रामपालबाबामुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत का???

Submitted by आशुचँप on 19 November, 2014 - 14:27

आज रामपाल बाबाचे दिव्य पराक्रम पाहून संताप संताप झालाय. अटक होऊ नये म्हणून या बाबाच्या कमांडोजनी पोलिस पथकावर गोळीबार केला. झालेल्या धुमश्चक्रीत चार बायका आणि एक दीड वर्षाचे बाळ ठार झाले.
अरे काय चाललयं काय....
कामचुकारपणा करायचा म्हणून कामावरून काढून टाकलेला हा इंजिनियर माणूस अचानक बाबा म्हणून काय अवतिर्ण होतो आणि आपला मूर्ख समाज त्याला डोक्यावर काय घेतो सगळेच अनाकलनीय...

या भोंदू बाबाविरुद्ध खूनाचा आरोप असतानाही हे शंख भक्तगण त्याचे समर्थन करतात हे पाहून मान लाजेनी खाली गेली. तसाच तो आसाराम...आणि अन्य अनेक...

इतर अत्यंत फालतू गोष्टींवरून धार्मिक भावना दुखावणारे कुठे आहेत आता. या लोकांमुळे तुमच्या भावना दुखावत नाहीत का. का तो केवळ हिंदु आहे म्हणून त्याने बलात्कार, खून, अपहरण केलेले क्षम्य आहे....

अरे कसले रे लोक...शी...लाज वाटते....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिसार के बरवाला में दो दिन तक चले ऑपरेशन के बाद गिरफ्त में आए रामपाल के सतलोक आश्रम में गुप्‍त ठिकानों के अलावा स्विमिंग पूल, नशीली दवाएं और टॉयलेट्स में सीसीटीवी भी लगे मिले हैं .
बरवाला और रोहतक के करौंथा आश्रम की तलाशी से पता चला है कि रामपाल ने तंत्र-मंत्र के गुप्‍त स्‍थान, सुरंग और खास लिफ्ट बनवा रखी है. रामपाल के कुछ भक्‍तों ने पुलिस को बताया कि वह दूध से नहाता था और बाद में उसी दूध की खीर बनाकर प्रसाद के तौर पर बांट दी जाती थी. पुलिस के मुताबिक रामपाल भक्‍तों के सामने लिफ्ट से ही प्रकट होता था और एक शाही सिंहासन पर बैठता था. आप जानकर हैरान रह जाएंगे कि रामपाल के कमरे से 5 लाख रुपये का मसाजर मिला है. इसके अलावा सतलोक आश्रम में तलाशी के दौरान पुलिस को कॉन्‍डोम, महिला शौचालयों में खुफिया कैमरे, बेहोश करने वाली गैस और अश्‍लील साहित्‍य भी बरामद किया गया है .

पुलिस को आश्रम में तीन लेयर का बेसमेंट मिला है, जिसकी तलाशी अभी तक पूरी तरह से नहीं हो पाई है. बरवाला आश्रम में ईंट के टुकड़ों से भरी बोरियां, तेजाब से भरी बोतलें और बड़ी संख्‍या में हथियार भी मिले हैं. पुलिस जब रामपाल को गिरफ्तार करने आई थी तब उसके अनुयायियों ने घंटों तक पत्‍थर बरसाए थे. हरियाणा पुलिस बरवाला के साथ रोहतक स्थित करौंथा आश्रम में भी छापा मार रही है. करौंथा आश्रम में अभी तक 30 किलो स्‍वर्ण आभूषण मिल चुके हैं. इनमें ज्यादातर मंगलसूत्र और हार हैं. आश्रम में सिक्कों से भरी 17 बोरियां और कई बोरियां नोटों से भी भरी मिली हैं. इसके साथ ही विदेशी शराब की कई बोतलें और अय्याशी के कई और सामान भी बरामद किए गए हैं.

बरवाला आश्रम में पुलिस को वह गुप्‍त स्‍थान भी मिला है, जहां पर रामपाल तंत्र क्रिया किया करता था. आश्रम में मौजूद लोगों ने दावा किया है कि रामपाल मृत लोगों को जीवन देने का भी दावा करता था. इसके लिए वह खास तरह की क्रिया करता था. आश्रम में पुलिस को एक अस्‍पताल भी मिला है, जिसमें कई खास रोगों का उपचार मोटी रकम लेने के बाद किया जाता था. रामपाल के पास 100 से 200 करोड़ की संपत्ति होने का अनुमान है. अकेला बरवाला आश्रम ही 16 एकड़ में फैला हुआ है. रामपाल के पास करीब 70 गाड़ियां होने की बात सामने आ रही है. इनमें मर्सिडीज, बीएमडब्ल्यू जैसी कारें भी शामिल हैं. रामपाल के पास 20 ट्रैक्टर, दो ट्रक व पांच बस भी हैं. आश्रम में एक समय में 50 हजार लोगों के रहने की व्यवस्था है. यहां सुरक्षा के भी पुख्ता इंतजाम किए गए थे. कोई भी बाहर से सीधा अंदर नहीं आ सकता है. आश्रम में तैनात रामपाल के निजी गार्ड कई स्‍तर पर तलाशी लेते थे.

और भी... http://aajtak.intoday.in/story/what-were-the-things-found-from-rampal-as...

बाबाला अवास्तव महत्व देणारे तितकेच मुर्ख आहेत. च्या मारी दर ४-६ , महिन्याला एखादा तरी बाबा उगवतोच,
आता पुढे काय त्याच्याकडे हे एचढे साहित्य सापडले म्हणून काय त्याला जन्मठेप येणार आहे काय, कुणी कसलेही आरोप केले तरी कोर्टात ते सिध्द करता येणार काय. तेवढी जूनी केस रंगेल बाकी सगळे जाणार चादरीखाली. Sad

रामपालबाबा नावावरुन तरी हिंदूं वाटतोय हा हिंदूंदेंवतांवरच टिकापण करतोय नेमका हा हिंदूं की मुसलमाना कळतच नाहिय?
>>>

चालाक लोमडी आहे तो. त्याने आपले सावज भक्त बरोबर हेरलेत. अश्या बाबांना धर्माबद्दल काही प्रेम नसतेच, किंबहुना ते ज्या धर्माचे ते आहेत असा दावा करतात त्याच धर्मातील लोकांचा तर गेम वाजवतात.

10154258_535150746620634_3443965411213261097_n.jpg

रामपालबाबा हा एकच विषय आपली महान (?) संस्कृती अंधश्रद्धेने किती खोलवर पोखरलेली आहे ह्याचे उदाहरण म्हणून पुरेसा आहे. जनतेने निवडलेले नेते ह्या बाबाच्या पायावर डोके ठेवायला जाणे, ह्या बाबाच्या आश्रमात विकृतीचे असंख्य पुरावे सापडणे, हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी आवश्यक ती शस्त्रसामुग्री ह्या आश्रमात सापडणे आणि भारतीय घटनेनुसार जे कायदा-रक्षणासाठी आश्रमाला घेरण्यास कटिबद्ध आहेत त्या पोलिसांवर प्रत्यक्ष हल्ला होणे हे सगळेच एक भारतीय म्हणून ह्या बाबाशी आपला प्रत्यक्षात काहीही संबंध नसतानाही आपल्यासाठी लाजिरवाणे आहे.

येथे काँग्रेस, भाजप, मोदी हा विषय (निदान मला तरी) अभिप्रेत नाही, इतरांना असल्यास त्यांनी त्यांची मते दिलेलीही आहेत व देतीलही!

माझ्यासारखे अनेकजण फुकट उपलब्ध झालेल्या व्यासपीठावर भाषणे ठोकण्याव्यतिरिक्त काही करत नाहीत. जे काही करू पाहात असतात त्यांच्यावर आश्रमातून हल्ला होतो, ओलिस म्हणून अनेक निष्पापांना डांबून ठेवले जाते.

हेल्मेटसक्ती ह्या धाग्यावर साजिरा ह्यांनी लिहिलेली पहिली पोस्ट ह्या संदर्भातसुद्धा अत्यंत चपखल आहे. आपण चाललो आहोत एक विकसित देश व विकसनशील देशांचा नेता बनायला, पण आजही आपले लढे अत्यंत सामान्य आहेत. आपल्याला रामपालबाबाशी नव्हे तर रामपालबाबाला मोठे करणार्‍यांशी लढायला हवे आहे.

न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे एखाद्याविषयी निश्चीतपणे काही म्हणता येत नाही असा प्रतिवाद करून आसारामसारख्यांना संशयाचा फायदा देणे हेही घातक आहे. एका उपग्रह वाहिनीने निर्मलबाबांचे सेशन्स प्रसारीत करणे हाही अपराध आहे आणि निर्मलबाबाच्या सेशन्सना हजेरी लावून त्याचे गुणगान गाणे हाही अपराध आहे.

रामपालबाबाला धरण्यास हजारोंनी सज्ज होणार्‍या पोलिस खात्याच्याच कोणत्यातरी एका शाखेला अनाकलनीय कारणासाठी दाभोळकर हत्येबाबत उदासीन होताना बघणे ही आपल्या षंढपणाने आपल्या तथाकथित पुरोगामीत्वाच्या थोबाडात मारणे आहे.

कोणता बाबा कोणत्या धर्माला अनुसरून साम्राज्य स्थापन करतो हा मुद्दा गैरलागू आहे.

नुसतीच इच्छा असणे, काहीही करता न येणे, करता येत आहे असे समजले तरीही ते करण्यासाठी द्यायला वेळ नसणे आणि 'आऊट ऑफ द वे' जाऊन काहीही करण्याचे धाडस नसणे ह्या चार चाकांवर आपला नपुंसकतेचा गाडा चर्चा चघळत चघळत पुढे चाललेला आहे. ही नपुंसकता इतकी आतवर भिनलेली आहे की आपली आई मृत्यूच्या धाकाने जबरदस्तीने रामपालबाबाच्या आश्रमात नको ते प्रकार सहन करत होती असे समजले तरी त्या गोष्टीची वाच्यता होऊ नये म्हणून आपण पोलिस आणि वार्ताहरांचे खिसे गरम करण्यात धन्यता मानू!

-'बेफिकीर'!

बेफिकीर,

>> न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे एखाद्याविषयी निश्चीतपणे काही म्हणता येत नाही असा प्रतिवाद करून
>> आसारामसारख्यांना संशयाचा फायदा देणे हेही घातक आहे.

आसारामसारख्यांना म्हणजे कोणाला?

आ.न.,
-गा.पै.

आसुमल आणि नार्‍याला हे गामाजी आदरार्थी बहुवचन का वापरीत आहेत बरे? सुसंस्कृत पणाचा भाग म्हणून का? की ते हिंदू आहेत म्हणून?

दांभिक (hypocrites)बाबा, बुव्वा,अम्मा, माता ओळखण्याचे निकष

१) हे पैसे घेउन तिकिटविकुन प्रवचन देतात.

२) हे लोक धुर्त कावेबाज बिझनेसमॅनसारखे दिसतात { साज श्रुगार करुन किमती आसनावर बसतात.}

3) पैसे घेउन पुजापाठ करुन देतात.

४) दैवी चमत्काराने आजार ठिक करन्याचा दावा करतात.

५) कुठल्यातरी आधी होउन गेलेल्या देवाचा आवतार सांगतात
.
६) यांची मोठाले मठ, आश्रम, मंदिर असतात.

७) राजकारनी लोकांचा सेलिब्रेटिज चा खेळाडुचा त्याच्यांकडे राबता असतो.

अजुन आठवल्यावर लिहते.

^^^^^
अगदी... सगळी लक्षणे तीच तशीच असतात, पण तरीही लोकं फसतात. चमचम तिथे घमघम अशी आपली जनता आहे

बेफिकीर,

आसारामबापूंनी पोलिसांशी पूर्ण सहकार्य केलं आहे. याउलट रामपाल याने अजिबात सहकार्य केलं नाहीये. दोघांनाही एकाच तराजूत तोललं तर भारतीय दंडविधानाची किंमत कमी होते ना?

आ.न.,
-गा.पै.

>>दोघांनाही एकाच तराजूत तोललं तर भारतीय दंडविधानाची किंमत कमी होते ना?<<<

गामासाहेब,

भारतीय दंडविधानाची किंमत इतकी तिरस्करणीय नाही जितके तिरस्करणीय ह्यांचे समाजात अस्तित्वात असणे आहे.

Happy

बेफिकीर,

रामपाल यांचा तिरस्कार करणं मी समजू शकतो. पण पोलिसांशी पूर्ण सहकार्य करणाऱ्या आसारामबापूंचा तिरस्कार नक्की कशासाठी, ते स्पष्ट करावं म्हणतो. आपण चर्चा करूया. Happy

आ.न.,
-गा.पै.

भारतीय दंडविधानाची किंमत इतकी तिरस्करणीय नाही जितके तिरस्करणीय ह्यांचे समाजात अस्तित्वात असणे आहे>> +१०० Happy

आसारामबापूंनी पोलिसांशी पूर्ण सहकार्य केलं आहे>> हे त्यांनी पोलीसांवर आणि आपल्यावर केलेले उपकार समजत आहात का? त्यांनी केलेल्या गुन्हांचा तुम्हाला काहीच अंदाज नसावा किंवा माहीती. दोघांना एकत्र तोलण्याचा प्रश्न नाही.दोघांचेही गुन्हे गंभीर आहेत आणि त्यामुळेच दोघे जेल मधे आहेत हा समान दुवा आहे.आणि हेच असे कृत्य करणारया सगळ्याच भोंदू बाबा किंवा मी तर म्हणेन मानवतेच्या विरुद्ध असणारी लोकांना एकाच तराजुत तोलतोय इथे.
Happy

आसुमल आणि नार्‍याला हे गामाजी आदरार्थी बहुवचन का वापरीत आहेत बरे? सुसंस्कृत पणाचा भाग म्हणून का? की ते हिंदू आहेत म्हणून?
------- असुमलच्या आणि त्याचा मुलगा यान्च्या अत्याचाराला बळी पडणारे पण हिंदू होते, आहेत.
प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि म्हणुन प्रतिक्रिया देता येत नाही असे आसुमल बाबत भुमिका घ्यायची आणि इतर अनेक न्यायप्रविष्ट प्रकरणान्वर निर्णय द्यायचे याला दुटप्पी पणा म्हणायला हवा.

यान्ची (आणि समविचार्‍यान्ची नित्यानन्द, खुनाचा आरोप असलेले आचार्य) पाठराखण ते केवळ हिन्दू आहेत असे म्हणुन होत असेल तर ते समाजाच्या आरोग्यासाठी घातक आहे.

सिनि,

१.
>> दोघांचेही गुन्हे गंभीर आहेत आणि त्यामुळेच दोघे जेल मधे आहेत हा समान दुवा आहे

माझ्या माहितीप्रमाणे आसारामबापूंचा गुन्हा आजून सिद्ध व्हायचा आहे. सव्वा वर्ष झालं तरी आजून खटला का उभा रहात नाही? रामपाल याचा गुन्हा प्रथमदर्शी (न्यायालयाला टांग देण्याचा) निश्चितच गंभीर आहे.

२.
>> हे त्यांनी पोलीसांवर आणि आपल्यावर केलेले उपकार समजत आहात का?

मी समजत नाही. पण समाजातले अनेक लोकं तसं समजतात. विशेषत: पोलिसांची दांडगाई पाहून.

आ.न.,
-गा.पै.

उदय,

१.
>> प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि म्हणुन प्रतिक्रिया देता येत नाही असे आसुमल बाबत भुमिका घ्यायची
>> आणि इतर अनेक न्यायप्रविष्ट प्रकरणान्वर निर्णय द्यायचे याला दुटप्पी पणा म्हणायला हवा.

बरोबर.

२.
>> यान्ची (आणि समविचार्‍यान्ची नित्यानन्द, खुनाचा आरोप असलेले आचार्य) पाठराखण ते केवळ हिन्दू आहेत
>> असे म्हणुन होत असेल तर ते समाजाच्या आरोग्यासाठी घातक आहे.

अनुमोदन.

आ.न.,
-गा.पै.

गामा_पैलवान_५७४३२
तुमचे म्हणणे बरोबर आहे <<आसारामबापूंचा गुन्हा आजून सिद्ध व्हायचा आहे. >> हे मलाही माहीत आहे.पण त्यांना जामीन न मिळण्याची कारणे तुम्हाला माहीत आहेत का. अजुन कीती दिवस वाट पहायची त्यांना योग्य शिक्षा होण्याची हीच खरी चिंता आहे . इतकीही डोळे झाक मी तरी करु शकत नाही .

समाजातले अनेक लोकं तसं समजतात. विशेषत: पोलिसांची दांडगाई पाहून.>> हेच समाजातील लोक पोलीसांनाही अनेकदा धारेवर धरतात आणि हतबलही करतात अश्याच (भोंदुबाबा)एखाद्या मोठ्या लेवलच्या व्यक्तीला पकडण्यासाठी. त्यावेळीही पोलीस चुकीचेच असतात आणि आताही चुकीचेच असं आहे का!

जो पर्यंत गुन्हा सिध्द होत नाही तो पर्यंत गुन्हेगार हा दोशी ठरवता नाही हे जर मान्य केले तर तुम्ही अजुन तरी योग्यच आहात.मी वाट पाहीन कायदयाने योग्य निर्णय मिळण्याची.माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, जरी तो उशीरा मिळाला तरी.

सव्वा वर्ष झालं तरी आजून खटला का उभा रहात नाही? >>हा मलाही प्रश्न पडला आहे.

तुमच्या प्रश्नांची उत्तरं मला अजुन माहीती काढण्यास जे भाग पाडत आहात तीही चांगलीच गोष्ट आहे. याची सर्वात जास्त मदत मलाच होईल त्यासाठी आभार . Happy

उदाहरणासाठी असं समजु,

क्ष व्यक्ती ह्या भोंदु (सॉरी हं अजुन सिद्ध नाही झाले) साधुंना आदराने बोलवत आहेत.
समजा ह्याच क्ष व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याबरोबर वरील भोंदु (सॉरी हं अजुन सिद्ध नाही झाले) साधुंनी काही अश्लील वर्तन केले तरी ते हेच म्हणतील का .......नाही नाही अजुन सिद्ध नाही झाले कोर्टाकडुन....घरचा सदस्य काय बावळट आहे कोर्टात सिद्ध झाले की बघु.

*** पर्सनली घेवु नये.........घेतला तरी काय करुन घ्याल.

Biggrin

आई बहिन पत्नी मुलगी नाति-पोती साधुसंताना समर्पित करावे असे काही धर्मग्रंथात लिवुन ठेवल असे तो आसुमल
म्ह्नायचा म्हणे.
स्त्रियांचा भोग तो न घेता त्याच्या अंगात घुसलेले देव घ्यायचे म्ह्णे किती महान भारतीयांची की हिंदु ची अंधश्रद्धा.

खर तर हे सगळे बाबा यांची लायकी खुप खालच्या पातळीची आहे...आपण धागा काढुन यांच्यावर चर्चा करावी यापेक्षा पण खालच्या पातळीचे आहेत हे ...

पण एका बाजुने विचार केला तर एक प्रश्न मला पडलाय म्हणजे ह्या लोकांना बाबा करण्याच्या मागे आपल्यासारख्या सुशिक्षीत लोकांची निश्क्रियता आहे.आपन आपल्या शेजारीपाजारी पाहतो लोकांना बाबाकडे जाताना थांबवतो का आपण? नाहि. का तर जाउदे मला काय करायच आहे, किंवा अजुनही खुप कारणे असतात तो माणुस आपले म्हणने मानणार नाही ईत्यादी. आपण विषय तिथेच सोडून देतो आपल्याला लष्काराच्या भाकर्या भाजायला वेळ नसतो.यात मी पण आले.
ईथे चर्चा करुन आपण तसा पण आपला वेळ ह्या लायक नसलेल्या लोकांसाठी वाया घालवत आहोत मला वाटत ईथुन पुढे जर प्रत्येकाने ठरवले असा बाबा,बाई उदयास आले तर मी स्व्तः जाणार नाही आणि माझ्या ओळखीच्यांना पण जाऊ देणार नाहि...तर परिस्थीती नक्कीच बदलेल.

ह्या बाबांच्यामुळे हिंदुत्वाचा प्रसार होतो. त्यामुळे लोक लंडनमधून त्यांचे समर्थन काढून त्यांचे दोष सिद्ध व्हायचे आहेत म्हनतात त्यामुळे घटनात्मक दृष्ट्या ते तोवर निर्दोष आहेत असा वकिली युक्तीवाद करतात. इतकेच काय अशोक चव्हाणांना सत्यसाई बाबा बद्दल नावे ठेवणारे शपथ विधीला ह्या बुवांची झुंड स्टेजवर बोलावतात. त्यामुळे बाबाबुवांचे राज्य आले आहे असे समजावयास हरकत नाही. कुठल्याही हिंदु बाबाच्या अंगाला हात लावू नये असा कायदाही निघेल बहुधा. काँग्रेसच्या काळातले कायदे सध्या अस्तित्वात असल्याने रामभाऊ बाबाला अटक करावी लागली. यथायोग्य कायदे दुरुस्ती केली जाईल.

रॉहू सही जवाब अब आप जीत चुके है भक्तो का द्वेष Wink

तब्बल ८०० वर्षानंतर हिंदुंचे सरकार दिल्लीत आले आहे म्हणुन आपले म्हणने योग्य ठरु शकते. याची एक छोटी स्टेप म्हणजे रामदेवबाबा यांना झेड+ सुरक्षा दिली आहे

तब्बल ८०० वर्षानंतर हिंदुंचे सरकार दिल्लीत आले त्यांना हे बुवा बाबा अम्मा महाराज मान्य आहेत तर... .

मग मोदीजीचा भारताचा विकास व अच्छेदिन आयेंगे चा नारा म्ह्नजे हेच का?

सुरेख, प्रत्येक ठिकाणी मोदीजींचा उल्लेख करु नये. विशेषतः देशात घडणार्‍या कुठल्याही घटनेच्या संदर्भात तर नाहीच. ते आता जागतिक पातळीवरील नेते आहेत.

श्रीमान सत्यवादी इथुन पुढे लक्षात ठेवेन.

पण जागतिक पातळीवरील नेत्यांना जगात फिरताना मनात हे विचार येत नसतिल का?की जग कुठे आणी आपण कुठे ?

सुरेख, प्रत्येक ठिकाणी मोदीजींचा उल्लेख करु नये. विशेषतः देशात घडणार्‍या कुठल्याही घटनेच्या संदर्भात तर नाहीच. ते आता जागतिक पातळीवरील नेते आहेत.
------- त्या जगातच भारत आहे, त्यामुळे प्रत्येक सहा घ्टना मागे एक वेळा श्री. मोदी यान्चा उल्लेख करणे योग्य आहे.

जागतिक पातळीवरील वगैरे म्हट्ले म्ह्नुन मी घाबरले होते.
मग आता आपला देश तब्बल ८०० वर्ष मागे जानार का?

रामपालबाबामुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत का???>>>>> रामपाल बाबा, आसाराम ह्यांच्या सारख्या घटना महाराष्ट्रात हि वाढीस लागण्याची शक्यता वाटतेय.महाराष्ट्र सरकार शपथविधीलाच डझन दोन डझन तथाकथित साधू संतांना मिरवताना बघितले तिथेच ह्या सरकारच्या काळात अच्छे दिन कोणाचे येणार ते कळले. साधूंचे अच्छे दिन नि भक्तांचे बुरे .

Pages