दिवाळीची मेजवानी - २०१४

Submitted by दिनेश. on 20 October, 2014 - 08:47

परवा सईने आठवण काढली होती म्हणून.. साधेच पदार्थ आहेत. गोड मानून घ्या.

प्रसादाचे लाडू.. केळ्याचे लाडू

साधेसे सलाद

खास आफ्रिकन खाऊ, फ्राईड कसावा

ज्या बाळांचे मॅगीशिवाय चालतच नाही, त्यांच्यासाठी.. पण भाज्याही खाव्याच लागतील

ग्रील्ड पोटॅटोज

ग्रील्ड कॉलिफ्लॉवर ( पाककृती सौ. इब्लिस..... सौ. म्हणजे सौजन्य Happy )

अवलने बिरडे लिहिल्यावर करावेसे वाटले. पण आमच्याकडे वाल नाहीत. ब्लॅक बीन्स भिजवून, सोलून वापरलेत.

ब्लॅक बीन्स भिजवल्यावर असे दिसतात.

आणि सोलल्यावर असे दिसतात.

मॅगी नूडल्स विथ फ्राईड पाक चोई आणि पीनट सॉस

इमाम बेशुद्ध पडला.. हो याच नावाची तुर्कि डिश

इंजेरा.. इथिओपियन डोसा

अंगोलाची खास गोल भेंडी आणि बटाटा भाजी

चना कोफ्ता इन योगहर्ट सॉस

डबलबीन्सची भाजी

माखी दाल ( रेसिपी सौ. स्नू... सौ म्हणजे.... Happy ) आणि घरची रोटी

एका इजिप्शियन मित्राच्या बायकोने शिकवल्याप्रमाणे त्यांच्या पद्धतीची मसूर डाळ

नैरोबी स्पेशल... खिचू

पास्ता इन मश्रूम सॉस

मिरची का सालन

झुकिनी आणि कॉर्न स्टर फ्राय

झटपट ब्रोकोली ग्रातिन

मावेत केलेला नान आणि फ्लॉवर बटाटा भाजी

हे काय आहे ते मात्र ओळखायचे आहे. हा चायनीज ( बर्मीज, थाई, कंबोडीयन वगैरे वगैरे ) पदार्थ नाही.

ऋषीपंचमीची सात्विक भाजी

डाळ खिचडी, सांडगी मिरची, लसूण.. सोबत मॉरिशियसहून आणलेले हॉग प्ल्म्स चे लोणचे

प्रसादाची खीर

अवाकाडो मूस

माझे आवडते फळ.. कुमक्वॅट ( उच्चार बरोबर असावा ) हे फळ साल, बियांसकट खायचे असते.

आवडले ना ?

ही दिवाळी सर्व मायबोलीकरांना आनंदाची आणि सुखसमृद्धीची जाओ.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

(मी पैली मी पैली!!)
असो.... दिनेश मस्त मेजवानी! सध्या तरी ट्रीट टु आइज! दीपावली शुभेच्छा!

पाककृती सौ. इब्लिस..... सौ. म्हणजे सौजन्य>>:D

दिनेशजी हॅपी दिवाळी!

सर्व माबोकराना पण हॅपी दिवाळी!

काय हो दिनेशदा? हे उचलून खाता येत नाहीये म्हणून प्रचंड जळफळाट होतोय माझा.

ती कोबी किंवा बटाट्याच्या किसाची भाजी आहे का ती (ओळखा पाहू).

ओळखा पाहू : मला तर ते कोबी, कांदा,मटारचं क्रीस्पी कायतरी वाटतंय!

बाकी सगळेच प्रचि म्हणजे छ्ळवाद प्रकरण आहे दिनेशदा! Happy

वाह..किती सुरेख सजावट आणी पदार्थ... हॅट्स ऑफ तुला, दिनेश!!!

ओळखा पाहू ,कॅबेज श्रेड्स सारखे दिस्ताहेत.. कॅबेज्,मटर ची भाजी???

बटाटे श्रेड्स आणी मटर ची भाजी ही असू शकते.. हा दिनेश काय काय करेल त्याचा नेम न्हाईये Lol

साऊथ ईस्टर्न पदार्थ नसल्याची त्याने हिंट दिलीये, त्यावरून अंदाजपंची कर्तेय झालं!!!

दिनेशदा, मेजवानी काय मस्त जमलीये....तुम्ही मां की दाल करून बघितली देखील . सोबतची घरची रोटी पण फार छान खुसखुशीत दिसते आहे. कसली आहे??..ओळखा पाहू मध्ये अंजु म्हणते तसं मलाही कच्ची पपई वाटते आहे..

मस्तच दिवाळीची मेजवानी.
दिनेशदा, तुम्हाला दिवाळीच्या खूप सार्‍या शुभेच्छा.
ओळखा पाहूच उत्तर तुम्हीच द्या. Happy

दिनेश दा.. सगले पदार्थ सहीच आहेत , आणि त्याच्या या सगळ्या क्रोकरीची पण कमला, हे सगळे सेत तुमच्या असतील तर मला खाण्याबरोबरच किचनही पाहायला आवडेल ....
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!!

कुमक्वॅट ची चव कशी लागते?

तुमच्यासोबत रहाणार्‍या माणसाच्या वजनाने काटा दबून जात असेल अगदी.
हे असले फोटो पाहून एकाही डिशला नको/नाही/पुरे म्हणता येणार नाही Happy

Pages