फ्लॅट, प्लॉट की एफडी ?

Submitted by सख्या on 1 October, 2014 - 04:03

सध्या थोडेसे पैसे जमा आहेत अन कन्फ्युजनही वाढले आहे. पैश्याला पैसा जोडुन तो वाढावा ही किमान अपेक्षा. फ्लॅट आहे सध्याचा अन मी दुसरा घेणे म्हणजे परत रेंट ने देणे आले अन त्यात घर खराब होणार ते नको वाटते. कुठली गुंतवणुक चांगली आहे? पुण्यात कुठल्या एरियात?
जाणकार माहीती देतील ही अपे़षा. पैसे विदाउट रीक्स कुठेच नाही.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक म्हणताहेत की सध्या म्युच्यल फंडात पैसा गुंतवणे चांगले.

तुम्ही कोणि फायनान्स कन्सल्टंट गाठा आणि त्याला विचारा. थोडे पैसे जातील पण चांगला सल्ला मिळेल.

सोन्याचे गेले १२-१५ वर्षातले भाव पाहिले तर पटींमध्ये वाढ झालीय अक्षर्शा..
पुढे पण होईल का असे यात मी जाणकार नाही,
पण सोने आता स्वस्त झालेय, दिवाळीनंतर आणखी स्वस्त होणार आहे बहुतेक .. तेव्हा गुंतवलेले चांगले.

पण सोने आता स्वस्त झालेय, दिवाळीनंतर आणखी स्वस्त होणार आहे बहुतेक .. तेव्हा गुंतवलेले चांगले.

आज १०० असेल तर दिवाळीनंतर ९० होणार असे अनुमान निघतेय वरच्या वाक्यातुन, मग तोटा नाही का होणार?? फायदा तेव्हाच होईल तेव्हा ते वर जाईल.

आज १०० असेल तर दिवाळीनंतर ९० होणार असे अनुमान निघतेय वरच्या वाक्यातुन, मग तोटा नाही का होणार??
>>>>>>>>
नाही हो, आता १०० ला घेण्यापेक्षा दोन महिने थांबून ९० झाल्यावर घ्यायचेय ते, विकायचे नाही, मग तोटा कसा? उलट जास्त सोने येईल ना? त्यानंतर जेव्हा काही वर्षांनी विकाल तेव्हा असेल तो भाव मिळेलच.

सोने घेतले तरी रीक्स आलीच ना सांभाळण्याची.
>>>>>
काही स्कीम आहेत ज्यात सोने सांभाळले जाते.
एवढेच नव्हे तर हल्ली ऑनलाईनही खरेदी करता येते, म्हणजे प्रत्यक्ष शोन्याशी आपला संबंध न येताही आपली गुंतवणूक सोन्यात होते. काही चुकत असेल तर जाणकारांनी प्रकाश मारावा.

प्लॉट घ्या.. थर्ड टायर सिटी मधे एन ए प्लॉट घ्या .

कोल्हापूर सांगली सोलापूर.. उरण , जळगाव , जालना अशा ठिकाणी तुमच्या बजेट नुसार शोधा

एफडीचे रीटर्न - जास्तीत जास्त - ९.५०% - टॅक्स नंतर ६ ते ६.५०% (पण सेफ)

प्लॉट - घेतल्यावर किमान ३-४ वर्षे ठेवायला हवा. अप्रीसीएशन गॅरंटी नाही..घेताना फसवाफसवीची शक्यता अधिक
रिस्की आहे पण जर योग्य ठिकाणी ड्यु डीलिजन्स करुन घेतला आणि वाट पाहण्याची तयारी असेल तर रीटर्न चांगले मिळु शकतील.

फ्लॅट- घेतल्यावर लाँग टर्म ठेवायला हवा. (त्यावरील प्रॉपर्टी टॅक्स, त्याचा मेंटेनन्स चार्ज दुरुस्ती इ. चा खर्च आणि त्यावर डीम्ड रेंट उत्पन्नात दाखवणे आले.)
फायदे:
रेंट मिळु शकेल, योग्य एरीयात असेल तर लाँग टर्म मधे वाढ संभव आणि जर लोनवर घेतला तर दिल्या गेलेल्या सपुर्ण व्याजावर वजावट मिळु शकते.

आपल्या बजेट, रिस्क अ‍ॅपेटाईट प्रमाणे निर्णय घ्या.. शुभेच्छा

>>घेताना फसवाफसवीची शक्यता अधिक
>>रिस्की आहे

प्लॉट घेताना योग्य खबरदारी घेतलई तर असा काही इस्श येत नाही .. जाहिराती वर न भाळता सर्व पेपर वकिलांना दाखवून , स्थानिक स्व संस्था मध्ये माहिती घेतली असता फसवा फसवी होत नाही..

नुसता बागूल बुवा आहे

एफडीचे रीटर्न - जास्तीत जास्त - ९.५०% - टॅक्स नंतर ६ ते ६.५०% (पण सेफ)>>>>> लि॑क्वीड फंड मधे टाका. ९% नक्की आणि सेफ रीटर्न. ३ वर्षापेक्षा जास्त ठेवले तर टॅक्स पण नाहीच ( जवळ्जवळ )

सामान्य, पापभिरु आणि गुंडगीरी करु न शकणार्‍या माणसांनी प्लॉट च्या नादी लागू नये.

mansmi18 यांना अनुमोदन.पुण्याजवळ (बहुतेक दानोली येथे) ३-४ वर्षांपूर्वी १.५ लाख प्रति गुंठा प्लॉट मिळत होता.२ महिन्यांपूर्वी ४-४.५ लाख प्रति गुंठा किंमत झाली आहे.प्लॉट घ्यायचा असेल तर तेथे जाणे -येणे पाहिजे.प्लॉटला फेन्सिंग घातले नसल्यास land encroachment/ झोपडपट्टीवाल्यांनी कब्जा घेणे इ.प्रकार असतात.
फ्लॅट घेणे कमी तापदायक.
सोने घेताना युनिट्स(Gold E.T.F) घेणे मस्त.सोन्याची वळी घेतल्यास परत विकताना buying-selling मधला फरक वजा करतात.
शेवटी एफडी.कमी फायदा पण सेफ.

Gold etf cha kahi fayda nahi. mi swath aata loss madhey kadhun takle. sone dead investment aahe etf pun tasech fakt sambhalnyachi risk nahi evdhech. best sip karat. flat ghetle tari 4-5% miltat shivay bhadekaru changla pahije etc katkati aahet.

mansmi18 आणि टोचा ला अनुमोदन!!

शेअर्स मध्ये जे लाँग टर्मसाठी गुंतवणूक करतात त्याचा फायदा असतो का?

सर्व्यांना धन्यवाद.
प्लॉटच्या बर्‍याच अ‍ॅडस सध्या बघ्तोय पेपर्समधे. पण विश्वासच बसत नाही मनस्मी म्हणल्याप्रमाणे. अपडेट देइन इथे, अजुन कन्फ्युजन आहेच पण पाहु. थेंक्स अगेन.

शेअर्स मध्ये जे लाँग टर्मसाठी गुंतवणूक करतात त्याचा फायदा असतो का?>>>>>
शेअर्स मधे गुंतवणुकीसाठी पेशन्सची खुप आवश्यकता असते. एखादा शेअर घेतल्यावर जर त्याच्या वर खाली जाणार्‍या किमतीबद्दल रोज विचार करत बसले तर झोप उडुन जाईल. पण जर लाँग टर्म व्यु असेल आणि चांगली सॉलिड कंपनी असेल (अर्निंग्स चांगले, ग्रोथ चांगला..प्रॉस्पेक्ट्स चांगले, वेल मॅनेज्ड असेल) तर असा शेअर लाँग टर्म मधे नक्कीच फायदा देतो. साधारणतः सामान्य गुंतवणुकदारात इतका पेशन्स नसतो त्यामुळे एखादा Diversidied Equity Mutual Fund is the best bet.

म्युच्युअल फंड म्हणजे काय प्रकार असतो हे माहीत आहे पण त्यात गुंतवणूक काय कशी कुठून करायची, किमान गुंतवणूक वगैरे, यावर कोणी जाणकार प्रकाश टाकेल का?

-------------------------------------------------------------------------------------
शाहिर | 1 October, 2014 - 20:09 नवीन
प्लॉट घ्या.. थर्ड टायर सिटी मधे एन ए प्लॉट घ्या .

कोल्हापूर सांगली सोलापूर.. उरण , जळगाव , जालना अशा ठिकाणी तुमच्या बजेट नुसार शोधा
-------------------------------------------------------------------------------------

शाहिर, तुम्ही कंच्या गावचे शाहिर? कोल्हापूर थर्ड टीअर??
प्रोफाईलमधे पुणे लिहीलेलं दिसतंय. पुण्यातच असाल, तर एकदा जाऊन पहा. आणि रेट पहा किती झालेत तिथे.

> > जाणकार
दादा... तुमच्या जवळजवळ प्रत्येक पोस्टीत हा शब्द आहे. आक्षेप नाही. फक्त जाणवलं इतकंच..

काही जाणकारांशी बोलून आणि स्वतः थोडंफार अभ्यासून माझं वैयक्तिक मत असं बनलं आहे, की इतक्या किमती वाढलेल्या असताना दुसरा फ्लॅट् न घेणं चांगलं असावं.. आपण भरणारे लोनचे हफ्ते आणि येणारं भाडं याचा मेळ बसणं अवघडच आहे. आणि रिसेलला तितक्या प्रमाणात किमती मिळतील असं आत्ता तरी वाटत नाही. प्लॉटबद्दल माहिती नाही.

(स्वतःच्या जबाबदारीवर ) शेअर्स घेतले तर बर्‍यापैकी फायदा मिळू शकतो. पण त्यासाठी अभ्यास लागतो. त्यासाठी इंडियाबूल्स्/शेअरखान अथवा बर्‍याच बँका डीमॅट खाते उघडू देतात. काळजी घेतली तर हा पर्याय नक्कीच चांगला. पण रिस्क १००% फक्त तुमची!

म्युच्युअल फंड हे शेअर्सपेक्षा कमी रिस्कचे म्हटले जातात. त्यासाठी एजन्सीच्या थ्रू आपण पैसे गुंतवू शकतो. मी २००६ते २००७ मधे थोडे पैसे गुंतवले होते. तीन वर्षांचे लॉकिंग होते. मी पाच वर्षांनी विकले तेव्हा तसा बरा फायदा झाला होता. पण तेव्हा मार्केट सतत चढे असायचे. आता मात्र तोच एजन्सीवाला 'जरा थांबा' म्हणतो आहे.

ऋयाम,
जाणकार म्हणजे संबंधित विषयाची माहिती असलेली व्यक्ती या आशयानेच वापरतो. हा धागा माहीती मागायचाच असल्याने वारंवार हा शब्द आला असावा. तसेच माझी पोस्ट वा माहिती लोकांनी प्रमाण मानू नये म्हणून मी जाणकार नाही हे एके ठिकाणी नमूद केले.

असो,
गुंतवणून नक्की कश्यात चांगली याचा अंदाजा नसल्याने माझीही बरीचशी गुंतवणूक अडलीय, म्हणून धाग्यावर लक्ष ठेऊन आहे. Happy

त्यासाठी एजन्सीच्या थ्रू आपण पैसे गुंतवू शकतो.
>>>>
ओके म्हणजे म्युचुअल फंडात गुंतवायला एजन्सीच गाठावी लागते, डि मॅट अकाऊंट नाही.
ऑनलाईन काही पर्याय नाही का? आणि सेफ?

जर तुमच्याकडे फ्लॅटच्या किंमतीची ८०% रक्कम असेल तर खुशाल फ्लॅट विकत घ्या नाहीतर म्युचल फंड मध्ये गुंतवा.

एजन्टशिवाय तुम्ही डायरेक्टली म्युच्युअल फंडची युनिट्स विकत घेऊ शकता. ते उलट स्वस्त पडतं.
पण एजंट ज्या सेवा देतो त्या मिळणार नाहीत. म्यु.फंं.च्या ऑफिसात जावे लागेल (यात फार काही अवघड , वेळखाऊ नाही)
ऑनलाइन आणि डीमॅट फॉर्ममध्येही युनिट्स विकत घेता येतात. एक्स्चेंज ट्रेडॅड फंड्स असतातच. पण बाकीचे, एक्स्चेंज ट्रेडेड युनिट्सही ऑनलाइन विकत घेता येतात. फिजिकल फॉर्ममधली युनिट्स (कागदी स्टेटमेंट ऑफ अकाउंट) डीमॅट करता येतात.

Watch your money program on cnbc awaz for beginners. Good program to watch. Go on sites like valueresearchonline.com etc you can get good returning mutual funds.

मला एक बेसिक शंका आहे. जाणकारांनी जरा समजुन द्यायला मदत करावी. ज्याच्या डोक्यावर कर्ज आहे भले गृह कर्ज / वाहन कर्ज / वैयक्तिक कर्ज तो जर असा गुंतवणुकिचा विचार करत असेल तर ते योग्य आहे का? म्हणजे हे लोन काढुन गुंतवणुक करण्यासारखे वाटत नाही का? अगदी आयकराचा विचार केला तरी, मिळणारा लाभ आणि भरले जाणारे व्याज याचा सुध्द्दा ताळमेळ नाही लागत.

गुंतवणुकीवर मिळणारा परतावा तुम्ही भरत असलेल्या व्याजापेक्षा जास्त असेल तर गुंतवणूक ठीक. अन्यथा पार्ट प्रिपेमेंट इज बेस्ट.(इक्विटी गुंतवणुकीत शक्य आहे, पण जोखीमही आहे. आणि तुमच्या डोक्यावर कर्ज आहे म्हणजे तुमची जोखीम घेण्याची शक्ती कमी.) पण तरीही अडचणीच्या वेळेसाठी म्हणून काही ठरावीक रक्कम बाजूला ठेवणे योग्यच असते.

गुंतवणुकीतून चक्रवाढ लाभ मिळतो. काही गुंतवणुकी आयकरमुक्त असू शकतात. गुंतवणुकीचा ROI व्याज दरापेक्षा जास्त असेल तर?

भरत, तो प्रश्न न्हवता. 'निपा'ना प्रतिसाद होता. तुमचा प्रतिसाद वाचण्यापूर्वी दिलेला. Happy

भरतजी, मला पण तेच वाटते पण, गुंतवणुक करणारे पण गृहकर्जाला लास्ट प्रेफरन्स देताना दिसतात. बर्‍याच वर्षापुर्वी मी एक बाफ चालु केला होता कि घर हि गुंतवणुक आहे का? सध्याच्या काळात तर तसे वाटत नाही. काही लोकांच्या बाबतीत तर ते एक बर्डन होउन गेले आहे.

Pages