उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

Submitted by जीएस on 20 October, 2014 - 20:20

उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे.
आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते.

कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत. मी फक्त निकालाच्या आकड्यांचा आधार घेऊन, आकडे काय दाखवतात ते लिहिणार आहे.

उद्धव ठाकरेंची पहिली घोडचूक: युती तुटू देणे.

युती खरच कोणी तोडली हा वाद न संपणारा आहे. आकड्यांचा मुद्दा काय होता ते बघू.

(१) २००९ मध्ये शिवसेना १६० आणि भाजप ११९ अशा जागा लढवल्या होत्या. तेंव्हाही कमी जागा लढवून भाजपाने जास्त जागा जिंकल्या होत्या.

(२) २०१४ मध्ये मोदी या घटकाने भाजपाची तुलनात्मक ताकद भरपूर वाढली होती हे लोकसभा निकालांनी स्पष्ट झाले होते.

(३) या पार्श्वभूमीवर भाजपने आधी समसमान म्हण्जे १३५-१३५ जागा लढवू अशी मागणी केली होती. आणि नंतर शिवसेना १४० - भाजपा १३० याला सुद्धा तयारी दाखवली होती. शिवसेनेने ९ जागा इतर मित्रपक्षांना देऊन १५१ चा आकडा लावून धरला होता.

(४) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचेच होते, तेंव्हा भाजपापेक्षा जास्त जागा मिळवल्याच पाहिजेत हे त्यांना आवश्यक होतेच, त्यात काही गैर नाही पण शिवसेनेची आणि भाजपाची तुलनात्मक ताकद काय आणि त्या प्रमाणात न्याय्य जागावाटप होणे आवश्यक होते जे उद्धव ठाकरेंनी साफ धुडकावून लावले. ११९:१५१ प्रमाण न्याय्य होते की १३०:१४० न्याय्य होते हे आपण निकालाच्या विश्लेषणात बघूया.

(५) भाजपाला १२२ जागा मिळाल्या आणि शिवसेनेला ६३. शिवाय ३४ ठिकाणी भाजपा शिवसेनेच्या पुढे आणि दुसर्‍या स्थानावर आहे, तर ३५ ठिकाणी शिवसेना दुसर्‍या स्थानावर आणि भाजपाच्या पुढे आहे. म्हणजे भाजपा शिवसेना प्रमाण १५६:९८ आहे.

(६) भाजप तर यापेक्षा फारच कमी जागा मागत होता. त्या नाकारण्यामागे उद्धव ठाकरेंचा इगो होता की संजय राउतने केलेली दिशाभूल होती की काही डावपेच होते की वस्तुस्थितीचे भान नव्हते याचे उत्तर शिवसेनेच्या आतल्या गोटातीलच देऊ शकतील. पण त्या नाकारून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कसा धोंडा पाडून घेतला ते मात्र आता आपण पुन्हा आकड्यांद्वारे बघू शकतो.

जर भाजप शिवसेना युती १३०:१४० या प्रमाणात झाली असती तर काय झाले असते ?

(७) सध्या मिळालेल्या जागा. भाजप १२२, शिवसेना ६३.

(८) शिवसेना भाजप एकत्र असते आणि राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र असते तर दोघांना आता मिळालेल्या मतांची बेरीज करता शिवसेनेला २२ आणि भाजपाला १६ जागा अधिक मिळाल्या असत्या. म्हणजे भाजप १३८ आणि शिवसेना ८५.

(९) भाजपने २००९ मध्ये लढवलेल्या ५ जागांवर शिवसेनेला यंदा विजय मिळाला. जर युती असती तर या जागा भाजपाकडे असत्या. म्हणजे भाजप १३८+५=१४३ आणि शिवसेना ८५-५=८०.

(१०) शिवसेनेने २००९ मध्ये लढवलेल्या ३९ जागांवर भाजपला विजय मिळाला. जर युती असती तर या जागा शिवसेनेकडे असत्या. पण युती झाली असती तर शिवसेनेने १३०-११९ म्हणजे ११ जागा भाजपाला लढायला दिल्या असत्या त्यातील साधारण ७ जागांवर भाजप जिंकला असे धरले तर उरलेल्या ३९-७=३२ जागांवर शिवसेना निवडून आली असती. म्हणजे भाजप १४३-३२=१११ आणि शिवसेना ८०+३२=११२.

(११) यात एक दोन जागांची चूक होण्याची शक्यता गृहीत धरुनही हे पुरेसे स्पष्ट होते की १३०:१४० तत्वावर युती झाली असती तर शिवसेनाही भाजपएवढीच ताकदवान असती, युतीकडे मित्रपक्ष वगळूनही २२३ एवढे मोठे मताधिक्य असते आणि उद्धव ठाकरेंना हवे असलेले मुख्यमंत्रीपद मिळण्याचीही ५०% तरी शक्यता होती. शिवाय स्वबळावर न लढल्याने शिवसेनेची झाकली मूठ मोठ्या भावाची राहिली असती. जी आता १५६:९८ या प्रमाणामुळे किमान पुढच्या निवडणूकीपर्यंत तरी फारच लहान भावाची झाली आहे.

(१२) दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आकडे काय म्हणतात हे समजून न घेताच शिवसेना आणि त्यांचे समर्थक स्तंभलेखक अजूनही खंजीर, आम्ही मोठे भाऊ, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र यातच रममाण झाले आहेत. निवडणूक प्रचारातही दोन पक्षांच्या जागावाटपाच्या भांडणात नक्की चूक कुणाची ? शिवसेना नेत्याचा अपमान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अपमान !!! किंवा धाकल्या बाळराजांना 'काका, काका' म्हणत दुडूदुडु धावत जाऊन बसायला आज भाजपमध्ये अधिकृत मांडी शिल्लक राहिली नाही !!! हे महाराष्ट्रापुढच्या खर्‍या आव्हानांचा काहीही संबंध नसलेले पक्ष व व्यक्तीकेंद्रित मुद्दे उगाळले गेले तेंव्हाच उद्धव ठाकरे वास्तवपासून किती दूरच्या जगात वावरत आहेत याचे दर्शन घडले होते.

पुन्हा घोडचुकीकडे

(१३) शिवसेनेची निकालानंतरची वक्तव्ये व सामनामधील लेख पाहिले तर त्यांना अजूनही वस्तुस्थितीचे भान आले आहे असे दिसत नाही.

(१४) भाजपला बहुमतासाठी फक्त २२ जागा कमी पडत आहेत. त्यात १० अपक्षांनी आणि ४१ सदस्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.
( भाजपने हा पाठिंबा घेणे योग्य आहे असे माझे म्हणणे नाही. ज्यांच्याविरुद्ध लढले म्हणून लोकांनी साथ दिली त्यांच्याच पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे असला केजरीवालछाप अनैतिक संधीसाधूपणा भाजपने करू नये असे मला वाटते, पण तो या लेखाचा विषय नाही)

(१५) आता आम्ही आधी भाजपशी बोलणार नाही. उपमुख्यमंत्रीपद हवेच. विशिष्ट खाती हवीच वगैरे अडवणूक केल्यास आता अशी चूक शिवसेनेला पुढच्या पाच वर्षात मोठ्या खच्चीकरणाकडे नेऊ शकते याचे भान असलेल्या कुणीतरी उद्धवजींना जागे करून वस्तुस्थितीच्या जगात आणण्याची गरज आहे असे वाटते. हे जागे करण्याचे काम कुणी करेल काय ?

-जीएस

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवाजी मतदान हा काय प्रकार असतो? म्हणजे माहित आहे तसे पण त्याने संख्या कशी काय कळणार.....विशेषतः सद्ध्याच्या परिस्थितीत? (आणि कोणी काय आवाज केला हे पण? Proud )

जितका जोरात आवाज तितके समर्थन . आवाज कमी असेल तर समर्थन कमी. आता मतदान होईल यात समजुन येईल की अल्पमतातील सरकार आहे की बहुमताचीसरकार आहे.
राष्ट्रवादी परत तटस्थ राहिले तर अल्पमताची सरकार निर्माण होईल आणि जर राष्ट्रवादी ने मतदान सरकार तर्फे केले तर बाहेरुन पाठिंबा घेउन भाजपाचे बहुमताचे सरकार निर्माण होईल

बातम्या: शिवसेनेचे आमदार सगळ्यात जोरात विरोधात ओरडले. राकॉंचे गप बसले होते.
आवाजी मतदानाचा निकाल कधीही सरकार पक्षाच्या बाजूने आहे असेच घोषित केले जाते.

ते बहुमत मानले जात नाही
आता स्पिकर यांनी मतविभाजनाचा प्रस्ताव फेटाळला आहे म्हणुन मतदान होणार नाही आणि उन्हाळी अधिवेशनात परत सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल

मतविभाजनाची मागणी नामंजूर झालेली आहे.
म्हणजे विश्वासदर्शक ठराव संमत.
फडणवीसांचे अभिनंदन. For running away from vote of confidence and setting a new trend

उन्हाळी नाही, हिवाळी . नागपूरला. तेव्हा काही विधेयके मांडली तर मतदान होईल. पण राकॉ मुद्द्यांवर आधारित मतदान करणार.

नक्की आकडा गुलदस्त्यातच राहिला.

उन्हाळी नाही, हिवाळी . नागपूरला > सहा महिन्यांनी मयेकर त्या आधी अविश्वास ठराव मांडता येत नाही. कोणीही अजुन सरकारला समर्थनाचे पत्र दिलेले नाही आहे त्यामुळे भाजपाने अल्पमतातले सरकार स्थापन केले असे म्हणता येईल

एनसीपीशी एवढी सेटिंग करूनही वोटिंगला भाजपला का घाबरतेय? > भाई वो पवार को घाबरता है. अचानक वारा पलटा और विरुद्ध मे मतदान झाला तो ? गयी भैस पाणी में Biggrin

अरे मला कोणी सान्गेल का काय चाल्ले आहे ते.:अओ: शिवसेनेने नृत्याचे विवीध प्रकार सभागृहात सादर केले अशी आता बातमी आहे. बाबा काहीतरी बोलत होते, माठा काहीतरी सान्गत होते. काकानी काय उद्योग केले म्हणे?:अओ:

शिवसेनेने नृत्याचे विवीध प्रकार सभागृहात सादर केले > चुकिचे. खर तर अध्यक्षांनी काँग्रेसचे विखेपाटील विरोधीपक्षनेते म्हणुन जाहीर केलेले म्हणुन शिवसेनेने चुक लक्षात आणुन दाखवली ( त्यासाठी गोंधळ घालावा लागला ती गोष्ट वेगळी) मग चुक लक्षात आल्यावर अध्यक्षांनी शिवसेनेला विरोधीपद बहाल केले

एनसीपीशी एवढी सेटिंग करूनही वोटिंगला भाजपला का घाबरतेय? > भाई वो पवार को घाबरता है. अचानक वारा पलटा और विरुद्ध मे मतदान झाला तो ? गयी भैस पाणी में
+१

>>कोणीतरी मोठा आव आणुन खरमरीत पत्र लिहिणार होते.? काय झाले कळु शकेल का ?

खरमरीत पत्रे ही खरखरीत कागदावर लिहावी लागतात का ? Uhoh एक भा.नि. प्रश्न.

निवडणुकीला तयार रहा. : शरद पवार राकॉ कार्यकर्त्यांना.
स्थिर सरकार ही आमची जबाबदारी नाही.

Pawar also alleged that some elements in BJP were behind the rise of Majlis-e-Ittehadul Muslimeen (MIM) party which won two seats in the recent state Assembly polls.

Pages