वऱ्याचा शिरा

Submitted by smi rocks on 9 November, 2014 - 12:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी वरी तांदुळ
१ चमचा तूप
पाऊण वाटी साखर
२ वाटी पाणी
दीड वाटी दूध
काजू बदाम
केसर १ कांडी
२ वेलची

क्रमवार पाककृती: 

प्रथम एका पातेल्यात साखर दूध व पाणी एकत्र करून उकळवून घ्यावे..एका बाजुला कढईत तुपावर वरी तांदुळ परतुन घ्यावा..मग उकळलेले मिश्रण त्यात ओतावे.. ढवळुन घ्यावे.. आता त्यात काजू बदाम आणि वेलची पूड घालावी..
पुन्हा एकदा ढवळुन घ्यावे.. आता त्यावर झाकण ठेवून ५ मिनिटे शिजू द्यावे.. शिरा तयार

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

गरम गरम छान लागतो..

माहितीचा स्रोत: 
रेसिपी पुस्तक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुहास्य हा शिरा अगदी रव्याच्या शिर्‍यासारखा लागतो, मस्त लागतो. आम्ही फक्त वरी एकदा मिक्सरला बारीक करुन घेतो, बाकी सर्व सेम. उपासाला मस्त.

स्मि, एखाद्या सुट्टीच्या उपवासाच्या दिवशी तुझ्या इडल्या करून पहाणार होते आता शीराही करेन Wink
सगळ्यांना चाटच करून टाकते थांब Proud