Submitted by सख्या on 1 October, 2014 - 04:03
सध्या थोडेसे पैसे जमा आहेत अन कन्फ्युजनही वाढले आहे. पैश्याला पैसा जोडुन तो वाढावा ही किमान अपेक्षा. फ्लॅट आहे सध्याचा अन मी दुसरा घेणे म्हणजे परत रेंट ने देणे आले अन त्यात घर खराब होणार ते नको वाटते. कुठली गुंतवणुक चांगली आहे? पुण्यात कुठल्या एरियात?
जाणकार माहीती देतील ही अपे़षा. पैसे विदाउट रीक्स कुठेच नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुंतवणुकीचा ROI व्याज
गुंतवणुकीचा ROI व्याज दरापेक्षा जास्त असेल तर?>>>> तर मग कर्ज काढुन सगळेच गुंतवले असते ना त्यात. काम करायची काय गरज होती? आयकराचा विचार करुन देखिल मला नाही वाटत कि गुंत्वणुक परवडते.
'जी' नाही लावला तर उपकृत
'जी' नाही लावला तर उपकृत होईन.
माझ्या आजूबाजूला गुंतवणूक म्हणून घर घेणारेच जास्त दिसतात. मुंबईत विकल्या जात नसलेल्या, विकल्या गेलेल्या तरीही रिकाम्या घरांची संख्या लक्षणीय आहे. तरीही घरांच्या किमती खाली येत नाहीत.
Real estate bubble?
घरांच्या किंमती वाढल्या तरच नफ्याची शक्यता आहे. यावेळी घर घेणं फायदेशीर नसेल कदाचित, पण ज्यांनी किमान दहा-पंधरा वर्षांपूर्वी घरं घेतलीत त्यांना फायदा दिसतोय.
घर भाड्याने देऊन जी रक्कम मिळते त्याचं परसेन्टेज रिटर्न काढण्यातही अर्थ नसतो.
(याचा दुसरा अर्थ , भाड्याच्या घरात राहणे फायदेशीर?)
पनवेलजवळ दुसरे विमानतळ होण्याची कुणकुण लागायच्या आधीच राजकीय नेत्यांच्या हस्तकांनी तिथले प्लॉट्स विकत घेतले होते म्हणे.
निपा, मी राहतो तिथे गृहकर्ज
निपा, मी राहतो तिथे गृहकर्ज २.७०% मिळतंय. व्याजदर भारतात NRE खात्यात FD ला ६-६.५ मिळेल, आयकरमुक्त fully repatriable. सांगायचा मुद्दा इतकाच की शक्य आहे.
शक्य नाही. गृहकर्जाचे पैसे
शक्य नाही.
गृहकर्जाचे पैसे ब्यान्क तुम्हाला हातात क्याश ठेवत नाही.. घर घेअतलेत की चेक त्या विकणार्याला मिळतो.
अमितव, तुम्हाला दुसर्या
अमितव, तुम्हाला दुसर्या देशात घर घ्यायला गृहकर्ज मिळू शकतंं?
करन्सी फ्लक्च्युएशनचं रिस्क आहे.
व्याजदरात फरक तर FII इथल्या बाँड मार्केटमध्ये गुंतवताहेत.
मागे रुपया घसरत होता आणि टेम्परिंगच्या बातम्या होत्या तेव्हा बाँड्सचीही चांगलीच घसरगुंडी झाली होती.
अहो घर घ्या की मग. घराचे
अहो घर घ्या की मग. घराचे मिनिमम हफ्ते भरा. उरलेले पैसे पार्ट पेमेंट करता न वापरता गुंतवा.
भरत, त्याच देशांत घर घ्या असं म्हणतोय मी. पार्ट पेमेंट लगेच न करता, गुंतवून १-२ वर्षानी (किंवा जास्त ) करा. NRE उदाहरण म्हणून दिलेलं, त्याच देशांत ३-४% बऱ्यापैकी सेफ गुंतवणे शक्य आहे.
ज्या देशात व्याजाचे दर २.७ %
ज्या देशात व्याजाचे दर २.७ % आहे, तेथे घरांच्या वाढीचा बेसिक वेग (अॅवारेज) किती असतो?
सध्या इन्फ्लेशनच्या पुढेमागे.
सध्या इन्फ्लेशनच्या पुढेमागे. (२-३%). काही वर्षांपूर्वी १०% पर्यंत सुद्धा गेलेला (तेव्हा व्याजदर ५-६% असावेत). भारताच्या (५-१० वर्षांपूर्वीच्या) मानाने अत्यंत कमी. पण रहायला घर लागतेच ना.
शहराप्रमाणे बऱ्यापैकी बदलतो. मी राहतो ते त्यामानाने छोटे ठिकाण आहे.
अपडेट: ५% असावा. http://www.agentinottawa.com/1956_-_Present_Prices/page_491704.html
पण तिथे घराच्या किमती
पण तिथे घराच्या किमती उतरतातही. जे भारतात अजूनतरी शक्य दिसत नाही.
तरीही तुम्हाला दोन देशांतल्या दरांतल्या फरकाचा नाममात्र का हईना फायसा आहे.
मध्ये डीएलेफ कोसळला होता. क्वचित कोणी अॅनालिस्ट एक्स्पर्ट बोलतो याबद्दल.
इथे स्वतःचे घर का भाड्याचे हा
इथे स्वतःचे घर का भाड्याचे हा प्रश्न वाटतो तितका सरळ नाही. घराबरोबर मेंटेनन्सचे इतके खर्च (विमा, कर, पाणी, वीज, घर उबदार ठेवायला ऊर्जा, गवत कापणे, स्नो फेकणे इ. साठी यंत्र इ.) येतात, जे भाड्याच्या घरात रेंटिंग कंपनी करते. त्यामुळे कमीतकमी १० वर्षे राहणार असाल तर ना-नफा ना-तोटा परिस्थिती येते. जी भारतात खूपच लवकर येते.
थोडक्यात तिकडे होम लोन घेउन
थोडक्यात तिकडे होम लोन घेउन त्या पैशात इकडे घर घेणे किंवा गुंतवणुक करणे हाच हिशोब झाला जे शक्य नाहीय. पण तुम्हाला लाँग टर्म मयेकर म्हनतात तसा फायदा होउ शकतो . पण भारतात हे शक्य नाही
महागाई निर्देशंकाशी संलग्न
महागाई निर्देशंकाशी संलग्न असणारे बाँडस मार्केटमधे आले होते तो पर्याय एफडीला असू शकतो का?
दुसरे मला असे विचारायचे आहे की समजा २५ लाख गुंतवणुक करुन पुर्वी एक घर/फ्लॅट घेतला . त्याची आजची किंमत १ कोटी आहे. त्याचे मिळणारे घरभाडे २० हजार आहे तर परतावा हा २५ लाखावर धरायचा की १ कोटीवर? तेव्हाच्या २५ लाखाची किंमत आता १ कोटी झाली यात माझे काहीच कर्तुत्व नाही.
कॅपिटल गेन्स मोजताना कॉस्ट
कॅपिटल गेन्स मोजताना कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स वापरता येतो म्हणजे तुम्ही घर घेतलं तेव्हा इन्डेक्स ११० असेल आता १४१ झाला तर याप्रमाणाउपर तुम्हाला जो फायदा झाला तो कॅपिटल गेन. पण इन्डेक्सेशन न करताही मोजता येतो.
विथ इन्डेक्सेशन २० टक्के टॅक्स. विदाउट इट १०%.
गेल्या दोन वर्षांत काही सूक्ष्म बदल झाले असल्यास कल्पना नाही.
घरभाडे त्या त्या वर्षाच्या आयकर परताव्यात दाखवून त्यावर लागेल तो कर भरायचा असतो. तिथेही एक्झेप्म्शन्स आहेत.
एफ्डीपेक्षा म्युच्युअल
एफ्डीपेक्षा म्युच्युअल फंडांच्या योजना अधिक टॅक्स एफिशियन्ट असतात. शिवाय ओपन एन्ड योजना घेतली तर लि॑क्विडिटी (केव्हाही काढून घेण्याची सोय) आहे.
आताच्य बजेटमध्ये एफ एम पींना असणारा टॅक्स बेनेफिट काढून घेण्यात आला आहे. डिटेल्स आता आठवत नाहीत.
पण या केस मधे घर विकलेले
पण या केस मधे घर विकलेले नाही. घरभाडे हा गुंतवणूकीचा परतावा अशा अर्थाने पकडल्यास कुठल्या किंमतीवर तो पकडायचा. २५ लाख ते १ कोटी ही वाढ माझ्यासाठी व्हर्चुअल आहे.
जोपर्यंत पैसा तुमच्या खिशात
जोपर्यंत पैसा तुमच्या खिशात येत नाही/येऊ घतालेला नाही तोवर त्यावर टॅक्स लागत नाही.
व्हर्च्युअल वाढीवर टॅक्स भरायचाच असला तर व्हर्च्युअली भरा.
घरभाडे हा गुंतवणुकीचा परतावा नाही (जसे व्याज/लाभांश असतात)
तो पगार, फी यांसारखा उत्पन्नाचा एक वेगळा स्रोत आहे. त्याचे नियमही वेगळे आहेत.
आता बाहेर जातोय. परत आल्यावर सविस्तर लिहेन.
किंवा इथे मोहन की मीरा या चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांना बोलवून आणा.
Now fmp is taxable if
Now fmp is taxable if withdrawn before 3 years.
http://www.livemint.com/Money
http://www.livemint.com/Money/LMupv2cnZ7LrpHJ8jbJf4J/Is-it-the-end-for-f...
अमितव, मी सध्या आखाता मधे
अमितव,
मी सध्या आखाता मधे आहे. ईथे २% व्याजाने कर्ज मिळते. कर्ज लवकर फेडले (३ वर्षाआधी) तर साधारण ८००० रु जास्त द्यावे लागतात. मी पण हा विचार केला कि ईथे कर्ज घ्यावे आणि भारता मधे एफ. डी ,मधे टाकावे. आपल्या ईथे बँक्स ९% मिळकतकर मुक्त एफ.डी देतात.
पण एक एक्सेल फाईल बनवली आणि नीट विचार केला तर २२ लाखाचं कर्ज घेतलं आणि ते लगेच फेडलं तर फक्त महिन्याला ३ ते ४ हजाराचा फायदा होतो.
हो पण हेच जर भारता मधे गृह कर्ज घेतले असेल आणि ईथे कर्ज घेउन फेडले तर फायदा बराच आहे.
घर घेणे फायदाचे आहे. (
घर घेणे फायदाचे आहे.
( तुम्ही घर घेऊन कर्ज फेडा.
एफ डी ठेअवलेल्या लोकाना ब्यान्क त्यातुनच व्याज देईल.
वरची सगळी चर्चा वाचून असं
वरची सगळी चर्चा वाचून असं लक्षात येतं की स्वतःची बँक काढणं सगळ्यात जास्त फायदेशीर ठरेल.
Buy banking companies'
Buy banking companies' shares. That's one way to own one. Even during the so called downturn in Indian economy, private sector banks were doing well.
>>Buy banking companies'
>>Buy banking companies' shares. <<
हो हो घ्याच. फुगा फुटल्यावर (टॉक्झिक डेट्स) गवरमेंट बेलआउटची तरतुद असेलच...
सख्या, सध्या गुंतवणुकीचे
सख्या,
सध्या गुंतवणुकीचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्याकडे असलेली रक्कम, जोखीम पत्करण्याची तुमची तयारी, किती कालावधीसाठी तुम्ही गुंतवणूक ठेवणार आहात? व किती परताव्याची अपेक्षा आहे? यावर कोणता गुंतवणूक पर्याय निवडायचा हे अवलंबून आहे.
वैयक्तिक चर्चा केल्यास या व इतर प्रश्नांची उत्तरे मिळवून योग्य पर्याय निवडता येईल. संपर्क: ९८५०९३३६५४
स्वीप इन सेविंग अकाउंट
स्वीप इन सेविंग अकाउंट फायद्याचे असते का ?
मी प्रायव्हेट सेक्टर बँक्स
मी प्रायव्हेट सेक्टर बँक्स म्हटलंय. (त्यांच्यासाठीही बेल आउट पॅकेज येतं म्हणा कुठेकुठे) तसंही कोळसा खाणींचं वाटप रद्द झाल्याने बँकांचे फुगे थोडे खाली उतरलेत.
!
!
आय एफ सी आय १०००० रुपयाची
आय एफ सी आय १०००० रुपयाची गुंतवणूक करावी का
जेव्हा शॉर्ट टर्म म्हणजे ७
जेव्हा शॉर्ट टर्म म्हणजे ७ दिवस ते १ महिना अशी गुंतवणूक करायची असते त्यासाठी काय मार्ग उपलब्ध आहेत. ऑन लाईन करता येते का?
स्वीप इन अकाउंट मस्त आहे. एक
स्वीप इन अकाउंट मस्त आहे.
एक मिनिमम अमाउंट वगळता इतर रक्कम एका व्हर्चुअल एफ डी ला जाते. कधी पैसे काढले की एफ डी आपोआप ब्रेक होऊन सेविंगला जमा होते.
फा यनान्शल इअर झाले की ब्यान्केकडुन इंटरेस्ट सर्टिफिकेट मागायचे. व्याजाची एकूण अमाउंट समजते.
पण एफ डी येणे जाणे हे अखंड सुरुच असल्याने पासबुक भरून जाते. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो.
मस्त !
Pages