झटपट चीनी पिझ्झा भेळ

Submitted by mi_anu on 21 September, 2014 - 07:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पिझ्झा बेस मध्यम आकाराचे २
मीरपूड, मीठ
शेझवान किंवा सोया सॉस
ऑलिव्ह किंवा साधे तेल
भोपळी मिरची मोठी १
टॉमेटो मोठा १
कांदा लहान १
बेबी कॉर्न १

क्रमवार पाककृती: 

१. उभे बारीक चिरावे: कांदा, भोपळी मिरची, टॉमेटो, बेबी कॉर्न
२. एका कढईत अगदी थोडे तेल तापवून त्यात या सर्व भाज्या हलवत परताव्या.
३. थोड्या शिजत आल्यावर शेझवान सॉस, केचप घालून नीट मिसळत परतावे.
४. दुसर्‍या एका भांड्यात पिझ्झा बेसचे पनीर सारखे दिसणारे चौकोनी तुकडे थोड्या तेलात सोनेरी परतावे.
५. हे तुकडे पहिल्या कढईत भाज्यांवर घालून मिसळावे
६. गरम गरम गट्टम करावे.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

बेसचे तुकडे जितके कुरकुरीत तितके अधिक छान लागतील.
हवे असल्यास भाज्यांचे परतायचे तेल शून्य करुन बेस परतण्यास जास्त तेल वापरावे.

माहितीचा स्रोत: 
लाईट गेले आणि मायक्रोवेव्ह वापरता आला नाही आणि पोट म्हणाले 'पिझ्झाच हवा'
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तय, इटली-चिनी भाय भाय .. मलाही जमू शकेल ..

माहितीचा स्त्रोत भारी पण तुमचा कॅमेरा सुद्धा लाईटवर चालतो का हो Wink

You do not have permission to view this album

अवांतर - फोटो टाकताना प्रॉब्लेम येतोय की कसे टाकायचे हेच तुम्हाला माहीत नाही ..

मला तरी अजून दिसत नाहीये.

इमेज गूगल प्लसवर द्यायची गरज नाही.

आपण प्रतिसाद लिहितो त्या खाली "मजकूरात image किंवा link द्या." असे वाक्य आहे, त्यातील इमेज वर क्लिक करून तिथे १५० केबी पेक्षा कमी साईजमध्ये इमेज अपलोड करा. अपलोड झाल्यावर ती सिलेक्ट करत सेंड टू टेक्स्ट एरीया बटणावर क्लिका की तिची लिंक इथे दिसू लागेल.

मस्त, आता कसे तोंपासु झाले.

आणि हो, इथे जी प्रतिसादात लिंक आली ना तीच लेखात डकवली तरी काम होऊन जाईल Happy