पुण्यातील कौन्सिलर, मानसोपचारतज्ज्ञांची नावे हवी आहेत

Submitted by रूनी पॉटर on 4 November, 2014 - 11:58

सिंहगड रोड भागात दोघेच रहात असलेल्या सत्तरीतल्या आजी-आजोबांना कौटूंबिक कारणासाठी कौन्सिलिंगची गरज आहे. या वयात आरोग्यावर परीणाम न होवू देता एकमेकांशी कसे जुळवून घ्यावे वा अश्या नेहमी वादविवाद होणार्‍या काही विषयावर काय तोडगे काढावेत याबद्दल त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे (घरच्यांचे नकोय).
त्यासाठी कोणी तज्ज्ञ सुचवा. आजी आजोबा फक्त बस व रीक्षा असा प्रवास करतात तेव्हा त्यांना जाण्यासाठी सोयीचे ठिकाण हवे.
इथे फक्त तज्ज्ञांची माहिती (नाव, पत्ता, फोन व असेल तर अनुभव) अपेक्षित आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षीणा ताई - मी बाकी कोणत्याही डोक्टर बद्दल काही कॉमेंट केल्या नाहीत. हा धागा नावे सुचवण्यासाठी होता म्हणुन मी नाव सुचवले आणि त्या डॉक्टरांबद्दल मला जे चांगले वाटले ते लिहीले. त्यांच्या बद्दल चांगले लिहीले म्हणजे मला बाकीच्यांना वाईट म्हणायचे नव्हते.

बाकी BA/MA psychology केलेल्या लोकांबद्दल काही ही बोलायचे नाही.

माझा फक्त शिकल्या सवरलेल्या डॉक्टर वर विश्वास आहे ( MBBS/MD , साती, इब्लिस सारख्या ).

वर धीरज नी म्हणाल्या प्रमाणे समुपदेशन म्हणजे प्रुव्ह न झालेली गोष्ट आहे.
प्रत्येक मेडीकल डॉक्टर हा थोड्याफार प्रमाणात समुपदेशन करतच असतो. शाररीक रोगांमधे पण डॉक्टर समुपदेश्न करतच असतो. जर घ्यायचेच असेल तर खर्‍या डॉक्टर कडुन घ्यावे ( औषधा बरोबर ).

हे BA/MA लोक हे बाबा / महाराजांपेक्षा फार वेगळे नसतात. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या HR मधे पण असले BA/MA psycho लोक दिसतील. हल्ली खर्‍या शिक्षणात गती नसलेली लोक ह्या वाटेला फार जातात.

बाकी BA/MA psychology केलेल्या लोकांबद्दल काही ही बोलायचे नाही.

माझा फक्त शिकल्या सवरलेल्या डॉक्टर वर विश्वास आहे ( MBBS/MD , साती, इब्लिस सारख्या ). >> टोचा फारच बिन बुडाचं विधान.

मला बी ए/ एम ए वाल्या कौन्सिलरचा फार चांगला अनुभव आहे. आणि एक तुमच्या भाषेत सो कॉल्ड शिकलेल्या डॉक्टरचा अत्यंत वाईट. त्यामुळे जो पुस्तकी ज्ञान घेतलेला माणूस आहे तो समुपदेशन उत्तम करू शकतोच हा गैरसमज आहे. मी ज्या डॉक्तरला भेटले तो माणूस उत्तम औषधं प्रिस्क्राईब करतो. पण समुपदेशन नाही. कारण त्यासाठी ऑब्जेक्टिव थिंकिंग लागते. जे प्रत्येकाकडं असतंच असं नाही.

समुपदेशनासाठी जे स्किल लागते ते अंगी बाणवावे लागते. (मूळात ते असावे लागते)
सॉ जे लोक औषध + समुपदेशन उत्तम करत असतील ते ग्रेट डॉक्टर्स आहेतच. पण बी ए एम ए वाले काय कमी नसतात.

काऊन्सेलर होण्यासाठीए ३००० तासांची इंटर्नशिप आहे ( अमेरिकेत). भारतात निम्हान्स सारखी संस्था- तिथे फक्त निवडक विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशन मिळते. तेथून नावाजलेले क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट निर्माण होतात. सायकिट्रास्ट व सायकॉलोजिस्ट हे एकमेकांशी मदत घेत काम करतात.
टोचा साहेब --- जरा सखोल अभ्यास करावा ही विनंती.

रेव्यू +१

मला माहित असलेल्या कौन्सिलर एम ए आहेत पण निम्हान्स मध्ये मेन्टल हेल्थ वर काम्/शिक्षण करून आलेल्या आहेत.

या विषयाशी समांतर असा बी यांचा एक धागा होता ना! तो गायब झालेला दिसतो. काय भानगड आहे?

या विषयाशी समांतर असा बी यांचा एक धागा होता ना! तो गायब झालेला दिसतो. काय भानगड आहे?>>>>>> हो ना, मी मोठा प्रतिसाद लिहीला होता. अ‍ॅड्मीन नी का गायब केला?

वर रूनी यांनी लिहीलेल्या समस्यांसाठी तज्ञ मार्गदर्शक पाहिजे... पिंपरी चिंचवड आकुर्डी निगडी या परिसरातील पाहिजे. Please please help...

@धनवन्ती,समुपदेशन वगैरे झूट असते हे माझ्या वैयक्तीक अनुभवावरुन सांगतो.अधिक सायकीॲट्रीस्टकडेही जावू नका हे सूचवतो,सिडेटीव्ह देऊन पेशंटला झोपवतात फक्त,फर्स्टहॅन्ड अनुभव आहे माझा स्वतःचा.अधिक माहीतीसाठी विपु करा.

,सिडेटीव्ह देऊन पेशंटला झोपवतात फक्त,फर्स्टहॅन्ड अनुभव आहे >>>>> सिंजि, माझ्या एका नातेवाईकाचा ठाण्यातील सुप्रसिद्ध डॉक्टरांबाबत चांगला अनुभव आहे.त्या व्यक्तीने डॉ.ना विचारले की तुम्ही ह्या गोळ्या कशाला देता ? तर तयांनी सांगितले की सतत चिडचिड होत असते,त्यामुळे मेंदू थंड करण्यासाठी गोळ्या दिल्या जातात.नंतर पेशंट ,काही सांगितलेले ऐकायच्या मनस्थितीत येतो.त्या व्यक्तीला डिप्रेशन आले होते आणि तिथे जाऊन ८०% बरे वाटले असे ती व्यक्ती म्हणत आहे.

त्यामुळे मेंदू थंड करण्यासाठी गोळ्या दिल्या जातात.>>>
>>>
या गोळ्यांनी ब्रेन ॲक्टीव्हीटी कमी होते हे खरे आहे.पण व्यक्तीमत्वात काहीच फरक पडत नाही हे मी माझ्या ट्रीटमेंटवरुन सांगू शकतो.पेशंटला तात्पुरते बरे वाटते ते सिडेटिव्हमुळे.याचा अजून एक साइड इफेक्ट म्हणजे पेशंटचा मेटाबोलीझम स्लो होतो,खाखा सूटते व जवळपास वीस ते पंचवीसकिलो वजन वाढते ,लगेच नाही पण एक वर्षात.
मनोरुग्नाने रोज पोषक आहार घ्यावा,नियमीत व्यायाम करावा,याने फरक पडतो.बाकी नंतर.

सिंजी :ऑ: तुमची मतं ऐकून आवाक झालेय मी.
सायकिअ‍ॅट्री किन्वा समुपदेशन असे अजिबात नसते. आधीच या विषया बद्दल लोकांना बायसनेस असतो, रादर भिती
तुमच्या अशा मतां मुळे ती अधिक वाढेल.
प्रतिसाद थोडे संयमित दिलेत तर बरं होइल.

सिंजी, माझ्या एका खूप जवळच्या मैत्रिणीने असे उपचार घेतले. ती कधीच झोपून राहिली नाही आणि तिचे वजन वाढले नाही... चार वर्षांत नाही. तिला त्या उपचाराचा खूप फायदा झाला. मला अजून काही अशी सकारात्मक उदाहरणे माहित आहेत. म्हणून मी इथे मदत मागितली आहे.

सिंथेटिक जि.... अज्ञ आणि अशिक्षितता तसेच पूर्वकलुषित ग्रहांवर आधारित अशी तुमची विधाने वाचून मला वाईट वाटले. या क्षेत्रात अत्यंत उत्तम काम होत आहे, उपचार यशस्वी होत आहेत आणि म्हणूनच तुम्ही अचावचा काहीही लिहू नका

Pages