स्पिनॅच कॉर्न पुलाव

Submitted by बस्के on 18 November, 2014 - 23:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालकाची १५-२० पाने
कॉर्नदाणे अर्धी वाटी
मटारदाणे अर्धी वाटी
१०-१२ काजू
कांदा उभा चिरून
आले पेरभर
लसूण दोन पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
मिळाल्यास ताजे बे लीव्ह्ज
बासमती तांदूळ १.५ वाटी
किचन किंग मसाला

क्रमवार पाककृती: 

तेलात काजू तळून घ्या
त्याच तेलात जिरे, बे लीव्ह्ज व बारीक चिरलेले हिरवी मिरची, आले लसूण इत्यादी घालून परता
उभट चिरलेला कांदा, बारीक चिरलेली पालकाची पाने, कॉर्न व मटारदाणे घालून किंचित वाफ काढा
मग धुतलेले तांदूळ, मीठ व ३ चमचे किचन किंग मसाला घालून शिजवून घ्या.
जरासा स्पायसी पण मस्त चवीचा स्पिनॅच कॉर्न पुलाव तयार..

वाढणी/प्रमाण: 
इतर जेवण असेल तर दोन जणांना दोनदा घेता येईल इतका होईल..
अधिक टिपा: 

नेहेमीचा स्पिनॅच पुलाव म्हटले की हिरवागार भात समोर येतो, तसा हा करायचा नाही. त्यामुळे पालक अती घ्यायचा नाहीये.
मी आत्ताच भूक लागल्यामुळे पटकन मनात येईल ते टाकून बनवला आहे. चवीला भन्नाटच झाल्याने लगेच पाकृ लिहीली. परंतू फोटो टाकण्यासारखा अजिबातच झाला नाही कारण मी आंबेमोहोर तांदूळ वापरला आहे. पुलाव म्हटल्यावर जसा लांबसडक शीतांचा भात समोर येतो तसा नाही झाला त्यामुळे नो फोटो.

माहितीचा स्रोत: 
मी कधीच स्पिनॅच पुलाव खाल्ला नसल्याने व त्याची पाकृ अ‍ॅज सच कधी न शोधल्याने माहीतीचा स्त्रोत नसले तरी शोधाची जननी मीच आहे. :)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages