विवाहाच्या निमित्ताने....

Submitted by limbutimbu on 26 November, 2014 - 02:31

हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.

प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.

तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्‍या घडणार्‍या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.

काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.

चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?

(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्‍या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)

या धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
जुनी मायबोली: http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विहिणीवरून आठवलं,
मलाही पूर्ण नवीन होता विहीण हा प्रकार. भावाच्या लग्नात म्हटलेली शेवटच्या पंगतीला कोणी. माझ्या शेजारी चुलत आजोबा बसलेले. मला हळूच म्हणले, "आज दादा (आजोबांना दादा म्हणत) असते तर आता थांबवलं असत, मलाही आवडत नाही पण उगाच लोकांना वाईट वाटतं म्हणून बोलत नाही आता"
आजोबांना पानावर बसल्यावर घास तोंडात घालायच्याआधी हा 'विहीण' प्रकार अजिबात आवडत नसे. जेवणं झाली की मुलगी सासरी जायची वेळ समीप आली त्यामुळे आधीच मुलीची आई/ घरचे हळवे झालेले असतात आणि त्यात पानावर बसून रडारड नको... धड जेवण होऊ द्या आणि मग म्हणा काय ते, असं त्यांनी अनेक लग्नांत खडसावून सागितलेल. सहज आठवलं. ठेवा बद्दल दुमत नाही.

हाहा, माझ्या नणं देची गंमत सांगू का.
कर्नाटकची मुलगी आणि यूपीचा मुलगा.
त्यामुळे आमच्या कर्नाटकी पद्धतीचे सर्वं देऊनही कार आणि फ्लॅट दिला नाही.
मात्रं लग्नात कार आणि फ्लॅटच्या चाव्या रुखवतात नसतील तर युपीचे लोक मुलाकडच्यांना हसणार. आणि प्रेमविवाह असल्याने सरळसरळ मागताही येत नाही. (मागितलं असतं तरी सासर्यांना मुंबईत फ्लॅट वगैरे जमणे त्यावेळी कठिण होते)
पण आमच्या नणंदेच्या सासर्यांनी तडकाफडकी एक नवी कार घेऊन तिची चावी आणि आपल्या एका नव्या फ्लॅटची चावी रुखातात ठेवली. (त्यांना फ्लॅटची कमी नाही ते बिल्डींग व्यवसायात आहेत)
आणि म्हणे दोन्हींकडची इज्जत वाचवली.

>>सांस्कृतिक ठेव म्हणुन ही परंपरा वॉलंटरीली चालू रहावी का? युरोपातल्या अनेक परंपरा अशा आजही चालू आहेत.
+१ टण्या.
प्रथा जिवंत ठेवणार्‍या 'अस्सल' मनुष्यांऐवजी आवडेल त्यांनी हे वारसे चालू ठेवले तर जमेल असे वाटते.

लग्नाच्या खर्चा बाबत जरा सामाजिक भान ठेवावेच, पण खर्च कीती करायचा ही ज्याची त्याची आवड असावी ,कर्ज काढुन ऐपत नसताना उगाच खर्च करु नये ,लग्न महत्वाचे ते साधेपणाने झाले तरी किंवा सोहळ्यासारखे झाले तरी नाहीतर तो (ताण असलेला)व्यवहार होतो. जसे की माबो वाचणारे लाखाच्या लॅपटॉप वरुन वाचत असतील किंवा तर काही हजारांच्या हलक्या दर्जाच्या मोबाईलवरुन किंवा साध्या पीसी वरुन ,माबो वाचता येणे महत्वाचे. Happy

बापरे हे सगळ अजुन चालत?? म्हण्जे काहीही बदलल नाहीये. मला वाटत होत हुंडा घेण/देण कायद्याने गुन्हा आहे.

कठिण आहे

सिनि, अगदी बरोबर.
आता मलाच लग्नात खूप खर्चं करायला जमेल आणि आवडेल.
आमच्या दोन्ही मुलांची बारशीपण आम्ही एकदम दणक्यात केली.
मात्रं मानपानाचा गोंधळ होऊ नये म्हणून सगळा खर्चं आम्ही केला.
सगळ्या गिफ्टस ऐच्छिक.
खरं तर आमच्या लग्नापेक्षा मुलांच्या बारश्यात खर्चं अधिक झाला.
पण आत्ता तो मला परवडतोय आणि मला मजाही येतेय.
हेच मला परवडत नसतं किंवा माझ्या माहेरच्याना जबरदस्तीने करायला लावलं असतं तर मला खूप राग आला असता.

अश्विनी के, हिम्याला, रैनाला वगैरे कदाचित आठवत असेल - ते तिथेच समोर हॉलमध्ये नुकतेच झोपून उठले होते फिदीफिदी >>>>> Lol अरे आम्ही पारोसे नव्हतो बसलो. वर खोलीत गर्दी असल्याने लग्नाच्या कपड्यांत तयार झालो नव्हतो. तू सोवळं नेसून इकडून तिकडे भटजींच्या इन्स्ट्रक्शननुसार जाताना आम्हाला अवतारात पाहून मला खूण केली होतीस ते पण आठवतं की जा आता अंघोळी करा आणि तयार होऊन या लवकर. मग मी हातवारे करुन सांगितलं होतं की अंघोळी झाल्यात सगळ्यांच्या :हहगलो:. तुझा ते विधी करतानाचा चेहरा लख्ख आठवतोय. ते घाणा भरताना की कधी ते तू मुसळाला डोकं लावतानाही आपल्या ग्रुपकडे बघत होतास तेव्हा मी कुणाला तरी म्हटलं पण टण्याकडे बघून घ्या. पुन्हा असा मजेशिर दिसणार नाही Biggrin

भल्या पहाटे सांगलीत उतरुन हॉलचं गेट वाजवून उठवलं होतं सगळ्यांना आम्ही तेही आठवतंय Lol

खूप मजा आलेली तुझ्या लग्नाच्या निमित्ताने केलेल्या सांगली ट्रिपमध्ये Happy

इतकं सगळं सामान देणार नाही म्हटलं तर काय होईल? असं फुकट घ्यायला पण किती लाज ना? त्या वस्तू वापरतानाही संकोच वाटेल. "हे आपलं नाही" असंच वाटेल.

ह्म्म, अजूनही असले (मुलीकडच्या लोकांना करायला लागलेले लाड = थेर = प्रथा) चालतात बघून काय बोलायचे.

मला वाटतं मुला मुलीने आता ठासून नकार द्यायला हरकत नाही ( अश्या प्रथांना) घरच्या मोठ्यांना.

कित्येक वेळा काही जोड्या सांगतात की, अगदी आम्ही साधंच लग्न करणार होतो पण आई बाबांची इच्छा म्हणून असा खर्च केला असे म्हणत करणारे पाहिले की थक्क व्हायला होतं. त्याआधी हिच जोडी प्रथा कशा चुकीच्या आहेत ह्यावर भाष्य करतात. Proud

पंजाबी लोकांच्या लग्नात कॉकटेल नामक जो प्रकार असतो त्याबद्दल नुकतचं एका पंजाबी मैत्रिणीकडून समजलं. लग्नाच्या आधी असते म्हणे ही कॉकटेल पार्टी. त्यात सगळे व्याही पिऊन टाइट होतात. माझ्या मैत्रिणीच्या लग्नात म्ह्णे तिची आई आणि सासू दोघी एवढ्या झिंगल्या होत्या की त्यांना शुध्दीवर आणायला २ तास लागले आणि त्यामुळे लग्न लागायला २ तास उशीर झाला.

साती व अन्य, अहो वरील एकेक वर्णने वाचली की अंगावर काटा येतोय....
नशीब माझे थोर म्हणून मी कोकणातील वंशात जन्मलो Happy
आता मीच भिक्षुक असल्याने मी तर बोवा ठणकावून सांगितले होते, की आधी लग्नविधीचा अर्थ समजून घ्या, की कन्यादान मी करणार, तेव्हा मी दाता आहे व तुम्ही याचक, तेव्हा याचकाप्रमाणेच सामोरे यायचे व स्वखुषीने मी जे देतोय ते दान स्विकारायचे. हे मान्य करणे वा न करणे हे आत्ताच इथेच ठरवा. नंतर बयादी कटकटी चालणार नाहीत, आम्हां कोब्रात त्या सहन केल्या जात नाहीत. (अन तुम्हाला माहितच असेल की बहुतेक सर्व क्रान्तीकारी/बंडखोर कोब्राच होते...., अजुनी रक्तातील ती कळ कायम आहे आमच्या Lol ).
[हे सर्व असेच्च्या असे, अगदी थोडाफार शब्द इकडे तिकडे असेल, बैठकीत सांगितलेले....]

त्यामुळे सर्व निर्विघ्न पणे पार पडले, अन याला कारण शहरी जीवनातील कष्टदायकता व अवघड परिस्थितीचे भान असल्यामुळे आलेल्या सुधारक समजुतदारपणातून फार झिगझिग झाली नाही.

इथे विहिणींची आठवण निघाली आहे.
गदिमांनी लिहिलेली एक खूप सुंदर हृद्य विहिण आहे. 'ओटीत घातली मुलगी विहिणबाई'
माझ्या आज्या खूप सुंदर विहिणी म्हणतात. पण ही विहिण म्हणण्यास आमची सक्त मनाई आहे.
एका मावशीच्या लग्नात तिच्या सासरकडच्यांनी विहिण न गाण्याची विनंती केली होती, त्यांचं म्हणणं की आपली संस्कृती आहे ते ठीक आहे, पण आम्हाला ते जड जातं. ही पंगत आपण मजेत आनंदात साजरी करूया. मग त्या पंगतीत उखाण्यांची चढाओढ लागली होती.

या चालीरितींची इथे चर्चा करून आपण त्यातून काय घेणार आहोत? जे आपल्याला पटत नाही, झेपत नाही, आवडत नाही ते आपल्यावर प्रसंग आल्यावर न करण्याचं धाडस कितीजण दाखवतील? मुलीच्या लग्नात झालेला मनःस्ताप, अपमान हे प्रसंग दुसर्‍यावर येऊ नयेत यासाठी मुलाच्या लग्नात कितीजण लवचिकता दाखवतील? अगदी साधं विचारायचं तर स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा खर्च वधूपक्षाबरोबर निम्मा वाटून घेण्याची तयारी कितीजण दाखवतील?

पुर्वी 'मंगळी' खपवताना लग्नात मुलीच्या बापाला जास्त खर्च करावयास लागायचा असे ऐकले होते.हा उपाय मध्यस्थ कम गुर्जीच सांगायचे.अजुनही हा मंगळ वैगुण्य समजणारे लोक आहेतच. असो...

कन्यादान मी करणार, तेव्हा मी दाता आहे व तुम्ही याचक, तेव्हा याचकाप्रमाणेच सामोरे यायचे व स्वखुषीने मी जे देतोय ते दान स्विकारायचे.>> कन्यादान हा शब्द कसातरी वाटतो .मला दान करणे हे केवळ वस्तु दान केल्यासारखे वाटते."आमची मुलगी इथे दिली" हाही त्यातलाच डोक्यात जाणारा प्रकार वाटतो.दिली काय? मुलीची किंमत केल्यासारखे .माझा विरोध कन्यादान शब्दाला आहे कन्यादानाला नाही .तितकी मला शास्त्रीय माहीती देखील नाही.त्यामुळे विषयांतरासाठी माफ करा.

कोकण प्रांत सोडला तर बाकि भागात "बायकोने" "नवर्‍याच्या" पाया पडायची चाल रूढ आहे.
आमच्यात ती अजिबात नाही. यावरही बौद्धिक घ्यावे लागते की जर "लक्ष्मीनारायणाचा" जोडा म्हणता, तर त्यान्ना एकमेकांच्या पाया काय पडायला लावता? इन फॅक्ट, लग्नाविधीत एका ठिकाणी नववधुवराच्या जोडीला त्यांच्या मातापित्यांनी लक्ष्मीनारायण समजून नमस्कार करायचा असतो.
अन लग्न झाल्यावर "अर्धांगिनी" म्हणून म्हणत असाल, तर तिला पाया पडायला काय लावताय? तुम्ही स्वतःच स्वतःच्या हाताने पडता का स्वतःच्या पाया? मग तुमचे अर्धे अंग तरी कसे काय पाया पडेल?

यावर अजूनही एक बौद्धिक असे की, मूळात एखाद्याने दुसर्‍याला केलेला नमस्कार हा "त्या दुसर्‍या व्यक्तिला" केलेला नसून, त्याव्यक्तिमधे जे इश्वरी अस्तित्व असते त्याला करायचा असतो, व त्या दुसर्‍या व्यक्तिनेही त्यास केलेला नमस्कार अहंभावाने स्वतःस केलाय असे न समजता, माझ्यातील इश्वरी अस्तित्वाला नमस्कार आहे, तो त्या इश्वरी शक्तिसच सुपूर्द करतोय, ही भावना जागृत ठेवायची असते.
प्रत्यक्षात नवरीमुलीला किती वेळा 'वाकवतोय' ह्याच भावनेने बाकी नणंदा/दीर/जावा वगैरे वागत असतील, तर त्या बिचार्‍या वधूचे संरक्षण ब्रह्मदेवासही करता येणार नाही हे निश्चित.

सिनि, कन्यादान याबद्दल नंतर कधीतरी बोलेन, आयमीन लिहीन. त्यात तसे गैर काही नाही असे माझे प्रथमदर्शनी मत आहे. पण नंतर... आत्ता खरेच वेळ नाहीये.

कोकण प्रांत सोडला तर बाकि भागात "बायकोने" "नवर्‍याच्या" पाया पडायची चाल रूढ आहे.>>म्हणुन तर मला कोकण आवडते. पण पुढचेही पटले. "इश्वरी अस्तित्वाला नमस्कार"ते आधीच माहीत होते. Happy

नेपाळी लोकांमधे बहुदा लग्नामधे भांडण्याची प्रथा आहे. नवरा नवरीचे लग्न झाल्यानंतर जेव्हा नवरी निघते तेव्हा घरामधे भांडण चालु असले पाहिजे. यामुळे नवरीच्या नशिबातुन भांडण त्याच घरात राहते आणि सासरी तिला सुख मिळते असा विश्वास आहे. मित्राच्या लग्नात गेलेलो होतो तिथे आम्ही वराती नवरीला घेउन निघताना अचानक नवरीची मावशी आणि आत्यामधे तुंबळ युध्द सुरु झाले. आम्ही तो प्रकार बघुनच हादरलो. झिंज्या उपटणे, दगड एकमेकींना मारणे फार चालु होते. आम्ही थांबलो तर मित्र म्हणाला वधु निघताना भांडणे ही प्रथा आहे आपण इथुन निघाल्यावर लगेच शांत होतील.

काय एकएक प्रथा असतात.

दिवाकर देशमुख, नविनच प्रथा ऐकली.

लिंबुकाका, खरेच! कोकणात बायकोने नवर्याच्या पाया पडायची सिस्टीम नाही.
इथे लग्नात तर पाया पडायचेच , पण नंतर प्रत्येक सणाला औंक्षण केल्यावर पडायचे.
लग्नातले एकदा पाया पडून झाल्यावर आम्ही आमच्यापुरती ही प्रथा रद्दं करून टाकली.
लग्नाच्या दिवशी तर आम्हाला इतक्या जणाना नमस्कार, तोही यांच्या पद्धतीने गुडघे आणि डोके टेकवून करायला लावला की नंतर आम्हा दोघांचंही कंबरडं मोडलं होतं. Happy

आणि यांच्यात सप्तपदी / फेरे इ. नाही पण कन्यादान आहे.
सप्तपदी सारखे फेरे नंतर मूळ गावी जाऊन कुलदैवताला घालायचे म्हणे.

आमच्या कोकणात शक्यतो एकदा विवाह झाला की पुढचे सगळे विधी सासरीच होतात.
विवाहाचा खर्चपण बर्याचदा विभागून किंवा ज्याच्या घरी /गावात विवाह असेल त्यांच्याकडे.>> मला खूSSSप टोकाचा विरूद्ध अनुभव आलाय... Proud

याला मुख्य कारण जातीबाहेर लग्न असू शकेल (हे काही कारण नाहीये विरोधाला विरोध करण्याचे पण तरीही...)
विवाहाचा खर्च : आमचं लग्न सासरी झालं, कुडाळ मध्ये! लग्नाला परवानगी दिली या गोष्टीचा सासू ने खूप बाऊ केला मग आमच्या मर्जीने बाकीच्या गोष्टी व्हायला हव्यात असा हेका चालवला. आमच्या अक्ख्या वर्‍हाडाचा घेऊन जाण्याचा, राहण्याचा खर्च आम्ही केला. साखरपुडा आदल्या दिवशीच करा म्हणजे आमच्या माणसांना उगीच दगदग नको आणि त्याच हॉलमध्ये करता येईल असे सांगितले गेले. त्याचे हॉलचे भाडे त्या दिवशीचा सगळ्या माणसांचा जेवणाचा खर्च आम्ही केला कारण साखरपुड्या चा खर्च मुलीकडच्यांचा असतो. आमची माणसे पंचवीस, त्यांची ५० च्या वर!
लग्नाचा बाकीचा खर्च विभागून... तिथेही तेच गणित : आमची माणसं २५ - त्यांची अक्खं गाव Happy लग्नात गोंधळ नको म्हणून जास्त ताणलं नाही.

पाचपरतावन ही याच मांडवात करून टाका मटणाचं जेवण घालून असं साबा-साबूचं म्हणणं होतं... पण बाबांनी त्याला विरोध केला. माहेरी आमच्या माणसांसाठी निदान छोटेखानी एक रिसेप्शन ठेवावे लागेल तेव्हा पाठवलंत तरी चालेल तुमची ५ माणसे असे त्यांचे म्हणणे... यावरून लग्नानंतर आठवडाभर ऐकून घ्यावं लागलं!! बरं आम्ही दोघं नंदीबैलासारखे खालमुंडी घालून होतो, विरोधानंतर लग्न तर लागलं एकदचं असा विचार करून!

पहीलं बाळंतपण : हा ही मनोरंजक विषय आहे! पहीलं बाळंतपण हे माहेरीच झालं पाहीजे (ते का? याच्यामागची पार्श्वभूमी, भावना समजून न घेता) ही प्रथा आहे असं समजणार्‍यांच्या बुद्धीची कीव येते. माझ्या प्रेग्ननन्सी कॉम्प्लीकेशन्स मुळे मला सासरी बाळंतपण करावं लागलेलं तेव्हा ही हाच गोंधळ! माझ्या आईची अक्षरशः आरती उतरलेली तेव्हा साबाने Happy
सासरी ओटी भरत नाहीत सांगितलेलं, तसेच आमच्या कडे वाडी ही भरत नाहीत, डोहाळ जेवळ वै. काही नसतं असंही सांगितलं (या खरंतर हौसेच्या गोष्टी असतात, गरोदर बाईला येनकेन प्रकारे आनंदी ठेवायचं, खावंसं वाटेल ते खायला घालता यावं यासाठी हा सोहळा ) Happy म्हणजे आम्ही आमच्या कडे काहीही करणार नाही, तुझ्या माहेरच्यांनी मात्र संक्रांतीचं वाण, दिवाळसण, अधिक महीन्याचं वाण या गोष्टी साग्रसंगित करायला हव्यात!
आमच्याकडे गोंधळ करत नाहीत, डोहाळजेवण नाही, मंगळागौर नाही म्हणून हौसेनी मुलीच्या माहेरच्यांनी या प्रथा करायचं ठरवलं तर आमच्याकडे हे असलं काही करत नाहीत. आता माहेरचं विसरायचं! (कित्ती तो अट्टाहास! मागचं आयुष्य पुसून टाकायचा!! बाहेरच्या जातीत लग्न करून नाक कापलं मग असा विरोध करून नाक थोडं तरी शाबूत ठेवायचं. नाहीतर समाजातील लोकं काय म्हणतील!!) मुलाने बायकोच्या माहेरचं कौतुक करायचं नाही, तिथे कुठल्याही फंक्शनला, लग्नाला जायचं नाही. सुनेने मात्र सासरची सगळी माणसं, सासूच्या माहेरची माणसं, नाते संबंध जपायचे!!

खरं तर लव्ह मॅरेज मध्ये प्रथा वगैरे अट्टाहास अगदी हास्यास्पद वाटतो. हौस आहे, ठीक आहे, करा ना सगळ्यांना रूचेल असं, सगळ्याम्ची मतं भावना लक्षात घेऊन. अन्यथा "आमचाच वरचष्मा" हे पालुपद पदोपदी आळवायची काय गरज!

थोडक्यात काय तर जात-प्रांत या गोष्टी तितक्या महत्वाच्या नाहीत!! समजून घेणं महत्वाचं! ज्या पवित्र धर्मसंस्काराने दोन व्यक्ती आणि त्यांचं सर्व कुटुंब मनाने, भावनांनी एकमेकांशी कायमचे जोडले जाणार आहे, तिथे अशी "कोती" मनोवृत्ती ठेऊन पुढची नाती कशी फुलतील, जोपासली जातील? प्रथा जबरदस्तीने थोपताना त्यामागील भावना लक्षात घेऊन, त्यातील सगळ्यांना सोयीस्कर, चांगलं ते घ्यावं. शेवटी नातं जुळणं, जोपासलं जाणं, टिकणं महत्वाचं! आणि त्यासाठी "दोन्ही बाजूंनी" प्रयत्न व्हायला हवा. वर पक्ष आणि वधूपक्ष असा भेदभाव करण्याचे दिवस खरंच मागे पडलेत पण काही लोक याला इतके चिकटून राहतात, की नवीन नाते फुलायच्या ऐवजी कोमेजत जाते! ती अढी आणि त्या कडवट आठवणी कायम मनात राहतात.

लिंबाजीरावांच्यात काहीतरी जालीम बदल घडून आलाय हे नक्की Wink नाहीतर पाया पडायला आजकालच्या लोकांना का आवडत नाही, असला काहीतरी धागा होता त्यांचा आधी.

बाकी आमच्याकडची गम्मत इतकीच, की रजिस्टर लग्न करायचा माझा फिक्स आग्रह. दुसरं मुहूर्त वगैरे काही काढला नव्हता. नोटिस दिल्याची मुदत संपली त्यानंतरचा सोयीचा रविवार हा मुहूर्त.

तर, लग्न रजिस्टर केलं, तरी रजिस्ट्रार येण्याआधी काकू गौरीहार पूजत बसल्या होत्या. Wink मी आरामात ८ वाजता उठून (तेही मित्राने होस्टेलस्टाईल उठवल्याने) दाढी आंघोळ आवरून १० वाजता मित्राच्या मोटारसायकलवर मागे बसून हॉलवर पोहोचलो होतो. (त्यामुळे घोड्यावर बसलेला गाढव कसा दिसतो, ते कुणाला कळले नाही.)

रात्री रिसेप्शन मात्र दिले होते, ते आमच्या गावात व आमच्या परिचित/नातेवाईकांसाठी असल्याने खर्च पूर्ण माझा, अन सौं.च्या गावी झाले त्याचा त्यांनी केला होता. सासरेबुवांनी हौसेने सांगितलेला व्हिडिओग्राफर मात्र फ्रस्ट्रेट झालेला. अख्खं लग्न १० मिन्टात फिनिश. म्हणजे, शपथ घेणे→ सह्या करणे,→ एकमेकांना माळ घालणे,→ फिनिश. उरलेल्या २ तास ५० मिन्टाच्या क्यासेटचं करायचं काय? Wink त्याने बिचार्‍याने दुपारच्या जेवणाचं अन संध्याकाळच्या जेवणाचं प्रत्येकाचा लाँगशॉट, क्लोजप, मग घास तोंडात घालताना (स्वतःच्या) मग परत झूम ऑट, मग पुढचा 'जेवक' असले उद्योग करुन ती कॅसेट भरली. जाम एंटरटेनिंग प्रकार होता.

अन व्हिडूवाला सांगितला, पण कॅमेरावाला सांगायची आठवण कुणालाच नव्हती. एका हौशी मित्राच्या कॅमेर्‍यातल्या रोलवरचे २४ फोटो, इतकाच भक्कम अल्बम आहे लग्नाचा. धर मोबाईल की काढ फोटो असा प्रकार त्या काळी नव्हता Sad

व्हिडिओ कॅसेट्सचा जमाना गेल्याने ती कॅसेट पुन्हा पहाण्याचा योग आता कधी येईल कुणास ठाऊक.

आमच्या फॅमिली डॉक्टरांच्या मुलीच्या लग्नात (ही नवरीमुलगी स्वतः एम.एस आहे..) मुलीच्या सासुने चक्क सोन्याच्या पाटल्यांची मागणी केली.. ही मागणी कशी आली त्याचा किस्सा नंतर पूर्ण ऐकण्यात आला तो असा..

मुलीची सासु: "कस आहे ना सुधाताई (आमच्या डॉक्टर काकु) तुम्ही मला लग्नात साड्या वगैरे घेणार ते म्हणजे वीस एक हजाराच्या खाली तर नक्कीच नसणार.. त्यापेक्षा अस करा की तुम्ही मला पाटल्याच करा...

या काकुंनी त्या केल्या तर सिमांतपूजनाच्या दिवशी विहीणाबाई "अहो कश्शाला? नाही नाही मी नाही घेणार" काकुंच्या अगदी जवळच्या स्नेही ओक काकुंनी बळच विहीणबाईंच्या हातात पाटल्या चढवल्या.. त्यावर विहीणबाई "तुम्ही म्हणताय म्हणुन मी घेतेय हां, फक्त तुम्ही म्हणताय म्हणुन"

दुसर्‍या दिवशी मी आणि माझ्या गाण्याच्या मॅडम दाराजवळ पायघड्यांची तयारी करत असताना विहीणबाई समोरुन येत होत्या.. वाटेत त्यांना ओक काकु भेटल्या तर विहीणबाईचा त्यांच्याशी झालेला संवाद

विहीणबाई: "अहो ओक ताई त्या तेलफळाच्या वाणात गळसरी आणि जोडवी ठेवलीत ना हो? नाही म्हणजे कस आहे की तुम्ही सगळ नीट करालच पण कधी कधी विसरल्या जातात या गोष्टी म्हणुन मी आपली आठवण करुन दिली"

आम्ही तिघि Uhoh

त्यात काय इब्लिस? लग्नाच्या ३०व्या, ४०व्या (जो जवळ असेल तो) वाढदिवशी परत काकूंशी लग्न लावा. ह्यावेळेस रजिस्ट्रार नको, कायद्याने शक्य होणार नाही :-). हाफडे लग्न ठेवा, नव्याने खरेदी करा, नव्या फॅशनचा दागिना घडवा, नव्या प्रकारची लग्नी साडी घ्या, नव्या प्रकारची हेअरस्टाईल करु द्या त्यांना, गळ्यात माळ घाला एकमेकांच्या, मुलांसकट मस्त ग्रूप फोटो काढा त्या लग्नी पेहरावात (अवतारात म्हटलंत तरी चालेल Wink ), मोबाईलने क्लिकक्लिकाट होऊदे. हाकानाका.

अश्विनी त्यांना एकुणच साडीच कौतुक आहे अस दिसत नै.. त्यांच्या फॅमिलीत दागिन्यांच वेड जास्त दिसल मला.. नवर्‍यामुलीच्या मोठ्या जावेच्या गळ्यात तीन पदरी ठुशी होती

ही अशी

Thushi.jpg

ड्रीमगर्ल, खरंच वाईट वाटलं वाचून.
आता जे झालं ते झालं पण जेव्हा हे सगळं होत होतं तेव्हाच तुम्ही दोघांनी ठाम नकार द्यायचा होता ना.
लग्नाला पर्वानगी दिली म्हणजे काय उप्कार केले का त्यांनी? नसती दिली तरी तुम्हाला कायद्याने अडवणारं कोण होतं? अशा वेळी मुलींनी आपल्या होणार्‍या नवर्‍याला सांगायला पाहिजे की तू तुझ्या घरच्यांना नीट समजवून सांग, नाही तर अशा अपमान करणार्‍या घरात मलाच लग्न करायचं नाही. जाऊ द्यायचं उडत! अर्थात हे करणं मुलीसाठी सोपं नसतं.. पण तसंच मुलालाही तुम्हाला सोडणं कठीण असतं हे लक्षात ठेवायचं.

Pages