स्पिनॅच कॉर्न पुलाव

Submitted by बस्के on 18 November, 2014 - 23:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालकाची १५-२० पाने
कॉर्नदाणे अर्धी वाटी
मटारदाणे अर्धी वाटी
१०-१२ काजू
कांदा उभा चिरून
आले पेरभर
लसूण दोन पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
मिळाल्यास ताजे बे लीव्ह्ज
बासमती तांदूळ १.५ वाटी
किचन किंग मसाला

क्रमवार पाककृती: 

तेलात काजू तळून घ्या
त्याच तेलात जिरे, बे लीव्ह्ज व बारीक चिरलेले हिरवी मिरची, आले लसूण इत्यादी घालून परता
उभट चिरलेला कांदा, बारीक चिरलेली पालकाची पाने, कॉर्न व मटारदाणे घालून किंचित वाफ काढा
मग धुतलेले तांदूळ, मीठ व ३ चमचे किचन किंग मसाला घालून शिजवून घ्या.
जरासा स्पायसी पण मस्त चवीचा स्पिनॅच कॉर्न पुलाव तयार..

वाढणी/प्रमाण: 
इतर जेवण असेल तर दोन जणांना दोनदा घेता येईल इतका होईल..
अधिक टिपा: 

नेहेमीचा स्पिनॅच पुलाव म्हटले की हिरवागार भात समोर येतो, तसा हा करायचा नाही. त्यामुळे पालक अती घ्यायचा नाहीये.
मी आत्ताच भूक लागल्यामुळे पटकन मनात येईल ते टाकून बनवला आहे. चवीला भन्नाटच झाल्याने लगेच पाकृ लिहीली. परंतू फोटो टाकण्यासारखा अजिबातच झाला नाही कारण मी आंबेमोहोर तांदूळ वापरला आहे. पुलाव म्हटल्यावर जसा लांबसडक शीतांचा भात समोर येतो तसा नाही झाला त्यामुळे नो फोटो.

माहितीचा स्रोत: 
मी कधीच स्पिनॅच पुलाव खाल्ला नसल्याने व त्याची पाकृ अ‍ॅज सच कधी न शोधल्याने माहीतीचा स्त्रोत नसले तरी शोधाची जननी मीच आहे. :)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच! आंबेमोहर चवीला केंव्हाही छान बासमतीपेक्षा. करुन बघेन. फोटो असेल तो टाक. कसाही आला तरी बघू दे.

आंबेमोहोर तर आबेमोहोर... फोटो टाक ना.
आलं-लसूण बारीक कापून की पेस्ट घालायची आहे?
मी शनिवारी करेन Happy
आणि त्याबरोबर आरतीचं पम्पकिन सूप.

माझा कॉर्न पुलाव पिवळा असतो Wink

मी बारीक चिरून घालते. पेस्ट करायचा कंटाळा व विकतची चव नाही आवडत.

हा घ्या फोटो.. अगदीच मऊ शिजवला मी कारण मला मऊ भात म्हणजे कम्फर्ट फुड व वन डिश मील वाटतो. टेक्निकली हा पुलावाचा फोटो नाही म्हणता येणार. Happy
IMG_3226.JPG

काय झाले फोटोला!! मस्त आला आहे. मला तो एकाचवेळी पुलाव, तमिळ लोकांचा तिखट पोंगल आणि गोड भात असे वेगवेगळे लुक्स देतो आहे Happy

मस्त ! आंबेमोहोर आणि इंद्रायणी माझे लाडके तांदू़ळ प्रकार आहेत अगदी. नक्की करून बघेन.

बस्के, रेसिपी इंटरेस्टींग वाटत आहे .. Happy

>> मी बारीक चिरून घालते. पेस्ट करायचा कंटाळा व विकतची चव नाही आवडत.

+१ Happy तसंही पेस्ट केली तरी पाणी न घालता ती कशी स्मूथ करायची हे मला कळलेलं नाही ..

नेहेमीचा कॉर्न पुलाव म्हटले की हिरवागार भात समोर येतो>> इथे कॉर्न एवजी पालक हव ना!

छान वाटतिय क्रुती !करुन खाणार

यम्मी दिसतीय खीर.. मला उद्याच केली पाहीजे खीर आता! Happy

शैलजा, हो अगदीच सोपी आहे रेसीपी ! पण इकडे स्पिनॅच कॉर्न पुलाव असं काही दिसलं नाही म्हणून पाकृ लिहून टाकली लगेच. नाहीतर कधी कधी मीच विसरून जाते हा असा पदार्थ मी बनवला होता. Happy

छान !
बस्केम्याडम, आलं लसुण पेस्ट करण्यात वेळ जातो व कुकिंगचा मजा त्यातच किरकिरा होतो. त्यासाठी एक टीप .. भरपूर आले व लसुण विकत घ्यावे, दोघांची वेगवेगळी बारीक पेस्ट करावी, दोन मोठ्या प्लास्टीक पेपर वा फॉईलच्यामध्ये पेस्टचा पातळ थर पसरवा व कडक उन्हात तीन चार दिवस वाळवत ठेवा, कडक पापुद्रा तयार होतो, तो चुरुन त्याची पावडर करता येते, ती खुप दिवस टिकते. फक्त हवा बंद डब्यात बाहेरच ठेवा, फ्रिजरात नको ,दमट होइल.

सशल .. थँक्यु Happy
बस्के .. शेवयाची खीर करायला कितीसा वेळ लागतो .. सरकारी डेझर्ट आहे ते .. काही नाही तर खीर .. व्हेरिएशनमधे फक्त वेलदोडा, ड्राय फ्रुट्स, इसेन्स , मँगो पल्प .. Naked Juice .. जे हातात मिळेल ते Proud

टीना, वेगळी रेसीपी असेल तर वेगळा धागा काढा. Happy

धीरज काटकर, हे सगळं करायचा कंटाळा आहे म्हणून मी बारीक चिरणे वगैरे शॉर्टकट घेते. शिवाय चवीत बदल वाटत नसल्याने चालून जाते आहे.. Happy

चनस, नेकेड ज्यूस घालून खीर? इंटरेस्टींग आहे. नेकेड कुठला, मी फक्त प्रोटीन झोन पीते.

नेकेड कुठला >> Mighty mango.. पल्प नव्हता म्हणुन ट्राय केला.. जर तुला तो ज्युस आवडत असेल तरच वापर .. मँगो नाव जरी असलं तरी मला जरा वेगळीच चव वाटली..
डीजेच्या आंब्याचा शिरा बघितल्याने ही आयडीया केली

ओह ओके. ज्यूस पीऊन बघते आधी.
पण ऑन सेकंड थॉट, मला शेवयाची खीर नेहेमीचीच आवडेल. असो.. Happy

Pages