श्रीमद्‍ भगवद्‍ गीता कळली तेवढी

Submitted by हर्ट on 22 September, 2014 - 11:24

माझ्या हाती श्रीमद्‍ भगवद्‍ गीता आली तेंव्हा मला फक्त तिच्यावरील चित्रांचा आस्वाद घेता यावा इतकीच माझी मति होती. मी रोज कित्येकदा मुखपृष्ठावरील उधळणारे घोडे बघायचो. पाठपृष्ठावर एक वेगळेच चित्र आहे. एक जराजर्जर व्यक्ती आहे. तिच्या पाठोपाठ तिच्यापेक्षा कमी वृद्ध व्यक्ती आहे आणि सर्वात शेवती रांगणारे एक मुल आहे. हे चित्र पुर्ण गोलाकार होऊन फिरते आहे. काहीतरी खोल गुढ अर्थ ह्या चित्रात दडलेला आहे असे वाटते.

geeta 1.jpggeeta back cover.jpg

मंडळी ह्या धाग्यावर आपण गीतेसंबधी चर्चा करणार आहोत.कुणाला कदाचित काही श्लोक कळले नसेल त्याबद्दल आपण इथे लिहू शकता. कुणाला काही श्लोकाबद्दल मनात संभ्रम असेल त्याबद्दल तुम्ही इथे लिहू शकता. दोन आवृत्त्याबद्दल फरकाबद्दल तुम्ही इथे लिहू शकता. तुम्हाला गीतेबद्दल जे काही लिहावेसे बोलावेसे विचारावेसे वाटते त्याबद्दल इथे लिहू शकता.

एक विनंती - कृपया हा धागा विनोद, मस्करी, हा धागा इथेच का तिथेच का वगैरेसाठी वापरु नये. एखादी आयडी मुद्दाम डुआयडी बनून इथे वाईट लिहित असेल तर त्या आयडीचा अनुल्लेख करा. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गीतेचा काही भाग चांगला आहे, जसा विकार निर्माण कसा होतो वगैरे

काही भाग भंकस आहे. जो चांगला वाटेल तो घ्यावा.

तेंडुलकरांच्या एका व्यक्तीचित्रात म्हणल्या प्रमाणे, गीता ( आणि तत्वज्ञान ) सांगुन सुद्धा अर्जुन काही युद्धाला तयार होइना, शेवटी कृष्णाला ते मोठे रुप वगैरे दाखवावे लागले, मग तो युद्धाला तयार झाला.

>> गीता ( आणि तत्वज्ञान ) सांगुन सुद्धा अर्जुन काही युद्धाला तयार होइना, शेवटी कृष्णाला ते मोठे रुप वगैरे दाखवावे लागले

आणि युद्धानंतर 'ते तू काय सांगितलं होतंस ते जरा पुन्हा सांग - मी विसरलो' म्हणाला म्हणून अनुगीता सांगावी लागली. Proud

आम्ही बारावीला असताना एक मित्र नापास झाला बिचारा फारच चिंतेत पडला तेव्हा मी त्याचे सांत्वन करण्यासाठी गेलो.नि काय बोलावे ते न सुचल्याने त्याला म्हणालो, 'मित्रा, काळजी करू नकोस जे होत ते चांगल्यासाठीच होत.
>>>>>>>

हा असाच एक प्रकार घडला होता. एका मित्राचे वडील गेल्याने सांत्वन करायला मित्रमंडळी गेलो होतो. मित्र फारसा जवळचा असा नव्हता, त्यामुळे काही दिवस उलटून गेल्यावर गेलेलो. निघताना सर्वांचे त्याला एका वाक्या शब्दाने धीर देऊन झाले. एका बावळटाला काय बोलायचे ते पटकन सुचले नाही आणि आपल्यालाही काहीतरी बोलायलाच हवे म्हणून पटकन बोलून गेला, चल झाले ते चांगलेच झाले आता जास्त टेंशन घेऊ नकोस ..

इथे झाले ते झाले असे बोलायचे होते पण चांगलेच झाले असे तोंडात आले त्याच्या..

कोणालाच यावर काय प्रतिक्रिया द्यायची समजले नाही, नशीब निघतच होतो तिथून म्हणून मग लगेच सटकलो आणि बाहेर पडून त्याला जाम शिव्या घातल्या ..

यावरून मी एक धडा घेतला, नुसते औपचारीकता म्हणून बोलण्यापेक्षा मनात ज्या भावना प्रामाणिकपणे येतील तसेच आणि तेवढेच व्यक्त व्हा !!!

जे झाले ते चांगले झाले
जे होत आहे ते ही चांगले होत आहे
जे होईल ते देखील चांगले होईल

ही वाक्य गीतेत आहे. पण..!
ही वाक्ये कोणत्या वेळी कोणत्या परिस्थितित कोणत्या घटने संबंधित आहे हे बघावे. गीतेत सांगितलेले सगळी वचने वाक्ये इतर सर्वत्र ढोबळ अर्थी लावण्यात आल्याने चुकीची जास्त वाटतात आणि त्यातील सार कमी होतो.

ओबामा बोलले yes we can
आता हेच वाक्य मुलगा होत नाही अशी व्यथा घेऊन येणार्या जोडप्यास डॉ. बोलले तर कसे वाटेल?

गजाभाऊ, ते नाटक मास्तरांनीच लिवले होते. आमच्या वर्गातले दिग्गज कलाकारांनी त्यात काम केले. नाटकाचे नाव होते आरसा. पुढे सरांनी ते नाटक उर्दुमिश्रित हिंदीत अनुवादीत केले व त्याचे नाव ठेवले 'अक्स'

टण्या, ओके.
इंट्रेश्टिंग वाटले. कधीतरी ते नाटक / काही भाग बच्चेकंपनीत बसवायला मला आवडले असते. म्हणून विचारले. Happy

गीता प्रवचने
लेखक: विनोबा भावे
वाचक: माधवी गणपुले
(संपर्क: voiceofmadhavi@gmail.com)
आचार्य विनोबा भावे यांनी वर्ध्याच्या तुरुंगात असताना दिलेली गीतेवरील प्रवचने तेव्हा तिथेच शिक्षा भोगत असलेल्या साने गुरुजींनी शब्दश: लिहून घेतली. महर्षी व्यासकृत महाभारताचे सार अशी गीता भारतीयांना कायमच दिशा दाखवत आलेली आहे. तिचा संदेश विनोबा सोप्या, सामान्यांना समजेलशा भाषेत पोहोचवितात. या पुस्तकाला बोलत्या स्वरूपात सादर करण्याची परवानगी दिल्याबद्दल ब्रह्मविद्या मंदिर आश्रम, पवनार यांचे मन:पूर्वक आभार.
http://boltipustake.blogspot.co.uk/2012/05/blog-post.html

वर दिलेल्या दुव्यावर आपल्याला विनोबां नी उलगडून सांगितलेला अर्थ ऐकता येइल. पानावर उजव्या बाजूस खाली एकेका अध्यायाचे दुवे आहेत ते क्लिक केले की आपल्याला त्या अध्याया बद्द्ल ऐकता येत.
या संकेतस्थळावरच डावी कडे अनेक उत्तम पुस्तकां ना ऐकण्यासाठी दुवे आहेत त्या मधे गीतेच मराठी भाषांतर ही (वामनपंडीतांचा समश्लोकी अनुवाद) आहे.

शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वर: !
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् !!

- अध्याय १५ श्लोक ८

अर्थ - ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसर्‍या देहात घेऊन जातो. अशा रितीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो.

तात्पर्य -
या श्लोकामध्ये जीवाचे वर्णन ईश्वर, अर्थात देहाचा स्वामी असे करण्यात आलेले आहे. त्याला वाटल्यास तो आपला देह बदलून उच्चतर योनी अथवा कनिष्ट योनी प्राप्त करू शकतो. त्याला सदैव आंशिक स्वातंत्र्य हे असतेच. कोणत्या प्रकारचे देहांतर करावे हे त्याच्यावर अवलंबून असते. मृत्युसमयी त्याने ज्या प्रकारची भावना निर्माण केली आहे, त्या भावनेनुसार त्याला पुढील देह प्राप्त होतो. जर त्याची कुत्र्यामांजराप्रमाणे भावना असेल तर त्याला निश्चितच कुत्र्याचे किंवा मांजराचे शरीर प्राप्त होते आणि जर त्याने आपली चेतना दैवी गुणांवर केंद्रीत केली असेल तर त्याला देवतेचे रूप प्राप्त होते.
शरीराच्या विनाशानंतर सर्व काही नष्ट होते हा दावा खोटा आहे. जीवात्मा एका देहातून दुसर्‍या देहात देहांतर करत असतो आणि त्याचे वर्तमान शरीर व वर्तमान कर्मे हि त्याच्या पुढील शरीराची पार्श्वभूमी असते. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार विविध प्रकारचे शरीर प्राप्त होते आणि कालांतराने त्याला ते शरीर सोडावे लागते.

मला पडलेला प्रश्न - हे पुनर्जन्माचे समर्थन झाले का? म्हणजे पुनर्जन्म असतो असे समजूनच वा स्वताला पटल्यावरच या श्लोकाकडे वळायचे का? कि याचा आणखीही काही मतितार्थ आहे?
तसेच जर पुनर्जन्म संकल्पना खरे मानूनच याचा अर्थ असेल तर मनुष्यजन्मानंतर जर पशूयोनीत जन्म घेतला तर पुन्हा मनुष्याचे शरीर मिळवण्यासाठी त्या कुत्र्यामांजरीच्या जन्मात चांगली कर्मे करावी लागणार का?

तळटीप - थेट १५ व्या अध्यायातील श्लोक वाचला गेला कारण तो सुरुवातीला चित्ररुपात हाईलाईट करून दिलेला.

मान्जराप्रमाणे भावना म्हणजे म्याव म्याव करणे.:खोखो:

बी तू सध्या पुण्यात आहेस की शिन्गणापुरला? जर पुण्यात असशील तर शन्कर अभ्यन्करान्ची प्रवचने जरुर ऐक. मी ऐकलेली नाहीत, पण बर्‍याच जणान्कडुन त्यान्च्याविषयी चान्गलेच ऐकले आहे.

शाळेत मुलांना काही तत्व समजावून सांगण्यासाठी शिक्षक जसे काहीतरी गोष्ट निर्माण करून सांगतात तसाच काही तत्व समजावून सांगण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ह्या अश्या गोष्टी निर्माण केल्यात . पण काळाच्या ओघात त्यामागचं तत्व विसरून फक्त त्या गोष्टीच शिल्लक राहिल्यात . अति दुष्ट माणसाचा दुष्टपणा सांगण्यासाठी हि अशी रुपकं योजली गेली आहेत . >>>>>>>>

मोहिनि, पूर्वजांनी अश्या गोष्टी निर्माण केल्या आहेत. पण आपण गीते बद्दल बोलत आहोत. तुम्ही असे मान्य करत आहात का कि गीता आपल्या पूर्वजांनी म्हणजे माणसाने लिहिली आहे ?
नाही जनरली लोक ती देवानी सांगितली असा प्र्चार करत असतात म्हणून विचारतोय.

<<<<<मला पडलेला प्रश्न - हे पुनर्जन्माचे समर्थन झाले का? म्हणजे पुनर्जन्म असतो असे समजूनच वा स्वताला पटल्यावरच या श्लोकाकडे वळायचे का? कि याचा आणखीही काही मतितार्थ आहे?
तसेच जर पुनर्जन्म संकल्पना खरे मानूनच याचा अर्थ असेल तर मनुष्यजन्मानंतर जर पशूयोनीत जन्म घेतला तर पुन्हा मनुष्याचे शरीर मिळवण्यासाठी त्या कुत्र्यामांजरीच्या जन्मात चांगली कर्मे करावी लागणार का?
>>>

ऋ, तू खूपच सुंदर लिहिले आहेस.

माझ्या मते एक मनुष्य जन्म सोडला तर इतर जीवांना कर्म तरी काय असते? म्हणून कर्म करण्याची संधी ही खरी मनुष्य जन्मातच प्राप्त होते. इतर जन्मात ती संधी उपलब्द्धच नाही.

मला एक प्रश्न पडतो, एकदा मनुष्य जन्म संपल्यानंतर परत त्या मनुष्याला मनुष्य हाच जन्म मिळत असेल का?

आणि पुनर्जन्म म्हणजे एखाद्या व्यक्तीला पुन्हा मनुष्य म्हणून जन्म होणे आणि मागिल जन्मातले त्याला सगळे आठवणे.

पुनर्जन्माबद्दल मी माझा एक अनुभव सांगतो. माझ्या लहानपणी मला नेहमी देजाऊ सारखे फीलींग यायचे. एखादी व्यक्ती घरी आली की वाटायची आपण हीला पुर्वी कधीतरी भेटलो आहे. आईने मिसळचे वरण केले की मी आईला म्हणायचो आई हे वरण तू आज दुपारीच तर केले होते. आता परत? माझी आई सांगते की तिचे वडील गेल्यानंतर आठ दिवसातच आईला दिवस राहिले. म्हणून ती समजते तिचे वडील तिच्या उदरी आलेत. माझ्या आजोबांना मिसळचे वरण फार आवडत असे.

मनुष्यजन्मानंतर जर पशूयोनीत जन्म घेतला तर पुन्हा मनुष्याचे शरीर मिळवण्यासाठी त्या कुत्र्यामांजरीच्या जन्मात चांगली कर्मे करावी लागणार का?>>>>
पशु योनी मध्ये चांगली कर्मे/ वाईट कर्मे हि संकल्पना लागू होत नाही . कारण पशूंनी केलेलि प्रत्येक कृती हि आहार /निद्रा /भय /मैथुन यांच्या साठीच असते .त्यामुळे कर्मफल शास्त्र त्यांना लागू होत नाही
भगवत गीते नुसार केवळ मनुष्य हि एकमेव कर्मयोनी आहे .बाकीच्या योनी या भोग योनी आहेत. मनुष्य जन्मात केलेली कर्मे हि पुढील जन्मातील योनी ठरवायला कारणीभूत ठरतात .

विनोबा,
वेगवेगळ्या योन्यांमधे वेगवेगळी कुकर्मे अथवा सत्कर्मे करून पुढे शाप वा मोक्ष वा मनुष्यजन्म मिळवल्याच्या पुराणातल्या वानग्या आहेत की.
अभ्यास करा ब्वा. Wink

>>पशु योनी मध्ये चांगली कर्मे/ वाईट कर्मे हि संकल्पना लागू होत नाही . कारण पशूंनी केलेलि प्रत्येक कृती हि आहार /निद्रा /भय /मैथुन यांच्या साठीच असते .त्यामुळे कर्मफल शास्त्र त्यांना लागू होत नाही<<
माणुस हा ही एक पशुच ( प्राणी या अर्थाने) आहे.

पण गीतेत अश्या राक्षसाच वर्णन कुठे आलाय हे मला तरी निदर्शनास आलं नाही. तुम्ही राक्षसाचा उल्लेख केला त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे >>>

मोहिनि, मी ते राक्षसाचे उदाहरण बुद्धी आणि लॉजिक या साठी दिले होते.

बाकी गीते मधे राक्षसाचे नाही तर कृष्णाचे वर्णन तसे आहे. अनेक बाहु, अनेक पाय, त्याच्या दातात योद्धे चिरडले जात आहेत, वगैरे वगैरे.

मी दिलेले अध्याय आणि श्लोक क्रमांक याच संदर्भा मधे आहेत.

मी गीताप्रेस, गोरखपुर ह्यांची गीता आणली आहे आमच्या इथल्या मराठी ग्रंथालयातून. खूप छान वाटते आहे वाचन करताना. आज दुसरा अध्याय वाचला त्यात "नैनं छिदन्ति शस्त्राणी नैनं दहति पावकः" चे खूप सुरेख वर्णन केलेले आहे. प्रिंट अगदी मोठी आहे त्यामुळे वाचायला त्रास होत नाही.

आपल्या पुराणात असे कुठलेच तंत्र मंत्र सांगितले नाहीत जेणेकरुन आपण गेलेल्या जीवाला वा त्याच्या आत्माला परत बोलवू शकू. (?)

आपल्या पुराणात असे कुठलेच तंत्र मंत्र सांगितले नाहीत जेणेकरुन आपण गेलेल्या जीवाला वा त्याच्या आत्माला परत बोलवू शकू. (?) >> त्याकरता गुलाब्राव पोळ म्हाराजांची दिक्षा घ्यावी लागते.

काय चाललंय काय ?मी गीता वाचली आणि काही मते ठरवली आहेत. इथे सहजच वाचन केले चर्चा भरकटते आहे त्यातून काहीच निघत नाहीये. जगातले सर्वच धर्मग्रंथ अर्धवट अथवा समाजाच्या सर्व थरांचे त्यांच्या सर्व प्रश्नांचे संपूर्ण समाधान करू शकत नाहीत. तरीही थोडीफार पुष्टी अथवा विरोध करणारी पाच पाच मते/श्लोक बी यांनी आणि इतरांनी लिहिली तरी खूप झाले.

सर्वात जुनी लिखित प्रत कुठे आहे?

गीतेचा सारांश सांगणारे एक पत्रक मिळते ना बाहेर विकत. की तुम्ही काय घेऊन आलात, काय घेऊन जाणार असे मी वाचल्याचे आठवते मला. सोप्या शब्दात गीता म्हणते तू तुझे कर्म कर फळाची अपेक्षा वा कर्माचे परिणाम माझ्यावर सोपव.

हा अर्थ पुरेसा नाही का?

Pages