बघवत नाही!

Submitted by मुग्धमानसी on 31 October, 2014 - 04:05

तुझे न बघणे बघवत नाही..
पाठ फिरवणे बघवत नाही...
मिटून घेते डोळे कारण
स्वत:च मिटणे बघवत नाही!

रेतीवरती नाव कुणाचे
लिहिता लिहिता थांबून जाते
किनार्‍यावरी लख्ख कोरडे
कुणीच मजला बघवत नाही!

झोप जराही नसोच नेत्री
विझवते तरी सर्व दिप मी
असे रात्रभर कोणाचेही
जळणे मजला बघवत नाही!

खिडकीतुन पसरून हात मी
ओंजळभर पाऊस झेलते
काय करू मी असे कुणाचे
’कोसळणे’ मज बघवत नाही!

भिंतीच्या भेगेतुन झरते
क्लांत बोचरे ओलेतेपण
मला शहार्‍यातून भेटणे
त्या दु:खाचे बघवत नाही!

उरते काही खोल बुडाशी
शब्दांना ते दावित नाही
उगीच भरल्या गळ्यात त्यांचे
हवेत विरणे बघवत नाही!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झोप जराही नसोच नेत्री
विझवते तरी सर्व दिप मी
असे रात्रभर कोणाचेही
जळणे मजला बघवत नाही!>>>>>>>> हे अफलातुन जमलय Happy

Lovely

अ प्र ति म
ही खरी मानसी स्टाईल Happy

बर्‍याच दिवसांनी Happy

परत परत वाचली.
१) स्वत:च मिटणे बघवत नाही!
२) किनार्‍यावरी लख्ख कोरडे >> आह! वाह ! सुंदर (मला लागला तसाच अर्थ असेल तर ही ओळ सगळ्यात अप्रतिम)
३)
झोप जराही नसोच नेत्री
विझवते तरी सर्व दिप मी
असे रात्रभर कोणाचेही
जळणे मजला बघवत नाही!
४)
उगीच भरल्या गळ्यात त्यांचे
हवेत विरणे बघवत नाही!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
सुंदर!!!!!!!!!!!

अ प्र ति म
ही खरी मानसी स्टाईल Happy

बर्‍याच दिवसांनी :)<<<< रियाशी प्रचंड सहमत !!

कविता ग्रेटच जमून आलीये

सुंदर........... अप्रतिम झाली आहे. खास तुमच्या स्टाईलने... अशाच लिहित रहा.

मस्त

काय करू मी असे कुणाचे
’कोसळणे’ मज बघवत नाही.. अप्रतिम...
पण...
किनार्‍यावरी लख्ख कोरडे
कुणीच मला बघवत नाही
कातिल... जियो मुग्धमानसी

घरंगळून जाऊ पहाणारया दवबिंदुला पर्णतळव्यात
धरू पाहणारी हळवी शब्दरचना...सुंदर.

<<<<<<<<<
तुझे न बघणे बघवत नाही..
पाठ फिरवणे बघवत नाही...
मिटून घेते डोळे कारण
स्वत:च मिटणे बघवत नाही!

>>>>>>
बर्याच तारा झन्कारुन गेल्या या ओळी.....

तुमच्या काव्यातून खुपकाही शिकायला मिळते...... तुमच्या सर्वच कविता आवडतात....अर्थातंच हीसुद्धा

झोप जराही नसोच नेत्री
विझवते तरी सर्व दिप मी
असे रात्रभर कोणाचेही
जळणे मजला बघवत नाही!

खिडकीतुन पसरून हात मी
ओंजळभर पाऊस झेलते
काय करू मी असे कुणाचे
’कोसळणे’ मज बघवत नाही!

खुपच छान..........

तुझे न बघणे बघवत नाही..
पाठ फिरवणे बघवत नाही...
मिटून घेते डोळे कारण
स्वत:च मिटणे बघवत नाही! >>>>
छानंच !