
थँक्स गिविंग डेच्या सुमारास बाजारात मोठ्या मोठ्या भोपळ्यांच्या राशी दिसायला लागतात. (काही देशांतच थँक्सगिविंग वेळेवर करतात, बाकी आळशीपणा, पण असो :)). पाव किलो भोपळा आणण्याची सवय असलेल्या कुटुंबात वाढलं असल्यानं या भोपळयाचं करायचं काय असा सुरुवातीला प्रश्न पडायचा. पण लोकांनी वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे भोपळे घराच्यासमोर ठेवलेले दिसले आणि भोपळा आणून त्याची बेक्कार भाजी न करता इतरही उपयोग असू शकतात या ज्ञानाने पाश्च्यात्यांबद्दलचा आदर दुणावला.
या भोपळ्यावर स्पुकी चित्र कोरून (कार्व करून) त्यात बारकी मेणबत्ती लावून घराच्या बाहेर ठेवलं की भारी दिसतं हे लवकरच समजलं. गेल्यावर्षी पहिल्यांदा प्रयत्न केला आणि फार कठीण नाही हे जाणवल्यावर या वर्षी परत करून फोटो काढले.
साहित्य: भोपळा, कार्विंग टूल (बारीक करवती सारखं), आयस्क्रीम स्कूप/ मोठा चमचा/ डाव, मेणबत्ती, सुरी, कचऱ्याचा डबा.
१. एक मध्यम आकाराचा भोपळा आणा. बाहेरून भोपळ्याला बघून तो जाड आहे का पातळ (थिन) हे समजत असेल तर पातळवाला (वाली नाही) आणा. नारळ आणताना वाणी अंगठी मारतो तसं ४-५ भोपळ्यावर मारा. फरक काहीच कळणार नाही (वाण्याला तरी कुठे कळतो). मग एक न फुटलेला, जरा गोरा गोमटा दिसणारा, ओबडधोबड न दिसणारा असा भोपळा निवडा. भोपळ्याची रास जरी दुकानाच्याबाहेर पडलेली असेल तरी आता जाऊन पैसे द्यावे लागतात हे विसरू नका. आत सेल्फ चेकआउट असेल तर वरील सगळी स्पेसिफिकेशन विसरून ज्या भोपळ्यावर ४ आकडी नंबर दिसेल तो उचला.
२. हॅलोविनच्या आदल्या दिवशी ऑफिसमध्ये 'पमकीन कार्विग स्टेनसिल' असा सर्च देऊन जे आवडेल/ सोपं वाटेल अशा स्टेस्न्सिलची प्रिंट घ्या. ती न विसरता घरी न्या.
३. आता पेनने भोपळ्याचा देठाकडच्या भागावर एक वर्तुळ काढा. (कंपास शोधू नका) हाताने जसं जमेल तसं काढा.
या वर्तुळाला एका बाजूला एक notch काढा, जेणे करून ते देठ परत झाकण म्हणून ठेवलं तर कसं ठेवायचं ते समजेल.
४. आता मोठ्या सुरीने तो आकार कापून घ्या, झाकण उघडलेला भोपळा असा दिसेल.
५. बिया खायला आवडत असतील तर त्या हाताने आधी काढून घ्या. नंतर आतून भोपळा स्वच्छ करा. आयस्क्रीम स्कूप/ डावेच्या मदतीने आतुन खरवडून काढा. आतला पृष्ठभाग जितका स्वच्छ करता येईल तेवढा करा. आत मेणबत्ती लावायाचेय, भोपळा ग्लो व्हायला हवा तर तो आतून नितळ करा. जास्त स्कूप करायचा आणखी एक फायदा म्हणजे जास्त जाड कोरत बसायला लागत नाही. ज्या बाजूला कार्व करणार आहात त्या बाजूने थोडा जास्त स्कूप करा. साधारण असा दिसेल.
६. आता ते स्टेनसिल भोपळ्यावर ठेवून एखाद्या अणुकुचीदार वस्तूने (बारीक स्क्रू-ड्रायवर, पिन) बाह्यारेषांची नक्षी भोपळ्यावर टिंब टिंब काढत उतरवून घ्या. तुम्ही कलाकार असला तर हातानेही काढू शकता. फक्त काय ठेवायचं आणि काय उडवायचंय याचं भान ठेवून चित्र काढा. तयार कार्विग केलेल्या भागाला स्ट्रेन्थ असली पाहिजे इतका तरी भाग जोडलेला असुद्या.
हे ट्रेस करताना कागद हलू देवू नका. हलणार असेल तर सरळ चिकटपट्टीने कागद चिकटवा आणि ट्रेस करा. ट्रेस करून झाल्यावर गोंधळ होत असेल तर पेनने परत एकदा रेषा ठळक काढून घ्या.
७. आता सावकाश जॉईन-द-डॉटस करत, कार्व करा. वरील चित्रातला काळा भाग काढायचाय आणि पांढरा ठेवायचाय.
८. कार्विंग बऱ्यापैकी सोपं आहे, ढोबळ आकार आले तरी चालेल. झालं. आता आतमध्ये एक छोटी मेणबत्ती लावा आणि ट्रिक-ओ-ट्रिटला लहान पोरांबरोबर कोस्चुम घालून दारोदार भटकून भरपूर chocolates आणा.
९. हा Jack-o'-lantern घराबाहेर ठेवतात. आपण केलेला सगळ्यांना कळायला नको का? फोटो काढून फेस्बुकावर, whatsappवर टाकून लोकांना वात आणा.
अंडी फोडणे, टॉयलेट रोलने
अंडी फोडणे, टॉयलेट रोलने फ्रंट यार्ड मधील झाड गुंडाळणे ( स्ट्रेंजर थिंग्ज) असं काही बाही वाचून/ अमेरिकन शोज बघून झालेलं ज्ञान आहे.
प्रत्यक्ष अनुभव, बाहेर दिवा लावला नसेल, भोपळे आणि इतर स्पूकी डेकोरेशन केलं नसेल तर हे क्यांडी देणार नाहीत त्यामुळे बेल न वाजवता पुढच्या घरात जाणे असा आहे.
यंदा लोकल फेबु गृपवर बेल वाजवून दार उघडेना कोणी तर टींनस् नी दाराला लाथ मारली आणि दाराला भेग पडली/ पोचा आला टाइप पोस्ट होती. लोकसत्ता असता तर सणाला गालबोट करून बातमी आली असती.
अच्छा. ज्ञानात भर
अच्छा. ज्ञानात भर घातल्याबद्दल धन्यवाद.
लोकसत्ता असता तर "शालेय विद्यार्थ्यांनी 'हे' केले" अशी क्लिकबेट टाकली असती.
Pages