्याचं काय करणार?

त्यावेळी द्वापारयुग होतं. ते नियम आत्ता कलियुगात लागू पडत नाहीत.

२.
>> दलित समाजातही मोठ्या प्रमाणावर गोमांस, म्हशीचं मांस पारंपरिक रीत्या खाल्लं जायचं, जातं - त्याचं काय
>> करायचं?

बाबासाहेबांनी सांगितलंय मेलं ढोर ओढू नका आणि खाऊही नका. काय कारण असेल बरं त्यामागे?

आ.न.,
-गा.पै.

प्रत्येक धाग्यावर धर्म, राजकारण, हिंदु, मुस्लिम इ. आणुन लाथाळी आणि चिखलफेक करायलाच हवी का?
धाग्याचा विषय लग्नाच्या अनुषंगाने हलके-फुलके किस्से इ. आहे. इथे येऊन घाण केलीच पाहिजे का?

तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्‍या घडणार्‍या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.
काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.
चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?

हे हेडरमध्ये ढळढळीत लिहिलेले असतांना वरचे काही (खरं तर बरेच) प्रतिसाद कुठे भरकटले आहेत हे कळायला मार्ग नाही.

माझे सदस्यत्व केवळ 4 वर्ष 2 आठवडे आहे म्हणून इग्नोर करणार असाल तर करा. पण तुमची घाण सगळीकडे नको. आता बास. ___/\___

रत्येक धाग्यावर धर्म, राजकारण, हिंदु, मुस्लिम इ. आणुन लाथाळी आणि चिखलफेक करायलाच हवी का?
धाग्याचा विषय लग्नाच्या अनुषंगाने हलके-फुलके किस्से इ. आहे. इथे येऊन घाण केलीच पाहिजे का?

>>>> अनुमोदन.

+१

गामा पैलवान कधी बसायचे मग?

तुम्ही पुण्याचे दिसत म्हणजे काही कोणाला देणार नाही .. पाणीसुद्धा .. सो दारू ची व्यवस्त मेच करतो

आणि बरोबर काय ? कोंबडी , बकरी कि डुक्कर ? पाहिजे असेल तर मी म्हैस पण ? ( water buffalo stake ??)

असो मी ऐकलेय ७०% दुध म्हशीचे असते मग म्हशीवर अन्याय का?

असो मी माझ्या खर्या ID ने वावरतो .. हा आस पैलवान ID घाबरायला घेतला का? मी घाबरलो आहे हा

@ रश्मी.. ..
प्रतिसाद आवडला.. आणि पिन्डावारच जोक पण.
खरेच खरे सान्गायचे तर नॉनव्हेज व्हेज खाणे हे ज्याच्या त्याच्या पिन्डावर अवलम्बुन असते.

मी फार कमी मांसाहार करतो . भाऊ शाकाहारी आहे ( अंडे पण नाही) वडील फार म्हणजे फारच कमी खातात . आम्ही तिघेही मासे खात नाही . त्यामुळे आईची फारच अडचण होत होती . फार कामे वेळा , आणि बर्याचदा पाहुणे आल्यावरच मांसाहार होत होता.
बायको पण लग्नानंतर वैतागली होती .. ती स्वतः स्वतः साठी केवडे करणार.

पण मुलीने मात्र माझी सर्व पापे फेडायचे ठरवले. साडे सात वर्षांची आहे आणि आताच ती एकही कोंबडी पार करू शकते ! चिकन ,मासे,, शिप्ले , खेकडे , चिंबोरी आणि कधीतरी तर ऑक्टोपस आणि स्क़्विड पण! तिला अजून फार red meat दिले नाही .

सध्या आईच्या घरी आई , सून आणि नात एक दिलाने मांसाहार करीत असल्याचे मनोहारी दृश्य असते .....

हेमन्त्,

>> आताच ती एकही कोंबडी पार करू शकते !

सातव्या वर्षी एक आख्खी कोंबडी उडवते? बिग अचिव्हमेंट. मी तेराव्या वर्षी पाऊण किलो कोंबडी खायचो. त्यानंतर एव्हढी कधीच खाऊ शकलो नाही.

आ.न.,
-गा.पै.

विवाहाच्या निमित्ताने....मांसाहारावर धार्मिक चर्चा .... मस्त !!

अवांतर :

काउ,

>> तुमच्या करोनरीजमध्ये ती कोंबडी जाउन बसली आहे.

बरोबर. म्हणूनच मी जिवंत राहिलो : http://www.heart.org/HEARTORG/GettingHealthy/NutritionCenter/HealthyEati...

आ.न.,
-गा.पै.

मायबोलीवरील घुसखोर नक्षली/ब्रिगेडींची ही नविन स्टाईल दिस्ते की "विशिष्ट आयडींच्या" धाग्यावर जाऊन विषयाला सोडून मुद्दामहून अचकटविचकट/किळसवाणे विषय काढीत राडा करायचा...... जेणेकरुन त्या त्या आयडी व वाचकही परत म्हणुन मायबोलीकडेही फिरकणार नाहीत. गावोगन्ना असलेल्या नुक्कड/चवाठ्यावरील मवाली कम्पूकडून येणार्‍या जाणार्‍या स्त्रीपुरुषांची छेडछाड जशी केली जाते तद्वतच या आयडीज मायबोलीवरील चांगल्या चाललेल्या धाग्यांवर गरळयुक्त ओकार्‍या काढत आहेत.

महत्वाचे म्हणजे हा हल्ला निव्वळ मजसारख्या आयडींच्या लिखाणावर नसून वा निवडक धाग्यावरील नसून, एकूणच मायबोलीवर होत आहे (व तसाच एकूणच नेटविश्वात होत आहे) हे पक्के समजून घेतले पाहिजे व त्यानुसारच कठोर त्वरीत कारवाई हवी.

आयडी व वाचकही परत म्हणुन मायबोलीकडेही फिरकणार नाहीत
>>
हेच विचार सुरु आहेत हल्ली लिंबूभाऊ. बाकी पूर्ण पोस्टीस अनुमोदन.

Pages