उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

Submitted by जीएस on 20 October, 2014 - 20:20

उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे.
आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते.

कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत. मी फक्त निकालाच्या आकड्यांचा आधार घेऊन, आकडे काय दाखवतात ते लिहिणार आहे.

उद्धव ठाकरेंची पहिली घोडचूक: युती तुटू देणे.

युती खरच कोणी तोडली हा वाद न संपणारा आहे. आकड्यांचा मुद्दा काय होता ते बघू.

(१) २००९ मध्ये शिवसेना १६० आणि भाजप ११९ अशा जागा लढवल्या होत्या. तेंव्हाही कमी जागा लढवून भाजपाने जास्त जागा जिंकल्या होत्या.

(२) २०१४ मध्ये मोदी या घटकाने भाजपाची तुलनात्मक ताकद भरपूर वाढली होती हे लोकसभा निकालांनी स्पष्ट झाले होते.

(३) या पार्श्वभूमीवर भाजपने आधी समसमान म्हण्जे १३५-१३५ जागा लढवू अशी मागणी केली होती. आणि नंतर शिवसेना १४० - भाजपा १३० याला सुद्धा तयारी दाखवली होती. शिवसेनेने ९ जागा इतर मित्रपक्षांना देऊन १५१ चा आकडा लावून धरला होता.

(४) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचेच होते, तेंव्हा भाजपापेक्षा जास्त जागा मिळवल्याच पाहिजेत हे त्यांना आवश्यक होतेच, त्यात काही गैर नाही पण शिवसेनेची आणि भाजपाची तुलनात्मक ताकद काय आणि त्या प्रमाणात न्याय्य जागावाटप होणे आवश्यक होते जे उद्धव ठाकरेंनी साफ धुडकावून लावले. ११९:१५१ प्रमाण न्याय्य होते की १३०:१४० न्याय्य होते हे आपण निकालाच्या विश्लेषणात बघूया.

(५) भाजपाला १२२ जागा मिळाल्या आणि शिवसेनेला ६३. शिवाय ३४ ठिकाणी भाजपा शिवसेनेच्या पुढे आणि दुसर्‍या स्थानावर आहे, तर ३५ ठिकाणी शिवसेना दुसर्‍या स्थानावर आणि भाजपाच्या पुढे आहे. म्हणजे भाजपा शिवसेना प्रमाण १५६:९८ आहे.

(६) भाजप तर यापेक्षा फारच कमी जागा मागत होता. त्या नाकारण्यामागे उद्धव ठाकरेंचा इगो होता की संजय राउतने केलेली दिशाभूल होती की काही डावपेच होते की वस्तुस्थितीचे भान नव्हते याचे उत्तर शिवसेनेच्या आतल्या गोटातीलच देऊ शकतील. पण त्या नाकारून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कसा धोंडा पाडून घेतला ते मात्र आता आपण पुन्हा आकड्यांद्वारे बघू शकतो.

जर भाजप शिवसेना युती १३०:१४० या प्रमाणात झाली असती तर काय झाले असते ?

(७) सध्या मिळालेल्या जागा. भाजप १२२, शिवसेना ६३.

(८) शिवसेना भाजप एकत्र असते आणि राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र असते तर दोघांना आता मिळालेल्या मतांची बेरीज करता शिवसेनेला २२ आणि भाजपाला १६ जागा अधिक मिळाल्या असत्या. म्हणजे भाजप १३८ आणि शिवसेना ८५.

(९) भाजपने २००९ मध्ये लढवलेल्या ५ जागांवर शिवसेनेला यंदा विजय मिळाला. जर युती असती तर या जागा भाजपाकडे असत्या. म्हणजे भाजप १३८+५=१४३ आणि शिवसेना ८५-५=८०.

(१०) शिवसेनेने २००९ मध्ये लढवलेल्या ३९ जागांवर भाजपला विजय मिळाला. जर युती असती तर या जागा शिवसेनेकडे असत्या. पण युती झाली असती तर शिवसेनेने १३०-११९ म्हणजे ११ जागा भाजपाला लढायला दिल्या असत्या त्यातील साधारण ७ जागांवर भाजप जिंकला असे धरले तर उरलेल्या ३९-७=३२ जागांवर शिवसेना निवडून आली असती. म्हणजे भाजप १४३-३२=१११ आणि शिवसेना ८०+३२=११२.

(११) यात एक दोन जागांची चूक होण्याची शक्यता गृहीत धरुनही हे पुरेसे स्पष्ट होते की १३०:१४० तत्वावर युती झाली असती तर शिवसेनाही भाजपएवढीच ताकदवान असती, युतीकडे मित्रपक्ष वगळूनही २२३ एवढे मोठे मताधिक्य असते आणि उद्धव ठाकरेंना हवे असलेले मुख्यमंत्रीपद मिळण्याचीही ५०% तरी शक्यता होती. शिवाय स्वबळावर न लढल्याने शिवसेनेची झाकली मूठ मोठ्या भावाची राहिली असती. जी आता १५६:९८ या प्रमाणामुळे किमान पुढच्या निवडणूकीपर्यंत तरी फारच लहान भावाची झाली आहे.

(१२) दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आकडे काय म्हणतात हे समजून न घेताच शिवसेना आणि त्यांचे समर्थक स्तंभलेखक अजूनही खंजीर, आम्ही मोठे भाऊ, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र यातच रममाण झाले आहेत. निवडणूक प्रचारातही दोन पक्षांच्या जागावाटपाच्या भांडणात नक्की चूक कुणाची ? शिवसेना नेत्याचा अपमान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अपमान !!! किंवा धाकल्या बाळराजांना 'काका, काका' म्हणत दुडूदुडु धावत जाऊन बसायला आज भाजपमध्ये अधिकृत मांडी शिल्लक राहिली नाही !!! हे महाराष्ट्रापुढच्या खर्‍या आव्हानांचा काहीही संबंध नसलेले पक्ष व व्यक्तीकेंद्रित मुद्दे उगाळले गेले तेंव्हाच उद्धव ठाकरे वास्तवपासून किती दूरच्या जगात वावरत आहेत याचे दर्शन घडले होते.

पुन्हा घोडचुकीकडे

(१३) शिवसेनेची निकालानंतरची वक्तव्ये व सामनामधील लेख पाहिले तर त्यांना अजूनही वस्तुस्थितीचे भान आले आहे असे दिसत नाही.

(१४) भाजपला बहुमतासाठी फक्त २२ जागा कमी पडत आहेत. त्यात १० अपक्षांनी आणि ४१ सदस्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.
( भाजपने हा पाठिंबा घेणे योग्य आहे असे माझे म्हणणे नाही. ज्यांच्याविरुद्ध लढले म्हणून लोकांनी साथ दिली त्यांच्याच पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे असला केजरीवालछाप अनैतिक संधीसाधूपणा भाजपने करू नये असे मला वाटते, पण तो या लेखाचा विषय नाही)

(१५) आता आम्ही आधी भाजपशी बोलणार नाही. उपमुख्यमंत्रीपद हवेच. विशिष्ट खाती हवीच वगैरे अडवणूक केल्यास आता अशी चूक शिवसेनेला पुढच्या पाच वर्षात मोठ्या खच्चीकरणाकडे नेऊ शकते याचे भान असलेल्या कुणीतरी उद्धवजींना जागे करून वस्तुस्थितीच्या जगात आणण्याची गरज आहे असे वाटते. हे जागे करण्याचे काम कुणी करेल काय ?

-जीएस

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< भाजप-एनसीपी यांची मिलीभगत लोकांसमोर आणणे यासाठीच ते चालढकल करत आहेत. >> अशी 'मिलीभगत' आहे याला सेना म्हणते याशिवाय कांहीं आधार नसावा. माझी तर ही एक सेनेने उडवलेली वावडी आहे अशीच भावना आहे.

तर आता भाजप आणी राष्ट्रवादीचे पप्पी दे, पप्पी दे सुरु झाले आहे. आता कोण आधी देत-घेत ते बघु. पवारान्ची लगीनघाई आणी खडसेन्ची, नवी नवरी/ मुलगी घुन्गटा आडुन कशी दिसते ( आता नव्याने फेशीयल करुन झाले असेल तर) ते पहाण्याची घाई सुरु झालेली दिसतेय.

मला वाटत होत की आता तरी भ्रष्ट्राचार्‍यान्चे दिवस भरतील, पण ते वेगळ्याचे अर्थाने भरण्याचे सन्केत दिसु लागलेत.

राष्ट्रवादीने प्रचंड मोठी खेळी पुढे केली आहे " मतदानाच्यावेळी ठरवणार आहे मतदान कुठे करायचे" असे म्हणुन आता भाजप आणि शिवसेनेच्या समोर प्रश्नचिन्ह उभा केले आहे. कालच्या उद्धवांच्या कार्या बघुन पवारांनी फासे टाकले आहे. उध्दवांना जर सरकार मधे सामिल व्हायचे होते तर काल शपथविधीवेळी नाटक करायला नको होते. आता राष्ट्रवादी जर पाठिंबा देणार असेल तर आम्ही देणार नाही बोलुन परत गोंधळात आहे हे दाखवुन दिले. राष्ट्रवादीने पाठिंबा दिला नाही तर सेना देणार. मग सेना देणार होती तर शपथविधित का सामिल झाली नाही.
काय करायचे कुठे करायचे काहीही समजत नाही अशी अवस्था सेनेची झालेली आहे. मुरंब्बी राजकारणी असलेला एकही माणुस सेनेकडे नसल्याने होणार्या राजकिय खेळ्या आणि केले जाणारे वक्तव्य यांचा ताळमेळ घालणे कठिन होउन बसलेले आहे. त्यातच विरोधी बाजुला शहा आणि पवार सारखे खेळाडु असल्याने "कोणता झेंडा घेउ हाती" सारखी अवघड परिस्थिती झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेवर असणारी पकड सुटु नये म्हणुन शिवसेनेची तगमग चालु आहे. आणि भाजपाला महाराष्ट्र नकोय तर मुंबई हवी कारण विदर्भाला वेगळा काढल्यावर तसेच मुंबई हातात आल्यावर उरलेल्या महाराष्ट्रावर राज्य करण्याची इच्छा भाजपात अजिबात नाही.

काय करायचे कुठे करायचे काहीही समजत नाही अशी अवस्था सेनेची झालेली आहे. मुरंब्बी राजकारणी असलेला एकही माणुस सेनेकडे नसल्याने होणार्या राजकिय खेळ्या आणि केले जाणारे वक्तव्य यांचा ताळमेळ घालणे कठिन होउन बसलेले आहे>>>>> अहो तुमचे बरोबर आहे, पण सेनेकडे मुरब्बी राजकारणी असुन उपयोग काय? पक्षप्रमुखाने जर मीच मोठा, मीच शहाणा, मीच काय तो बरोबर असा विचार केला असेल, आणी बाजूला सगळे जी जी र जी जी र करणारे आहेत, मग निर्णय बरोबर आहे का चूक हे कोण पडताळुन पहाणार?

आधीच्या ज्येष्ठ सेना नेत्याना बाजूला सारुन नवीन सेलेब्रिटीना ( ते केवळ टिव्हीवर फेमस आहेत म्हणून) मान दिला जात असेल तर काय होणार? मनोहर जोशी सरान्च्या चूका काय होत्या माहीत नाही. पण त्या एवढ्या मोठ्या होत्या का की त्यान्चे कुठलेच मत विचारात घेतले गेले नाही/ जात नाही. बरेच ज्येष्ठ नेते डावलले गेलेत.

भाजपावाले कमी नाहीत हे पण माहीत आहे, पण इतक्या वर्षात यान्चे डावपेच याना कळु नये याचे आश्चर्य आहे.

काल उद्धव ठाकरेंनी 'भाजपला' प्रश्न विचारले होते (भगवा आतंकवाद वगैरेवरून) तर आज लगेच पवार साहेब भाजपचा बचाव करायला पत्रकार परिषद घेतात. भाजपची गोची होवू नये म्हणून पवार पुढे येतात अजून काय पुरावा हवा आहे? हि भाजप एनसीपी यांची मिलीभगत आहे. भाजपने युती तोडली कि एनसीपी अर्ध्या तासात युती तोडते, पूर्ण निकाल यायच्या आत पवार भाजपला पाठींबा देतात, आता खडसे म्हणतात कुणाचाही पाठींबा चालेल अजून काय बाकी आहे.
बाकी विश्वासदर्शक ठराव मतदानाच्या दिवशी सरकार किती स्थिर हे कळेल अशी अजून एक गुगली पवारांनी टाकली आहे. आत्ता ते सरकार तरु देतील मात्र वर्ष सहा महिन्यांनी आपला रंग दाखवतील.

मुळात कोणी कितीही काहीही बोलू द्या, गोंधळलेले सारेच आहेत, त्यामुळे कोण काय बोलते त्यापेक्षा निर्णायक क्षणी कोण काय करते याला महत्व आहे.

अश्या क्षणी ज्याच्याकडे जास्त सीट आहेत म्हणजे भाजप त्यांना झोपा लागत नसतील, ते बेचैन असतील. तर दुसरीकडे शिवसेना तळमळत असेल.

राष्ट्रवादी या क्षणाला काही करू शकते ते फक्त काड्या. एकदा का सेना-भाजपा मांडवली झाली की त्यांची किंमत शून्य. वरून त्यांनी कितीही मजा बघितल्याचा आव आणला तरी आतून किंवा बाहेरून आपल्यालाही संधी आहे आणि ती सोडता कामा नये हे त्यांना ठाऊक आहे, म्हणून ते पण वळवळत आहेत.

शिवसेना किंवा उद्धव कधी चुकलेच नाहीत असे कुणीच म्हणणर नाहीत मात्र उद्धव ठाकरेंकडे सल्लागार नाहीत किंवा ते कुणाचे ऐकत नाहीत असे काही नाही. चांगले सल्लागार आहेत. सेनेचे ब्रेन समजले जाणारे सुभाष देसाई, दिवाकर रावते हे उद्धवचे सल्लागार आहेत. टीव्ही सेलिब्रेटी आदेश बांदेकर, अमोल कोल्हे हे सल्लागार नव्हेत त्यांना वेगळी जबाबदारी आहे. असे सेलिब्रेटी सगळीकडे असतात.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्या दिवशीच फडणवीसांचा एक टीव्ही इंटरव्ह्यु पाहिला होता. त्यात त्यांनी अगदी खात्रीपूर्वक राकॉ आम्हाला पाठिंबा देणार नाहीत, तर फक्त अ‍ॅब्स्टेन करतील (मतदानात भाग घेणार नाहीत) असं म्हटलं. म्हणजे बहुमताचा आकडा (२८८-४१)/ २ = १२४. भाजपचे स्वतःचे १२२ आमदार आहेत. मित्र पक्ष धरूनच त्यांना बहुमत मिळेलच. नाहीतर अपक्षांना वळवणे काही कठीण नाही.

अर्थात दरम्यान पवारांनी अनेकदा रंग बदललेत. शिवसनेची स्थिती बाद फेरीत प्रवेश मिळण्यासाठी अनेकदा दुसर्‍याच दोन संघांतल्या सामन्याच्या निकालाकडे डोळे लावून बसणार्‍या भारतीय क्रिकेट संघासारखी झाली आहे.

<< भाऊ ही मिलिभगत आहे हे शेंबडे पोरगेही सांगू शकेल.>> << भाबडे भाऊसाहेब!
>> पवारसाहेब मानलं तुम्हाला ! या एकाच नेमक्या वेळीं केलेल्या खेळीने तुम्ही भाजप व शिवसेनेचीच नाही तर इथं माझीही गोची करून टाकलीत !! Wink

सेनेने विरोधी पक्षनेतेपद मिळावे म्हणून पत्र लिहिले.

हो भाजपा सरकार ( एनसीपीचा आतून/ बाहेरून पाठींबा) १२२+ ४१ + इतर
विरोधात शिवसेना, कॉंग्रेस आणि इतर ६३+४२+ इतर अशी विधानसभा असणार आहे.
भाजपा अजून लाजत आहे पण पवार साहेबांनी रिश्ता कबूल केला आहे.

सेनेने आता ठाम रहावे आणि सजगपणे विरोधीपक्षाची भूमिका निभवावी. सरकारची कसोटी लागणार हे निश्चित कारण सेनेचा आक्रमकपणा आणि कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचा-मंत्र्यांचा अनुभव याचा सामना सरकारला करावा लागेल.

पाच जिल्हा परिषदांत भाजप-राकाँ कधीपासून जोड्याने गुण्यागोविंदाने नांदताहेत. आता लाजायचा अभिनय कशाला?

पुलोद च्या वेळेस वसंतदादांचे सरकार उलथवुन शरद पवार मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा दादांनी "माझ्या पाठीत खंजीर खुपसला" हे उद्गार काढले होते

एकंदरित सगळेच निर्लज्ज असं म्हणायला हरकत नाही! 'भ्रष्टवादी' पवारांशी भाजप हातमिळवणी करतंय..कालपर्यंत कम्युनल पार्टीशी युती करणार नाही म्हणणारे धर्मनिरपेक्ष काका आता भाजपला पाठिंबा देतायत.

शिवसेनेबद्दल तर काय बोलणार? बाळासाहेबांना कधी मुख्यमंत्री होण्याची स्वप्नं नव्हती पडली. उठांनी हे लक्षात घ्यायला हवं होतं की त्यांच्यापेक्षा त्या पदासाठी फडणविस योग्य आहेत. अगदी शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा तर त्यावेळी शिवसेनेत असलेल्या सुरेश प्रभुंचं नाव तरी घ्यायचं! उठा स्वतः तर निवडणुक पण लढवायला तयार नाहीत आणि म्हणे मुख्यमंत्री व्हायचंय. यावेळी आपली बाजू पडती आहे हे लक्षात घेऊन सीट्स शेअरिंग व मुख्यमंत्रीपद याबद्दल भाजपच्या अटी मान्य करायला हव्या होत्या. तरीही भाजपने युती तोडली असती तर भाजप एक्स्पोझ झाली असती.

दुसरं म्ह्णजे जो अनेकांनी मुद्दा मांडलाय शिवसेनेकडे मुद्देच नाहीयेत. आणि उठा व आठा सोडून मोठे नेतेच नाहीयेत. Demographics व generational changes लक्षात घेत नाहीयेत. Demographics म्हणजे परप्रांतियांचा सतत वाढत असलेला टक्का आणि परप्रांतिय अशाच पक्षाला मतं देणार जो मराठीचा पाणउतारा करेल. अमित शाहनी पदोपदी केलेला मराठीचा अपमान आणि वेगळा विदर्भ, वेगळी मुंबईला दिलेली हवा यांमुळे खुश होऊन परप्रांतियांनी एकगठ्ठा भाजपला मतं दिली यावेळी. २००९ पर्यंत अशीच एकगठ्ठा मतं काँग्रेसला मिळत होती कारण काँग्रेसची परप्रांतियधार्जिणी भूमिका घेतली होती. पण यंदा मराठा आरक्षणामुळे परप्रांतिय काँग्रेसवर भडकले कारण 'मराठा' कॅटेगरीतून आरक्षण मिळवणारे मराठी भाषिक असतील.

जनरेशन गॅप हा अजून एक मुद्दा. ज्या हक्काच्या मराठी मतदारांवर शिवसेनेची भिस्त असते त्यांची पुढची पिढी-१८-२० वर्षांचे नवमतदार मराठीच्या मुद्दयावर किती आयडेन्टिफाय करतात? ही बहुतांशी इंग्लिश मिडियममध्ये शिकलेली पिढी आहे. यांना स्वतःलाही मराठी नीट बोलता येत नाही. यांची भाषेशी भावनिक गुंतवणुक खूप कमी आहे. 'वेगळा विदर्भ' किंवा 'वेगळी मुंबई' याबद्दल 'होऊ दे किंवा न होऊ दे..मला काय पडली आहे?' अशी निर्विकार भावना आहे.. या पिढीला शिवसेना गृहित धरु शकत नाही आणि हे मतदार मोठया संख्येने आहेत.

काँग्रेसचे नेहमीचे यशस्वी मुद्दे-धर्म आणि जातीच्या नावाने भांडणे लावा- तेही यांच्यावर असर करत नाहीत. यांच्यावर सध्यातरी भाजपचा प्रभाव आहे. पण ही डेव्ह्लपमेन्ट वाली भाजप आहे, १९९२ ची भाजप नव्हे. धर्माचं राजकारण यांना पटत नाही कारण अमकं मंदिर झालं/न झालं, तीच 'मला काय करायचंय' भावना. आरक्षणाचंही राजकारण यांना पटत नाही कारण आज अनेक कोर्सेसच्या रिझर्व्ह व ओपन दोन्ही सीट्स रिकाम्या पडलेल्या असतात. सीट्स आहेत आता भरपूर पण शिकून पुढे काय हाच मोठा प्रश्न असतो. त्यासाठी जे डिटेल्ड रिसोर्स प्लॅनिंग (स्किल्स डेव्हलपमेन्ट) लागेल त्याबद्दल मोदी निदान बोलतात तरी. शहरांत वगैरे तरी जात हा फॅक्टर कमी झाल्यामुळे या पिढीला जातीद्वेष झेपत नाही कारण सगळ्या जातींचे फ्रेन्ड्स, रिलेटिव्हज असतात.
१९९६-९८ काळातही अशाच एका तेव्हाच्या तरुण पिढीमुळे अटलजींचं सरकार येऊ शकलं होतं. आताही तेच होतंय पण पिढी बदलली आहे.

बरोब्बर श्रीमान सत्यवादी. इतक्या वर्षांत त्यांच्या खंजीराला गंज चढलेला नाही. निवडणुकांआधी राज्यात राष्ट्रपती राजवट आणून चुणूक दाखवलीच आहे.

वेदीका, जाती-धर्माचा प्रभाव नाही असं नाही म्हणु शकत. मुजफ्फरनगर्,त्रिलोकपुरी,बावान या घटनांचा मागोवा घेतल्यास तुम्हाला आढळेल की मतांच्या धृवीकरणासाठी घडवुन आणलेल्या खेळी आहेत. सेनेला मात्र यावेळेस लोकांच्या भावना कशा चेतवायच्या हे कळलं नाही.

काहि का असेना, मान गये .... देर आये दुरुस्त आये Wink .....

राजकारण तुम्हा आम्हाला येवड्यात कळ्ळे अस्ते तर आपल्या बद्दल अशी नाही चर्चा झाली अस्ती. Wink खंजिराला धार कोण लावते आहे आणि कोणाच्या खंजीराची धार फळाला आली ते लवकरच कळेल आयदर २ दिवसांत नाहितर ६ महिणे २ दिवसांत Wink

आत्ता आकाशवाणीच्या बातम्यांत शिवसेनेचे आमदार शपथविधीला विरोधी पक्षांत बसल्याचे सांगितले.

मुद्द्यांप्रमाणे पाठिंबा ठरणार अशी पवारांची स्पष्टोक्ती. (स्पष्टोक्ती हा बातम्यांमधलाच शब्द आहे.)

होय ती बातमी दुपारीच आली होती. लेटेस्ट बर बेफिंनी लिहलयं.... विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावा Happy

पवाराम्ची स्पष्टोक्ती .... विग्रह / समास सोडवा अश्यासाठी मिलिअन डॉ प्रश्न होउ शकतो Wink

अधी नव्हे ते आज बातम्या फॉलो करतोय दर अर्ध्या तासाला अगदी पवारांच्या पत्रकार परिषदेसकट

जनरेशन गॅप हा अजून एक मुद्दा. ज्या हक्काच्या मराठी मतदारांवर शिवसेनेची भिस्त असते त्यांची पुढची पिढी-१८-२० वर्षांचे नवमतदार मराठीच्या मुद्दयावर किती आयडेन्टिफाय करतात? ही बहुतांशी इंग्लिश मिडियममध्ये शिकलेली पिढी आहे. यांना स्वतःलाही मराठी नीट बोलता येत नाही. यांची भाषेशी भावनिक गुंतवणुक खूप कमी आहे. 'वेगळा विदर्भ' किंवा 'वेगळी मुंबई' याबद्दल 'होऊ दे किंवा न होऊ दे..मला काय पडली आहे?' अशी निर्विकार भावना आहे.. या पिढीला शिवसेना गृहित धरु शकत नाही आणि हे मतदार मोठया संख्येने आहेत.
<<

मुंबईबाहेर महाराष्ट्र आहे.

मराठीदेखिल नीट न बोलता येणारी मुलं बहुसंख्य आहेत, पण ती इंग्रजी नाही, तर लोकल बोलीभाषा बोलणारी आहेत, अन त्यांना शिवसेनेचा टिळा आहे. महाराष्ट्रभर भाजपला तारून नेणारी हीच मुलं आहेत. शिस्तबद्ध स्वयंसेवक नव्हेत.

वेदिका,

पोस्ट आवडली. अ‍ॅनॅलिसीस चांगले आहे.

>>>महाराष्ट्रभर भाजपला तारून नेणारी हीच मुलं आहेत. शिस्तबद्ध स्वयंसेवक नव्हेत.<<<

हे एन्टायरली अ‍ॅग्री करण्यासारखे वाटले नाही. भाजपची स्वतःची काही मते व जागा आधीपासून आहेत. मोदी-प्रभावामुळे काँ-राकाँ वाली मतेही भाजपकडे वळलेली असतील.

मी वर म्हंटले ते येथे पुन्हा म्हणायचा प्रयत्न करतो.

१. शिवसेनेने 'मराठी माणूस' हा एकमेव मुद्दा असणे हे आता कालबाह्य होत आहे हे लक्षात घ्यायला हवे.

२. काळाची पावले ओळखून लवचिक धोरण आखायला हवे. यंदाच्या मोसमात काळ भाजपच्या बाजूने होता.

३. भूमिकेत दुटप्पीपणा नसावा. (भाऊसाहेबांनी वर लिहिले आहे तेच मीही म्हणतो. पवारसाहेबांचा पाठिंबा स्वीकारला तर आम्ही विरोधी पक्ष होणार ही भूमिला वेगळी आणि युती तुटल्यावर प्रचारात भाजपवर टीका करणे ही भूमिका वेगळी! आत्तासुद्धा पवारसाहेबांचा पाठिंबा असो वा नसो, आम्ही काय करणार हे उद्धव ठाकरेंनी नि:संदिग्धपणे नोंदवायला हवे होते असे वाटते).

वेदिका च्या पोस्ट शी सहमत.

बेफिकिर तुमचा तिसरा मुद्दा जास्त पटला. उठा नी योग्य निर्णय योग्य वेळी घ्यायला हवा. देसाईना दिल्लीवरुन बोलवण्यापेक्षा पाठवलेच नसते तर बरे झाले असते. शपथविधीला पण उशिरा आले , अत्ता पण जर तर ची भाषा.
एक निर्णय घेउन त्याचाशी ठाम राहिले पाहिजे.

पवारानी १९ तारखेला घेतलेल्या निर्णयावर आजपर्यन्त ठाम आहेत.

Pages