Submitted by smi rocks on 9 November, 2014 - 12:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी वरी तांदुळ
१ चमचा तूप
पाऊण वाटी साखर
२ वाटी पाणी
दीड वाटी दूध
काजू बदाम
केसर १ कांडी
२ वेलची
क्रमवार पाककृती:
प्रथम एका पातेल्यात साखर दूध व पाणी एकत्र करून उकळवून घ्यावे..एका बाजुला कढईत तुपावर वरी तांदुळ परतुन घ्यावा..मग उकळलेले मिश्रण त्यात ओतावे.. ढवळुन घ्यावे.. आता त्यात काजू बदाम आणि वेलची पूड घालावी..
पुन्हा एकदा ढवळुन घ्यावे.. आता त्यावर झाकण ठेवून ५ मिनिटे शिजू द्यावे.. शिरा तयार
वाढणी/प्रमाण:
२ जणांसाठी
अधिक टिपा:
गरम गरम छान लागतो..
माहितीचा स्रोत:
रेसिपी पुस्तक
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे रेसिपी. सोप्पी पण
छान आहे रेसिपी. सोप्पी पण आहे. नक्की करेन.
सुहास्य हा शिरा अगदी
सुहास्य हा शिरा अगदी रव्याच्या शिर्यासारखा लागतो, मस्त लागतो. आम्ही फक्त वरी एकदा मिक्सरला बारीक करुन घेतो, बाकी सर्व सेम. उपासाला मस्त.
मी करते हा शीरा.... आजच
मी करते हा शीरा.... आजच केला होता..
छान.... वरी मिळाणार नाहीच
छान.... वरी मिळाणार नाहीच इथे. भारतातून थोडी आणावी लागेल.
धन्यवाद ..मी त्यादिवशी असच
धन्यवाद ..मी त्यादिवशी असच पहिल्यांदाच केला होता.. सगळयांनाच आवडला म्हणून म्हटल इथे शेयर करावा..
छान रेसिपी स्मि!! आता जरा नॉन
छान रेसिपी स्मि!!
आता जरा नॉन व्हेज रेसिप्या टाकत जा. ते गेल्या आठवड्यात कालवं कशी केललीस त्याची टाक
Hmm.. नीलू ताय नक्की प्रयत्न
Hmm.. नीलू ताय नक्की प्रयत्न करीं एकदा..:p
स्मि, एखाद्या सुट्टीच्या
स्मि, एखाद्या सुट्टीच्या उपवासाच्या दिवशी तुझ्या इडल्या करून पहाणार होते आता शीराही करेन
सगळ्यांना चाटच करून टाकते थांब