श्रीमद्‍ भगवद्‍ गीता कळली तेवढी

Submitted by हर्ट on 22 September, 2014 - 11:24

माझ्या हाती श्रीमद्‍ भगवद्‍ गीता आली तेंव्हा मला फक्त तिच्यावरील चित्रांचा आस्वाद घेता यावा इतकीच माझी मति होती. मी रोज कित्येकदा मुखपृष्ठावरील उधळणारे घोडे बघायचो. पाठपृष्ठावर एक वेगळेच चित्र आहे. एक जराजर्जर व्यक्ती आहे. तिच्या पाठोपाठ तिच्यापेक्षा कमी वृद्ध व्यक्ती आहे आणि सर्वात शेवती रांगणारे एक मुल आहे. हे चित्र पुर्ण गोलाकार होऊन फिरते आहे. काहीतरी खोल गुढ अर्थ ह्या चित्रात दडलेला आहे असे वाटते.

geeta 1.jpggeeta back cover.jpg

मंडळी ह्या धाग्यावर आपण गीतेसंबधी चर्चा करणार आहोत.कुणाला कदाचित काही श्लोक कळले नसेल त्याबद्दल आपण इथे लिहू शकता. कुणाला काही श्लोकाबद्दल मनात संभ्रम असेल त्याबद्दल तुम्ही इथे लिहू शकता. दोन आवृत्त्याबद्दल फरकाबद्दल तुम्ही इथे लिहू शकता. तुम्हाला गीतेबद्दल जे काही लिहावेसे बोलावेसे विचारावेसे वाटते त्याबद्दल इथे लिहू शकता.

एक विनंती - कृपया हा धागा विनोद, मस्करी, हा धागा इथेच का तिथेच का वगैरेसाठी वापरु नये. एखादी आयडी मुद्दाम डुआयडी बनून इथे वाईट लिहित असेल तर त्या आयडीचा अनुल्लेख करा. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचे येथे सभ्य शब्दातील विनंतीला सभ्य उत्तर मिळते. इंग्रजी भाषेत आदरार्थी बहुवचन नसले, तरी मराठीत अनोळखी व्यक्तीस अरेतुरे केल्यास, योग्य ते उलट उत्तर मिळते. समोरच्याने परवानगी दिल्याशिवाय एकेरीवर येऊ नये, तो तुमच्या तीर्थरूपांचा नोकर नव्हे, हे तुम्हाला एकदाचे उमजले हे बरे झाले.

मंदार जोशींनी येऊन तुमच्या प्रतिसादाची झील तोडली याचा अर्थ तुम्ही योग्य बोलत आहात असा होत नाही.

दुसरा प्रतिसाद बरा लिहिला आहात. तरीही, 'नीट लिहा नाहीतर लिहू नका' यात "नीट" म्हणजे काय, ते कोण ठरविणार?

तुम्ही कसे वागता, कोण आहात याच्याबद्दल मला काय करायचे आहे? इथे आलेल्या प्रतिसादावर मी लिहितो, व लिहीणार. पण, मला या धाग्यावर अरेतुरे करणार्‍या दोन आयडी सापडल्या. एक तुमची, अन दुसरी वर आहे ती मोहिनी. दोघांच्या प्रतिसादाचा टोन एकच आहे. यावरून जो अर्थ काढायचा तो मी काढेनच.

असो.

नीट लिहा म्हणजे तुम्ही विषयाला धरुन लिहा.

आणि इथे मायबोलिवर कुणालाच कुणाचे वय समजत नाही. चार वर्षाच्या मुलाला तुम्ही "कसे आहात तुम्ही" असे बोलणार नाही आणि समवयस्क जर कुणी असेल तर फार दिवस त्याला "तुम्ही" संबोधणार नाही. फक्त आपल्यापेक्षा जो कुणी मोठा असेल त्याला आपण तुम्ही म्हणू. जसे इथे झक्की, दिनेशदा, रॉबीनहूड, भिडेकाका ह्यांना सगळेजण "तुम्ही" हेच संबोधन लावतात.

तुम्ही जर माझ्या समोर उभा राहीलात आणि माझ्यापेक्षा जर तुम्ही वयानी मोठे असाल तर मी तुम्हाला "तुम्ही" हेच म्हणेल. तू म्हणणार नाही. पण इथे वय कळत नाही. त्यात तुमच शैली आणि खोडसाळ वृत्ती बघून मला तुमचे वय एकदम विशीतले वाटते.

आपल्या हातून जर कळत नकळत एखादे भयंकर मोठे पाप झाले असेल तर गीतेत अशा पापाचे परिमार्जन कसे करावे ह्याबद्दल उपदेश करणारा एखादा श्लोक सांगू शकाल का?>>>>>>>>

गीते मधे पाप आणि पुण्य या संकल्पने पेक्षा कर्म हि संकल्पना जास्त आहे. तुमचे नियत कर्म न करणे किंवा स्वार्थ ठेवून एखादे कर्म करणे हे चूक किंवा पाप. कर्मफलाच्या अपेक्षा न ठेवता कर्म करणे हे बरोबर किंवा पुण्य.

पापचे परिमार्जन वगैरे मला गीते मधे तरी नाही सापडले.

आणि मूळात तुम्ही स्वता तरी पाप आणि पुण्य, चूक आणि बरोबर याची व्याख्या सांगू शकाल का ?

अंतःकरणपूर्वक पश्चात्ताप, (ज्याच्या बाबतीत पाप/चूक/गुन्हा घडला असेल त्याच्याकडे) कबुली आणि क्षमायाचना, शक्य असेल तर त्याच्या झालेल्या हानीची भरपाई असे पापक्षालनाचे मार्ग आहेत.

या अर्थाचं संस्कृत सुभाषित वाचल्याचं आठवतंय, पण आत्ता सापडत नाही. घरी बघून नंतर सांगते.

बी
माझि पोस्ट व कॉपी पेस्ट विषयाला धरुन नसेल तर संपादित करते.अलिकडेच लिहायला सुरवात केलिय कुनाच्या भावना दुखावन्याचा हेतु नसतो.

मिस्टर बी , इब्लिस हे एक सर्जन आहेत हे अख्ख्या मायबोलीला माहीत आहे. एक सर्जन वीस वर्षे वयाचा असु शकतो हे तुमचे विधान ऐकून खूप हसु आले.

.......
अंतःकरणपूर्वक पश्चात्ताप, (ज्याच्या बाबतीत पाप/चूक/गुन्हा घडला असेल त्याच्याकडे) कबुली आणि क्षमायाचना, शक्य असेल तर त्याच्या झालेल्या हानीची भरपाई असे पापक्षालनाचे मार्ग आहेत..

शक्य असेल तर.. हे पटत नाही. म्हणजे लबाड मनुष्य कबुलीचे आणि क्षमायाचनेचे नाटक करुन भरपाई न देताच सुटणार.

आणि इथेच धर्मग्रंथ आणि कायद्याचे पुस्तक यातील फरक लक्षात येतो.

>> शक्य असेल तर.. हे पटत नाही.
म्हणजे ह्यूमनली पॉसिबल असेल तर.
म्हणजे एखाद्याचे पैसे चोरले तर परत देता येतील, पण (एक्स्ट्रीम उदाहरण) एखाद्याची हत्या झाली तर त्याला कसं परत आणणार?

संमि, हे पापक्षालन स्वतःसाठी आहे. इतर कोणाला दाखवण्यापुरतं नाही. सुरुवात अंतःकरणपूर्वक पश्चात्तापाने झाल्यावर लबाडीचा प्रश्न येतोच कुठे?

छान धागा,
मी धार्मिक प्रवृत्तीचा नाही पण मागे कधीतरी घेतलेले इस्कॉनचे भगवदगीतेचे पुस्तक आहे. २०० रुपये मूळ किंमत पण डिस्काऊंटमध्ये १०० रुपयाला मिळालेले. आकर्षक मुखपृष्ट आणि बांधणी आकर्षित करून गेली आणि काय भगवदगीता असते ते बघूया तरी म्हणून घेतली. पण न वाचता तसेच ड्रॉवर मध्ये पडून आहे. हा धागा बघून ते वाचायची इच्छा होतेय फक्त एक कन्फर्म करायचे होते की ते योग्य पुस्तक आहे ना, नाहीतर गीतेच्या नावावर काहीतरी भलतेच वाचायचो.

अतरंगी, धन्यवाद, बघतो मी ती लिंक. आणि घरी गेल्यावर माझ्याकडे नक्की कोणते पुस्तक आहे त्याचे डिटेल्स देतो. फक्त काही चुकीचे वा आपल्या सोयीने भेसळ केलेले वाचून त्यालाच अंतिम गीता समजण्याची चूक व्हायला नको म्हणून आधीच शंका उपस्थित केली.

ऋन्मेऽऽष,

देवभोळे आणि आंधळेपणाने विश्वास ठेवणारे नसाल तर एक टिप. मूळ गीता, आणि सर्व भाषांतरे हि सर्व माणसाने लिहिलेली आहेत. त्याला त्या त्या वेळच्या प्रचलित समाजव्यवस्ठा, विचारसरणी आणि ज्ञात गोष्टींची मर्यादा आहे.
सारासार विचारबुद्धी ठेउन वाचल्यास बरेच चांगले पुस्तक आहे.

मी गीतेची ३ ते ४ भाषांतरे वाचलेली आहेत. त्यातल्या त्यात गीताप्रेस गोरखपूर चांगले आहे. आणि छोटे असल्याने कॅरी करायला सोपे पण.

देवभोळे आणि आंधळेपणाने विश्वास ठेवणारे नसाल तर ..... >>> नाहीये मी तसा.
जसे आपल्या बुद्धीमान पूर्वजांनी कित्येक वैज्ञानिक गोष्टी धार्मिक प्रथांच्या नावे रुजवल्या आहेत तेच तत्वज्ञानालाही लागू. बस त्याच द्रुष्टीकोणातून वाचले जाईल. आजपासूनच. घटस्थापनेचा मुहुर्त देखील आहेच चांगला Wink

अध्याय ११ वा, श्लोक १०,११,१२,१६,१७,१९,२०,२३,२४,२५,२६,२७,२८,२९,३०,३६, !!!!!!!
काहीही आहेत !!!! गीते सारख्या सर्वोच्च ग्रंथामधे ?
>>>
मी गीता वाचलेली असली तरी श्लोक नंबर प्रमाणे माझ्या लक्षात नाहीयेत . numbers देण्यापेक्षा direct श्लोक द्या . आणि त्यात तुम्हाला कैच्या काही काय वाटतंय ते पण सांगा . सगळ्यात पहिली गोष्ट इथे बुद्धी प्रामाण्य वादाच काही काम नाहीये कारण माणसाची बुद्धी हि खूप लिमिटेड आहे आणि ती व्यक्तीनुसार कमी जास्त आहे . त्यामुळे केवळ बुद्धीला झेपत नाही म्हणून ते कैच्या काही आहे हा दृष्टीकोन बाजूला ठेवावा लागेल तर चर्चा smoothly होऊ शकते

त्यामुळे केवळ बुद्धीला झेपत नाही म्हणून ते कैच्या काही आहे हा दृष्टीकोन बाजूला ठेवावा लागेल तर चर्चा smoothly होऊ शकते

खरे आहे.

समोरच्याने परवानगी दिल्याशिवाय एकेरीवर येऊ नये, तो तुमच्या तीर्थरूपांचा नोकर नव्हे, हे तुम्हाला एकदाचे उमजले हे बरे झाले.>>>

सहमत आहे . पण संमी चे वेगवेगळ्या लेखावारचे प्रतिसाद बघता त्याच्या लायकीप्रमाणे त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. अहो त्या संमी ला बायको चांगली वस्ताद मिळाली आहे म्हणून बुद्धी भ्रष्ट होवून जिथे
तीथे dhandhalat असतो .. इब्लिस तुझ्यासाठी ignore मोड ऑन. बस बडबडत .

http://yatharthgeeta.com/hindi/

मोहिनि या लिंकवर गीता आहे. मी इतके श्लोक आणि त्याचे अर्थ वेळेअभावी ईथे टंकु शकत नाही.

प्रश्न बुद्धी इतकाच लॉजिक चा आहे.
उदा.
आईनस्टाईनची रिलेटिव्हीटी थेअरी समजून घ्यायला बुद्धी आणि माहिती लागते. पण एक राक्षस होता त्याला १५ हात आणि २३ पाय असतात, १०० दात असतात, तो एकावेळी १०० माणसे खायचा मग त्याचे पोट भरायचे. हे खरे खोटे करायला माझ्यासाठी बुद्धी नाही लॉजिक पुरेसे आहे. बुद्धी लावायची गरज नाही.

समोरच्याने परवानगी दिल्याशिवाय एकेरीवर येऊ नये, तो तुमच्या तीर्थरूपांचा नोकर नव्हे, हे तुम्हाला एकदाचे उमजले हे बरे झाले.
<<
हे तुमचे संस्कार का इब्लिसबाई?

आपल्या हातून जर कळत नकळत एखादे भयंकर मोठे पाप झाले असेल तर गीतेत अशा पापाचे परिमार्जन कसे करावे ह्याबद्दल उपदेश करणारा एखादा श्लोक सांगू शकाल का?>>>>>>>>
एक पापि राजा होता त्यानि जनतेवर खुप आन्याय आत्याचार केले होते जो कोनि त्याच्या विरुध बोलायचा त्याचि हत्या केलि जायचि कुनाचि हिंमत नव्हति त्याच्या विरुध बोलायचि अशा हजारो हत्या, कत्तल त्यानि केल्या होत्या तो जेव्हा म्हातारपणाकडे वाटचाल करालालागला त्याला त्याच्या चुकांचि जानिव व्हायला लागलि पश्च्याताप व्हायला लागला त्याने वेगवेगळ्या पंथातिल दोन संन्याश्याना बोलावले व विचारले मि आयुष्यात खुप चुका केल्या आहेत त्याचे मला पापक्षालन करायचे आहे काहि ऊपाय आहे का?
पहिल्या संन्याश्या ने सांगितले कि तुझ्या कर्माचे फळ तुला भोगायलाच लागतिल माझ्याकडे काहिच ऊपाय नाहि.
राजा खुप परेषान झाला बेचन झाला.त्याने दुसर्‍या संन्याश्याला हाच प्रश्न विचारला.त्याने सांगितले कि उपाय आहेत पन खुप खर्च येइल मोठा यज्ञ हवन करायला लागेल व त्यात सगळी पाप जाळायला लागतिल गंगेत डुबक्या घ्यायला लागतिल हे एकुन राजा खुष झाला .
चुकिचा सल्ला दिल्याबद्द्ल सगळ्यात आधि त्याने पहिल्या सन्यासाचे मुंड्के छाटले व त्या पंथातिल सगळ्या सन्यासाच्या हत्या करन्याचे आदेश दिले दुसर्‍या संन्याश्याला दान दक्षिणा देऊन पाठ्वले.
गिते प्रमाने कोठ्ला संन्यासि योग्य होत ?

गीतेचा आणि पश्चात्तापाचा / परिमार्जनाचा काय संबंध ?

म्हणजे बघा.. मी अ याचा खून केला.

तर त्याला मरताना मी म्हणेन.. त्य्झ्या गेल्या जन्माचा कर्मविपाक म्हणुन तुझ्या नशिबी असे मरण आले.

मीही कोणत्या तरी जन्मात याची शिक्षा भोगेन.

मग मी या जन्मात परिमार्जन / पश्चात्ताप तरी का करावा ?

गीता वैगरे कधी वाचली नाही तस मनच झाल नाही.

पण शालेय जीवनात एका मित्राकडून मला असे कळले होते कि जे होतंय ते चांगल्या साठीच होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे असच बरचस काहीतरी गीतेत आहे. मित्र नॉर्थ इंडियन होता तो 'जो होता हे वह अच्छे के लियेही होता हे' असच काहीस म्हंटला होता नि हे गीतेत लिहिलंय अस सांगायचा.ह्याचा माझ्या मनावर तेव्हा फारच प्रभाव पडला होता.
आम्ही बारावीला असताना एक मित्र नापास झाला बिचारा फारच चिंतेत पडला तेव्हा मी त्याचे सांत्वन करण्यासाठी गेलो.नि काय बोलावे ते न सुचल्याने त्याला म्हणालो, 'मित्रा, काळजी करू नकोस जे होत ते चांगल्यासाठीच होत. त्यावेळी तो माझ्यावर जाम भडकला म्हणाला ‘तुला, बोलायला काय जातंय तू पास झालास. आता घरी गेल्यावर मला फटके पडणार ते वेगळे, वडिलांनी पाच हजार खर्चून क्लास लावला होता ते पैसे पाण्यात गेले. नातेवाईकांमध्ये शेजारी पाजारी नापास झाल्याने इज्जतचा कचरा होणार, नि तू बोलतोयस जे झाले ते चांगले झाले चल निघ इथून..

तेव्हापासून कानाला खडा लावला पुराणातील वांगी पुराणातच ठेवायची वास्तविक जीवनात त्यांचा काहीही उपयोग नसतो.

आमचे एक मास्तर होते राकेश मेहरा नावाचे (ते नाव आणि आडनावाच्यामध्ये बहुतेक वडलांचे नाव पण लावत). त्यांनी आम्हाला एका नाटकामार्फत गीता शिकवली. त्या नाटकातले प्रमुख पात्र 'ना कोई मारता है, ना कोई मरता है' ही गीतेतील शिकवण विविध प्रकारे हत्या करवून लोकांना शिकवते. फारच सुंदर नाटक होते ते. त्याच नाटकात "जादूच्या आरश्यात बघितले असता आपल्याला समोर वेगळाच माणूस दिसतो" हे पराभौतिकीय सत्यदेखील फार छान मांडले आहे.

गीता अर्जुन सोडून कुणालाही कळली नाही कारण त्याचा मतितार्थ खुद्द कृष्णाद्वारेच सांगितला गेलेला
म्हणुन त्याचा अर्थ मलाच समजला असा जगात कोणी दावा करत असेल तर ती शुध्द फसवणूकच आहे

Pages