वाकून नमस्कार करणे "जाचक" का वाटू लागले असावे?

Submitted by limbutimbu on 16 June, 2010 - 03:40

शीर्षकावरुन असे वाटू शकेल कुणालाही की एकतर मी वाकून नमस्कार करण्याचे समर्थन करतोय वा वाकुन नमस्कारास जाच समजणार्‍यान्ची खिल्ली उडविणारे किन्वा जाचक प्रथान्ना विरोध करणारे!
पण यातले मला काहीच करायचे नाहीये.
माझ्या नजरेसमोर वेगळीच बाब येत्ये. ज्यान्ना वाकून नमस्कार करणे हा जाच वाटतो, तर तो का वाटत असावा, याची माझ्या नजरेतून (अन अर्थातच एकान्गी) कारणमिमान्सा सुरवातीस करतो. मग त्यानन्तर विषयानुरुप ज्यान्नीत्यान्नी त्यान्चि मते मान्डली तरी चालतील! असो
बर्‍याच ठिकाणी, लग्न मुन्ज इत्यादी कार्यक्रम, देवळात भटजीसमोर, घरच्याघरी वडीलधारे पाहुणे आले असता, हल्ली हल्ली तर टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शोमधे देखिल, अनेक "ज्युनिअर" त्यान्च्या सिनियर्सना वाकून नमस्कार करताना दिसतात.
ते तसे वाकून नमस्कार करत अस्ताना, ज्यान्ना ते तो नमस्कार करतात, त्या व्यक्तिन्चे वागणे व्यक्तिनुरुप इतके तर्‍हेवाईक असते की माझ्या सारख्याला वाटेल "XX मारली अन यान्ना नमस्कार केला". काय कारण असे वाटण्याचे?
तर एखाद्याने वाकून नमस्कार केल्यानन्तर, त्याचे दुनियेला ऐकु जाईल इतक्या खणखणीत आवाजात अगदी जरी नसले, तरी नमस्कार करणार्‍या व्यक्तिला ऐकु जाईल इतपत मोठ्याने "अभिष्टचिन्तनात्मक आशिर्वचन" उच्चारण्याची अक्कल्/कुवत ज्यान्ची नाही, त्यान्नी दुसर्‍यास वाकवुन नमस्कार तरी का करवुन घ्यावा? नै का?
यावर अधिक विचार करता माझ्या असेही लक्षात आले की, दुसर्‍यास नमस्कार करावा, उभारुन वा वाकून वगैरे शिकवले जाते, पण दुसर्‍याच्या नमस्काराप्रित्यर्थ, त्या बदल्यात त्या व्यक्तिचे वयानुरुप ज्येष्ठतेस धरुन कसे अभिष्टचिन्तन करावे हेच शिकवले जात नाही. येऊन जाऊन गेल्या शतकभरात लोक "थ्यान्क्यु" येवढेच शिकलेत असे केवळ वाटत नाही तर अनुभवलय!
साला मी नमस्कार केला वाकून, तर समोरील व्यक्ती म्हणते "थ्यान्क्यू" Lol
अन मी आशिर्वाद दिला तरी तेच... थ्यान्क्यू! Proud
आता या तर्‍हेला काय म्हणाव?
वाकुन नमस्कार घेताना, कुणी नुस्त कैतरी पुटपुटतं, कुणी हात उन्चावल्यासारख करत पण हात कोपरातुन मोडल्याप्रमाणे हालचाल होते, कुणाचे तिकडे लक्षच नस्ते, एकतर दुसर्‍याकुणाशी बोलत असतात किन्वा फोटोग्राफरकडे बघताना काही बोलायचे विसरुनच जातात, कुणी अहन्कार सुखावल्याप्रमाणे महा आढ्यतेखोरीने वाकलेल्या बकर्‍यान्कडे अन जमलेल्या गर्दीकडे बघत असतात.
काही निवडक सोवळे, स्वतःचेच पाय मागे ओढत नको नको करत नमस्कार घेण्याचे टाळतात.
याला अपवाद भटजी देखिल नस्तात (हे दुर्दैव).
लिम्बीचे बाबा वगळता, खणखणीत आवाजात सु:स्पष्टपणे आशिर्वाद देणारी व्यक्ती अजुनही माझ्या पहाण्यात आलेली नाही!
हे कशाचे द्योतक?
खिशातली फुटकी कवडी देखिल दुसर्‍यांस न देण्याची व्रुत्ती आशिर्वाद देण्यापासून परावृत्त करते?
की आशिर्वचने व ती यथायोग्य पणे देण्याची पद्धतच शिकवली जात नाही?
अर्थात मुद्दामहून शिकवणी लावुन शिकण्यासारखी ही गोष्त नाहीच, पण एखाद्या व्यक्तीला केलेल्या नमस्काराबद्दल उत्कृष्ट आशिर्वादाचा कधी अनुभवच आलेला नसेल तर ती व्यक्ती अनुभवातुन तरी शिकणार काय? अन काहीच शिकायला, निदान आशिर्वचन ऐकायला मिळणार नसेल, तर नमस्कार करणार्‍यास तो "जाचच" वाटला तर विशेष ते काय?

आपल्याला काय वाटते?
(क्रुपया थोताण्डपन्थियान्नी इकडे लिहीण्याची तसदी घेऊ नये ही णम्र विणन्ती)

[आज हा विषय डोक्यात आला, कारण काल अन आज tonaga मला नमो नमः म्हणतोय, तर तत्काल मी आशिर्वचने टाईप केली, अन त्यावरुन वरील रामायण लक्षात आले]

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणून यवन बांधवात वाकून नमस्कार करण्याची पद्धत नाही. घेनार्‍याची लायकी नसते. प्रभूच्या लेकरातही नाही.

लहानपणी घरातले सांगायचे की वाकुन नमस्कार करायचा त्यामुळे मेंदु पर्यंत रक्त पोहोचत आणि बुद्धि वाढते. हे नमस्कार करायची सवय लागण्यासाठी हो की खर होत हे अजुन माहीत नाही. हा विषय काढलात म्हणुन आठवल.
तुमच निरिक्षण रास्त आहे. पण आपल्याला जे आदराच्या स्थानी आहेत त्यांना वाकुन नमस्कार करायला माझ्या मते काहीच हरकत नाही. त्यातुन काही नुकसान तर होत नाही.

आमच्या बाजुला एक वयस्कर गृहस्थ होते, त्यांना सगळे काका म्हणत....पण अगदी चणाक्ष होते ते भेटल्यावर शक्यतो सगळेच त्यांच्या पाया पडत ....त्यांचे आशिर्वाद मात्र पाया पडणार्‍याच्या वयोमानानुसार
बदलत. खालील प्रमाणे..
लहान मुलं ते तरुण- यशवंत व्हा
स्त्री - अखंड सौभाग्यवती भव ,
जोडपी - सुखाने संसार करा
वगैरे वगैरे

मला तरी असा अनुभव अजुन आला नाहीये. किंवा माझ्या ल्क्शात आले नाहीये. पण मला आवडते वाकुन नमस्कार करायला.

>>>> पण आपल्याला जे आदराच्या स्थानी आहेत त्यांना वाकुन नमस्कार करायला माझ्या मते काहीच हरकत नाही. <<<<
माझीही हरकत नाही!
पण त्या त्या आदरणीय व्यक्तिन्ना जरा "तोन्डभरुन आशिर्वाद" द्यायला काय धाड भरते का, हा माझा प्रश्न आहे! Happy

tonagyaa, त्यान्च्यात "नमस्काराप्रित्यर्थ आशिर्वाद" असले काहीही नस्तेच
अन जे काय अस्ते त्यास "दाढी कुरवाळणे" म्हणतात Proud
(त्याही पलिकडे काही असते, पण ते इथे लिहीण्यासारखे नाही, कळ्ळ? आता थोडावेळ गप्प बैस! )

लिंबुकाका,

आमच्या घरात माझा नवरा आणि दीर दोघांनाही सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवाचे वगैरे म्हणून झाले की घरातल्या वडिलधार्‍यांना, दिवंगत व्यक्तींच्या फोटोंना, देवादिकांच्या घरात लावलेया तसबीरींना वाकून नमस्कार करण्याची सवय होती. नवर्‍याची सवय सुटली पण दीर मात्र अजूनही आवर्जून पाया पडतो. मला त्याचे याबद्दल खूप कौतुक वाटते. Happy मी ही सुरुवातीला त्याला काय आशीर्वाद द्यावा या संभ्रमात असे. कारण मला कायम दुसर्‍यांच्या पाया पडण्याची सवय. आपल्याला कुणी पाया पडत असेल तर काय म्हणावे समजत नसे.
माझे साबु कुणीही पाया पडले की "all the best" असा आशीर्वाद कम शुभेच्छा देतात. छान वाटतं मला. मी स्वतः आता कुणी माझ्या पाया पडलं तर "शुभं भवतु|" असे म्हणायला सुरुवात केली आहे Happy

साला मी नमस्कार केला वाकून, तर समोरील व्यक्ती म्हणते "थ्यान्क्यू" >>>>

"आमच्या पाया पडण्याइतकी आमची लायकी समजलात" अशा विचाराने थँक्यु म्हणत असावेत Lol

LOL निम्बुडा,
पण बहुधा अशा व्यक्ती कॉन्व्हेण्ट कल्चरमधे वाढलेल्या असाव्यात, मला तो परिणाम देखिल अधोरेखित करायचा होता!

माझ्या कुणी पाया पडायला आल की मलाही निंबुडा सारखच होत. पटकन सुचत नाही. मग जो आशिर्वाद येईल मनात तो देते. मोठे व्हा, सुखी व्हा वगैरे.

लिंबूकाका, हा बाफ सुरु केल्याबद्दल धन्यवाद. चांगलं वाचन होणारे.

तुम्हाला माझा नमस्कार Happy

निरिक्षण रास्त आहे.

पण,
अन काहीच शिकायला, निदान आशिर्वचन ऐकायला मिळणार नसेल, तर नमस्कार करणार्‍यास तो "जाचच" वाटला तर विशेष ते काय? >>>

मुळात नमस्कार केल्यावर काहि (आशिर्वचनासकट सर्व काहि आले ह्यात) मिळावे हि अपेक्षाच का ?

कोणी मला नमस्कार केल्यास मी उभ्याउभ्याच हात जोडुन परत नमस्कार करतो (नमस्कार करणारा लहान असो वा मोठा - म्हणजे relatively - सगळे नमस्कार करणारे माझ्याहुन लहानच असतात.)

लिंब्या.. मंद्या भडकेल तुझ्यावर आता.. अर्वाच्च्य शब्द वापरलेस असं म्हणून. Proud
गणूस अनुमोदन. Happy

अरे, असा विचार केलाच नव्हता कधी !!!
मला एक तर कोणी नमस्कार केला की फार संकोच वाटतो, आणि अरे मला कशाला वगैरे म्हटले जाते, किंवा अर्ध्यातच त्याला थांबवले जाते, वा हात जोडून नमस्कार केला जातो. घरात तर होतेच, पण ऑफिसमध्येही गुरूपौर्णिमेला काही जण आठवणीने फुले देउन नमस्कार करायचे तेंव्हा फार अवघडसारखे व्हायचे. तसे न करता, जर एखादी व्यक्ती नमस्कार करत असेल तर त्याला/ तिला अनुरुप अशा आशिर्वाद /शुभेच्छा मनःपूर्वक द्यायला हव्यात असे या लेखामुळे लक्षात आले. मी हे करणार. एक छोटा पण वेगळाच विषय लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

बाकी काही हरकत नाही पन लिम्बूजी सासरकडच्याना नमस्कार करण्याची तेवढी सक्ती करू नका प्लीज. एकतर ते जाचक असतेच. शिवाय '(सासरकडच्यांची ) लायकीही नसते. शिवाय केवळ सासरकडचे आहेत म्हणून त्याना नमस्कार करवून घ्यायचा कसा काय अधिकार पोचतो? एवढी ** असेल तर घ्या (म्हणावं) त्यांच्या मुलाकडून हज्जार वेळा नमस्कार करवून....

सांच्याला लई पोष्टी पडतील हितं ....

अरे वा!!
"गणू." ह्यांनी माझे सजेशन मनावर घेऊन शुद्ध लिहायला सुरुवात केलेली दिसतेय..लगे रहो Happy
बाकी लिम्बुटिम्बुंना कशावर चर्चा करायचीय ते काही कळले नाही..

>>>> कोणी मला नमस्कार केल्यास मी उभ्याउभ्याच हात जोडुन परत नमस्कार करतो (नमस्कार करणारा लहान असो वा मोठा - म्हणजे relatively - सगळे नमस्कार करणारे माझ्याहुन लहानच असतात.) <<<<
गणू, वारकरी पन्थामध्ये, केवळ वाकूनच नव्हे तर दुसर्‍याच्या पावलावर डोके टेकवुन नमस्कार केला जातो, ज्यास नमस्कार करतात, तो देखिल लगेच ज्याने नमस्कार केला त्याचे पायावर माथा टकवितो! Happy यामागचे तत्व फार सुरेख आहे, पण नेमक्या शब्दात याक्षणी मला सान्गता येत नाही, तुमच्या भावनेप्रित्यर्थ मी हे उदाहरण दिले! Happy
तरीही, वारकरी नसाल, तर केलेल्या नमस्कारास यथायोग्य आशिर्वाद देणेच उचित होय! Happy (असे माझे मत)

जीएस, जरुर कर! Happy (किम्बहुना, आडपडद्याने, विनोदी/उत्प्रेक्षा/उपहास इत्यादीतून मला हेच सान्गायचे आहे)

जी एस साहेब, नमो नमः,
ज्याना असे वाटते ' माझं वय काय झालंच नाही" त्याना नमस्कार करवून घेताना संकोच वाटतो. पुढे वस्तुस्थिती मनाशी मान्य केल्यावर मग तेही निर्ढावल्यासारखे पादत्राणे काढून आपला'नम्बर' कधी येणार याची वाट पहातात. Proud

खरी गम्मत येते मुलगी पहायला गेल्यावर. पोहे , प्रश्नमंजूषा वगैरे आटोपल्यावर जाताना मुलगी येते अन आपल्या घराण्याचे 'वळण' सिद्ध करण्यासाठी वाकून नमस्कार करू लागते त्यावेळी 'पाहणार्‍या' मुलाच्या पोटात गोळा येतो . ही बया आपल्याही पाया पडते की काय.? (आम्ही नै बै असं कुणाच्याच पाया पडलो असं ऐकू आलय मला...)

बाकी लिम्ब्या विषय लै भन्नाट काढलाय. मानलं .

पण त्या त्या आदरणीय व्यक्तिन्ना जरा "तोन्डभरुन आशिर्वाद" द्यायला काय धाड भरते का, हा माझा प्रश्न आहे!
>> आमच्या घरात देतात ...
लोकं कधी कधी शाय असतात.. प्रत्येकाला मोठमोठ्यांदा आशिर्वाद देता येतोच असं नाही..स्वभाव प्रत्येकाचा..
मनातून चांगल्या भावना असल्या म्हणजे झाल्या..

काही काही वेळा तर नववधूवर मला हा अत्याचार केल्यासारखा वाटतो. खास करुन साखरपुड्यात. साखरपुडा पार पडला की मुलगी जेवढे लोक सासरचे माहेरचे आहेत त्या सगळ्यांना पाया पडते. बिचारीची कंबर दुखेपर्यंत तिला हे कराव लागत. गावामध्ये २००, ३०० लोक तरी साखरपुड्याला हजर राहत असतील.

>>>> लोकं कधी कधी शाय असतात.. <<<
नानबा, हा देखिल कारणान्पैकी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे! (माझ्याकडून निसटला/लक्षात आला नाही) Happy मान्य

पण हा शायनेस जाऊ शकतो ना प्रयत्नाने? शिवाय नमस्कार करण्यास लाज वाटत असो वा कम्बर दुखत असो, प्रत्यक्ष केला जातो, तर आशिर्वादही ऐकु जाईल इतपण मोठ्याने व्हावा ना?
लोक शाय अस्तात याचे कारणच मुळात "नमस्कार करणे व आशिर्वाद देणे" हा "सन्स्कार" पुरेश्या ठामपणे झालेला नसतो, त्यातल्या त्यात नमस्कार केला जातो, आशिर्वाद देणे राहुनच जाते हा बहुतेक वेळचा अनुभव! शायनेस घालवला पाहिजे असे मला वाटते.

वाचासिद्धी व त्याद्वारे दिलेला आशिर्वाद इकडे मी वळलो नाहीये, पण केवळ मनातुन चान्गल्या भावना असून चालत नाही, प्रत्यक्ष कृती आवश्यक सर्व ठिकाणी, तसेच नुस्ता मनातल्या मनात आशिर्वाद पुरेसा नाही, वाचेद्वारे उच्चारणही तितकेच महत्वाचे असे मला वाटते Happy

>>> मुलगी जेवढे लोक सासरचे माहेरचे आहेत त्या सगळ्यांना पाया पडते. बिचारीची कंबर दुखेपर्यंत तिला हे कराव लागत.<<<<
हे बाकी खरे आहे! Happy
मात्र नशिबाने साखरपुड्यास आलेला भटजी (माझ्यासारखा Proud ) खमक्या (व घाईत असलेला) निघाला तर तोच ऑर्डर सोडतो की एकाच ठिकाणी वाकून सगळ्यान्ना नमस्कार करा!

तरीही, मागे एकदा अशाच खमक्या भटजीला तितकेच तिरके लोक (मुलीमुलाकडील) भेटले, अहो करुद्यात की वाकून नमस्कार, येवढ्यातेवढ्याने काय कमरा तुटतात काय? वगैरे वगैरे, अन त्यात होला हो मिळविणार्‍या बर्‍याच साळकाया म्हाळकाया बाजुला
पण भटजी त्यान्चे बारसे जेवलेला होता बहुतेक, बरं म्हणाला, एक दोन नमस्कार होताच, हातात हळदीकुन्कु/अक्षत/गन्धाच्या वाट्या घेऊन पोरी मागोमाग गेला, तिने नमस्कार केला की हा पठ्ठ्या ज्यास नमस्कार केला त्याचे तोन्डून मोठ्याने सन्स्कृतमधुन आशिर्वाद म्हणवुन घेऊ लागला, नीट उच्चार झाला नाही तर पुन्हा परत म्हणा असा खाक्या, वर मल्लीनाथी की तुमचे आशिर्वाद हवेच हवे, त्याशिवाय तिचे भले कसे होणार? त्यातुन एकास सान्गितलेला आशिर्वाद एक दुसर्‍यास वेगळाच! जेमतेम पाचसहा नमस्कार झाल्यावर पब्लिकच बास बास आता पुरे म्हणू लागले!
बर, गन्ध वाटी कशासाठी, तर नमस्कार करवुन घेणार्‍या पान्ढर्‍याकपाळाच्या बाप्याच्या कपाळी समन्त्रक टीळा लावण्यासाठी, सगळ कसं अगदी साग्रसन्गित, यशस्करं बलवंत......, मग अक्षत लावणे, मग पोरीने नमस्कार करणे, मग आशिर्वाद उच्चारणे...........
(हा प्रसन्ग माझ्यासमोर घडलेला आहे, बर्‍याच काळापूर्वी, मला नीटसे ठिकाण वा त्या भटजीचा चेहराही आठवत नाही)

limbutimbu
वारकरी पन्थाच्या माहितिबद्दल धन्यवाद.

"गणू." ह्यांनी माझे सजेशन मनावर घेऊन शुद्ध लिहायला सुरुवात केलेली दिसतेय..लगे रहो >>>
धन्यवाद compliment बद्दल

वारकरी पंथांसारखेच सत्संगवाले सुद्धा मला वाटत एकमेकांच्या पाया पडतात प्रत्येक माणसात देव असतो ह्या भावनेने.

वारकर्‍यांच्यात विशेषतः वारीला जाताना, मोठे लोक अगदी लहान मुलांच्यासुद्धा पाया पडतात. त्यामागे अशी भावना असते की हा केलेला नमस्कार त्या व्यक्तीला नसून ती व्यक्ति पांडुरंगाला भेटायला चालली असल्याने, नमस्कार पांडुरंगालाच केलेला आहे.

बिचारीची कंबर दुखेपर्यंत तिला हे कराव लागत. >>> तिला पण आणि त्याला पण Proud

तोच ऑर्डर सोडतो की एकाच ठिकाणी वाकून सगळ्यान्ना नमस्कार करा!
>>> मला पण बरेच जणांनी हे वाक्य उच्चारून वाचवले आहे.

मुळात एका मानवाने दुसर्‍या मानवासमोर अशा अपमानास्पद पद्धतीने झुकावेच का? त्याने आशिर्वाद देवो अगर न देवो. यामध्ये झुकणार्‍याच्या आत्मसन्मानाचे काय? अगदी वडील असले तरी. अगदी सगळ्या निरपेक्ष आशिर्वाद असला तरी. ही वाकून नमस्कार करण्याची पद्धत मानसिक गुलामगिरीची द्योतक आहे. आपल्यापुढे दुसर्‍याला झुकवण्याच्या श्रेष्ठतेच्या अहंगडातून निर्माण झाललेला हा सरंजामी प्रकार आहे. 'तुझी जागा माझ्या पायाजवळ आहे' हे दर्शविण्याची वृत्ती यातून स्पष्ट होत नाही काय. ? शतकानुशतकांच्या या कंडीशंड 'संस्कारा' मुळे झुकणारानाही त्यात पोकळ नम्रता वाटू लागली आहे. हात जोडणे हे देखील शरण आलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे.

बाफ सुरू करणारानी आशिर्वाद न देण्यार्‍याच्या असभ्यपणाच्या चर्चेचा आव आणला असला तरी मूळ कालबाह्य झालेल्या बुरसटलेल्या रूढींच्या पुनरुज्जीवनाचा दुर्गंध काही लपत नाही.
श्रेष्ठत्वाला नमन करण्याची एवढी चाड आहे तर सुनेने सासर्‍याला वाकून नमस्कार केल्यावर सुनेला डॉक्टरेट मिळाल्याबद्दल सासर्‍यानेही तिला वाकून नमस्कार का करू नये?

>श्रेष्ठत्वाला नमन करण्याची एवढी चाड आहे तर सुनेने सासर्‍याला वाकून नमस्कार केल्यावर सुनेला डॉक्टरेट मिळाल्याबद्दल सासर्‍यानेही तिला वाकून नमस्कार का करू नये?
ते सून अन सासरा बघून घेतील ना.. Happy

>बाफ सुरू करणारानी आशिर्वाद न देण्यार्‍याच्या असभ्यपणाच्या चर्चेचा आव आणला असला तरी मूळ कालबाह्य झालेल्या बुरसटलेल्या रूढींच्या पुनरुज्जीवनाचा दुर्गंध काही लपत नाही.

हरीदासाची कथा.....
नमस्कार करावा का करू नये हा विषय कसा काय दिसला बुवा तुम्हाला? केल्यास, नमस्कार घेणार्‍याने मोठ्याने आशीर्वाद द्यावा का असा विषय आहे. ऊगाच आपलं काहितरी भलताच अर्थ काढायचा अन मग त्यातून भलत्या पोस्ट्स पाडायच्या? काय? Happy

tonaga,
तुमच्या अख्ख्या पोस्ट मध्ये विनोदही सापडला नाही तेव्हा हा विनोद घ्या:

भरल्या पोटी क्रीया, अन रिकाम्या डोकी प्रतिक्रीया दोन्ही वाईटच काय? Happy

Pages