काकडीचे गोड घारगे

Submitted by kamini8 on 22 September, 2014 - 14:00
kakadiche gharage
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी काकडीचा कीस (मोठी काकडी)
१ वाटी गुळ
१ चमचा तुप
तांदुळाचे पीठ
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

काकडीची साले काढुण बीया बाजुला काढा, ती किसुन घ्या. काकडीचा कीस हलक्या हाताने दाबुन घ्या. काकडीचे पाणी बाजुला काढा. कीसात गुळ विरघळवुन घ्या. त्यात चवीनुसार मीठ घाला. या मिश्रणात तांदुळाचे पीठ घट्ट गोळा होई पर्यत घाला. थोडे तुप लावुन पीठ मळुन घ्या. २ तास पीठ झाकुन ठेवले तर छान मऊ घारगे होतात. केळीच्या पानावर थोडे तुप लावुन पीठाचा एक लहान गोळा घेवुन गोल वडे तयार करुन तेलात तळुन घ्या.

वाढणी/प्रमाण: 
आवडीप्रमाणे
अधिक टिपा: 

काकडी कीसुन झाल्यावर उरलेले पाणी डाळ\ आमटी मघ्ये घालुन छान चव लागते.
साहीत्य प्रमाण कमीजास्त झाले तर पदार्थ बिघडत नाही.
यात वेलची \ जायफळ पावडर मी वापरत नाही.
सर्वपित्रअमावत्सेला आमच्याकडे काकडीचे घारगे आणि तांदुळची नाळराचे दुध घालुन केलेली खीर करतात.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे हे तिखट आणि भोपळ्याचे गोड घारगे करतात. भोपळ्याचे घारगे किंक्रांतीला हवेतच.

खुप छान... आम्ही पण लाल भोपळ्याचे गोड घारगे करतो...

काकडीचे,बेसन पीठ आणि तांदळाची पीठी सम प्रमाणात आणि बाकी आपल नेहमीचच तिखट मीठ कढी पत्ता तीळ ओवा हिंग घालुन वडे छान लागतात...