ड्रॅगनच्या देशात ०२ - बायजींग : स्वर्गीय शांततेचे द्वार (Tiananmen) आणि निषिद्ध शहर (Forbidden City)

Submitted by इस्पीकचा एक्का on 25 November, 2014 - 07:06

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

बायजींगचा पहिला दिवस

बायजींगमधल्या भटकंतीचा पहिला थांबा तियानआनमेन हॉटेलपासून पायी ५ मिनिटावरच होता. टूर मॅनेजरने सर्व टूरभर हॉटेल्स अशीच मोक्याच्या ठिकाणची निवडली होती. ) तियानआनमेन म्हणजे स्वर्गीय शांततेचे द्वार (Gate of Heavenly Peace). हा सम्राटाच्या राजमहालाचा म्हणजेच Forbidden City चा मुख्य दरवाजा. Forbidden City म्हणजे चीनच्या सम्राटाचा राजवाडा, यांत एका ठराविक इमारतीनंतर मोठ्या सरदारांनाही प्रवेश निषिद्ध होता. सामान्य जनतेलातर त्याच्या मुख्य दरवाजाच्या आत येण्यासही मनाई होती. त्यामुळेच या राजवाड्याला Forbidden City असे ओळखले जाते. हा राजप्रासाद इतका मोठा आहे की त्यात एकावेळी ९,९९९ लोक राहत असत. कारण ९,९९९ कारण हा आकडा त्या काळी शुभ आणि सत्तेचे प्रतीक समजला जात असे . चीनमध्ये या राजवाड्यात राहणाऱ्यात केवळ सम्राटच फक्त पुरुष असे, शिवाय एक सम्राज्ञी आणि इतर सर्व नपुंसक (Eunuch) असत. नपुंसक परंपरा हा चीनच्या क्रूर सम्राट संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. या प्रथेची सुरुवात पराजित सैन्यातील सैनिकांना शिक्षा म्हणून झाली. काही वेळेस अत्याचारी लोकांनाही ही शिक्षा होई.परतू सम्राटाच्या सेवेत असणारे केवळ Forbidden City मध्ये कामगार किंवा गुलाम म्हणून काम करण्यासाठी त्यांच्या मर्जीविरुद्ध व जबरदस्तीने eunuch बनवले जात. बायजींगच्या मिग राजघराण्याच्या पदरी ७०,००० नपुंसक होते. काही नपुंसक राजदरबारी उच्चपदस्थही होते. एकजण तर जनरलच्या पदापर्यंतही पोचला होता. अधिक माहिती आंतरजालावर आहे(http://en.wikipedia.org/wiki/Eunuch#China).

Forbidden City मध्ये शिरण्याआधी कुप्रसिद्ध तियानआनमेन चौक दिसतो (हाच चौक जेथे ४ जून १९८९ ला लोकशाही हक्कांकरता निदर्शन करणाऱ्या लोकांना गोळ्या घालून मारण्यात आले होते. तियानआनमेन व तियानआनमेन चौक हे चीनमधील सर्वात महत्त्वाच्या स्थळांपैकी आहेत. चीनच्या राष्ट्रीय दिनाचे संचलन येथेच होते.तियानआनमेन चौकाची अधिक माहिती येथे मिळेल: http://en.wikipedia.org/wiki/Tiananmen_Square_protests_of_1989). तियानआनमेन चौकाच्या तीन बाजूंस महत्त्वाच्या सरकारी इमारती आहेत व एका बाजूस तियानआनमेन म्हणजेच Forbidden City चे प्रवेशद्वार आहे.

तियानआनमेन चौक

तियानआनमेन (Gate of Heavenly Peace / Main Gate of the Forbidden City)

तियानआनमेनमधून Forbidden City मध्ये प्रवेश केला की समजते की या राजवाड्यास city का म्हणतात ते. अगदी शहर नाही तरी एकाद्या उपनगराएवढा याचा विस्तार आहे. चीनसारख्या अगडबंब साम्राज्याचा गाडा चालवण्यास आवश्यक त्या सर्व इमारती या एकाच जागी आहेत. एक खास इमारत सम्राटाच्या रोजनिशीसाठी राखून ठेवलेली होती. रोजचा अहवाल लिहून संध्याकाळी तो सीलबंद करून येथे ठेवला जात असे. या प्रथेमुळे हजारो वर्षांचा चीनचा इतिहास आजही उपलब्ध आहे. Forbidden City च्या चारी बाजूंनी ५ ते ६ मीटर उंच भिंत आहे. मात्र पाणी असलेला खंदक फक्त मागच्या बाजूसच आहे (का ते गाइडला माहीत नव्हते).

असो, असे म्हणतात की एक चित्र १,००० शब्दांपेक्षा जास्त परिणामकारक असते...

Forbidden City ०१

.

Forbidden City ०२

.

Forbidden City ०३
.

Forbidden City ०४

Forbidden City ०५


.

Forbidden City ०६


.

Forbidden City ०७


.

Forbidden City ०८: या इमारतीत सम्राटांच्या रोजनिश्या जपून ठेवलेल्या होत्या.


.

Forbidden City ०९: ड्रॅगनचा रस्ता, फक्त सम्राटासाठीच राखीव रस्ता.

चीनमध्ये ड्रॅगन हे सम्राटाचे चिन्ह समजले जात होते. इतर कोणासही ते चिन्ह वापरण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे कम्युनिस्ट सत्ता सुरू झाल्यावर त्यांनी ड्रॅगनला काही काळ वाळीत टाकले होते. पण आता ते एक मनोरंजनाचे साधन झाले आहे. बरेच सर्वसामान्य चिनी अजूनही ड्रॅगनला शुभ मानतात. घरामध्ये मोक्याच्या जागी आणि विशेषतः घरावर त्याचे स्थान असते.

Forbidden City १०: राजदरबार आणि सिंहासन


.

Forbidden City ११: सम्राटाचे शयनगृह

 (क्रमशः)

==============================================================================
ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!