सुंदल

Submitted by नंदिनी on 25 September, 2014 - 05:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. काबुली चणे १ कप
२. ओले खोबरे (किसून) खवणलेले नकोय
३. मोहरी, हिंग, कड्।ईपत्ता, लाल मिरची
४. उडीद डाळ : २ चमचे
५. चणाडाळ २ चमचे.

क्रमवार पाककृती: 

तमिळ लोकांमध्ये नवरात्रीमधून घरामध्ये वेगवेगळ्या बाहुल्या मांडून त्यांची सजावट करतात. त्याला गोलू किंवा कोलू म्हणतात. तमिळी लोकामध्ये क आणि ग एकच असतो. आपला विनायक त्यांचा विनायगार होतो (शिवाय इथे पोचेपर्यंत तो कार्तीकेयाचा मोठा भाऊ पण होतो!! असो.)

तर या बाहुल्या बघायला आलेल्या लोकांना प्रसाद म्हणून हा सुंडल केला जातो. (तो सुंदल की ते सुंदल मला माहित नाही. कुनाला माहित असल्यास माहितीत वाढ करा.) करायला अत्यंत सोपा आणि झटपट पदार्थ आहे. कांदा लसूणसमसाला वगैरे नसल्यानं नैवेद्यासाठी देखील चालतो.

सुंडल इथं बर्याचदा स्ट्रीट फूड म्हणूनदेखील मिळतो. मरीना बीचवर निवांत बसून समुद्राच्या खार्‍य वार्‍याचा आनंद घेत पत्रावळीच्या द्रोणामधले सुंडल खाणे एकदम मस्त वाटतं. (तरी आम्ही करंटे लोक तिथं पावभाजी आणी पाणीपुरीच्या नावानं अश्रू सांडतोच) असो. आता मुख्य रेसिपी.

१. काबुली चणेअथवा छोले रात्रभर पाण्यात भिजवा.
२. दुसार्‍या दिवशी मीठ आणि पाच सहा कप पाणी घालून कूकरमध्ये शिजवा.
३. दोन चमचे उडीद डाळ, चणाडा़ळ आणि तीन चार मिरच्या तव्यावर नुसतं कोरडं परतून घ्या. हे मिक्सरमध्ये वाटून पावडर करून घ्या.
४. तेलाची चरचरीत मोहरी, उडीद, हिंग कढीपत्ता घालून फोडणी करा. नो हळद प्लीज. त्यामध्ये पाण्यातून काढलेले छोले घाला. छोले कोरडे होइपर्यंत झटपट परता. त्यात मिक्सरमध्ये केलेली पावडर घाला, खोबरं घाला. नीट मिक्स करा.

सुंड्ल तयार आहे!!!! वाटल्यास वर कोथिंबीर वगैरे घालायचे नखरे करा. पण तसं कराय्ची काहीही गरज नाही.

गरम असताना छान लागतंच, पण गार झाल्यावर पण सुंदर लागतं.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे.
अधिक टिपा: 

सुंडल कुठल्याही कडधान्याचे बनवता येतात. जस्त करून छोले, चणा आणि वाटाण्याचे सुंडल केले जातात. इच्छा असल्यास राजमा, शेंगदाने, चवळी वगैरेंचेही सुंदल करून पाहता येतील.

मुगाचे सुंदल करताना लाल मिरची पूर्णपणे वगळा. गूळ पाण्यात विरघळवून घ्या. त्याचा कच्चा पाक करून गाळून घ्या. फोडणी करून शिजवलेले मूग त्यात घाला, गुळाचा पाक घालून निट मिक्स करा. गोड सुंदल तयार आहे (हा आताच शेजाबाईनं आणून दिलाय. ऑस्सम लागतोय)

माहितीचा स्रोत: 
तमिळ मैत्रीणी.
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mani kozhukattai-Ammini kozhukattai (Kozhukattai sundal)(Steamed mini rice balls) हो तेच आहे. लिंक चालतेय.

गेल्या वर्षी मरीना बीचवर हा प्रकार खाल्ला होता. जामच बंडल होता चवीला. त्यामुळे फुली मारलेली यावर. पण परवा चेन्नईच्या प्रवासात एका बसमधे मिळाला, फिरता विक्रेता आला होता घेऊन, तो फारच चविष्ट होता. त्यात पुदिन्याची पाने पण घातलेली चवीला. आत्ता भिजत घातलेत छोले.

_/\_ Thanks to all,
I tried, today. very tasty; thodi dry zali,

from stock of chana(chana ukadlele pani) added the powder prepard for Sundal & served as soup. everybody liked, it Thanks for your recipe, Njoyed Sundal & soup too.
With Prayers,

Pages