होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>हज्जारो मोदकं!!<<<

लोकं सिरियल पाहून इतकी भडकलेली आहेत की मोदकांचेही लिंग बदलून टाकत आहेत अनवधानाने!

स्वप्नसुंदरी Light 1

त्या "कले" च्या कला पाहिला मजा येते.
आता पिंट्या बकरा होणार. लग्न करून.

कोणीतरी मिर्या वाटणारी सून मिळालेर तर जाम मजा.

>>>हज्जारो मोदकं!!<<<

लोकं सिरियल पाहून इतकी भडकलेली आहेत की मोदकांचेही लिंग बदलून टाकत आहेत अनवधानाने!

स्वप्नसुंदरी Light 1

मूळ चूक पटकथा लेखकाची आहे हे माझे ठाम मत आहे. संवाद कौशल्य मिळाल्याशिवाय चांगले संवाद होऊच शकत नाहीत. कथेत इतके पाणी का घालायचे याला काही कारणमिमांसाच नाही. कथेची गती मायनसवर आणण्यात लेखक-लेखिकेचा सर्वात जास्त सहभाग आहे.

लेखक-लेखिकेचा सर्वात जास्त सहभाग आहे.>> नाही. चॅनलचा. आपण कितीही आदळआपट केली तरी सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका आहे ही (लोकप्रिय नाही म्हणणार :)) त्यामुळे झीला ही मालिका चालेल तितकी चालायला हवी आहे. म्हणून लेखकांना पाणी घालायचे आदेश असतात.

mala vatat mool concept vait nahiye..pan ti ati jast lambavli jatey...parat maine heroin evdhi ladat ladat bolate ki kharach rag yeto.

Maje aho hi serial naylajane baghtat pan heroin ali ki tynachya cheharya varche expression baghayla mala jam majja yete evdha nakki..

गीताच्या प्रॉब्लेमचं जानी ला किती टेन्शन ?????
आणि काय सांगते ती गीताला , " मूल झालं की होईल सगळं मॅनेज " , डोक्यावर पडलोय हे का वारंवार दाखवून द्यायच ??
आणि ही लोक मूल होण्यासाठी प्रयत्न करण्याचा अगोदरच दत्तक घ्यायचा का विचार करतात ??

महान लोक आहेत ते.
जानु जीवावर आल्यासारखी अभिनय करतेय. म्हणजी आधी काय अगदीच उजेड नव्हताच. पण आता अगदीच दिसुन येतंय.

आजचं चला हवा येऊ द्या बघायला विसरू नका.. आपल्या सगळ्या वैतागाला विनोदी वाचा फुटणार आहे. सगळी आदळआपट मूर्त होणार आहे. Watch Shreya Bugade as Jaani and one & only Bhau Kadam as one & only Aaiaajji Lol

बघायला पाहिजे... आमच्यावरच्या अन्यायाला कशी वाचा फोडतायत ते. Wink

आजचं चला हवा येऊ द्या बघायला विसरू नका.. आपल्या सगळ्या वैतागाला विनोदी वाचा फुटणार आहे. सगळी आदळआपट मूर्त होणार आहे >>> नेहमीप्रमाणेच टुकार भाग होता कालचा पण ...........

नेहमीप्रमाणेच टुकार भाग होता कालचा पण ...........

>> खूप टुकार नव्ह्ता. काही पंचेस चांगले होते. उदा. बेबी आत्या. पण काही काही खरंच बकवास होते.
श्रेया बुगडे मानसिक संतुलन गेल्यासारखी हसत होती ते जानीशी अगदी डिट्टो मॅच होत होते.

त्या "कले" च्या कला पाहिला मजा येते.
आता पिंट्या बकरा होणार. लग्न करून.

कोणीतरी मिर्या वाटणारी सून मिळालेर तर जाम मजा.
>>>
ही मालिका म्हणजे खरतर ह्या घरची म्हणजे त्या घरच्या सूनेची ईश्टोरी असावी आणि अत्ता पर्यन्तची ष्टोरी म्हणजे नमनाला टाकीभर पाणी असावे अशी प्रत्येक दर्शकाची ईच्छा दिसतेय Happy म्हणजे इतका त्या घरचा अभिनय छान झाला आहे. शशिकला बाई, पिंन्टू, बाबा. एक कच्चालिंम्बू होता तो ह्या घरी देउन टाकला आहे. अजुन एक शशिकला बाईंच्या तोडीची सून घेतली की झाल :))

चला हवा येऊ द्या च्या होसुमियाघ स्पेशल एपिसोडात सगळ्या आयांनी एकसारख्या साड्या नेसल्या होत्या. रंग वेगळे होते फक्त. बाकी एम्ब्रॉयडर्‍या सेम.

चला हवा येऊद्या मध्ये मस्त स्वतःभोवती दिवे ओवाळले सर्वांनी.

दक्षि त्या साड्या लेह लडाखला घेतल्या त्यांनी. त्या अशाच एकत्र साड्या घेऊन eventला नेसतात.

एक गोष्ट कोणी observe केली का? तेजश्री आणि शशांक एकमेकांकडे पाहातही नव्हते. त्यांचा खरेच काडीमोड झालाय का?

तरीच निलेश साबळे पण जरा सांभाळून बोलत होता आणि ती जानीची आई तरी पचकलीच " मी नोकरी करते तिथे म्हणे सर्वजण विचारतात श्री च्म लग्न झालय का म्हणून..." काहीही हं शशीकला बाई

Pages