श्रीमद्‍ भगवद्‍ गीता कळली तेवढी

Submitted by हर्ट on 22 September, 2014 - 11:24

माझ्या हाती श्रीमद्‍ भगवद्‍ गीता आली तेंव्हा मला फक्त तिच्यावरील चित्रांचा आस्वाद घेता यावा इतकीच माझी मति होती. मी रोज कित्येकदा मुखपृष्ठावरील उधळणारे घोडे बघायचो. पाठपृष्ठावर एक वेगळेच चित्र आहे. एक जराजर्जर व्यक्ती आहे. तिच्या पाठोपाठ तिच्यापेक्षा कमी वृद्ध व्यक्ती आहे आणि सर्वात शेवती रांगणारे एक मुल आहे. हे चित्र पुर्ण गोलाकार होऊन फिरते आहे. काहीतरी खोल गुढ अर्थ ह्या चित्रात दडलेला आहे असे वाटते.

geeta 1.jpggeeta back cover.jpg

मंडळी ह्या धाग्यावर आपण गीतेसंबधी चर्चा करणार आहोत.कुणाला कदाचित काही श्लोक कळले नसेल त्याबद्दल आपण इथे लिहू शकता. कुणाला काही श्लोकाबद्दल मनात संभ्रम असेल त्याबद्दल तुम्ही इथे लिहू शकता. दोन आवृत्त्याबद्दल फरकाबद्दल तुम्ही इथे लिहू शकता. तुम्हाला गीतेबद्दल जे काही लिहावेसे बोलावेसे विचारावेसे वाटते त्याबद्दल इथे लिहू शकता.

एक विनंती - कृपया हा धागा विनोद, मस्करी, हा धागा इथेच का तिथेच का वगैरेसाठी वापरु नये. एखादी आयडी मुद्दाम डुआयडी बनून इथे वाईट लिहित असेल तर त्या आयडीचा अनुल्लेख करा. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।
सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥६- १३॥

याचा संक्षिप्त अर्थ असा की- भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की शरीर, मस्तक, स्थिर ठेवून नासिकाग्र दृष्टी ठेवून माझे ध्यान करा. इथे नासिकाग्र शब्दाचा अर्थ अनेक भाषांतरकारांनी चुकीचा लावला आहे असे वाटते. अनेकजण नासिकाग्र म्हणजे नाकाच्या शेंड्याकडे पाहावे असे सांगतात. वस्तुतः नासिकाग्र म्हणजे नाकाचा अग्र भाग- जेथून नासिकेचा उगम होतो म्हणजेच दोन भुवयांच्या मधली जागा. ध्यानयोगामध्ये दोन भुवयांच्या मधल्या जागेला अत्यंत महत्व आहे. तेथेच आपले आज्ञा चक्र देखील असते. इथेच शरीराच्या दोन नाड्या इडा आणि पिंगला एकत्र येतात. दोन भुवयांच्या मध्ये ध्यान लावल्याने आपले तृतीय नेत्र उघडते. बायबल मध्येही म्हणले आहे की 'when thine eye will be single thy will be full of light'. इथेही single eye म्हणजे तृतीय नेत्राचाच उल्लेख आहे जे दोन भुवयांच्या मध्ये असते.
उलट नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून काहीच साधत नाही. त्याने दृष्टीदोष होण्याचा संभव जास्त असतो.
परमहंस योगानंद यांनी त्यांच्या 'Autobiography of a Yogi' या पुस्तकात याचा उल्लेख आढळतो. (chapter 16- Outwitting the Stars).

बाकीच्यांनी आपले मत यावर जरूर मांडावे.

माझे सगळ्या बाबतीतले मत लिहून टाकतो. तुमच्यासारखे विद्वान त्यावर प्रतिसाद लिहून मला दाखवून द्याल की बरोबर काय नि चूक काय?

माझे पहिले गृहितक:

देव, धर्म याबद्दल जी मते आहेत ती ज्याच्या त्याच्या मनात असतात. पुष्कळलोकांच्या मनात तेच विचार असू शकतात. पण इतरांच्या मनात वेगळे येतील.

त्याप्रमाणे मी जे जे वाचले त्यावरून मला असे वाटते की जे जे देवाने सांगितले म्हणतात त्याचा अर्थ समजून घ्यावा, शब्दच्छल करू नये. त्या दृष्टीने माझ्या मते "चातुर्वर्ण्यं ....." या श्लोकाचा अर्थ एव्हढाच की समाजात चार प्रकारचे लोक असतात. बुद्धिवादी, लढाऊ, व्यापारी नि सेवा करणारे. त्या सर्वांची सर्व समाजांना गरज आहे, आणि ते सर्व सारखेच आहेत (कुणाच्या मते देवाचे मत वेगळे आहे. पण मला असे वाटते.) उगाच जाति, वर्ण, देव या शब्दांमधे अडकून बसण्यात अर्थ वाटत नाही मला. शिवाय असे नव्हे की सेवा करणार्‍यांनी शिकू नये, व्यापार करू नये किंवा बुद्धिवादींनी कधीहि सेवा करू नये वगैरे. ते सगळे आपल्या समाजात हजारो वर्षात कुणितरी पसरवले, म्हणून शूद्रांनी वेद वाचू नयेत वगैरे काहीतरी लोक मानू लागले. कदाचित कालमानाप्रमाणे त्यात बर्‍याच लोकांना त्यात तथ्य वाटले असेल, पण आता तसे मानण्याची गरज नाही, स्त्रियांनी खुश्शाल शिकावे,
शूद्रांनी वाट्टेल तेव्हढे शिकावे किंवा सैन्यात भाग घ्यावा, व्यापार करावा नि सेवा दुसर्‍यांकडून घ्यावी.

तसेच कर्मयोगाचा अर्थ मला माझ्या आध्यात्मिक गुरु ने सांगितले की फारसे समजत नसेल तर एव्हढे लक्षात ठेवा की जे काय करायचे असेल, ते अत्यंत नीट अभ्यास करून, व्यवस्थित, पूर्णपणे मन घालून जास्तीत जास्त चांगले करावे. फळ काय मिळेल ते सांगता येतच नाही. उदा. तुम्ही जरी खूप चांगले काम केले तरी त्याचे फळ म्हणजे नोकरीत पगारवाढ, जास्त पैसे वगैरे जे कुणि देणारे असतील त्यांच्यावर अवलंबून. धंदा असेल तर बहुतेक समाजात धंदा चांगला चालून पैसे मिळतील.

हे सुद्धा वाटते एव्हढे सोपे नाही - कारण समाजात नाना प्रकारच्या लोकांशी संबंध येणार. त्यातले काही अति वाईट, तुमचे विनाकारण शत्रूत्व असणारे असतात. त्यांच्याशी कसे वागायचे हे मला तरी कधीच कळले नाही. ते मग मी जो कुणि देव असेल नसेल तर त्याच्यावर सोडले.

यापैकी चातुर्वण्याचा अर्थ मला काय वाटतो तेव्हढेच सांगितले, त्याचा मा़ह्या जीवनावर काहीहि परिणाम होत नाही पण कर्मयोग मात्र करून बघण्याजोगा आहे.

बाकीच्या गोष्टींबद्दल मला अक्कल नाही नि त्यात काही गम्यहि नाही.

कूटस्थ . एकदम बरोबर. नासिकाग्र म्हणजे नाकाचा अग्र भाग- जेथून नासिकेचा उगम होतो म्हणजेच दोन भुवयांच्या मधली जागा.
झक्की तुमचंही म्हणणं बरोबर आहे .चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा उलटा अर्थ लावून पुरोहितांनी आपलं सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थान बळकट केलं . वेद आणि उपनिषदांमध्ये वर्णन केलेलं, सगळ्यांच्यात समान असलेलं आत्मतत्व सगळ्यांना समजलं तर आपल्याला कुणी कुत्र विचारणार नाही म्हणून खेळलेली खेळी आहे ती

अनेक बाहु, अनेक पाय, त्याच्या दातात योद्धे चिरडले जात आहेत, वगैरे वगैरे. >>>>
अतरंगी, ईश्वराला माणसासारखे २च डोळे , २ च हाथ , २ च पाय असावे . त्यापलीकडे त्याचं रूप असू नये असं तुम्हाला का वाटतंय ?
लाखो प्रकारचे अतरंगी जीव निर्माण करणाऱ्या ईश्वराचं रूप कसं असलं पाहिजे हे सामान्य माणूस ठरवणार का ?

बी,
>>आपल्या हातून जर कळत नकळत एखादे भयंकर मोठे पाप झाले असेल तर गीतेत अशा पापाचे परिमार्जन कसे करावे ह्याबद्दल उपदेश करणारा एखादा श्लोक सांगू शकाल का?>>>>>>>>
होय , आहे. श्रीकृष्ण म्हणतात , ( आता अध्याय वगैरे विचारू नका, extempore लिहितेय Happy )
'' सर्वधर्मान परित्यज्य मामैकं शरणं व्रज
अहं त्वां सर्वपापेषु मोक्षयिष्यामि मा शुच ''
अर्थात, सगळे धर्म सोडून मला शरण ये, मी तुला तुझ्या सर्व पापांमधून मुक्ती देईन.
म्हणजेच सगळ्या शंका, वितंडवाद सोड, माझा हो, पाप आणि त्याचे परिणाम शिल्लकच राहाणार नाही हा मला कळलेला अर्थ.
ज्ञानेश्वर जास्त शैलीदारपणे म्हणतात,'' तू पापाचा डोंगरू व्यामोहाचा सागरू किल्मिषाचे आगरु'' असे खूप काही जरी असलास तरी एकदा माझा झालास की हे सर्व भ्रम विरून जातील.

शरण येणे, किंवा देवाचा "होणे" म्हणजे नक्की काय करायचे?
मी शरण येतो म्हणायचे की झाले?
गीतेतच म्हंटले आहे की जोपर्यंत शरीर आहे, जीव आहे तोपर्यंत काही ना काही कर्म करणे आलेच. असे कुठले कर्म आहे ज्यात १०० टक्के खात्री आहे की पाप नाही? मग सतत फक्त देवाची भक्ति करत बसायचे? अर्जुन तसेच करायला निघाला तर त्याला सांगितले, युद्ध कर! व्यापार्‍यालासुद्धा व्यापारात फायदा केलाच पाहिजे, तो त्याचा धर्म. म्हणजे त्याच्या हातूनहि पाप होणार याची शक्यता.
मग हे कसे करायचे?
की माझ्यासारखे झाल्यावर, म्हणजे वृद्ध झाल्यावर, संसाराची काळजी मिटली की फक्त देवाचे नाव घेत बसायचे? नि काही कर्म करणे हे मा़झे कर्तव्य असेल नि मी आपला देवाचे नावच घेत बसलो तर तेहि पापच ना?

तर हे असे आहे. उगाच शब्दशः अर्थ घेत बसले तर मजसारख्या अतिमर्यादित बुद्धीच्या माणसाचा गोंधळच होतो.
हेहि मला बहुतेक सर्व आयुष्य संपायला आले तेंव्हा कळले.

आता इथे काही सज्जन चर्चा करतात, त्यातून काही ज्ञान मिळते, पण मला अजून खूप जास्त वेळ लागेल सगळे समजायला. तोपर्यंत काय?
तर आता यापुढे जे कर्म समोर करणे आहे ते नीट, विचार करून, अभ्यास करून, मन लावून, माहित असलेली पापे टाळून जास्तीत जास्त चांगले करणे. दररोज रात्री झोपताना देवाची प्रार्थना करून म्हणावे, जे केले ते तुला अर्पण, मला जे फळ मिळेल, न मिळेल त्याबद्दल माझी तक्रार नाही. उगाच अध्यात्म वगैरेच्या भानगडीत पडू नये.

गेल्या काही पिढ्या आपल्या सर्वांची बुद्धि मुख्यतः पाश्चिमात्यांच्या अंमलामुळे पाश्चिमात्य शास्त्रांच्या मूलभूत सिद्धांतावर आधारित झाली आहे. जसे क्वांटम मेकॅनिक्स, ब्रेन सर्जरी, रॉकेट सायन्स या सारखे विषय समजायला पदार्थविज्ञान, गणित, वैद्यकीय ज्ञान बर्‍यापैकी उच्च स्तरावर असावे लागते तसे वेद, उपनिषदे समजण्याचे मूलभूत सिद्धांत काय? जर पाश्चिमात्य सिद्धांतावरून ते समजत नसतील तर ते सिद्धांत वेदांना लावावेत का?

तर जरी आपल्याला वैद्यकीय ज्ञान नसले तरी आपण अ‍ॅलोपथी, होमीओपथि, आयुर्वेदी डॉक्टरवर काही प्रमाणात विश्वास ठेवतोच ना? तसा विश्वास वेद, देव यांच्यावर ठेवावा का? कितपत? हे शेवटी ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या मर्यादेवर अवलंबून.

इथे ११व्या अध्यायावर बर्याच शंका आलेल्या आहेत. माझ्या अल्पमतीला जेवढे कळले तेवढे सांगण्याचा प्रयत्न करतो.
११ वा अध्याय हा विश्वरूपदर्शन दर्शवतो. म्हणजेच निर्गुण, निराकार परब्रह्माचे सगुण आणि साकार रूप (manifestation). हे अमर्याद आणि अफाट विश्व देखील याच manifestation चा भाग आहे. उत्पत्ती, स्थिती, आणि लय हे त्याचे प्रकृती गुण आहेत. पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा या प्रकृती गुणांनी बांधला गेला आहे. परंतु ज्याअर्थी सर्व विश्वाची निर्मिती परब्रह्म परमात्म्यातून झालेली आहे त्याअर्थी प्रत्येक जिवामध्ये त्याचा अंश आहेच. आता अर्जुनाच्या विश्वरूपदर्शनाकडे वळूया. अर्जुनाला झालेले विश्वरूपदर्शन हे एखाद्याला समाधी अवस्थेत झालेल्या साक्षात्कारासार्खेच आहे. अश्या साक्षात्कारी पुरुषांना प्रत्येक जिवामध्ये परब्रह्माचे रूप दिसते. याच अर्थांने विश्वरूपदर्शनात पाहिलेले हजारो मुख, हजारो भुजा हे ह्या विश्वातल्या असंख्य मानवांचे परमात्याने दाखवलेले एकत्रित दृश्य रूप. कारण प्रत्येक जिवामध्ये त्याचा असलेला अंश.

अगदी त्याचप्रमाणे << त्याच्या दातात योद्धे चिरडले जात आहेत>> याचा अर्थ उत्पत्ती, स्थिती, आणि लय यापैकी 'लय' या प्रकृती गुणाचे प्रकटीकरण. अर्जुनाने पाहिलेले ते दृश्य म्हणजे रणांगणावर वीरमरण आलेले योध्ये व त्यांचा झालेला लय.

खूप सुंदर प्रश्न आणि त्यावरची उत्तरेही छान! मलाही शरण जाणे म्हणजे नक्की काय हे कळत नाही. त्यात देवाच्या शरण जाणे तर अजिबात नाही कळत. माणसाच्या शरण जाणे हे तरी कळते पण देवाच्या तर देवा शपथ कळत नाही Happy

धन्यवाद.

मायबोलीवर खुप पूर्वी श्रीयुत मुकुंद कर्णिक यांनी साध्या सरळ मराठीत “‘श्रीमद्भगवद्गीता’!” या नावाने भगवदगीतेचे अगदी रसाळ मराठीत भाषांतर केले होते. त्यांच्या 'लेखन' पानावर त्याचे सगळे भाग उपलब्ध आहेत. http://www.maayboli.com/user/10357/created

झक्की,

>> असे कुठले कर्म आहे ज्यात १०० टक्के खात्री आहे की पाप नाही? मग सतत फक्त देवाची भक्ति करत बसायचे?
>> अर्जुन तसेच करायला निघाला तर त्याला सांगितले, युद्ध कर! व्यापार्‍यालासुद्धा व्यापारात फायदा केलाच पाहिजे,
>> तो त्याचा धर्म. म्हणजे त्याच्या हातूनहि पाप होणार याची शक्यता.
>> मग हे कसे करायचे?

यासाठी संत नामदेवांनी उपाय सांगितला आहे. तो म्हणजे पाप आणि पुण्याचा हिशेब न करता सर्व कामं करायची. हे साध्य कसं व्हावं? तर त्यासाठी मनात अखंड नामजप चालू ठेवायचा असतो. आपल्या कुलदैवताचा जप सतत करावा. आपली दैनंदिन कामं करत असतांना नामजप सलग ठेवण्याचा हळूहळू सराव होतो. नंतर तो झोपेतही होऊ लागतो.

यातूनच पुढे आपली कामं मी करत नसून कोणतरी करवून घेतोय असं वाटायला लागतं. ती शरणागतीची सुरुवात आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

मलाही एक प्रश्न आहे ... एखाद्याने चूक केली असेल जाणते अजाणतेपणी व त्याने/तीने माफी मागितली असो वा नसो तर क्षमा करणे, माफ करणे ह्यावर गीतेत काय सांगितलं आहे?

जीव आहे तोपर्यंत काही ना काही कर्म करणे आलेच. असे कुठले कर्म आहे ज्यात १०० टक्के खात्री आहे की पाप नाही >>>
देवाने माणसाला बुद्धी दिली आहे . तेव्हा आपण करतोय ते पाप आहे कि पुण्य हे common sense न सुधा समजू शकतं .

मग सतत फक्त देवाची भक्ति करत बसायचे? अर्जुन तसेच करायला निघाला तर त्याला सांगितले, युद्ध कर! >>>
अर्जुन देवाची भक्ति करायला निघायला नवता, तर त्याचं क्षात्रकर्म सोडून पळपुटेपणा करायला निघाला होता

व्यापार्‍यालासुद्धा व्यापारात फायदा केलाच पाहिजे, तो त्याचा धर्म. म्हणजे त्याच्या हातूनहि पाप होणार याची शक्यता.>>>
क्षत्रियाचा धर्म मारणे हा आहे. ह्याचा अर्थ त्यांनी उठ सुठ कोणाचीही हत्या करण असा नव्हे . दुष्टांचा संहार करून सुष्टांच रक्षण करण्यासाठीच क्षत्रिय धर्म आहे . तसाच व्यापार्याचा सुधा धर्म .

परवाच नरसिंह वाडीला गेले होते . भक्त निवास मध्ये राहिले होते. चुकून दुसर्याच मुलीची चप्पल मी घातली . लक्षात आल्यावर काढून तिची तिला दिलि. अगदी ५ मिनिटे सुधा ती चप्पल माझ्या पायात नवती . पण ती मुलगी मला काय काय बोलली . काय कोत्या मनाची , स्वार्थी माणसं असतात.
अशी वासनेनं लडबडलेली माणसं देवदर्शन करून शरण जाण्याचं नाटक करतात .
देवाला शरण जायचं ह्याचा अर्थ उठ सुठ देवाला नमस्कार करायचे . दिवसरात्र पूजा करत राहायची आणि मी तुला शरण आलोय असं सांगणं नव्हे . आपण न सांगताही ते त्याला कळतं . योग्य ती कर्म करण, जेवढं होईल तेवढं सत्य , करुणेनं वागणं , नामस्मरण करत राहणं इत्यादि .
समोर एखादी चुकीची , अन्यायकारक गोष्ट असतानाही आणि ती थांबवण्याची आपली कुवत असतानाही दुर्लक्ष करण हि सुधा पाप कर्माच आहेत .

छान पोस्ट सारिका.

झक्कीकाकांचे प्रतिसाद पण वाचनीय

सारिका३३३,
धन्यवाद. बरेच मार्गदर्शन झाले.
तेव्हा आपण करतोय ते पाप आहे कि पुण्य हे common sense न सुधा समजू शकतं .
बरोबर आहे. म्हणूनच मी म्हंटले "माहित असलेली पापे टाळून" कर्म करावे.
आ.न. गा. पै.
तसे करून बघायला हरकत नाही. करावे म्हणतो. सोपे आहे.

काउ
पुढच्या वेळेस नक्कि. नरसिंह वाडीला जायची ओढ नेहमीच असते .
मेनका१
आपल्याला प्रतिसादाचा अर्थ समजला नसेल तर गप्प बसावं . उगीच कशाला स्वतःचं हसं करून घ्यावं ?

Pages