रामपालबाबामुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत का???

Submitted by आशुचँप on 19 November, 2014 - 14:27

आज रामपाल बाबाचे दिव्य पराक्रम पाहून संताप संताप झालाय. अटक होऊ नये म्हणून या बाबाच्या कमांडोजनी पोलिस पथकावर गोळीबार केला. झालेल्या धुमश्चक्रीत चार बायका आणि एक दीड वर्षाचे बाळ ठार झाले.
अरे काय चाललयं काय....
कामचुकारपणा करायचा म्हणून कामावरून काढून टाकलेला हा इंजिनियर माणूस अचानक बाबा म्हणून काय अवतिर्ण होतो आणि आपला मूर्ख समाज त्याला डोक्यावर काय घेतो सगळेच अनाकलनीय...

या भोंदू बाबाविरुद्ध खूनाचा आरोप असतानाही हे शंख भक्तगण त्याचे समर्थन करतात हे पाहून मान लाजेनी खाली गेली. तसाच तो आसाराम...आणि अन्य अनेक...

इतर अत्यंत फालतू गोष्टींवरून धार्मिक भावना दुखावणारे कुठे आहेत आता. या लोकांमुळे तुमच्या भावना दुखावत नाहीत का. का तो केवळ हिंदु आहे म्हणून त्याने बलात्कार, खून, अपहरण केलेले क्षम्य आहे....

अरे कसले रे लोक...शी...लाज वाटते....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हूडा, व्हायचय काय नव्याने? आख्ख्या भारतात पसरलेल्या (की विषाणु युद्धात पसरविलेल्या?) डेन्ग्यूच्या साथीप्रमाणेच पुपुवाडकरांची मला व माझ्या पोस्टीन्ना इग्नोर करायची साथ आत्तापर्यंत आख्ख्या माबोवर पसरली असेल, तर माझ्या पोस्टस इग्नोर होतील. हा.का. ना.का.

लग्न केलेला वा करणारा, विवाहीत असलेला वा होणारा, संत-महात्मा मानण्यात गैर काय आहे?

उलट अविवाहीत असणारे पण ब्रह्मचारी नसणारे, आणि तरीही अविवाहीतपणाची टिमकी मिरवणारे ढोंगी नव्हे का?

संसाराची जबाबदारी घेणे केव्हाही स्तुत्यच!

देवा! गापै अहो काय त्या आसारामची सारखी तळी उचलताय? तो आणी त्याच कार्ट महा बिलन्दर आहेत. सगळ समजून उमजून देखील तुम्ही अस्तित्वात नसलेल्या पेडगावला अपडाऊन करताय, धन्य आहे तुमची.

एक भक्तची पोस्ट बघितली Wink

कुप्रचारक बालू रेत को पेरकर चाहे उसमें से तेल निकाल दें
परंतु संत आशारामजी बापू में हमारी श्रद्धा को
कुप्रचारक खत्‍म नहीं कर सकते.... नहीं कर सकते... नहीं कर सकते...

कुप्रचारक बर्फ से भले ही अग्नि प्रकट करा दें
परंतु संत आशारामजी बापू में हमारी श्रद्धा को
कुप्रचारक खत्‍म नहीं कर सकते.... नहीं कर सकते... नहीं कर सकते...

कुप्रचारक मृगतृष्णा के जल को पीने से भले ही प्यास बुझा दें
परंतु संत आशारामजी बापू में हमारी श्रद्धा को
कुप्रचारक खत्‍म नहीं कर सकते.... नहीं कर सकते... नहीं कर सकते...

कुप्रचारक आकाश में भले ही अनेकों प्रकार के फूल खिला दें
परंतु संत आशारामजी बापू में हमारी श्रद्धा को
कुप्रचारक खत्‍म नहीं कर सकते.... नहीं कर सकते... नहीं कर सकते...

अन्धकार भले ही सूर्य का नाश कर दे,
परंतु संत आशारामजी बापू में हमारी श्रद्धा को
कुप्रचारक खत्‍म नहीं कर सकते.... नहीं कर सकते... नहीं कर सकते...

इथे न्यू जर्सीत एक आसाराम आश्रम आहे. तिथे मी कधी कधी रविवारी चक्कर टाकत असे. (भोजन मोफत!).
पत्नीच्या माहेरचे पाहुणे आले तेव्हा त्यांना तिथेच जेवायला नेऊयात या माझ्या सूचनेमुळे घरात आग लागली. तर ते असो. अटक होण्यापूर्वी तिथे दर रवीवारी अक्षरशः पार्किंगला जागा नसायची. तीनशेच्या आसपास उपस्थिती. तिथे मी गेलो तरी लोक माझ्याशी गुजरातीतच बोलायचे. आता तिथे अगदी कमी उपस्थिती असते, जेमतेम पाच कार्स. पण एक निरिक्षण असे आहे की अत्ता येणारे लोक अगदीच कट्टर आहेत. एका रविवारी मोफत भोजनाच्या लालसेने तिथे गेलो आणी गप्पा मारल्या तर विविध कॉन्स्पिरेसी थियरी ने डोके दुखु लागले.

ऋषीमुनी पूर्वी लग्न करायचे की. आणि हे त्यांच्या गर्लफ्रेन्डशीच लग्न करणार असल्याने चालत असावे >> ते ऋषी वेगळे हे रिशी पकूर आहेत . Proud

पण , <<लग्न केलेला वा करणारा, विवाहीत असलेला वा होणारा, संत-महात्मा मानण्यात गैर काय आहे?
उलट अविवाहीत असणारे पण ब्रह्मचारी नसणारे, आणि तरीही अविवाहीतपणाची टिमकी मिरवणारे ढोंगी नव्हे का?
संसाराची जबाबदारी घेणे केव्हाही स्तुत्यच!>> + १००

ऋन्मेऽऽष,बाकी लोकसत्ता तुमचे भविष्य जाणुन आहे.दिवाकर देशमुख यांनाही पट्ले. Proud माफ करा http://www.maayboli.com/node/51027?page=3 . Happy

लोकहो,

रामपाल यांचं व्यापक वार्तांकन करणाऱ्या वाहिन्यांनी कोलकत्यात २९ नोव्हेंबरला झालेली दंगल दाखवली तरी का? इथे दोन दुवे आहेत :

http://www.outlookindia.com/news/article/Policemen-Injured-in-Clashes-Wi...
http://www.business-standard.com/article/pti-stories/policemen-injured-i...

२०१२ च्या ऑगस्टात आझाद मैदानात जसा धुडगूस घातला गेला, अगदी तस्साच परवा कोलकत्यात घातला गेलाय. त्याच विशिष्ट लोकांकडून. त्यांना प्रसारमाध्यमांकडून वेगळा न्याय लावला जातो. का ते ओळखा पाहू!

आ.न.,
-गा.पै.

पैलुभौ ,

मोदी आल्यापासुन , जरी दंगली झाल्या तरी पेप्रात छापुन येत नाही. गुज्रात दंगलीबाबत तरी कुठे छापुन आले होते ?

आमच्या काँग्रेसच्या राज्यात असं नव्हतं बै ! सगळं कसं सचित्र छापुन यायचं .

आज पेप्रात आलं नाही म्हणुन बोंबला.

आणि पाच वर्षानी , मोदीच्या काळात दंगली झाल्याच नाहीत , हेही भाषण तुम्हीच लिहिणार आहात ...

Proud

वाराणसी प्रकरण तर दडपून टाकले
कोणत्याच वाहीनीवर चर्चा नाही काही नाही??
हे बरं दिसत नाही गड्यांना? Wink

काउ,

>> गुज्रात दंगलीबाबत तरी कुठे छापुन आले होते ?

गुजरात दंगलींचे भांडवल करून मोदींवर शरसंधान केल्यानेच त्यांना एव्हढी देशव्यापी प्रसिद्धी मिळाली. या फुकट प्रसिद्धीच्या आधारे ते पंतप्रधानही झाले. जागे व्हा!

आ.न.,
-गा.पै.

वाराणसी प्रकरण तर दडपून टाकले
>>>
???
कुठले वाराणसी प्रकरण Uhoh

ईथे तरी लिहा, नाहीतर आम्हा सामान्य लोकांना कळणार कसे Sad

३-६ लाख खोटे मतदार सापडले ही बातमी कोणत्याही वाहिनीवर चर्चेसाठी आलीच नाही हेच जर इतर पक्षांच्या मतदारसंघात सापडले असते तर आकाशपाताळ एक केले असते . इंडीया वांट्स नो असे बोंबलुन बोंबलुन टिव्ही डोक्यावर घेतला असता. मायबोलीवर १०-२० धागे निघाले असते. सगळ्या चॅनल्स वर तथाकथित एक्स्पर्ट बोलवले असते त्यावर चवीने चर्चा झाली असती. निवडणुक आयोगाच्या नावे "शंखनाद" केला असता. सगळ्या भक्तांनी छाती फुटेस्तोवर बडवुन घेतली असती.

पण हे वाराणसीत झाले. सगळे चिडीचुप अळीमिळीगुपचिळी

निवडणुकीच्या वेळी केन्द्रात काँग्रेस आणि राज्यात (उ.प्र) मुलायमचा पक्ष असताना इतक्या बोगस मतदारांची मते कुणाला गेली असतील ते उघडच आहे Wink

समोरच्या मतदाराला निव्वळ १.५ लाखच मते मिळाली मोदी एकट्यालाच ५ लाखा वर मिळाली

आता बोगस मते कुणाला गेली हे उघडच झाले Biggrin

बाकीच्या सगळ्या उमेदवारांना मिळून किती मिळाली? Happy ते जौद्या.
नुकतेच वाराणसीच्या निवडणुक अधिकार्‍याने सांगितले आहे की बोगस मतदारांची बातमी चुकीची आहे. हे वाचल्याचं आठवलं म्हणून सांगतोय. बाकी चालुद्या.

Biggrin

मोदी सोडुन स्गळ्यांनीच बोगस मतदार आणले आनि स्वतःला हरवुन घेतले
भक्तांनी चोरुन दुध पिताना देखील डोळे घट्ट मिटुन घेतले. आता वरुन प्रेशर आल्यावर माहिती दडपली गेली

एकाच उमेदवाराला किती मत मिळाली ते बघावे Wink त्याकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष करुन "इतरांना किती मिळाली" विचारणे हा शुध्द दांभिकपणा आहे

प्रश्नाला उत्तर न देता वैय्यक्तिक शेरेबाजी करु नका. बाकीची मते किती ते सांगा? याचा स्क्रीनशॉट काढून त्याचा उपयोग बदनामीच्या खटल्यात उपयोग होऊ शकतो. तेव्हा जरा जपून.

चला, आता इतर उमेदवारांना मिळून किती मते मिळाली ते सांगा बरं?

कृपया वैय्यक्तिक शेरेबाजी टाळावी.

मोदींच्या विरोधातल्या काही प्रमुख उमेदवारांना मिळून ३९०७२२ इतकी मते मिळाली होती.
विकीपिडियावर माहिती उपलब्ध आहे.

निवडणुकीच्या वेळी केन्द्रात काँग्रेस आणि राज्यात (उ.प्र) मुलायमचा पक्ष असताना इतक्या बोगस मतदारांची मते कुणाला गेली असतील ते उघडच आहे डोळा मारा

---------

यावर देखील तुमच्यावर बदनामीचा खटला चालु शकतो

Pages