सेवा जगदंबेची

Submitted by विनायक. दि.पत्की. on 12 September, 2014 - 13:08

-:सेवा जगदंबेची:-

दि. २५ सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र म्हणजे जगदंबेचा उत्सव सुरु होत आहे त्या निमित्याने तिची सेवा घडावी या उद्देशाने

सध्याचे युग हे विज्ञान युग असले तरी कलीयुगाच्या अंकित आहे.विज्ञान फक्त निसर्गात उपलब्ध घटकांवर प्रयोग करून शोध लावते तर निसर्गाची निर्मिती व लय त्या आदिशक्ती च्या इच्छेवरच अवलंबून आहे.निसर्ग हा मुळात दोनच शक्तीत विभागला गेला आहे त्या म्हणजे एक सकारात्मक व दुसरी नकारात्मक.आपण नकारात्मक शक्तीचा परिणाम आधी पाहू. ..........................
विज्ञानाच्या शोधामुळे आपले जीवनमान जरी सुखकारक झाले असले तरी त्या सुखाच्या हव्यासा पोटी आपण बऱ्याच आवशक त्या गोष्टी कडे काना डोळा करत आहोत व त्याचे भयंकर परिणाम भोगत आहोत उदाहरण द्यायचे झालेतर पहा दुचाकी वाहनांचा शोध लागला व माणसाने चालण्याकडे दुर्लक्ष केले.टी,व्ही.घरात आला बाहेर फिरायचे बंद झाले व वेळ जात नाही म्हणून टी.व्ही.पुढे बसू लागल्याने पचनाचे विकार ,वजनाच्या समस्येने नवीन विकार यांची वृद्धी झाली आहे.म्हणजे प्रत्येक नवीन शोधाचा वापर अतिरिक्त प्रमाणात वाढत चालला आहे आपण आत्मचिंतन करा तुम्हाला प्रत्येक शोधाचा गैर वापर व त्याने आपल्यातली व आपल्या सभोवतालची नकारात्मक शक्ती वाढत आहे हे मनोमन पटेल तेव्हा या नकारात्मक शक्तीलाच कलियुग म्हटले तर वावगे होणार नाही.
हल्ली घरोघरी या नकारात्मक शक्तीचा प्रादुर्भाव वाढलेला ठळक पणे दिसत आहे तो म्हणजे मुले ऐकत नाहीत आई वडिलांच्या इच्छेच्या विरुद्ध वागतात ,कित्येक घरात तर मोठी माणसेच ताळतंत्र सोडून वागत आहेत. प्रत्येक घरात शारीरिक,आर्थिक,मानसिक समस्या आहेत.हा सर्व नकारात्मक शक्तीचा प्रादुर्भाव आपणच आपल्या न कळत वाढू दिला त्याचा हा परिणाम आहे. आणी आपण दिवसेंदिवस मागेच चाललो आहोत .तर .......
जगातल्या कोणत्याही यशस्वी लोकांची गाथा तपासली तर असे म्हणता येईल कि त्यांच्यात सकारात्मक उर्जा अतिशय प्रचंड प्रमाणात त्यांनी कमावली असल्याने त्यांना त्यांच्या समस्येची काळजी वाटत नाही किंवा ते कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यास सक्षम राहिले आहेत त्यामुळे ते पुढेच जात आहेत. या वरून असे म्हणण्यास हरकत नाही कि हा सर्व फक्त शक्तीचाच खेळ आहे .आपल्या भोवतीची नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आपल्याला सकारात्मकतेची अत्यंत गरज आहे आणी त्यात आपण जर आपल्या जवळील सकारात्मकता गमावली तर आपले दैन्य वाढणारच आहे ,म्हणजे ......
जीवनातील सर्वच प्रश्न शक्तीशीच निगडीत आहेत .शक्तीचे प्रश्न सोडवण्यासाठी शक्तीच पाहिजे .आपले प्रश्न वाढू नये म्हणून युक्ती पाहिजे .आणि मिळाले ते समाधान टिकवण्यासाठी भक्ती पाहिजे . आपल्याला आपल्या जवळील सकारात्मकता न गमावता त्यात वाढ करणे हेच आपल्याला आपल्या सर्वच समस्यांचे समर्पक उत्तर आहे .मग त्यासाठी काय करावे ? या महत्वाच्या प्रश्नाला योग्य रीतीने सामोरे जाण्यासाठी शक्तीची उपासना हाच मार्ग आहे त्यासाठीच जगदंबेची सेवा म्हणजे आईची सेवा .
अशी कोणतीच आई नाही कि जिचे आपल्या लेकरावर प्रेम नाही त्यामुळे जगदंबेचे प्रेम आपल्यावर असतेच मग आपण तिच्या प्रेमाची परत फेड तर कधीच करू शकत नाही आपण सदैव तिच्या ऋणातच आहोत म्हणून त्या शक्ती ची उपासना करावी.तिच्या उपासनेनेच हि शक्ती मिळते. ही शक्ती कशासाठी तर माणसांचे शत्रू आहेत ........महिषासुर,चंड,मुंड,शुंभ,निशुंभ,रक्तबीज,.....ई.
या शत्रू पासून आपले रक्षण व्हावे म्हणून.
समस्त देवांनी सुद्धा या शत्रू पासून संरक्षण पाहिजे म्हणून तिची करुणा भाकली मग आपल्या सारख्या मानवाला या शत्रू पासून संरक्षण नको का ? हे शत्रू दुसरी कडे कोठे नसून आज तरी हे आपल्यातच दडलेले आहेत त्यांचा समूळ नाश झाल्याशिवाय आपले मूळ रूप प्रगट होणारच नाही .आपले मूळ स्वरूप हे अत्यंत पवित्र,निरागस,आणी आनंदी आहे. त्यातच राहणे हे खरे जीवन असल्यामुळे आपल्याला त्याचे नित्य स्मरण जगदंबेच्या सेवे मुळेच राहणे शक्य आहे अन्यथा सर्व शक्तिमान असून ही दुबळ्या च्या भूमिकेत आपण वावरत असतो.
जेव्हा एका सकारात्मक विचारांच्या लोकांचा समूह एकत्र आल्रेला असतो तेव्हा साहजिकच तेथे प्रचंड सकारात्मकता असते आणी त्या प्रचंड सकारात्मकाते पुढे आपले शत्रू दुबळे होत असतात आणी दुबळ्या शत्रुंचाच नायनाट करणे सोपे असते म्हणून नवरात्रात जगदंबेच्या प्रत्येक मंदिरात आपल्याला प्रचंड उत्साह आढळून येतो (तसा तो नेहमीच अखंड असतो पण या काळात तो विशेष जाणवतो) तेव्हा त्या वातावरणाचा अंश आपल्यातही अंतर्भूत व्हावा आपले नैराश्य,उदासीनता निघून जाऊन आपल्यात त्या प्रचंड शक्तीचा प्रवाह प्रवाहित व्हावा म्हणून किमान नवरात्रात तरी नियमित तिचे दर्शन करावे म्हणजे पुढे तिचे नित्य दर्शन घेण्याची सवय लागून आपले मूळ रूप प्रगट होण्यास मदत होईल.

प्रत्येक निर्मितीला आई असतेच. प्रत्येक जीवाला निर्मिती नंतर घडवणारी सुद्धा माऊली(गुरु माऊली)च असते आई सारखे महान दैवत नाही समस्या निर्मिती व यशस्वी रित्या सोडवणे याला सुद्धा आईच कारणीभूत असते {प.पु.गोंदवले कर महाराज म्हणतात कि जसे उजेडाला कारण सूर्य व अंधाराला हि कारण सुर्यच तसे} पहिल्यात तीच्या अभावामुळे तर दुसऱ्यात तीच्या उपलब्धपणा मुळे एवढेच. जिच्या इच्छेने आपण जन्माला आलो तिची सेवा हि सर्व श्रेष्ठ सेवा आहे.ह्या जीवाला ,आत्म्याला ,देहाला ज्या काही सुख सोयींची आवशकता असते त्या सर्व आईच्याच सेवेने प्राप्त होतात अशी हि जगदंबा माता सकल देवतांची जननी आहे. जिचा उगम कोणालाच माहित नाही तर तिला अंत नाहीच म्हणूनच तिला आदी शक्ती म्हणतात ,तिच्या इच्छे शिवाय झाडाचे पान सुद्धा हलत नाही अशी ती सर्व श्रेष्ठ म्हणून तिला जगत जननी सुद्धा म्हटले जाते.तेव्हा तिची मर्जी संपादन केल्या शिवाय आपले कुठलेही काम होऊच शकत नाही म्हणून मनोभावे तिची प्रार्थना करून मनोमन तिची सेवा आरंभ करू आणी ह्या जगत जननीस प्रिय असणाऱ्या सेवे पैकीच ज्या सेवा अत्यंत महत्वाच्या आहेत त्या केल्यास निश्चित तिची कृपा होते त्या अशा आहेत .......
(१) तिचा सर्वात प्रिय असा नवार्ण मंत्राचा जप :- नवार्ण मंत्राचा जप तिला अत्यंत प्रिय आहे व तन्मयतेने सुचीर्भूत पणे ह्या मंत्राचा जप करणाऱ्यास ती निश्चितच प्रसंन्न होते. प्रत्येकाच्या घरी किमान रोज ९ माळी (१०८ मण्यांची १ माळ ) तरी जप व्हावा (.जमल्यास सामुदायिक रित्या ९ कोटी जपाचा संकल्प करून कसोशीने पूर्णत्वास न्यावाच ).येथे ९ हा अंक आलेला आहे कारण सर्वात श्रेष्ठ अशा जगत जननीच्या सेवेचा अंक हि असाच सर्व श्रेष्ठ असावा तिचे वाहन हि सर्व श्रेष्ठ म्हणजे सिह आहे.तिला पायस आवडते जे कि दुध पूर्ण आटवून त्याचे राहिलेले सत्व असते`.तिला सर्वश्रेष्ठ कमळाचे फुल आवडते. मग सर्व श्रेष्ठ कृपा होण्यासाठी सर्वच श्रेष्ठ लागते म्हणूनच सर्व श्रेष्ठ ९ तोच तिला प्रिय आहे. मनुष्याच्या सर्वांगीण विकास साठी शारीरिक ताकद , धन, व बुद्धी अत्यावशक असते या सर्वांची देवता महाकाली ,महालक्ष्मी ,व महा सरस्वती हि असत म्हणजे तीच जगदंबा हा सर्व खेळ करत असते त्या मुळे तिचे महात्म् थोरच आहे तिच्या थोर महात्म्या मुळे ती थोर आहे तेव्हा या नवार्ण मंत्राचा अर्थ सुद्धा श्री महाकाली,श्री महालक्ष्मी ,श्री महा सरस्वती देवीस माझा मन:पूर्वक नमस्कार असो असा आहे ..तेव्हा सर्वांनी आपल्यावर सर्व दृष्टीने कृपा होण्यासाठी आपल्या घरात किमान ९ माळी तरी जप होईल याची दक्षता घ्यावी. इच्छित फळ देण्यास ती समर्थ आहेच.तेव्हा काळजी सोडून मार्गक्रमण करण्यास सुरवात करू या.
आपल्या घरात रोज किमान ९ माळी जप करण्याचा किंवा आपल्या सर्वांच्याच समस्या जवळ पास सारख्याच असतात व उद्देश एकच असल्यामुळे आपल्याला संघटीत शक्तीची आवशकता आहे आपल्या आसपास सम विचाराचे अनेक लोक असल्यास सामुदायिक रित्या ९ कोटी जपाचा संकल्प करून देखील तिची सर्वीत्कृष्ठ सेवा घडू शकते म्हणून ह्या अतिशय दयाळू/कृपाळू मातेच्या सेवेचा, सामुदायिक ९ कोटी जपाच्या सेवेचा संकल्प आपल्या मनोकामने नुसार करू शकता,किंवा खालील प्रमाणे करू शकता
मात्र आपण आपला जो संकल्प करू तो कसोशीने पूर्णत्वास न्यावाच.
हे जगदंबे माते ,
आम्ही तुला शरण आलो आहोत .
आमुची संतती काळाच्या ओघात वाहवत जाऊ नये .
ते उच्य संस्कारित व्हावेत .जीवनात यशस्वी व्हावेत ,समाधानी राहावेत .
आमुची सतसत विवेक बुद्धी जागृत रहावी .
या कली च्या प्रभावा पासून ,सर्व आरिष्टा पासून आम्हा सर्वांचे रक्षण व्हावे .
आमच्या ह्रदयात तुझ्या विषयी अपार भक्ती जागृत व्हावी म्हणून तुला अत्यंत प्रिय असलेल्या नवार्ण मंत्राचा

(ओम ऐम-ह्रींम –क्लीम चामुंडाय विच्चे)

जप सामुदाईक रीत्या किमान ९ कोटी एवढा आमुच्या कडून व्हावा तो तू समर्पित करून घे.
आम्हाला तुझे भव्य दिव्य असे भक्तिपूर्वक पूजन घडावे व तुझ्या मंगलमय चरणांचे दर्शन घडावे
म्हणून आजच्या पवित्र दिनी मी हा संकल्प मनपूर्वक करत आहे .
||महाकाली,महालक्ष्मी, महासरस्वती माता कि जय ||

मात्र आपण आपला जो संकल्प करू तो कसोशीने पूर्णत्वास न्यावाच.

ठरलेला जपएकदम झाला नाही तरी चालते पण दिवस भरात लक्ष पुर्णच करावे.काही अपरिहार्य कारणाने झाला नाही तर दुसऱ्या दिवशी तरी पूर्ण करावाच .सरते शेवटी महिना अखेर एकूण होणारा जप कुठल्याही परस्थितीत पुर्णच करावा .जप उपाशी पोटीच करावा असे काही नाही.उलट जेव्हा जेव्हा मन प्रसन्न असते तेव्हा परमेश्वराशी अनुसंधान लवकरच साधत असल्याने शरीराच्या क्रिया साधनेत बाधा आणणार नाहीत या साठी दक्ष राहिल्यास उपासना चांगली होते.सर्व श्रेष्ठ देवतेला सर्वच श्रेष्ठ लागते जसे आपण काही खरेदीला गेलो तर कमी पैशात जास्तीत जास्त चांगले घेण्याकडे आपला कल असतो हा गुण आपल्याला आपल्या आई कडूनच म्हणजेच जगदंबे कडून आला आहे तेव्हा तिला सुद्धा अतिशय पवित्र भावनेने ,सुचीर्भूत पणे, सत्विकतेने,तन्मयतेने केलेलीच सेवा मान्य होते म्हणून आपण अतिशय शुद्ध् तेनेच सेवा अर्पण करावयास शिकावे.जप हा सुचीर्भूतपणे च करावा म्हणजे मनाला शुद्ध वाटेल अशा रीतीने पवित्र राहूनच केलेला जप सिद्धीस जातो. अन्यथा नुसत्या शारीरिक कष्टां शिवाय काहीही साध्य होणार नाही .
त्यासाठी .जप सुरु करण्यापूर्वी जगदंबेची प्रार्थना करावी कि माते तुझा परमप्रिय नवार्ण मंत्राचा जप रोज माझ्या कडून किमान.............माळी अतिशय तन्मयतेने,भक्ती भावाने व्हावा तसा तू माझ्या कडून करवूनच घ्यावा व तुझ्या चरणी समर्पित करून घ्यावा.असे म्हणूनच जपाला सुरुवात करावी.जप करताना माळ पूर्ण झाल्या वरच बोलावे,जप हा पवित्र ठिकाणीच बसून करावा (जर झोप येत असेल तरमंदिरात प्रदक्षिणा घालताना केल्यास चालू शकतो.प्रदक्षिणा घालण्याचा उद्देशच हा असतो कि त्या देवते सभोवती असणारया प्रचंड सकारात्मकतेत या देहाला बुडवून काढायचे असते आणि याने व्यायामाचे उदिष्ठ हि साध्य होईल ).रोज ठरलेला जप काहीही झाले तरी पूर्ण करावाच. परंतु काही अपरिहार्य कारणाने एखाद्या दिवशी जर झाला नाही किंवा काही दिवस झाला नाही तर महिन्याचे लक्ष ठरवून महिनाभरात तरी पूर्ण करावेच याने आपल्याला नियमित पणाची सवय होते हा एक अप्रत्यक्ष आपला फायदा होत असतो.
झालेला जप जगदंबेच्या डाव्या हातात मनोभावे प्रार्थना करून,जपात झालेल्या चुकीची क्षमा मागून ,समर्पित करून घे अशी विनंती करून अर्पण करावा.
(२) सप्त सतीचा पाठ .:- ...सप्त सती ही जगदंबेला अत्यंत प्रिय आहे तिच्यातील प्रत्येक ओवी हा एक सिद्ध मंत्रच आहे .नवरात्रात जर १२ पाठ केले तर त्याचे १ पूर्ण हवन होते त्यामुळे नवरात्रात एकून १२ पाठ करावेत .ज्यांना संस्कृत पाठ करणे होत नसेल तर श्री स्वामीसमर्थ केंद्रात मराठी सप्त सती मिळते .ती वाचण्याचा विधी त्यात दिलेला आहे त्यानुसार वाचन केले तर ती जगदंबा आपले मनोरथ पूर्णत्वास नेते .
(३) जर काहीच जमले नाही तर:- या सर्वांचे सार म्हणून किमान सेवा म्हणून खालील दिलेली सप्तशतीची अवतर्णीकेचे मनोभावे वाचन करावे.
प्रथामाध्यायीन निश्चिती || श्रीमहाकालीची उत्पत्ती मधुकैटभ दैत्यांप्रती ||मारविती जाहली जगदंबा ||१||
द्वीतीयाध्यायी केले वर्णन || श्रीमहालक्ष्मीचे जनन || सेनापतीचे युद्ध दारूण || होते जाहले देवीसि ||२||
तृतीयाध्यायी कथन जाहले || महिषासुराचे हनन केले || चतुर्थाध्यायी निरूपिले || शुक्रादिदेव स्तुतीसी ||३||
पाचवे अध्यायी निरुपण || श्रीमहासरस्वतीचे आख्यान || पार्वती देहापासुनी जनन || दुत संवाद हि वर्णिला ||४ ||
सहावे अध्यायी वर्णन || देवीने मारिला धुम्रलोचन || सातवे अध्यायी ते दारूण || चंड-मुंड वधियेले ||५||
आठवे अध्यायी निश्चिती || राक्तबिजाची केली समाप्ती || नववे अध्यायी निशुम्भाप्रती || मारिती जाहली जगदंबा ||६||
दहावे अध्यायी वर्णिले || शुम्भासुराचे हनन केले || अकरावे अध्यायी निरूपिले नारायणीस्तुतीते ||७||
बारावे अध्यायी प्रसिद्ध || वर्णिला देवीचा संवाद || श्रवण पठणाचे फल अगाध || देवीने स्वमुखे वर्णिले ||८||
तेरावे अध्यायी केले वर्णन || सुरथ-वैश्यासी देवी प्रसन्न || अक्षयी राज्य नृपालागून || मुक्ती दिधली वैश्यासी ||९||
चवदावे अध्यायी निरुपण || प्राधानिक रहस्य केले कथन || देवीने ब्रम्हा-शिव-विष्णू निर्मून || उत्पन्नादि कर्मे निवेदिली ||१०||
पंधरावे अध्यायी जाण || केला पूजा प्रकार वर्णन || सप्तप्रकारची अनुष्ठाने पूर्ण || तथा होम प्रकार वर्णिला||११
|| शेवटी सोळावे अध्यायी || मूर्तीरहस्य वर्णिले पाही || पंचचावतार चरित्र सर्वही || ध्यानरुपादी वर्णिले ||१२||
या प्रकारे करोनी जाण || सोळा अध्याय ग्रंथ पूर्ण || श्रीदेवीने कृपा करून || ब्राम्हण मुखे वदविला ||१३||
ग्रंथाचे सोळा अध्याय जाण || हेची शोडशोपचार पूर्ण || केले श्रीजगदंबा पूजन || भावे अर्पिले सर्वही||१४||
किंवा हा शोडशाध्याय ग्रंथ || हेची सोळा काळांचा नक्षत्रनाथ || भक्तांचे त्रिविधताप-शमनार्थ || देवीने पूर्ण निर्मिला ||१५||
अथवा सोळा अध्याय ग्रंथ जाण || हेची सोळा दळाचे कमल पूर्ण || श्रीजगदंबेसी केले अर्पण || धरिले करी प्रीतीने ||१६||
ना तरी हे शोडशाध्याय देखा || देवीकंठीच्या सोळा मातृका || किंवा सोळा स्वर हे अंबिका || धारणकरीनिजकंठी ||१७||

या नंतर खाली दिलेले दिलेले २० नमस्कार म्हणून प्रत्येक वेळी माथा टेकवून नमस्कार करावा. एवढे जरी नित्य केले तरी त्या प्रेमळ जगदंबेची निश्चित कृपा होते

सर्वस्य बुद्धिरूपेण जनस्य हृदि संस्थिते |
स्वर्गापवर्गदे देवी नारायणी नमोस्तुते ||१||
कलाकाष्ठादिरूपेण परिणामप्रदायिनी |
विश्वास्योपरतौ शक्ते नारायणी नमोस्तुते ||२||
सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थ साधिके |
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||३||
सृष्टीस्थितीविनाशाना शक्तीभुते सनातनी |
गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते ||४||
शरणागतदिनार्तपरित्राणपरायणे |
सर्वस्यर्तिहरे देवी नारायणी नमोस्तुते ||५||
हंसयुक्तविमानस्थे ब्राम्हणीरूपधारिणी |
कौशांभ:क्षरीके देवी नारायणी नमोस्तुते ||६||
त्रिशूलचंद्राहिधरे महावृषभवाहिनी |
माहेश्वरीस्वरूपेण नारायणी नमोस्तुते ||७||
मयूरकुक्कुटवृते महाशक्तिघरे नघे |
कौमारीरूपसंस्थाने नारायणी नमोस्तुते ||८||
शंखचक्रगदाशांगगृहीतपरमायुधे |
प्रसीद वैश्नवीरूपे नारायणी नमोस्तुते ||९||
गृहीतोग्रमहाचक्रे दन्ष्ट्रोधृतवसुंधरे |
वराहरुपिणी शिवे नारायणी नमोस्तुते ||१०||
नृसिंहरुपेणोग्रेण हन्तु दैत्यान कृताद्यां |
त्रैलोक्यत्राणसहिते नारायणी नमोस्तुते ||११||
किरीटिनी महावज्रे सहस्त्रनयनोज्वले |
वृत्रप्राणहरे चैन्द्री नारायणी नमोस्तुते ||१२||
शिवदुतीस्वरुपेन हतदैत्यमहाबले |
घोररूपे महारावे नारायणी नमोस्तुते ||१३||
दंष्ट्राकरालवदने शिरोमालाविभुशणे |
चामुंडे मुंडमंथने नारायणी नमोस्तुते ||१४||
लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टिस्वघे ध्रुवे |
महारात्री महामाये नारायणी नमोस्तुते ||१५||
मेघे सरस्वती वरे भूती बाभ्रवी तामसी |
नीयते त्वं प्रसिदेशे नारायणी नमोस्तुते ||१६||
सर्वस्वरुपे सर्वेशे सर्वशक्तीसमन्विते |
भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते ||१७||
एतत्ते वदनं सौम्यं लोचनत्रयभूषितम |
पातु न सर्व भित्यीभ्य कात्यायनी नमोस्तुते ||१८||
ज्वालाकरालमत्युग्रमशेषासूरसुदनम |
त्रिशूलं पातु नो भितेर्भद्रकाली नमोस्तुते ||१९|| ||
सर्व नामे नमो नम: ||२०||

असे म्हणून परत एक नमस्कार करावा व म्हणावे माते माझ्या सारखा पापी कोणी नाही ,आणी तुझ्या सारखी पाप विनाशिनी कोणी नाही .तुझ्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम .

एवढे जरी नित्य केले तरी त्या प्रेमळ जगदंबेची निश्चित कृपा होते

||महाकाली ,महलक्ष्मी ,महासरस्वती. माता कि जय|| जय जगदंब ||

तेव्हा आपण आपल्या आईची सेवा करु या आणी सुख समाधानाने राहू या

|| जय जगदंब ||
.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Prasann Harankhedkar जी,
एकच जगदंबेची सर्व लेकरे आणी त्यांची योग्य वेळी,योग्य ठिकाणी भेट हि सर्व तिचीच ईच्छा दुसरे कहिहि नाही .
कोकणस्थ जी,
मला एवढे मोठे पण देउ नका मी एक अती सामान्य माणुस आहे परवानगी त्या जगदंबेची आहेच आणी आम्ही दर्शनाभीलाषी आहोत आम्हाला दर्शन हवेच. सुंदर प्रतिमा पाहुन मन प्रसंन्न झाले .खुप आनंद झाला..
आणी वर तुरजा कवचाचा उल्लेख झाला आहे.गरजवंता साठी तुरजा कवच क्लिक करा .

<<तिचा सर्वात प्रिय असा नवर्णाव मंत्राचा जप :- नवर्णाव मंत्राचा जप तिला अत्यंत प्रिय आहे व तन्मयतेने सुचीर्भूत पणे ह्या मंत्राचा जप करणाऱ्यास ती निश्चितच प्रसंन्न होते>>

विनायकराव, कृपया मंत्रही द्यावा ही विनंती. बाकी लेख अर्थपूर्ण.

पत्की साहेब,

लेख छान आहे .देवीचे दर्शन घेऊनही मन प्रसन्न झाले. अशीच उपयुक्त माहिती पुरवत जा. नकारात्मक शक्तींकडे दुर्लक्ष करा. (ओम ऐम-ह्रींम –क्लीम चामुंडाय विच्चे) हा नवार्ण मंत्र मी सुद्धा बऱ्याच वेळी करत असते.पण लेख वाचल्यावर पुन्हा नव्याने करण्याचा जोश मनात निर्माण होतो.
धन्यवाद.

मोहिनी३३३ जी.
तुळ्जा भवानी हे नांव कसे पडले याचा संक्षीप्त माहिती अशी आहे ,
फार पूर्वी कर्दम नावाचे एक तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनुभूती रूपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्र रत्न प्राप्त झाले, परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. करण कदर्भ ऋषींनी लवकरच इहलोकाची यात्रा संपवल्यामुळे अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय घेतला. परंतु अल्प वयीन पुत्राला मागे सोडून पती सोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता, अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुंच्या घरी सोडून ती मेरू पर्वता नजीक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परीसरात गेली. आणी तिथे तिने आश्रम बांधून तपश्च्यर्या सुरु केली. तिची तपश्च्यर्या सुरु असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लुब्ध झाला. त्याच्या मनात पाप वासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला. त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करू नये व आपली त्याच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून तिने आदिशक्तीचा धावा सुरु केला. तेव्हा खरेच देवी भवानी मातेच्या स्वरुपात त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युद्ध केले. दैत्य ही महिषाचे रूप घेऊन आला तेव्हा देवीने त्रिशूळाने त्याचे शीर धडावेगळे केले. ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आली, त्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरीताचे तुरजा व पुढे तुळजा झाले.
भवानी म्हणजे शत्रुंचा नाश करणारी म्हणून तिला तुळजा भवानी म्हणून पुजतात.

कूटस्थ जी .सप्रेम नमस्कार.

मंत्र दिलेला होताच पण आपल्या सुचने नुसार मी त्याला आता ठळक केले आहे.

जयश्री देशकुलकर्णी, अश्विनी के धन्यवाद.

एकंदरीत आपला लढा हा पावलो पावली नकरात्मकते शी असतो याचे परत प्रत्यंतर आले पण सकरात्मकते पुढे ते पालापाचोळ्या सारखे ठरते तेव्हा आपण सर्व जण सकारत्मकतेचे पुजारी होउ या. जगदंबेच्या सेवेत राहुन तिचा अशिर्वाद घेउ या.
||जय जगदंब || ||महाकाली ,महलक्ष्मी ,महासरस्वती. माता कि जय|| जय जगदंब ||

भवानी आई विषयी ही माहिती नव्हती मला !!!
व्वा !! फारच छान.
आमच्या नागपूर नजिक कोराडी हे एक देवी चे स्थान आहे.
Koradi Thermal Power Plant मुळे चांगलेच नावारुपाला आलेले हे गाव. नागपूर पासुन अवघ्या १५ कि.मे. वर आहे.
आई महालक्ष्मी चे तिथे देउळ आहे.Koradi.jpg
हा घ्या फोटो.

परब्रम्ह जी ,नमस्कार
होय बरोबर आहे लिहण्यात चुक झालेली दुरुस्त केली धन्यवाद .
renuka.jpg

अप्रतीम! मस्त फोटो आहेत. मनात कधी आले पण नव्हते, म्हणजे नुसते वाचलेच होते, पण अकल्पितरित्या मला आमच्या श्री अम्बाबाई ( कोल्हापूर) बरोबर च श्री सप्तशृन्गी तसेच अम्बेजोगाई इथे श्री योगेश्वरी देवीचे दर्शन घडण्याचा ( तिथे जाण्याचा ) योग आलाय. श्री अम्बा बाई आमची कुलदेवता असल्याने तिथे जाणे होतेच पण बाकी ठिकाणान्चा पण लाभ होईल असे वाटले नव्हते, ते झाले. आता माहुरची श्री रेणुका देवीचे दर्शन राहीलेय, ते करणार. ( लवकर योग यावा ही ईच्छा). तुळजापूरच्या श्री भवानी मातेचे लहानपणीच दर्शन झालेय.

पत्कीजी धन्यवाद, छान बाफ सुरु केलात.:स्मित:

विनायक नमस्कार,

खाऊ तिकडे तुमच्य " अध्यात्म", च्या पानांवर तयार होतो आहे..... :-),

तुम्ही सुद्धा खूप अर्थपुर्ण कार्ये करता बुवा !

ईथे महामायेची रुपे आणवुन दर्शन करविता आणि तिकडे निर्गुणा चा शोध घ्यायला लावता......... धन्य देवा ! फार सुंदर पाने उघडलित !

महामायेच्याच..........कृपेने ( ह्या शरिराने, सर्व इंद्रियांचा उपयोग करुन ), नेति नेति म्हणत .....हा तो नाहि, हा तो नाहि म्हणत ह्या सर्वांच्या पलिकडे स्थित असलेला निर्गुण शोधायला लावित आहात..........खरेच धन्य आहात.

प्रणाम |

सर्व जगदंबेच्या भक्ताच्या चरणी माझा विनम्र प्रणाम ,
महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळ्जा भवानी ,जगतवंद्य श्री शिवाजी राजे आणी आई जोगेश्वरी यांचे दर्शन घेउन पावन होउ या.
bhavani.jpgshivaji1.jpgyogeswari1.jpg||जय जगदंब || ||महाकाली ,महलक्ष्मी ,महासरस्वती. माता कि जय|| जय जगदंब ||

जगदंबे विषयी सतत आदर बाळगणे तिचे नित्य स्मरण ठेवणे ही सुद्धा एक परमोच्य सेवाच आहे :-

सतत काही तरी करत असणे यात कधी कधी काहीच न करणे( मनाला शुन्यावस्थेत नेणे ) याला सुद्धा खूप महत्व असते आणी यात शुद्ध भावने सोबत शुद्ध हेतु ला ही तेवढेच महत्व असते तेव्हा........

जगदंबेने आपल्या सर्व शत्रूंचा नवरात्रात अहोरात्र निराहार युद्ध करून वध केलेला असतो. तेव्हा आपले सर्व विघ्न हरण करून आपल्याल्या सुरक्षित करूनच तिने युद्धाचा शेवट केलेला आहे .त्यामुळे आता यापुढे आपल्याला निर्भयता आणी आनंदच प्राप्त झालेला आहे या भावनेत राहावे. आणी दसऱ्या नंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत च्या कालावधीत तिला युद्धामुळे आलेला शीण घालवण्यासाठी ती विश्रांती घेत असते या आदर युक्त भावनेने या कालावधीत कुठलेही साकडे घालू नये तसेच या ३ ते ४ दिवसांची आपली जी काही नित्य सेवा असते ते नवरात्रातच आधीच जास्तीची करून घ्यावी म्हणजे सेवेत खंड न पडल्याचे आपले समाधान टिकून राहील आणी तिच्या विषयी आदर ही वाढेल.

केवळ......... आपली सर्वच विघ्ने हरण केली आहेत, आपल्याला अधिकृत रित्या जे पाहिजे ते सर्वच तिने वारेमाप दिले आहे तेव्हा तिला आता मागणे मागून त्रास देऊ नये.
हा आदर म्हणून दसऱ्या नंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत जगदंबेच्या मंदिराचे दरवाजे बंद ठेवतात. कोजागिरीला पुनश्च नवीन जोमाने सात्विक कामाला आशीर्वाद व पाठबळ देण्यासाठी ती सदैव उभी असतेच.

तेव्हा ज्यांना काहिच करणे जमत नसेल त्यांनी किमान जगदंबा अखील विश्वाची प्रेमळ माता आहे ती माझी प्रेमळ माता माझे संरक्षण करण्यास समर्थ आहे त्यामुळे मी निर्भय झालो आहे आणी माझ्या जिवनात तिच्या कृपेने आनंदच आनंद आहे या भावनेत सतत रहण्याची सवय जरी करुन घेतली आणी आपल्या आई तच जगदंबेला पाहिले आणी जगदंबेतच आपल्या आईला पहिले म्हणजे आई म्हणजे जगदंबा व जगदंबा म्हणजेच आई हा भाव दृढ झाला
तर ती सुद्धा तिची मोठी उपासना ठरुन तिच्या कृपेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

||जय जगदंब || ||महाकाली ,महलक्ष्मी ,महासरस्वती. माता कि जय|| जय जगदंब ||

सगुना जी,
छान दर्शन घडवलेत.
जय जगदंब || ||महाकाली ,महलक्ष्मी ,महासरस्वती. माता कि जय|| जय जगदंब |

विनायक जी,

>>जगदंबे विषयी सतत आदर बाळगणे तिचे नित्य स्मरण ठेवणे ही सुद्धा एक परमोच्य सेवाच आहे<<
सर्व गोष्टींचा सारांश एका वाक्यात सांगीतला तुम्ही !!
ह्या धाग्याच्या निमित्ताने जगदंबेच्या सर्व रुपांचे काय सुरेख दर्शन घडते आहे.
विनायकराव, काय पुण्याचे काम केले आहे तुम्ही हे..व्वा

उद्या पासुन सुरु होणार्या नवरात्राच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा.
जय जगदंब || ||महाकाली ,महलक्ष्मी ,महासरस्वती. माता कि जय|| जय जगदंब |

सप्तश्रुंगी हे जगदंबेचे देवस्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली ही देवी सात आदिमातांमधील थोरली माता आहे.

png.jpg

Prasann Harankhedkar .,हे सर्व जगदंबेच्या कृपेची फलश्रृती आहे .
डीविनिता, सप्तश्रृंगी मातेचे दर्शन झाले आनंद झाला धन्यवाद .

पत्कीजी (विनायक दादा म्हणले तर चालेल का?) श्री सप्तशती दुपारी १२ ते सन्ध्याकाळी ६ च्या दर्म्यान कधी पण वाचली तर चालेल का? . कारण सकाळी १२ च्या आत आणी निदान दुपारी ५ पर्यन्त तरी मला वाचणे शक्य नाही, कारण घरात आजारी व्यक्ती आहे.

मी दर नवरात्रात श्री सप्तशती वाचते. आता या वर्षी तरी ते शक्य नाही असे दिसतेय. तुम्हाला माहीत असेल तर सान्गा. किन्वा अजून कुणी जाणकार ( अश्विनी ) असतील तरी त्यानी कृपया सान्गावे. म्हणजे मला उद्यापासुन सन्कल्प सोडुन वाचता येईल.

आज पासून शारदीय नवरात्राला सुरवात आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवीची "शैलपुत्री" स्वरुपात पूजा केली जाते .पर्वतराज हिमालयाची पुत्री म्हणून देवीने अवतार घेतला म्हणून तिला हे नाव मिळाले.शैलपुत्री बैलावर बसली असून हातात त्रिशूल आणि कमळ धारण केले आहे.

shailputri.jpg

ध्यान मंत्र:-
वन्दे वांछितलाभायाचन्द्रार्घकृतशेखराम्।
वृषारूढांशूलधरां शैलपुत्रीयशस्विनीम्।

स्तोत्र:-
प्रथम दुर्गा त्वंहिभवसागर तारणीम्।धन ऐश्वर्य दायनींशैलपुत्रीप्रणमाम्हम्।
चराचरेश्वरीत्वंहिमहामोह विनाशिन।भुक्ति मुक्ति दायनी,शैलपुत्रीप्रणमाम्यहम्।

रश्मी.. ताई,
मला दादा (मी तुमच्या पेक्षा वयाने मोठा असेल तर ) म्हणत असाल तर मला खुप आनंद आहे.
माझ्या मते दुपारी फक्त १२ ते १२.३० हि वेळ सोडुन आपण भक्ती भावाने केव्हाही वाचु शकता जगदंबेला मान्य आहे आपण अनुभव जरुर घ्या .कारण तुमची अडचण तिला मान्य आहे .
|| जयह्जगदंब ||

धन्यवाद! मी चाळीशीकडे वाटचाल करतेय. तुम्ही लहान असल्यास मला ताई जरुर म्ह्णा.:स्मित:

आत्ता या वर्षी पोथी वाचणे शक्य नाहीये. तेव्हा नवार्ण मन्त्रच तेवढा जपेन आणी बाकी लहान स्तोत्रे म्हणणार.

जगदंबे पुढे बसल्या नंतर तिच्या कृपेने सुचलेली कृती आवश्य वाचा

प्रार्थना-१ क्लिक करा .
प्रार्थना-2 क्लिक करा .
प्रार्थना-3 क्लिक करा .
प्रार्थना-4 क्लिक करा .
प्रार्थना-5 क्लिक करा .
प्रार्थना-6 क्लिक करा .
कनकधारा स्तोत्र क्लिक करा .
देवपराधक्षमापनस्तोत्र क्लिक करा .