Submitted by आशुचँप on 19 November, 2014 - 14:27
आज रामपाल बाबाचे दिव्य पराक्रम पाहून संताप संताप झालाय. अटक होऊ नये म्हणून या बाबाच्या कमांडोजनी पोलिस पथकावर गोळीबार केला. झालेल्या धुमश्चक्रीत चार बायका आणि एक दीड वर्षाचे बाळ ठार झाले.
अरे काय चाललयं काय....
कामचुकारपणा करायचा म्हणून कामावरून काढून टाकलेला हा इंजिनियर माणूस अचानक बाबा म्हणून काय अवतिर्ण होतो आणि आपला मूर्ख समाज त्याला डोक्यावर काय घेतो सगळेच अनाकलनीय...
या भोंदू बाबाविरुद्ध खूनाचा आरोप असतानाही हे शंख भक्तगण त्याचे समर्थन करतात हे पाहून मान लाजेनी खाली गेली. तसाच तो आसाराम...आणि अन्य अनेक...
इतर अत्यंत फालतू गोष्टींवरून धार्मिक भावना दुखावणारे कुठे आहेत आता. या लोकांमुळे तुमच्या भावना दुखावत नाहीत का. का तो केवळ हिंदु आहे म्हणून त्याने बलात्कार, खून, अपहरण केलेले क्षम्य आहे....
अरे कसले रे लोक...शी...लाज वाटते....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साधूसंतांचे आशिर्वाद घेणे हि
साधूसंतांचे आशिर्वाद घेणे हि आपली परंपरा आहे.
आता हल्ली चांगले साधूसंत मिळत नाहीत हा आपला दोष काय??
(No subject)
सिसि, आपला इथला प्रतिसाद
सिसि,
आपला इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.
१.
>> पण त्यांना जामीन न मिळण्याची कारणे तुम्हाला माहीत आहेत का. अजुन कीती दिवस वाट पहायची त्यांना योग्य
>> शिक्षा होण्याची हीच खरी चिंता आहे . इतकीही डोळे झाक मी तरी करु शकत नाही .
मी एक भक्त (आसारामांचा नव्हे) असून मलाही निकालाची उत्सुकता आहे. बापू जर निर्दोष सुटले तर त्यांच्यावरील किटाळ गेल्याचा आनंद होईल. जर दोषी ठरले तर हिंदूधर्मियांतली घाण दूर झाली म्हणून आनंद होईल.
त्यांना जामीन न मिळण्याची कारणं माहीत नाहीत. कोणी स्पष्ट केल्यास बरं होईल.
तरुण तेजपाल यांच्यावरही बलात्काराचं कलम (भादंवि ३७६) घातलं आहे. आसारामबापूंवरील सर्वात गंभीर कलम ३७६ हे आहे. एकाला जामीन मिळतो आणि दुसऱ्याला नाही. असं का ते माहीत नाही. बहुधा फिर्यादी पीडिता अल्पवयीन आहे इतकंच कारण असावं.
२.
>> मी वाट पाहीन कायदयाने योग्य निर्णय मिळण्याची.माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे,
>> जरी तो उशीरा मिळाला तरी.
माझाही विश्वास आहे. पण ज्यांचा काडीमात्र अपराध नसतांना तुरुंगात सडावं लागतंय त्यांची फुकट गेलेली वर्षं कोण भरून देणार? साध्वी प्रज्ञासिंग या विना आरोप गेले ६ वर्षं तुरुंगात आहेत. त्यांना कर्करोगाने ग्रासलं आहे. त्यांच्यावर इतर बंदिवानांकडून प्राणघातक आक्रमणं झाली आहेत. त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा का?
३.
>> हेच समाजातील लोक पोलीसांनाही अनेकदा धारेवर धरतात आणि हतबलही करतात अश्याच (भोंदुबाबा)एखाद्या
>> मोठ्या लेवलच्या व्यक्तीला पकडण्यासाठी. त्यावेळीही पोलीस चुकीचेच असतात आणि आताही चुकीचेच असं
>> आहे का!
असा संशय उत्पन्न होणं ही लोकशाहीची शोकांतिका आहे. आज पोलिसांची प्रतिमा प्रचंड भ्रष्ट अशी झाली आहे. न्यायप्रणालीही त्याच वाटेने चालली आहे. निदान लोकांची तशी धारणा आहे. लोकं कोर्टाची पायरी निरुपायाने चढतात.
कांची कामकोटीच्या शंकराचार्यांना २००४ मध्ये ऐन दिवाळीत जयललिता सरकारने अटक केली. त्यांच्यावर दोन वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता. मधले दिवस ते साधे संशयितही नव्हते. यथावकाश फुटक्या कवडीइतकाही दम नसलेला खटला उभा राहिला. पण त्यांची निर्दोष सुटका व्हायला २०१४ साल उजाडलं. कशावरून आसारामबापूंवर हाच प्रसंग येणार नाही?
कायद्याचं समान संरक्षण (equal protection of law) लाभावं हा भारतीय नागरिकाचा घटनादत्त अधिकार आहे.
आ.न.,
-गा.पै.
एखाद्या आरोपीला जामीन न
एखाद्या आरोपीला जामीन न मिळण्याचं कारण म्हणजे तो प्रकरणातील पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करू शकतो, साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. आसारामबापूंना जामीन नाकारताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या जाईतो जामीन दिला जाऊ नये असे म्हटले आहे.
यावर जामिनासाठी आसारामबापूंनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले, त्यावर एम्सच्या डॉक्टरांच्या पॅनेलकडून त्यांच्या प्रकृतीची चिकित्सा व्हावी असा आदेश मिळाला आहे.
एका साक्षीदाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे, तर एका साक्षीदारावर गुजरातेतील सूरतमध्ये अॅसिड हल्ला करण्यात आला.
ही सर्व माहिती/या बातम्या अर्थातच वृत्तसंस्थांच्या संकेतस्थळांवर सहज उपलब्ध आहेतच. पण अजून खटलाच उभा राहिलेला नाही असे सांगणार्या लोकांना त्या नजरेआड कराव्या लागणारच. खरे तर खटला उभा राहिला नाही, जामीन मिळत नाही असा खोटा ओरडा करायचा हाच हेतू आहे.
त्यांची निर्दोष सुटका व्हायला
त्यांची निर्दोष सुटका व्हायला २०१४ साल उजाडलं. कशावरून आसारामबापूंवर हाच प्रसंग येणार नाही? >>अरे ओ गामा,
आसुमल, रामपाल हे स्वतःला साधू म्हणवतात ना? मग ते तुरुंगात असोत का त्यांच्या मठात असो, काय फरक पडतो. त्यांनी आपलं परमेश्वर स्मरण चालू ठेवावं ना? नीरीच्छ असायला पाहिजे त्यांनी! हो की नई? जिवन तो मोहमाया है ना?
निर्दोष सुटका आणि सबळ
निर्दोष सुटका आणि सबळ पुराव्या अभावी सुटका यात मोठा फरक आहे. जळगाव वासनाकान्डातही सर्व आरोपीन्ना पुराव्या अभावी सोडले होते...
आरोपी तुरुन्गात असताना बाहेर अत्यन्त महत्वाच्या साक्षीदाराची हत्या होत असेल तर आरोपी किती तरबेज, निर्ढावलेला, सराईत गुन्हेगार आहे आणि त्याची पोहोच कुठवर आहे हे लक्षात येते. या मह्त्वाच्या खटल्यात आरोपीन्ना सरक्षण का नाही दिले गेले? साक्षीदारान्ची हत्या, त्यान्च्यावर हल्ले, धमकावणे इत्यादी प्रकार होत असतील तर अरोपीच्या विरुद्ध सज्जड पुरावे न्यायालया समोर कसे येणार? आणि पिडीत महिलान्ना न्याय कसा मिळणार ?
ज्याप्रमाणे जळगाव वासना खटल्यातील आरोपी, खुनाचा आरोप झालेले शन्कराचार्य हे सबळ पुराव्या अभावी सुटले तसेच असुमल सुटणार नाही कशावरुन?
परिस्थिती अत्यन्त गन्भिर आहे... मला असुमल, नित्यानन्द, खुनाचा आरोप झालेले शन्कराचार्य यान्च्यापेक्षा त्यान्च्या कर्म कॄत्याना पाठिशी घालणारे महाविचारी विद्वान यान्ची उदासिनता जास्त घातक वाटते. समाजाला योग्य मार्गदर्शन करणे आणि सद्सदविवेकाला प्रामाणिक राहुन भुमिका घेणे येथे अपेक्षित आहे.
त्या आसुमलने खून-बलात्कार
त्या आसुमलने खून-बलात्कार केले की नाहीत याबद्दल शंका असू शकेल एकवेळ पण त्या डिसे.२०१२ मधल्या दिल्लीतल्या निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणी आसुमलने स्टेटमेन्ट केली होती की त्या घटनेत त्या मुलीचीही तितकीच चूक आहे आणि तिने बलात्कार्यांच्या हातापाया पडून विनवणी केली असती तर त्यांनी तिला सोडलं असतं वगैरे. ही स्टेटमेन्ट्स सर्व लोकांसमक्ष केली आहेत आणि त्याचे व्हिडियो उपलब्ध आहेत. केवळ यातूनही कळतंच की या माणसाची विचारसरणी काय आहे.
कायद्याचं समान संरक्षण (equal
कायद्याचं समान संरक्षण (equal protection of law) लाभावं हा भारतीय नागरिकाचा घटनादत्त अधिकार आहे.>> + १०० तुमच्या मताचा आदरच आहे . काही दुष्ट प्रवृत्तींमुळे सगळ्यांच्या श्रद्धेला आणि धार्मिक भावनेला धक्का पोचु नये इतकच .
आस्याच्या भक्तांच्या नादी
आस्याच्या भक्तांच्या नादी लागु नये. त्यांना शिकवणच अशी मिळालेली आहे की काहीही आस्याने केले तरी ते परमपुज्य त्यांच्या आंघोळीच्या दुधाची खीर पिणार्यांना काय समज द्यायची. सोडा लोकांनो .
खर तर असे विकृत साधुंचा धंदा
खर तर असे विकृत साधुंचा धंदा वाढवण्यामागे असेच भक्त असतात.
कसाब हा आपल्यासाठी माथेफिरू
कसाब हा आपल्यासाठी माथेफिरू दहशतवादी असला तरी या भूतलावरच्या काही लोकांसाठी तो शहीद जवान होता.
प्रत्येकाची विचारसरणी तो कोणत्या गटात आहे त्यावर अवलंबून असते, इथे कोणी श्री श्री आसूमल महाराजांचा भक्त असेल तर त्याला त्याच्या विचारांवर सोडून देणे योग्य!
इथे कोणी श्री श्री आसूमल
इथे कोणी श्री श्री आसूमल महाराजांचा भक्त असेल तर त्याला त्याच्या विचारांवर सोडून देणे योग्य!
दुर्दैवाने आपल्या समाजात याच विचाराच्या लोकांचा जास्त भरणा असल्यामुळे या भोंदु बाबांचे फावते...त्यांना माहीती आहे की ठामपणे विरोध करणारे फक्त मुठभरच लोक आहेत आणि त्यांना हे कुंपणावरचे लोक काहीही मदत करणार नाहीत.
इथे कोणी श्री श्री आसूमल
इथे कोणी श्री श्री आसूमल महाराजांचा भक्त असेल तर त्याला त्याच्या विचारांवर सोडून देणे योग्य!>>
मला नाही वाटत असं एवढ्या शंभरावर प्रतीसादांनंतर जर का एखादा (आसूमल)भक्त या सगळ्या प्रकाराकडे डोळसपणे पहायचा प्रयत्न करत असेल तर हेही चांगलच की !.इथे लिहिण्याचा माझा हेतु हाच होता. जगात चांगले वाईट लोक असतात. कसाबला महान समजणारे वाईट आणि दहशतवादी समजणारे चांगलेच ,जगातल्या कुठल्याही कोपरयात असले तरी अगदी पाकीस्तानातही. चुकीची विचारसरणी बदलायची ताकद शब्दांमधे असते म्हणुन तर आपण इथे वाचतोय.
लोकहो, श्री भरत मयेकरांनी
लोकहो,
श्री भरत मयेकरांनी आसारामबापूंच्या संबंधी या व दुसऱ्या बाफ वरकाही रोचक विधाने केली आहेत. त्यांची चिकित्सा करेन म्हणतो.
१.
>> खटल्याचं कामकाज सुरळीत कोण होऊ देत नाही ते इथे कळेल.
खटल्यात सरकार वादी आहे. सरकारपाशी बलदंड यंत्रणा आहे. त्याविरोधी लढायला विनंत्या सादर करतांना कालापव्यय होणे अपेक्षित आहे.
२.
>> उभा राहिलाय खटला.
हे बघायचं राहून गेलं. चूक दाखवून दिल्याबद्दल भरत मयेकरांचे आभार.
३.
>> दरम्यान एका महत्त्वाच्या साक्षीदाराची गोळ्या घालून हत्याही करण्यात आली आहे.
इथे अमृत प्रजापती हा साक्षीदार अभिप्रेत आहे का?
४.
>> ही सर्व माहिती/या बातम्या अर्थातच वृत्तसंस्थांच्या संकेतस्थळांवर सहज उपलब्ध आहेतच. पण अजून खटलाच
>> उभा राहिलेला नाही असे सांगणार्या लोकांना त्या नजरेआड कराव्या लागणारच. खरे तर खटला उभा राहिला
>> नाही, जामीन मिळत नाही असा खोटा ओरडा करायचा हाच हेतू आहे.
खोटा ओरडा करायचा हेतू अजिबात नाही. साध्वी प्रज्ञासिंग आणि प्रसाद पुरोहित हे गेली ६ वर्षे आरोपाविना तुरुंगात सडत आहेत. या पार्श्वभूमीवर उपरोक्त संशय येणं स्वाभाविक आहे.
मात्र ही संशयनिवृत्ती मला सहजपणे करता आली असती. ती न केल्याबद्दल क्षमस्व.
आ.न.,
-गा.पै.
किती ती नाटक किळस येते आता
किती ती नाटक
किळस येते आता
मी गामाच्या विचारांशि सहमत.
मी गामाच्या विचारांशि सहमत.
अहमदाबाद। सही ही कहा गया है
अहमदाबाद। सही ही कहा गया है कि पुलिस जब अपने पर आती है तो मुर्दे से भी सच उगलवा लेती है। जी हां पुलिस ने पूछताछ में आसाराम केस की अहम कड़ी और उसकी बेटी भारती से वो सारी बातें उगलवा ली है जो वो सुनना चाहती थी। भारती ने इस बात को कबूल किया है कि वो अपने पिता आसाराम की कुटिया में लड़कियों को भेजा करती थी। पूछताछ में भारती ने बताया है कि ''हां, मैं ये मानती हूं कि मैं इन्हें (बलात्कार पीड़ित लड़की) जानती हूं, और मैंने ही इन्हें पहली बार आसारामजी बापू के एकांतवास की कुटिया में भिजवाया था।''
पुलिस की मानें तो पूछताछ के दौरान पीडि़त लड़की का आसाराम और भारती से आमना-सामना कराया गया और भारती ने सारी बातें कबूल लीं। पुलिस ने बताया कि क्रास इंटेरोगेशन के दौरान आसाराम की बेटी भारती सिरुमलानी उर्फ भारती श्री के सामने कोई चारा नहीं बचा और उसने सब सच-सच बोल दिया।
हालांकि भारती से जब ये पूछा गया कि सब कुछ जानते हुए उस मासूम बच्ची को आसाराम की कुटिया में अकेला क्यो भिजवाया तो इसपर भारती ने कहा कि 'मैंने तो लड़की को आसाराम जी बापू के पास मंत्र दीक्षा के लिए
भिजवाया था। कुटिया के अंदर क्या हुआ, इसके बारे में मुझे कोई जानकारी नहीं है।' आसाराम पर आरोपों की फेहरिस्त लंबी है। एक ताजा खुलासा ये भी है कि आसाराम ने कई लड़कियों का गर्भपात भी करवाया है। तो चलिये आसाराम पर लगे उन तमाम आरोपों का जिक्र तस्वीरों के माध्यम से करते हैं।
लड़कियां तो दूर मासूम लड़कों को भी हवस का शिकार बनाते थे आसाराम
लड़कियां तो दूर मासूम लड़कों को भी हवस का शिकार बनाते थे आसाराम
आसाराम के पूर्व बॉडीगार्ड देवेन्द्र प्रजापति ने खुलासा किया है कि आसाराम और नारायण साईं मासूम लड़कों को भी अपने हवस का शिकार बनाते थे। इसके अलावा आश्रम में जिन दो बच्चों की मौत हुई थी उसके पीछे भी आसाराम का ही हाथ था क्योंकि वो उन बच्चों पर तंत्र-मंत्र का आजमाईश कर रहे थे।
साध्वी प्रज्ञासिंग आणि प्रसाद
साध्वी प्रज्ञासिंग आणि प्रसाद पुरोहित हे गेली ६ वर्षे आरोपाविना तुरुंगात सडत आहेत.
<<
आरोपाविना??
कैच्याकै.
मागल्या शतकात छापील ते ते
मागल्या शतकात छापील ते ते सत्य मानण्याची अंधश्रद्धा होती.
या शतकात मिडीया जे जे दाखविल सांगेल ते ते सत्य मानण्याची अंधश्रद्धा आहे.
बरोबर म्हणतोय ना मी गामा?
लिम्ब्या हा गामाचा शिष्य
लिम्ब्या हा गामाचा शिष्य आहे का?
उलट
उलट
..
..
आसाराम दैवी चमत्काराने
आसाराम दैवी चमत्काराने जेलच्या बाहेर का येत नाहि?? निदान मुलाला तरी बाहेर काढायला काहिच हरकत नाही.
याचे उत्तर भक्तांकडे आहे का??
लोकहो, प्रसाद पुरोहितांना
लोकहो,
प्रसाद पुरोहितांना आरोपाविना का तुरुंगात टाकलंय याचा थोडाफार अंदाज हे वाचून येतो (इंग्रजी दुवा) :
http://www.firstpost.com/india/the-malegaon-probe-the-curious-case-of-lt...
आ.न.,
-गा.पै.
आसाराम दैवी चमत्काराने
आसाराम दैवी चमत्काराने जेलच्या बाहेर का येत नाहि?? निदान मुलाला तरी बाहेर काढायला काहिच हरकत नाही.
याचे उत्तर भक्तांकडे आहे का??
आसाराम वर ज्या कोनी बलात्कारा सारखे गंभिर आरोप केले त्यांना त्यानी श्राप देउन दगडाची शिळा -बिळा का बनवली नाही
त्यांच्या सारख्या संताला काय अशक्य आहे.त्याचे देवत्व सिध्द करन्याची केवढी छान संधी आहे त्याना.जेल मधे कशाला सडताय ते??
भक्तांकडुन उत्तराची अपेक्षा आहे.
ही सगळी त्यांचीच माया आहे.
ही सगळी त्यांचीच माया आहे. दैवी लोकांना सामान्यांसारख्या हालअपेष्टा भोगाव्या लागतात. त्याची महती तुमच्या आमच्या सारख्या पाखंडी लोकांना नाही कळणार. प्रभु रामचंद्रांपासून ते कृष्णभगवान यासर्वांना मानवी रुपात त्रास सहन केला आहे. त्यामुळे ते जेलात असोत वा बाहेर कुठे ते त्यांच्या लीलेने आरामातच आहेत.
सडतायत वगैरे हा आपला भ्रम...ते जेव्हा सुखरुप सुटून बाहेर येतील तेव्हा आत्तापेक्षा जास्त भक्तगण तिथे आरती ओवाळायला हजर असतील याची खात्री बाळगा.
प्रभु रामचंद्रांपासून ते
प्रभु रामचंद्रांपासून ते कृष्णभगवान यासर्वांनी मानवी रुपात पन लिला दाखवल्याच होत्या ना...
कृष्णभगवाननी नाहिका गोवर्धन पर्वत करंगळिवर उचलला होता तसेचआसाराम निपन जेलच्या सलाखा करंगळिनी तोडायच्या.
जेलमधे घालनार्या पोलिसांना पहरेदारांना छुssssssssssss करुन भस्म करायचा.मग आमच्या सारखे पाखंडी पन
भक्त होतिल ना....
न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत
न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत थांबायला हवे असे वाटते. एक बातमी आली म्हणून लगेच निघाले "धार्मिक भावना दुखावत नाहीत का" करत. धार्मिक भाव्ना आजकाल इतक्या हळव्या झाल्यात की कुणा थोतांडाला अटक झाली की लगेच दुखावतात.
शंकराचार्यांच्या केस मध्ये नंतर काय झाले ? त्यांना अटक झाल्यानंतर मिडीया १ आठवडा पेटली होती पण नंतर सगळेच विस्मृतीत गेले. असो.
वरिल प्रतिसादाचा अर्थ माझा रामपाल अथवा त्याच्या कृत्यांना पाठिंबा आहे असा नाही, पण मला इतकच म्हणायचय की धार्मिक भावना इतक्याही नाजूक नसाव्यात की नेहमीच दुखाव्यात.
रच्याकने: मोदींविषयी बातम्या आल्या की म्हणायचे मिडीया विकली गेलीये, मिडीयावर विश्वास नाही इ इ आणि रामपाल्/असाराम्/साध्वी संदर्भात मात्र त्याच मिडीयावर विश्वास ठेवायचा. #hypocrisy
ते जेव्हा सुखरुप सुटून बाहेर
ते जेव्हा सुखरुप सुटून बाहेर येतील तेव्हा आत्तापेक्षा जास्त भक्तगण तिथे आरती ओवाळायला हजर असतील याची खात्री बाळगा.
>>> म्हणजे ते जर सुटून आले तरी तुमच्या लेखी ते गुन्हेगारच? न्यायसंस्थेवर विश्वास नाही? न्यायालयाचा निर्णय काही जरी झाला तरी तुम्ही तर आधीच निकाल लावून टाकला.
चिखलु, >> म्हणजे ते जर सुटून
चिखलु,
>> म्हणजे ते जर सुटून आले तरी तुमच्या लेखी ते गुन्हेगारच? न्यायसंस्थेवर विश्वास नाही? न्यायालयाचा निर्णय
>> काही जरी झाला तरी तुम्ही तर आधीच निकाल लावून टाकला.
अगदी नेमकं बोट ठेवलंत तुम्ही. आसारामबापू पूर्वी एका खटल्यातून पूर्णपणे निर्दोष सुटले असतांनाही असा पूर्वग्रह बाळगणे उचित नाही. आसारामबापूंच्या आश्रमात काळ्या जादूचे पुरावे मिळाले नाहीत असं प्रतिज्ञापत्र गुन्हे अन्वेषण विभागाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं होतं (इंग्रजी दुवा).
आ.न.,
-गा.पै.
Pages