खांडोळी

Submitted by दिनेश. on 10 November, 2014 - 04:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
८/१० खांडोळ्या होतील.
माहितीचा स्रोत: 
लोकसत्ता मधला लेख.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार.. साधना वांद्र्याच्या एका प्रदर्शनाला तू होतीस का ? नीधप, मामी, रीना होत्या, जिप्स्या पण होता. तिथे आपण मासवडी खाल्ली होती. पण ती वेगळी होती.

असे प्रकार कापायला अगदी धारदार सुरी वापरावी लागते.

दिनेशदा ,पदार्थाचं नाव वाचुन आधी मला हसुच आलं होतं का ते कारण तुम्ही वर लिहीलं आहेच.मी करुन पाहणार आहे खांडोळी(पदार्थ हं) .
हा बाकरवडी सारखा प्रकार दिसतोय असे मी लिहीणार होते पण नशीब वर कोणीतरी आधीच लिहिले आहे नाहीतर पुणे आणि विदर्भ इथले लोक माझ्यावर एकत्रच तुटून पडले असते. Proud बाकी बाकरवडी चा मान पुण्याचाच. Happy मी पुण्याची नसली तरी.

फोटो इतका यमी(यमलोकातला नव्हे Happy )आहे की करावाच लागेल हा पदार्थ. रेसिपी मस्तच.

दिनेशदा, या तर रुमाली वड्याच की हो! तुम्हीच लिहिलेय ना पाकृ.

फोटो जबरी आलेत. विशेषतः बेसनाच्या पोळीवर पसरलेल्या सारणाचा आणि त्या पांढर्‍या प्लेटवरच्या दोन त्रिकोणी वड्यांचा हे दोन्ही फोटो एकदम मस्त दिसत आहेत.

खरं तर बेसनाचे असे प्रकार वेगवेगळ्या प्रांतात होतात पण फरकही आहे. इथे बेसन आधी शिजवलेले नाही.
शिवाय बेस खसखशीचा आहे.
मला तो मूळ लेखातला धिरड्याचा प्रकार कळलाच नाही, एकदा बघायला मिळायला पाहिजे, निदान फोटो तरी.
त्याच लेखातला दुसरा पर्याय मी वापरलाय. ( तो थोडासा रुमाली वड्यांसारखा वाटतोय खरा, तरी पण त्या लेखातली वाफवायची कृती जरा वेगळी आहे. )

गूगल करून फार काही दिसत नाही !

अरे कोणी मा बो वरच्या कायदेकानू बद्दल माहितगार आहे का????? इथे कातील पदार्थांचे कातील फोटो टाकून लोकांना नुसते तोंडावर रुमाल धरून बसावे लागतेय!!!!!!....................
दा, कुफेहेपा??????
तुम्ही इथे पुण्यातच येऊन रहा बरं आता.. .. सगळ्या इ मेजवान्या आम्हाला प्रत्यक्ष (खाणे) करता येतील!

दिनेशदा,
नेट वर शोधले असता खांडोळीचा विडीओ मिळाला. त्या बाईंनी बेसन पीठाची धिरडी केली आणि त्यात सारण भरले.
http://www.youtube.com/watch?v=bh6VkAjL_Ew
http://www.youtube.com/watch?v=RIZFkf50Y-o

मासवडीसारखाच पदार्थ दिसतोय, फक्त इथे सारण भरल्यावर वाफवायचे आहे तर मासवडीत बेसन वाफवुन घेउन मग त्यात सारण भरावे लागते.
पण पाकृ तोंपासु आहे.
कोणाकडे पाटवड्यांची सोप्पी रेसिपी आहे का?

दिनेश दा सलाम तुम्हाला. एखादा नवीन प्रकार कळायचा अवकाश तुम्ही करून पाहताच.
आयता म्हणजे पांतळ धिरडे जसे डोसे तसे असावे असे वाटतेय. तव्यावर पांतळ धिरडे घालून, एकदा उलटवून त्यावर मधे सारण घालून दोन्ही बाजुंनी फ्रँकी सारखे फोल्ड करून हळुवार दाब देऊन धिरडे बंद करणे असावे असे वाटतेय. एकदा करून बघितले पाहिजे.

ह्या मासवड्या आहेत्...आमच्याकडे पण करतात फक्त तीळ घालतात्...आणि बेसन एकदम घट्ट शिजवुन घेतात सारण मध्ये भरुन त्रीकोनी थापतात नंतर कापतात...

( खांडोळी म्हणजे शत्रुपक्षाचे काहीतरी करायचे असते असे वाटायचे. तेही नेमके काय म्हणजे तुकडे करायचे का खिमाच करायचा ते माहीत नव्हते. )>>>> +१

मलाही हा धागा वाचेपर्यंत माहीत नव्हते की खांडोळी हा खाद्यपदार्थ असू शकतो.

तुम्हाला मनापासून दंडवत की हे करावसं वाटलं आणि करुनही पाहिलंत. त्यात तुम्हीच लिहिलंयत की यातील धिरडी कशी करतात/चिकटवतात ते समजले नाही.

जर आपणास समजले नाही तर म्या पामराची काय कथा???? म्हणून याच्या वाटेसच जाणार नाही.

तुमच्या जिद्दीला, चिकाटीला, परिश्रमांना एक कडक सॅल्यूट !!

आभार.. परत.
आभासी जगात का होईना, तूम्ही सगळे बरोबर आहात यातच मला समाधान. प्रत्यक्ष भेटून गटग करु तेव्हा करूच.

स्वाती२, लेखात लिहिलेय त्यापेक्षा फारच सोपा प्रकार वाटतोय या व्हीडीओ मधला. धिरडे जरा जाडच वाटतेय Happy
लेखात लिहिलेय त्यावरून अगदी पातळ धिरडे असेल असे वाटले होते. मग त्यात सारण घालून त्याची घडी कशी होणार असा मला प्रश्न पडला होता.

बाकरवडीसारखं प्रकरण दिसतंय.
अशाच सारणाचे मोदक करून आमटी करतात त्याची. भाकरीबरोबर मोदकाची आमटी म्हणजे डायरेक्ट स्वर्ग!

भाकरीबरोबर मोदकाची आमटी म्हणजे डायरेक्ट स्वर्ग!>> येस! सेम सारण वापरुन मोदकाची आमटी होते,

दिनेशदा! पातळ धिरड्यात सारण भरल तर वळवताना ते तुटून बाहेर येईल..त्या व्हिडीयोत केलेला पदार्थ दिसत भारी असला तरी तिखट, तेल,मसाला केवढा वापरलाय! हे एवढ तिखट सवय नसताना खाण अशक्य आहे( निदान मलातरी)
एकुणात विदर्भात सगळे फार तिखट्/जहाल म्हणता येइल अस खातात, आम्ही शेगाव्ला राहिलो तेव्हा हा अनुभव आलेला.

दा Happy प्रस्तावना फार छान लिहिली. लिंक वाचनिय आहे. धन्स.

आमच्याकडे पातोळ्या आणि खांडोळ्या दोन्ही महिन्यातून एकदा तरी असतातच.

पण दिनेसशा आमच्याकडे खांडोळ्याचे छोटे छोटे कानवले करतात आणि ते मसाल्याच्या भाजीत सोडतात. काहीवेळी खांडोळ्या फुटतात. हा पदार्थ खरे तर खास हिवाळी आहे कारण आम्ही ह्यात तिळ खोबरे खूप घालतो. मस्त काळसर रस्स येतो ह्या भाजीला. माझी बहिण नर्मदा ताई आमच्या घरी खा. स्पे. आहे.

लिंक परत वाचली. बदगं शब्द खूप दिवसांनी वाचला. खाली बसलेला थर म्हणजे बदगं. लोणच्यातील मोहरी म्हणजे बदगं. तळात जाऊन बसलेले वाटण म्हणजे बदगं.

लिंक मधे एक चुक आहे. कोथीम्बीरीला विदर्भात 'संभार' म्हणात सांबार नाही.

बी, कधी घरी गेलास आणि ताईकडे तो प्रकार केला तर आठवणीने सविस्तर पाककृती आणि फोटो टाक इथे.
मोदकाची आमटी मीच लिहिली आहे मायबोलीवर.. ( मग ती फेसबुकवर पण माझे नाव न घेता बरीच फिरली म्हणे Happy )

दिनेश Happy रेसिपी ल्लिहिताना अधुन मधुन आपले नाव टाकाय्चे Happy

फोटो खरेच कातिल आहेत. मीही करुन बघेन (उग्गिचच).. जर खरेच केले= तर अजिबात कातिल होणार नाह्हि याची खात्रि आहे.,

हो, त्या वेळेसच खाल्लेली मासवडी. तेव्हाच चिकुचे सुकवलेले काप तुम्ही घेतलेले, नंतरच्या वेळेस मीच घेतले आणि खाल्ले.

आता आले दिवस परत सरस आणि सोबतच्या इतर सरस गोष्टींचे Happy

दिनेशदा तुम्हाला साष्टांग नमस्कार. फोटो, एकदम कातिल.

ह्या नावाचा खाण्याचा पदार्थ असु शकतो अशी शक्यतासुध्दा लेख वाचे पर्यंत वाटली नव्ह्ती. कोणी बनवुन दिले तर खायला नक्की आवडेल.

साधना, नाव टाकायची आयडीया भारी.. तुका म्हणे, नामा म्हणे.. असे. ( ते चिकूचे काप मस्त होते. बरेच दिवस पुरले मला. चिकू खाऊनही बरेच दिवस झाले.. ) जानेवारीपर्यंत असते का ते प्रदर्शन ?

नरेश, तसा कठीण नाही प्रकार हा. आता केल्यावर मी असे आत्मविश्वासाने म्हणू शकतो.

दिनेशदा, हो पुढील वेळी नक्की फोटो घेऊन. मागच्या वेळी सुद्धा मी घेणार होतो पण मी दुपारी ४ वाजता बाहेर पडलो आणि ८ वाजता घरी आलो तर जेवणात खांडोळ्या होत्या Happy

दिनेश, धन्य आहात.. इतका सोसाचा प्रकार करायच्या वाट्याला जाणार नाही.

खांडोळी ह्या नावाचा अंडं वापरून केला जाणारा पदार्थ कोल्हापुरात खुप फेमस आहे. पण तो कुठल्यातरी कँटीनमधे मिळतो. अमेय पंडित सांगू शकेल. तो खातो कोल्हापुरात गेल्यावर.

किती निगुतीनं करत असता सगळं! किचकट कृत्या वाचणं, घटक पदार्थ गोळा करणं, तो करणं, वर त्याचे फोटो काढून इथे लिहून काढणं.. भारी हौस आहे रे बाबा तुम्हाला_/\_

Pages