तंदूरी गोभी

Submitted by इब्लिस on 26 September, 2014 - 12:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फ्लॉवरचा गड्डा सुमारे १/२ किलो

मॅरिनेटसाठी :

घट्ट दही २०० ग्राम
२ चमचे एव्हरेस्ट चिकन तंदूरी मसाला
२ चमचे आलंलसूण वाटण
चमचाभर लोणी किंवा तेल
मीठ
लिंबाचा रस.

क्रमवार पाककृती: 

खालील फोटोत दिसताहेत तशी कोबीची (हो आमच्याकडे फुलकोबी म्हणतात. जास्त कीस काढू नये.) सुमारे १ इंच साईजची फुलं खुडून/कापून स्वच्छ धुवून घ्यावीत.

मॅरिनेशनसाठीचे सगळे साहित्य एकत्र मिसळून त्यात फ्लॉवरचे तुकडे टाकावेत, व नीट मिसळून घ्यावेत. इच्छा असेल तर अर्धा तास झाकून ठेवावे.

मॅरिनेटेड कोबी

बेकिंग ट्रेवर अ‍ॅल्युमिनियम फॉइल टाकून तिला तेला/लोण्याचा हलका हात लावून त्यावर हे तुकडे ठेवावेत.

२०० डीग्री सेल्सिअसवर २ मिनिटे प्रिहीट केलेल्या ओव्हनमधे सुमारे ७-८ मिनिट सर्वात वरच्या कप्प्यात ठेवावे. (मला क्रिस्पि आवडते म्हणून) पैकी ४ मिन्टांनी फ्लॉवर उलटवणे अपेक्षित आहे.

कोबीच्या निबरपणानुसार कुकिंगटाईम कमीजास्त लागू शकतो. हे मासे वा चिकन नाही त्यामुळे काडी टोचून मऊ पडलंय का ते पाहू नये. काडी टोचली जाणार नाही.

बशीत काढून त्यावर लिंबू पिळून थोडा चाट मसाला भुरभुरावा. सोबत कांद्याचे काप घेऊन फोटो काढावा, व इथे झब्बू द्यावा.

घ्या तोंडी लावायला :
तंदूरी कोबी

मी गार्लिक ब्रेड घेतला होता सोबतीला.
गार्लिक ब्रेड

वाढणी/प्रमाण: 
आवडलं तर दोघांसाठी.
अधिक टिपा: 

१. मॅरिनेट तयार झाले की चाखून पहावे. आपल्याला आवडेल अशी चव आली की त्यात फ्लॉवरचे तुकडे घालावेत. जास्त वेळ मुरल्यावर चव वाढते का, ते उद्या सकाळी मला समजेल Wink
२. वरच्या कप्प्यात कोबी होत असताना खालच्या कप्प्यात गार्लिक ब्रेड तयार होतो.
३. फोटोत ब्रेड गोरा दिसत असला तरी तो होल व्हीट ब्राऊन ब्रेड आहे. त्याला बटर + लसूण पेस्ट + कोथिंबिर मिक्स लावून, फॉइलमधे गुंडाळून भाजून घेतले आहे.
४. "लागणारा वेळ" तंदूरी कोबीचा (गार्लिकब्रेडसह) फन्ना उडविण्यासाठी लागणार्‍या वेळेसकटचा आहे.

माहितीचा स्रोत: 
पाकिटावरील कृती. माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झब्बू स्वाती! इतपतच सजावट ठीक वाटते. उगीच नाहीतर एकाच ताटलीत दही, केचप, कढिपत्ता, सफरचंदे , गाजरे अशी भारंभार सजावट बघवत नाही अगदी !!

ती ब्रेड फॉईलवर ने ठवता एका ताटात ठेवली असती तर प्रेझेन्टेशन आणखी छान दिसले असते. गोबीचे काही तुरे जळल्यासारखे वाटतात ते थोडे बाजूला काढायचे असते. छायाचित्र थोडे आणखी उजळ हवे होते.

ह्या टिप्स. टिका नाहीत.

Pages