Submitted by मुग्धमानसी on 31 October, 2014 - 04:05
तुझे न बघणे बघवत नाही..
पाठ फिरवणे बघवत नाही...
मिटून घेते डोळे कारण
स्वत:च मिटणे बघवत नाही!
रेतीवरती नाव कुणाचे
लिहिता लिहिता थांबून जाते
किनार्यावरी लख्ख कोरडे
कुणीच मजला बघवत नाही!
झोप जराही नसोच नेत्री
विझवते तरी सर्व दिप मी
असे रात्रभर कोणाचेही
जळणे मजला बघवत नाही!
खिडकीतुन पसरून हात मी
ओंजळभर पाऊस झेलते
काय करू मी असे कुणाचे
’कोसळणे’ मज बघवत नाही!
भिंतीच्या भेगेतुन झरते
क्लांत बोचरे ओलेतेपण
मला शहार्यातून भेटणे
त्या दु:खाचे बघवत नाही!
उरते काही खोल बुडाशी
शब्दांना ते दावित नाही
उगीच भरल्या गळ्यात त्यांचे
हवेत विरणे बघवत नाही!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झोप जराही नसोच नेत्री विझवते
झोप जराही नसोच नेत्री
विझवते तरी सर्व दिप मी
असे रात्रभर कोणाचेही
जळणे मजला बघवत नाही!>>>>>>>> हे अफलातुन जमलय
Lovely
Lovely
Manasi mastachga.-apurva tai
Manasi mastachga.-apurva tai
धन्यवाद!
धन्यवाद!
आवडली!
आवडली!
छान जमलीये!!! मस्तच!
छान जमलीये!!! मस्तच!
वा वा, सुंदर लिहिलंय, खूप
वा वा, सुंदर लिहिलंय, खूप आवडली.
अ प्र ति म ही खरी मानसी
अ प्र ति म
ही खरी मानसी स्टाईल
बर्याच दिवसांनी
परत परत वाचली.
१) स्वत:च मिटणे बघवत नाही!
२) किनार्यावरी लख्ख कोरडे >> आह! वाह ! सुंदर (मला लागला तसाच अर्थ असेल तर ही ओळ सगळ्यात अप्रतिम)
३)
झोप जराही नसोच नेत्री
विझवते तरी सर्व दिप मी
असे रात्रभर कोणाचेही
जळणे मजला बघवत नाही!
४)
उगीच भरल्या गळ्यात त्यांचे
हवेत विरणे बघवत नाही!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
सुंदर!!!!!!!!!!!
अ प्र ति म ही खरी मानसी
अ प्र ति म
ही खरी मानसी स्टाईल
बर्याच दिवसांनी :)<<<< रियाशी प्रचंड सहमत !!
कविता ग्रेटच जमून आलीये
सुंदर........... अप्रतिम
सुंदर........... अप्रतिम झाली आहे. खास तुमच्या स्टाईलने... अशाच लिहित रहा.
सुंदर कविता !!!
सुंदर कविता !!!
मस्त.
मस्त.
सुपर्ब ....
सुपर्ब ....
खूप खूप धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद!
मस्त
मस्त
काय करू मी असे
काय करू मी असे कुणाचे
’कोसळणे’ मज बघवत नाही.. अप्रतिम...
पण...
किनार्यावरी लख्ख कोरडे
कुणीच मला बघवत नाही
कातिल... जियो मुग्धमानसी
सूंदर आणि अप्रतिम
सूंदर आणि अप्रतिम
घरंगळून जाऊ पहाणारया
घरंगळून जाऊ पहाणारया दवबिंदुला पर्णतळव्यात
धरू पाहणारी हळवी शब्दरचना...सुंदर.
छान आहे कविता.
छान आहे कविता.
धन्यवाद दाद, किरण कुमार,
धन्यवाद दाद, किरण कुमार, भुईकमळ, सतीश..
<<<<<<<<< तुझे न बघणे बघवत
<<<<<<<<<
तुझे न बघणे बघवत नाही..
पाठ फिरवणे बघवत नाही...
मिटून घेते डोळे कारण
स्वत:च मिटणे बघवत नाही!
>>>>>>
बर्याच तारा झन्कारुन गेल्या या ओळी.....
वाह क्या बात है...अगदी सुरेख
वाह क्या बात है...अगदी सुरेख
तुमच्या काव्यातून खुपकाही
तुमच्या काव्यातून खुपकाही शिकायला मिळते...... तुमच्या सर्वच कविता आवडतात....अर्थातंच हीसुद्धा
खिडकीतुन पसरून हात मी ओंजळभर
खिडकीतुन पसरून हात मी
ओंजळभर पाऊस झेलते
काय करू मी असे कुणाचे
’कोसळणे’ मज बघवत नाही!
>>>>>>>>>>>>>>
खुपच छान .
धन्यवाद!
धन्यवाद!
सुंदर
सुंदर
झोप जराही नसोच नेत्री विझवते
झोप जराही नसोच नेत्री
विझवते तरी सर्व दिप मी
असे रात्रभर कोणाचेही
जळणे मजला बघवत नाही!
खिडकीतुन पसरून हात मी
ओंजळभर पाऊस झेलते
काय करू मी असे कुणाचे
’कोसळणे’ मज बघवत नाही!
खुपच छान..........
तुझे न बघणे बघवत नाही.. पाठ
तुझे न बघणे बघवत नाही..
पाठ फिरवणे बघवत नाही...
मिटून घेते डोळे कारण
स्वत:च मिटणे बघवत नाही! >>>>
छानंच !
धन्यवाद!
धन्यवाद!