Jack-o'-lantern - पमकीन कार्विंग

Submitted by अमितव on 31 October, 2014 - 10:25
pumkin carving

थँक्स गिविंग डेच्या सुमारास बाजारात मोठ्या मोठ्या भोपळ्यांच्या राशी दिसायला लागतात. (काही देशांतच थँक्सगिविंग वेळेवर करतात, बाकी आळशीपणा, पण असो :)). पाव किलो भोपळा आणण्याची सवय असलेल्या कुटुंबात वाढलं असल्यानं या भोपळयाचं करायचं काय असा सुरुवातीला प्रश्न पडायचा. पण लोकांनी वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे भोपळे घराच्यासमोर ठेवलेले दिसले आणि भोपळा आणून त्याची बेक्कार भाजी न करता इतरही उपयोग असू शकतात या ज्ञानाने पाश्च्यात्यांबद्दलचा आदर दुणावला.

या भोपळ्यावर स्पुकी चित्र कोरून (कार्व करून) त्यात बारकी मेणबत्ती लावून घराच्या बाहेर ठेवलं की भारी दिसतं हे लवकरच समजलं. गेल्यावर्षी पहिल्यांदा प्रयत्न केला आणि फार कठीण नाही हे जाणवल्यावर या वर्षी परत करून फोटो काढले.

साहित्य: भोपळा, कार्विंग टूल (बारीक करवती सारखं), आयस्क्रीम स्कूप/ मोठा चमचा/ डाव, मेणबत्ती, सुरी, कचऱ्याचा डबा.

१. एक मध्यम आकाराचा भोपळा आणा. बाहेरून भोपळ्याला बघून तो जाड आहे का पातळ (थिन) हे समजत असेल तर पातळवाला (वाली नाही) आणा. नारळ आणताना वाणी अंगठी मारतो तसं ४-५ भोपळ्यावर मारा. फरक काहीच कळणार नाही (वाण्याला तरी कुठे कळतो). मग एक न फुटलेला, जरा गोरा गोमटा दिसणारा, ओबडधोबड न दिसणारा असा भोपळा निवडा. भोपळ्याची रास जरी दुकानाच्याबाहेर पडलेली असेल तरी आता जाऊन पैसे द्यावे लागतात हे विसरू नका. आत सेल्फ चेकआउट असेल तर वरील सगळी स्पेसिफिकेशन विसरून ज्या भोपळ्यावर ४ आकडी नंबर दिसेल तो उचला.

IMG_20141030_204744.jpg

२. हॅलोविनच्या आदल्या दिवशी ऑफिसमध्ये 'पमकीन कार्विग स्टेनसिल' असा सर्च देऊन जे आवडेल/ सोपं वाटेल अशा स्टेस्न्सिलची प्रिंट घ्या. ती न विसरता घरी न्या.

IMG_20141030_210803.jpg

३. आता पेनने भोपळ्याचा देठाकडच्या भागावर एक वर्तुळ काढा. (कंपास शोधू नका) हाताने जसं जमेल तसं काढा.
या वर्तुळाला एका बाजूला एक notch काढा, जेणे करून ते देठ परत झाकण म्हणून ठेवलं तर कसं ठेवायचं ते समजेल.

IMG_20141030_204844.jpg

४. आता मोठ्या सुरीने तो आकार कापून घ्या, झाकण उघडलेला भोपळा असा दिसेल.
IMG_20141030_205321.jpg

५. बिया खायला आवडत असतील तर त्या हाताने आधी काढून घ्या. नंतर आतून भोपळा स्वच्छ करा. आयस्क्रीम स्कूप/ डावेच्या मदतीने आतुन खरवडून काढा. आतला पृष्ठभाग जितका स्वच्छ करता येईल तेवढा करा. आत मेणबत्ती लावायाचेय, भोपळा ग्लो व्हायला हवा तर तो आतून नितळ करा. जास्त स्कूप करायचा आणखी एक फायदा म्हणजे जास्त जाड कोरत बसायला लागत नाही. ज्या बाजूला कार्व करणार आहात त्या बाजूने थोडा जास्त स्कूप करा. साधारण असा दिसेल.

IMG_20141030_210617.jpgIMG_20141030_210625.jpg

६. आता ते स्टेनसिल भोपळ्यावर ठेवून एखाद्या अणुकुचीदार वस्तूने (बारीक स्क्रू-ड्रायवर, पिन) बाह्यारेषांची नक्षी भोपळ्यावर टिंब टिंब काढत उतरवून घ्या. तुम्ही कलाकार असला तर हातानेही काढू शकता. फक्त काय ठेवायचं आणि काय उडवायचंय याचं भान ठेवून चित्र काढा. तयार कार्विग केलेल्या भागाला स्ट्रेन्थ असली पाहिजे इतका तरी भाग जोडलेला असुद्या.
हे ट्रेस करताना कागद हलू देवू नका. हलणार असेल तर सरळ चिकटपट्टीने कागद चिकटवा आणि ट्रेस करा. ट्रेस करून झाल्यावर गोंधळ होत असेल तर पेनने परत एकदा रेषा ठळक काढून घ्या.
IMG_20141030_213503.jpg

७. आता सावकाश जॉईन-द-डॉटस करत, कार्व करा. वरील चित्रातला काळा भाग काढायचाय आणि पांढरा ठेवायचाय.

IMG_20141030_221116.jpgIMG_20141030_221245.jpg

८. कार्विंग बऱ्यापैकी सोपं आहे, ढोबळ आकार आले तरी चालेल. झालं. आता आतमध्ये एक छोटी मेणबत्ती लावा आणि ट्रिक-ओ-ट्रिटला लहान पोरांबरोबर कोस्चुम घालून दारोदार भटकून भरपूर chocolates आणा.

IMG_20141030_222044.jpgIMG_20141030_222149.jpg

९. हा Jack-o'-lantern घराबाहेर ठेवतात. आपण केलेला सगळ्यांना कळायला नको का? फोटो काढून फेस्बुकावर, whatsappवर टाकून लोकांना वात आणा.

IMG_20141030_222532.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष Happy
---------
रमड खतरनाक सुंदर.

रमड, मस्त आहे एकदम.
असा भोपळा ठेवला की, बिस साल बाद मधली डिंपल बाहेर यायची त्यातून.

भुते फार आवडतात, म्हणून हॅलोविन सण आवडतो. स्पूकी भुतांचे झकास सेलेब्रेशन. लेख आणि प्रतिसादातले Jack-o'-lantern खूप छान आहेत.

लेखातल्या सूचना Lol खास आहेत.

अस्मिता सामो rmd नवीन कोरलेले भोपळे ही मस्तच.
आपल्याकडं भारतात हॅलो विन भारी प्रमाणात साजरा होतो हल्ली. शाळेतली पोरं तसले टिपिकल कपडे गोळ्या वगैरे वाटून मजा करतात. पण कोरतात ते भोपळे नाही येत मार्केट ला विकायला. आले तर मी नक्की घेईन भोपळा कोरायला खुप मजा येईल. .

Lol म्हणूनच Badass झाले ते. असे व्रण, disproportionate, unalign असणे आजकाल badass असते म्हणे. कूल झाले ते..!

सर्वच भूत भोपळे भारीच एकदम.

भोपळा अमावस्येच्या शुभेच्छा (यावेळी अमावस्या आहेना या दिवशी) .

सामो, आजी नात फोटो मस्तच.

मस्त भोपळे.

ट्रिक ऑर ट्रीट थिस इज अस या मालिकेत पाहिलं होतं.

विल & ग्रेसमध्ये कॉस्च्युम्स प्रकार पाहिला. ते नाही करत का कोणी?

ट्रिक ऑर ट्रीट ला जाताना मुलं ड्रेसप करतात.
काल आमच्याकडे दोन एकशे मुलं तरी आली असतील. Happy चाकलेटं संपत आल्यावर ग्रनोला दिले तर टीन म्हणू लागली ग्रनोलाच दे.. ते पण संपू लागल्यावर परत जाऊन क्यांड्या आणाव्या लागल्या. पण मजा आली.
बारकी पोरं होतीच पण आता नेबरहुडचं वय वाढू लागलंय हे टीन चे जथे बघून जाणवत होतं. Happy

ह्या वर्षी हॅलोविन निमित्ताने अर्धबरीने नवीन उपक्रम केला.
घरात लहान मुलांची बरीच पुस्तके पडून होती. मुलांना कॅन्डीज् देण्याऐवजी पुस्तके देऊ असे ठरवले.

संध्याकाळी बालगोपाल चमुंचे आक्रमण सुरू झाले. पहिल्या जथ्याला तिने सांगितले मी कॅन्डीज् देणार नाही मात्र माझ्याकडे ही पुस्तके आहेत ही घ्या.

सुरवातीला मुले गोंधळली, काहींनी स्पष्ट सांगितले आम्हाला पुस्तके नको, काहींनी उत्साहाने पुस्तके निवडली. काही पालकांनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले. एका मुलाने पुस्तक घ्यायचे नाकारल्यावर त्याच्या पालकाने मुलाला एखादे पुस्तक घेण्याचा आग्रह केला परंतु त्याने ऐकले नाही. त्याच्या चेहऱ्यावर निराशा आणि राग असे संमिश्र भाव दिसून आले. Happy

एका जथ्यातील मुलांमध्ये मला हेच पुस्तक पाहिजे म्हणून चढाओढ झाली तेव्हा पुस्तक वाचून झाल्यावर एक्सचेंज करा असे सांगून समाधान करावे लागले. भीतीदायक पोशाख आणि मेकअप केलेल्या एका चिमुरडीने तुमची पुस्तके खूप "स्केरी" आहेत असे सांगितले तेव्हा हसू आवरेना.

एकंदरीत पुस्तके कारणी लागली आणि भूत-भोपळ्याचा "Diwali-Ween" दिवस पार पडला.

ह्या निमित्ताने माझी रिक्षा.
https://www.maayboli.com/node/82583

अर्धबरी Lol १ मिनिट लागला.
बाकी आयडीया झकास.
बारकी पोरं होतीच पण आता नेबरहुडचं वय वाढू लागलंय हे टीन चे जथे बघून जाणवत होतं>>>>>>>>> आमची टीन म्हटली आता आम्हाला कोणी कँडी देत नाय.. त्यापेक्षा ऑलिव्ह गार्डन मधे मैत्रिणींचा जथ्था जाऊन ऑल यु कॅन ईट का नेव्हर एंडीग पास्ता बोल स्पेशल्स खाऊन आले.
बाकी आम्ही काल नेबरहुडातली दिवाळी पार्टी म्हणून भारी साड्या, लेहंगा घालून मिरवत होतो बाकीची पोरं हे काय यांचे कॉश्चुम म्हणत असतील Lol

मस्तच कल्पना चामुंडराय...! पुढच्या वर्षी मी बघेन करून.‌

दोन्ही झाले की अंजली. Happy
आमच्याकडे आलेले टीन्स आधीच We are not too old to trick or treat म्हणतात. फक्त शरीराने मोठी असतात मनाने लहानच की. Happy

फक्त शरीराने मोठी असतात मनाने लहानच की. Happy>>>>>>>>>> खरंय
माझ्या पोरीने आधीच लहान्याला धमकी देऊन ठेवलेली तू जास्तीत जास्त बॅग भरून आणायची मग आपण वाटून घेऊ. Lol आणि ती ऑलिव्ह गार्डन मधून त्याच्यासाठी पास्ता आणि ब्रेडस्टिक्स घेऊन येणार अशी मांडवली झाली काल Wink

पुस्तकांची कल्पना चांगली आहे. पण कधी केलं तर कँडी 'आणि कोणाला हवी असतील तर' पुस्तकं असं करेन. हालोईनला कँडी मिळणार नाहीत काही माझ्याने सांगता यायचं नाही. आमच्याकडे पण चांगलीअर्धी काही तरी हेल्दी देऊ चे टुमणे दरवर्षी लावत असते, मी ते जमेल तोवर हाणुन पाडतो.
तो एक दिवस रँडमली कोणाचीही बेल वाजवून कँड्या जमवायचा हक्काचा असतो असं माझ्या मनात कोरलं गेलं आहे. मग त्या किती कँड्या खायच्या का डायबेटिस आणि डेंटल प्रॉब्लेम ओढवुन घ्यायचे हा त्यांचा आणि त्यांच्या पालकांचा प्रश्न. नेबरहुडातील मुलांना शहाणे करुन सोडावे असं काही वाटत नाही. Lol
झाली मोठी की होतीलच शहाणी.
काल एक ग्रुप एकदा कँड्या घेऊन परत दहा मिनिटांनी मागायला आला. आता मला काय कळत नाहीये का ते मला उल्लू बनवताहेत. पण उल्लू बनुन घेण्यात पण मजा असते. Proud

हो , आपणही ॲक्टिंग करायची की आपल्याला ओळखूच आले नाही. शो मस्ट गो ऑन. Wink आमचे संस्काराचे दुकान बंद पडलेय कधीच, चाललेच नाही. Lol मी हे असे दिवसभर खेळू शकते मुलांसोबत.

मी गोडाचा कंटाळा आलेल्यांना चिप्स आणि पॉपकॉर्नची पाकिटे सुद्धा आणावीत पुढच्या वर्षी असे ठरवलेय. त्या 'नर्ड' नावाच्या बारक्या रंगीत गोळ्या (नुसत्या आंबटचिंबट घाणेरड्या आहेत) लेकीने देताना व्हरायटी हवी म्हणून घ्यायला लावल्या त्या उरल्या आहेत. गुटख्यासारखेच पुडी फोडून टाकतात तोंडात, सुडोमि झाले. Lol

अरे... ती साखरेची आंबट पावडर असते ती ना! बरी असते. फक्त ती सांडवतात पोट्टे फार. यंदा चिप्स आणि पॉपकॉर्नची पाकिटं आली आहेत बरीच. मला रॉकेट ( लायनीपलिकडे स्मार्टीज म्हणतात मला वाटतं. आमच्याकडे स्मार्टीज म्हणजे एम अ‍ॅड एम सारख्या गोळ्या असतात) त्या पण आवडतात. आपल्या बारक्या एक्स्टॉस्टॉंग सारख्या असतात विदाऊट मिंट Lol आंबट-गोड असतात.
आणि कॉफी क्रिस्प्स आणि एरो. Wink

लायनीपलीकडून -- कळाले बरं. Proud आमच्याकडे मुबलक प्रमाणात नाही पण ग्रोसरीतील इंटरनॅशनल आयलमधे 'कॉफी क्रिस्प' मिळायला लागले आहेत. किती ते अप्रूप. Happy
पावडर आणली होती बहुतेक एकदा, मला बोरकूटची अमेरिकन बहिण वाटली. स्मार्टिज मस्त असतात आणि ॲडिक्टिव्हही, एकच खाऊन थांबणाऱ्याला 'नोबेल' द्यायला हवे. Happy

काल मी सात नंतर कॅन्डीजचे टोपले उचलून 'हवं तितकं न्या' म्हणून जवळजवळ रस्त्यावर नेऊन ठेवले होते, फडशा पडला. साडे आठला रिकामे झाले होते. या निमित्ताने शेजारीपाजारी रहाणाऱ्या मुलांना खाऊ देता येतो, एरवी शक्यतो कोणी कुणाकडे जात नाही.

मला एक जेनुईन शंका आहे. हा जो ट्रिक ऑर ट्रीट खेळ आहे, त्यात कुणी ट्रीट दिली नाही तर नक्की काय ट्रिक करतात?

Pages