श्रीमद्‍ भगवद्‍ गीता कळली तेवढी

Submitted by हर्ट on 22 September, 2014 - 11:24

माझ्या हाती श्रीमद्‍ भगवद्‍ गीता आली तेंव्हा मला फक्त तिच्यावरील चित्रांचा आस्वाद घेता यावा इतकीच माझी मति होती. मी रोज कित्येकदा मुखपृष्ठावरील उधळणारे घोडे बघायचो. पाठपृष्ठावर एक वेगळेच चित्र आहे. एक जराजर्जर व्यक्ती आहे. तिच्या पाठोपाठ तिच्यापेक्षा कमी वृद्ध व्यक्ती आहे आणि सर्वात शेवती रांगणारे एक मुल आहे. हे चित्र पुर्ण गोलाकार होऊन फिरते आहे. काहीतरी खोल गुढ अर्थ ह्या चित्रात दडलेला आहे असे वाटते.

geeta 1.jpggeeta back cover.jpg

मंडळी ह्या धाग्यावर आपण गीतेसंबधी चर्चा करणार आहोत.कुणाला कदाचित काही श्लोक कळले नसेल त्याबद्दल आपण इथे लिहू शकता. कुणाला काही श्लोकाबद्दल मनात संभ्रम असेल त्याबद्दल तुम्ही इथे लिहू शकता. दोन आवृत्त्याबद्दल फरकाबद्दल तुम्ही इथे लिहू शकता. तुम्हाला गीतेबद्दल जे काही लिहावेसे बोलावेसे विचारावेसे वाटते त्याबद्दल इथे लिहू शकता.

एक विनंती - कृपया हा धागा विनोद, मस्करी, हा धागा इथेच का तिथेच का वगैरेसाठी वापरु नये. एखादी आयडी मुद्दाम डुआयडी बनून इथे वाईट लिहित असेल तर त्या आयडीचा अनुल्लेख करा. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी एक शंका आहे.
मूळ महाभारता मधे लोकांनी स्वताच्या स्वार्था साठी काही संदर्भ नंतर घुसविले असे काही विद्वानांचे म्हणणे आहे. असे गीते मधे पण झाले असेल का?

उदा. अध्याय ४ श्लोक १३.

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपी मां विध्द्यकर्तारमव्ययम ॥

अतरंगी
ह्या श्लोकाचा सरळ स्पष्ट असा अर्थ आहे :
मनुष्यांच्या गुण आणि कर्माप्रमाणे त्यांचे ४ विभाग पडतात .
ह्यात पुढे कोणत्या कर्माने तो मनुष्य कोणत्या विभागात म्हणजे वर्णात गणला जातो ह्याचं वर्णन केलं आहे . हा श्लोक मूळ गीतेत आहे . फक्त गीतेवरची टीका लिहिताना लोकांनी त्याचा उलटा अर्थ लावला .

अध्याय १०,११ म्हणजे तर काहिच्या काहि आहेत. बुद्धीप्रामाण्यवादा वर आजिबात न पटणारे.

शाळेमधे आम्हाला गीतेचे अध्याय पाठांतराला होते. तेव्हा खरेच वाटायचे कि देवाने गीता लिहिली आहे. आपला तो सर्वात श्रेष्ठ धर्मग्रंथ आहे. ती पाठ केल्याने पुण्य मिळेल वगैरे वगैरे. पण आता वाचतो तेव्हा त्याच्या मर्यादा पण लक्षात येतात. ते तेवढे गाळून वाचले कि बर्याच शंकांचे समाधान होते.
एक दोन विरोधाभासांकडे दुर्लक्ष केल्यास बरेच फंडे क्लियर होतात

मोहिनी,

माझ्याकडे गीताप्रेस गोरखपुरची आवृत्ती आहे. मी इस्कॉन वाल्यांचे भाषांतर पण वाचलेले आहे. दोन्हीकडे त्या श्लोकाचा अर्थ सारखाच आहे. गीतेवरची टिका अजुन तरी वाचनात आली नाही. आणि खरेच अशी कुठे अस्तित्वात आहे हे पण आज कळाले.

ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णाचा समूह, गूण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टिरचना इत्यादी कर्माचा मी कर्ता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज.

वर्णात चुकीचे काय आहे? मी सेवा क्षेत्रात काम करतो म्हणजे मी शूद्र वर्णात मोडतो. त्या तथाकथीत सगळ्यात खालच्या वर्णात मोडतो तरी मला काही कमीपणा वाटत नाही आणि का वाटावा?

जातीव्यवस्था संपूर्ण वेगळा विषय आहे.

वरच्या श्लोकात वर्ण आहे जात नाही. त्यात तुम्हाला चुकीचे असे काय वाटले?

I started on wrong foot here

चर्चेच्या सुरुवातीला उगीच हा श्लोक नव्हता घ्यायला पाहिजे. बाकि पण एक दोन शंका आहेत कर्म आणि मोक्ष वगैरे बाबत. त्या घ्यायला हव्या होत्या. पण असो.

माधव साहेब. I am really sorry for this comment but just cant stop myself. स्वतामधे बुद्धी आणि क्षमता असताना फक्त एका कोणत्यातरी विशिष्ठ मात्या पित्याच्या पोटी जन्माला आलात म्हणून, एका घरात जन्माला आलात म्हणून जेव्हा आयुष्यभर दुसर्‍यांचे संडास धूवावे लागतात आणि तरी उपाशी आणि अर्धपोटी झोपावे लागतं तेव्हा कळते जात आणि वर्णव्यवस्ठा काय असते ते.

जात हि वर्णव्यवस्ठे मधूनच आली आहे ना ?

फक्त एका कोणत्यातरी विशिष्ठ मात्या पित्याच्या पोटी जन्माला आलात म्हणून >>> ती जात झाली.

तुम्ही तुमच्या आधीच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे वर्ण केवळ अंगच्या गुणांवरून (skills) ठरतो, जन्मावरून ठरते ती जात. जातीचे समर्थन जराही करायचे नाहीये. पण वर्णात चूक काय हे पण मला कधी कळले नाहीये.

माणसात रुप, रंग, उंची, वजन असे भेद निसर्गदत्तच असतात. तसाच अजून एक भेद असतो तो skills चा. त्या skills वरूनच त्याचे कर्म ठरते. काही skills प्रयत्नांनी मिळवता येतात तर काही अंगभूतच असावी लागतात. उदा. मला गायक व्हायचे असल्यास माझ्या आवाजावर मी मेहनत घेऊ शकतो पण एका मर्यादेपलीकडे मला माझा आवाज सुरेल करता येणार नाही. मी रफी किंवा किशोर नाही होऊ शकणार.

हे अंगभूत गुण म्हणजेच वर्ण.

या अंगभूत गुणांवरून एखाद्याचे हाल करावेत, त्याला कमी लेखावे असे गीता म्हणत असेल तर ते चूकच. पण मला तरी तसे काही आढळले नाहीये गीतेत.

"काही गुण जन्मतःच असतात". मग ते अनुवंशिकतेने येतात, मग कामावरून आणि गुणांवरून ठरणारा वर्ण जन्मावर आधारित होऊ लागतो. वर वर्ण हे देवानेच निर्मिलेले असल्याने त्याबद्दल प्रश्नही विचारता येत नाहीत.

माधव
आपल्या दोघांचे interpretation वेगळे आहेत बहुतेक. भारतीय समाजात जात आणि वर्ण त्याच्या अंगभूत गुणांवरुन न ठरता मात्यापित्याच्या कामावरुन ठरते. म्हणजेच जन्मावरुन.

तुम्ही दिलेल्या उदाहरणावरुनच पुढे. माझा आवाज चांगला आहे आणि माझ्याकडे मेहनत करुन चांगला गायक व्हायची क्षमता आहे तरी माझे आई वडिल चांभार आहेत म्हणून मी पण गायक न होता चांभार व्हावे हा अन्याय आहे.

आता गीते मधल्या श्लोकाविषयी.
http://www.maayboli.com/node/50659?page=4 ईथे बेफिकिर यांची कुराण च्या interpretation विषयी एक कमेंट आहे. ती माझ्यामते ईथे पण लागू होते.

भगवतगीते मधे साक्षात देवच जर म्हणेल कि वर्ण (जाती व्यवस्था) मी निर्माण केले आहे. तर ती कसे बदलता येईल? आधीच उल्हास आणि त्यातून फाल्गून मास.

या अंगभूत गुणांवरून एखाद्याचे हाल करावेत, त्याला कमी लेखावे असे गीता म्हणत असेल तर ते चूकच. पण मला तरी तसे काही आढळले नाहीये गीतेत.>>>> असं कुठेच काही लिहिलेलं नसतं. ते तसं स्वताच्या स्वार्थासाठी interprete आणि implement केलं जातं. त्यात साक्षात देवाने सांगितलं असेल कि हे मी निर्माण केलं आहे. मग तर काय बिषाद कोणाची काहि बोलायची.

परत माझ्या मते. जात आणि वर्ण स्किल्स वरुन न ठरता जन्मावरुन ठरतात. तिथे सगळा लोचा आहे.

बीबी चा विषय वेगळा आहे आणि आपला विषय भलतीकडेच जात आहे. मला वाटते आपण हा विषय थांबवावा

अतरंगी . टीका म्हणजे तेच हो . श्लोकाचा अर्थ लावणं.

माधव . कृपया अर्थ समजून घ्या .तुम्ही सेवा क्षेत्रात काम करता म्हणजे तुम्ही शूद्र वर्णात मोडता असं नाहीचे . जवळ जवळ ९५ % लोक हा असाच चुकीचा अर्थ घेतात . त्यामुळेच वर्ण व्यवस्थेने आपल्याकडे एवढा गोंधळ मजला आहे . हा आता सेवा करताना नडलेल्याकडून मेवा खात असाल तर मात्र तुम्ही शूद्र वर्णात मोडाल

चर्चेच्या सुरुवातीला उगीच हा श्लोक नव्हता घ्यायला पाहिजे. बाकि पण एक दोन शंका आहेत कर्म आणि मोक्ष वगैरे बाबत. त्या घ्यायला हव्या होत्या >>>
सहमत .

अध्याय १०,११ म्हणजे तर काहिच्या काहि आहेत. बुद्धीप्रामाण्यवादा वर आजिबात न पटणारे.>>>
अध्यायाचा मूळ अर्थ न कळल्यामुळेच हे असं होतं.

अध्यायाचा मूळ अर्थ न कळल्यामुळेच हे असं होतं.>>>>>
असहमत.

मोहिनि एक एक श्लोक घेउन चर्चा करु या का ? पण प्रत्येक श्लोक one by one घेतला तर खूप मोठी चर्चा होईल

आणि हो. गीता वाचल्याने पुण्य लागतं हे बुद्धीप्रामाण्यवादा वर पटलं का ? काही लोक वेड्यासारखे भगवद्गीतेची पारायन करत बसतात . एकदा TV वर एक प्रोग्राम होता. त्यात ती बाई सांगत होती तिच्या कोणाचा तरी accident झाला होता . तर त्यांनी म्हणे गीतेतले अध्याय वाचले . पण तो माणूस गेलाच वगेरे वगेरे .... कैच्या काही

गीता वाचल्याने पुण्य लागतं हे बुद्धीप्रामाण्यवादा वर पटलं का ?>>>>>>>

अहो ते मला शाळेत असताना वाटायचं. इयत्ता सहावी की सातवी मधे होतो तेव्हा आम्हाला गीतेच्या अध्यायाचे पाठांतर होतं वर्गात. दहा बारा वर्षाचा होतो तेव्हा खरेच कळत नव्हता बुद्धीप्रामाण्यवाद.

विष्णूने मोहिनीरूप घेऊन 'असुरांचा' नि:पात केलेला होता.
अतरंगी, तुम्ही या मोहिनीवर भाळू नका. Wink वर्जिनल कोण आहेत तिकडे बघा.

इब्लिस .. तुझा तू बघ ना. तुला काही काम धंदे नाहीत म्हणून दुसर्यांना फुकटचे सल्ले देत बसतोस का ?

मोहिनि एक एक श्लोक घेउन चर्चा करु या का ?>>>
आवडेल .

पण प्रत्येक श्लोक one by one घेतला तर खूप मोठी चर्चा होईल. >>>
सहमत . एखादा important कुठला वाटला तर घेत येईल . पण मला तर सगळेच important वाटतात .

इब्लिश, मी वर विंनती केलेली आहे ती परत वाच आणि इथे नीट लिहि : "एक विनंती - कृपया हा धागा विनोद, मस्करी, हा धागा इथेच का तिथेच का वगैरेसाठी वापरु नये. एखादी आयडी मुद्दाम डुआयडी बनून इथे वाईट लिहित असेल तर त्या आयडीचा अनुल्लेख करा. धन्यवाद"

तू तुझ्या अंतरंगात डोकवलेलं जास्त बरं राहिल.

बी माझे पण इब्लिस यान्च्याशी काही वेळा वैचारीक/ राजकीय वाद झालेले आहेत, पण म्हणून मी त्याना अरे-तुरे केलेले नाहीये.:स्मित:

लिहीण्याच्या भरात एवढा वाहु नकोस.

रश्मी, इथे आपण एकमेकांशी अरेतुरे संबोधूनच लिहितो. जोवर एखादी व्यक्ती वयानी मोठी आहे हे माहिती नसतं जसे की आपले झक्की तोवर आपण त्यांना अरेतुरे असेच लिहितो.

मला कोणीतरी कर्म, सकाम कर्म, अकाम कर्म यातला फरक नेमक्या शब्दात सांगा. मला वाटते कि मला कळला आहे पण कधी कधी वाचताना अचानक गोंधळ उडतो. माझ्या संकल्पना अजुन स्पष्ट होतील.

मोहिनि,

अध्याय ११ वा, श्लोक १०,११,१२,१६,१७,१९,२०,२३,२४,२५,२६,२७,२८,२९,३०,३६, !!!!!!!
काहीही आहेत !!!! गीते सारख्या सर्वोच्च ग्रंथामधे ?

मूळ म्हाभारतात गीताच नव्हती. नॉमिनल होती.

एका आचार्याने गीता घुसडली असे म्हणतात ते खरे आहे का ?

गिते मुळे आनि त्यातिल श्लोक चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।तस्य कर्तारमपी मां विध्द्यकर्तारमव्ययम ॥
तस्य कर्तारमपी मां विध्द्यकर्तारमव्ययम ॥
ज्याचा अर्थ ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णाचा समूह, गूण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टिरचना इत्यादी कर्माचा मी कर्ता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज असा होतो या अर्था मुळे, या विचारामुळे, हे मानन्यामुळे देशाचि धर्मा चि ऊन्नति झालि कि अधोगति.
मि काहि महिने जपान ला होते जपान बद्दल जानुन घेताना हा निबंध वाचन्यत आला तो इथे देत आहे.
जापान की उन्नति का मूल
सम्प्रति जो दशा भारतवर्ष की है ठीक यही दशा सन् 1850 से पूर्व जापान की थी। भारत में जिस प्रकार वर्ण व्यवस्था है। उसी प्रकार जापान में चार वर्ण माने जाते थे जिन के नाम इस प्रकार हैं- (1) कोवेत्सु (2) शीनवेत्सु (3) बामवेत्सु और (4) समुराई? इन में में ऊँच नीच का भी खूब विचार था। परस्पर एक दूसरे को घृणा की दृष्टि से देखा करते थे। कोवेत्सु अपने को सूर्य से पैदा बतलाते थे एवं शीनवेत्सु चन्द्रमा से। समुराई के अर्थ हैं समर करने वाले (क्षत्रिय)। ये लोग वे हैं जो भारतवर्ष से शंकराचार्य के प्रभाव से बौद्ध रूप में ही भाग गए थे और जापान में जा बसे थे। तब से जापान की सिविल और मिलिटरी में केवल समुराई वर्ण के लोग ही नौकरी किया किया करते थे। ये लोग अन्य वर्ण वालों को नहीं आने देते थे। इस के अतिरिक्त फौजों में लैफ्टिनेण्ट से लेकर कमाण्डर तक और डिप्टी कलेक्टर से लेकर गवर्नर तक समुराई वर्ण वाले होते थे। इन के अतिरिक्त जापान में अछूतों की तरह ईनिन, इत्ता और ह्यास्को भी थे। ये लोग भंगी और चमारों की तरह ग्राम और शहर से बाहर बसाए जाते थे। इनके मुख्य रूप से चार पेशे थे। चमड़े का व्यापार, जल्लादी, कबरें खोदना और मैला साफ़ करना-ठीक उसी तरह इनमें भी वही भेदभाव था जो आज छूत अछूतों का भारतवर्ष में है। ये परस्पर ऊँच-नीच का व्यवहार रखते थे और घृणा भी करते थे। इसी वर्ण-व्यवस्था के कारण चीनियों के हमले जापानियों पर प्रायः हुआ करते थे। फलतः सैकड़ों जापानी चीनियों के हाथों लूटे, मारे और फूँके गए। सन् 1852 में स्पेन के पादरी पहिले पहिल जापान में इस वर्ण व्यवस्था के ढंग को देख कर पहुँचे। उन्होंने जापान के अछूतों में अर्थात् ईनिन और इत्ता लोगों में ईसाई धर्म का प्रचार प्रारम्भ किया। बहुत से ईसाई हो भी गये-तब ठीक हिन्दुस्तान की तरह विदेशी मुसलमान ईसाई आकर अपना-अपना उल्लू सीधा करते रहे। जगह-जगह आपसी विरोध होकर बलवे होने लगे-पशु बध भी खूब होने लगा-यहाँ तक कि इन लोगों ने गाय मारने की भी सलाह दी। ईनिन और इत्ता लोगों के बुजुर्ग बौद्ध थे, इस लिए इन्होंने गाय मारने से तो स्पष्ट इनकार कर दिया। तब ईसाइयों ने मजबूर किया कि तुम लोग ईसाई हो गए हो, कोई हर्ज नहीं है। बहुत समझाने के बाद इन लोगों ने गोबध प्रारम्भ किया। परिणाम यह हुआ कि गाय आदि पशुओं के बध के कारण जापान में हिन्दुस्तान की तरह आए दिन खूब बलवे और मारपीट होने लगी। ईसाई लोगों की यह एक राजनैतिक चाल थी, जो हिन्दुस्तान में अभी जारी है। सावधान!!!दूसरी बात यह हुई कि सन् 1857 में हिन्दुस्तान में गदर हो गया और भारत तबाही की हालत में आ गया। इन दोनों का प्रभाव जापानियों पर विशेष रूप से पड़ा। जापानी लोग इन चालों को समझ गए। जगह-जगह बड़ी-बड़ी सभाएँ होने लगी। इन सभाओं में एक स्वर से जापान के वीर नेताओं ने आवाज उठाई कि जब तक इस व्यवस्था को मिटा कर तमाम कौमों को एक न कर दिया जाएगा-तब तक जापान आगे न बढ़ेगा। सचमुच जापान का सौभाग्य सितारा चमक उठा। जापान 286 राजाओं और सैकड़ों जातियों में विभक्त था। पहिले पहिल मत्ता प्रान्त के स्वदेश भक्त राजा ने अपना राज्य टोकियो के महाराजा मैकडो को सौंप दिया
और एक काठ का मकान बना कर साधारण प्रजा की तरह टोकियो में रहने लगा। इसी भाँति थोड़े ही समय में सब राजाओं ने अपना राजपाट, लाव लश्कर मैकडो के सुपुर्द कर दिया। अब पहिले पहिल आज्ञा जो बुद्धिमान जापान नरेश मैकडो ने सन् 1868 में निकाली वह यह थी कि अछूतों की बस्तियाँ तोड़ दी जावें और ईनिन इत्ता लोगों को ऊँचे माने जाने वाले लोगों के बीच में बसाया जावे एवं जो इनसे छूतछात करे, उसको राज्य की ओर से कठोर दण्ड मिले। बस-इस आज्ञा के निकलते ही जापान में प्रचलित वर्ण व्यवस्था टूट गयी। फलतः कोबेत्सु, शीनवेत्सु बामवेत्सु और समुराई, एवं ह्यास्को, ईनिन इत्ता यह कृत्रिम वर्ण-विभाग टूट गये और जापान एक ‘जापानी क़ौम’ का पवित्र देश बन गया। इसके बाद सन् 1868 में ही जापान के दूरदर्शी नरेश मैकडो ने तुरन्त राजाज्ञा द्वारा समस्त जापान में अनिवार्य शिक्षा प्रचलित कर दी।

अनिवार्य शिक्षा के कार्य में जापान के कुबेर फ्रूबूजावा और हीटो ने प्रचुर धन राशि उदारता और प्रसन्नता पूर्वक प्रदान की। आज तक जापानी लोग इन दोनों महानुभावों को आदर पूर्वक स्मरण करते हैं। इन दोनों ने जापान की उन्नति में अपने करोड़ों रुपए व्यय कर दिए। आज भारत निवासी वर्ण व्यवस्था के बखेड़े में खंड-खंड हो रहे हैं। क्या भारतीय लोग अब भी उन्नति का मार्ग जापान की सच्ची कथा को पढ़कर समझेंगे? जापानी लोगों ने अछूतोद्धार करके अपनी शक्ति को दुगुना कर लिया। यदि ईनिन और इत्ता लोगों को जापानी लोग अपने अन्दर न मिला लेते तो ईसाई लोग अपनी शक्ति बढ़ा लेते परन्तु बुद्धिमान् और दूरदर्शी जापानियों ने समय की गतिविधि को समझा और खूब समझा। देखिए इन्हीं ईनिन और इत्ता लोगों में से एक बहादुर ने जापान के चार चाँद लगा दिये। सन् 1900 में जापान उन्नति करने लगा और सर्व प्रथम कैप्टन तनामा को दूत बनाकर मास्को (रूस) भेजा। तनामा बहुत ऊँचे क़द का आदमी था। साथ ही कुरूप भी था परन्तु मिलनसार और बुद्धिमान् प्रथम कोटि का था। वह मास्को में रूस के मिलिटरी अफ़सरों के साथ जुआ खेलने लगा और जान बूझकर हार जाता था। उसी धन से रूसी अफ़सर अपनी स्त्रियों के लिए हीरे और मणिओं के हार खरीदा करते थे। रूस की स्त्रियाँ तनामा को वर्दी पहिने जब देखतीं थीं तब उस पर मोहित हो जाती थीं। इस प्रकार बहुत स्त्रियों के साथ कैप्टन तनामा का पवित्र प्रेम हो गया। उन्हीं दिनों रूस की सरकार ने परम प्रसिद्ध पोर्ट आर्थर का क़िला बनवाया। उस क़िले में जापानी मजदूर काम करते थे-जो पढ़े लिखे और समझदार थे। इन्होंने सलाह करके क़िले को कच्चा चिन दिया। दूसरी ओर सरकार ने पोर्ट आर्थर में लड़ाई लड़ने के लिए चक्रव्यूह का एक नक़्शा गुप्त रूप से बनवाया और अपने दूत के पास जो जापान में रहता था भेज दिया। इस नक़्शे की नकल कैप्टन तनामा ने बुद्धिमत्तापूर्वक करवा ली और अपनी सरकार के पास जापान में तुरन्त भेज दिया। जब रूस के जापानी दूत को ज्ञातहुआ कि गुप्त नक़्शे की नकल जापान में पहले ही पहुँच गयी है तो उसने अपनी रूसी सरकार को बड़ी डाँट बताई और पूछा कि यह नक़्शा कैसे यहाँ पहुँचा। तब दूसरा नक़्शा तैयार किया गया। वह भी बुद्धिमान् तनामा ने किसी प्रकार हाथ में कर लिया। परन्तु यह भी छिपा नहीं रहा कि दूसरे नक़्शे की नकल भी जापान में पहुँच गयी। तब कैप्टन तनामा पर सबने सन्देह किया। अतएव रूस के जर्नल एब्लोन्स्की आदि अफसरों ने गुप्त कमेटी की और खूब विचार परामर्श के बाद एलोन्सकाया नाम वाली एक नर्तकी को भेजा जो तनामा के चरित्र को भ्रष्ट करके सब भेद लेवे। पहिले तो वह नर्तकी न गयी परन्तु खूब लोभ लालच और धमकी देने के बाद वह कैप्टेन तनामा के बँगले पर गई और उस को अपने साथ विवाह करने के लिए मजबूर किया। परन्तु देश भक्त तनामा तय्यार न हुवा। तनामा को धन का भी लोभ दिया गया-परन्तु उसने देश की स्वाधीनता को अक्षुण्ण रखने के लिए सब को तृणवत् समझ कर त्याग दिया, क्योंकि वह नर्तकी सब रहस्यों को जानने के लिए भेजी गई थी। अन्ततोगत्वा तीसरा नक़्शा तय्यार किया गया और बुद्धिमान् तनामा ने उसको भी प्राप्त कर लिया और तदनुसार जापान के अफ़सरों को लिख दिया कि डबल पलटनें एक महीना पूर्व तैनात कर दो हमारी जीत होगी। फौरन जापान की पलटनें रूसी पलटनों के आने के पूर्व ही भेज दी गईं और इधर कैप्टन तनामा को रूसिओं ने गिरफ़्तार कर लिया और गोली से उड़ा देने की आशा रूस के राजा निकोलन ने निकाल दी। वीर कैप्टेन तनामा आज्ञा सुनते ही तुरन्त अपने कोट के बटन पकड़ कर छाती खोल खड़ा हो गया। निदान उस स्वदेश सेवक तनामा ने स्वामी श्रद्धानन्द की तरह छाती पर गोलियाँ खाकर स्वदेश के लिए स्वर्ग का मार्ग स्वीकार कर लिया। इस घटना से जापानी लोगों में गहरी देश भक्ति का पता पाया जाता है। ऐसी-ऐसी घटनाएँ तो अनेक हैं परन्तु इस पुस्तक के लिए यह घटना प्रासंगिक है। अगर जापान में वर्ण व्यवस्था का पाखण्ड प्रचलित रहता और जापान की अछूत मानी जाने वाली जाति ईनिन और इत्ता की सत्ता बनी रहती तो जापान आज खंड-खंड होकर वर्ण व्यवस्था का घोर दंड भोगता होता। फिर कैप्टन तनामा जैसा अछूत कही जाने वाली इत्ता जाति का सरदार कैसे जापानियों का प्राण प्यारा बन पाता? न जापान से वर्ण व्यवस्था का प्रयाण होता और न जापानियों में से अछूतपन का प्लेग निकल पाता। जापानियों ने वीर तनामा को पाया। वर्ण व्यवस्था को विध्वंस करके। फलतः 1805 में जो भयंकर प्रसिद्ध लड़ाई पोर्ट आर्थर पर हुई उसमें जापान विजयी रहा। इस विजय की प्राप्ति में ईनिन और इत्ता आदि अछूत कही जाने वाली क़ौमों ने ही विशेष वीरता दिखाई। आज जापान में उस विध्वंसकारी वर्ण-व्यवस्था का नामोनिशान नहीं है और जापान एक महान शक्तिशाली राष्ट्र है। सब प्रकार की उन्नति जापान में हो रही है। क्या भारत निवासी अपने पड़ोसी जापान निवासियों से शिक्षा लेंगे कि वर्ण व्यवस्था का विध्वंस करके भी कैसे दुनियाँ में उन्नति हो सकती है। जापान से वर्णव्यवस्था तो भाग गई-लेकिन Four Ms make the monarchey अर्थात् मिशनरी, मिलिटरी, मरचैन्ट, और मीनियल्स का वैदिक कर्म-विभाग (वर्ग-व्यवस्था) आज जापान में स्वतः प्रचलित हो गया है। इसी प्रकार यदि भारत-वर्ष प्रचलित वर्ण व्यवस्था का विध्वंस कर दे तो समय आने पर स्वतः ‘वैदिक वर्ग व्यवस्था’ कायम हो जाएगी। इसकी चिन्ता न करनी पड़ेगी। सावधान!!!

वेद में भी लिखा है-

क्षत्राय त्वं, श्रवसे त्वं, महीया इष्टये वंत, अर्थमिव त्वं-इत्यै।

(ऋग्वेद 1/11/3/6)

अर्थात् यह चार प्रकार की प्रवृत्ति ही वैदिक वर्ग-व्यवस्था है। इस मन्त्र में शूद्र के लिए ‘महीया’ आया है जिसका अर्थ पूज्य होता है।

अंतरंगी, मोहिनी, भरत, संमि, माधव - धन्यवाद.

आपल्या हातून जर कळत नकळत एखादे भयंकर मोठे पाप झाले असेल तर गीतेत अशा पापाचे परिमार्जन कसे करावे ह्याबद्दल उपदेश करणारा एखादा श्लोक सांगू शकाल का? किंवा इतर कुठल्याही ग्रंथात ह्याबद्दल उपदेश केलेला आहे का? धन्यवाद.

बी,
तुमच्या अंतरंगाच्या रंगाशी मला घेणे देणे नाही.

तुम्हाला आंतरजालीय फोरम्सवर लिहितानाचे किमान सभ्यतेचे नियम ठाऊक नाहीत हे वाचून गंमत वाटली. त्यामुळे, तुमच्या 'विनंती'ला मान द्यायला हवा अशी सभ्यता पाळायची मलाही गरज नाही Happy

इब्लिस, फक्त मीच नाही इथे बाकी इतर जण सुद्धा तुम्हाला ह्या ना त्या बीबीवर हीच विनंती करत आहेत की इथे नीट लिहा बोला. माझ्या पुरता मी हे म्हणेल की मी कधी कुणाच्या वाट्याला जात नाही. मी जे धागे उघडतो फक्त त्याच धाग्यावर मी लिहितो. आणि मी तुमच्यासारखा नियमीत इथे येत नाही. इथे येताना माझ्या मनात कुणाशी वाद घालायची जरा देखील इच्छा नसते. रस नसतो. मी माझ्या एकमेव बी ह्या आयडीने लिहितो.

परत एकदा विनंती की इथे एकतर नीट लिहा नाहीतर इथे कृपया लिहू नका. धन्यवाद.

Pages