जगदंबेची प्रार्थना-5

Submitted by विनायक. दि.पत्की. on 22 March, 2013 - 04:07

जगदंबेची प्रार्थना-5
(अंबा जननी विश्वाची माया आदी पुरुषाची )
आनंदमय माते,तुझे नावंच आनंदी.
संकटाने च शिकवले मज,राहण्या स्वच्छंदी.
संकटे मजला सूचना आणिक संधी नामी,
लाभो अभय मज या अपार भक्तीच्या कामी.||१||
संकटाने च मिळते मज ताकद भोगाची,
मनोमन माझी तयारी होते विषय त्यागाची.
कास्तुरीस हि लाजवणारे असे तुझे देणे,
भावे तुज,तेच असावे माझे वागणे.||२||
जे नसे मज जवळ तेच वाटते हवे,
स्थिरता नसे मनाची,रोजच दु:ख नवे.
नको ते मागणे,आणि मनात हि न यावे.
दृढ मनाने मी आता समाधान पावावे.||३||
घेतलेस जाण,अजाण,अपराध उदरात.
करुणामय कधीच न तिष्ठे, तुझ्या दारात.
तव इच्छेचाच प्रताप असे युगानु युगे.
निश्चिंत तव भक्त या मातलेल्या कलियुगे.||४||
अंश रूप तव लाभले समस्त नारीस,
नारी परी पूर्ण न उमजे मनुष्य योनीस.
माग मागुनी मागणे असे सदा पुनीत,
मागणे थांबवी,हाच गुरु उपदेश असे नवनीत.||५||
अनिष्ट ग्रह कुंडलीत जरी दाटले अवचित,
कृपा तुझी,भेटले गुरु साधण्या माझे हित.
कृपा तुझी,मार्ग गुरूंचा,आता मी नसे भीत.
समर्थ असता पाठीशी,रक्षण माझे निश्चिंत ||६||
तव कृपेने जे असे मजला लाभले,
हेच माझे परमसुख,आणि हेच माझे भले.
दुजा न विचार आता करी हीच दृष्टी विशाल,
समानच दिसो आता मज कुटी वा महाल.||७||
सदा सर्वदा वान्छितो आम्ही आनंदी जगणे,
खंत नसो माते,घडो तव इच्छेनेच वागणे.
आता मनोमनी जरी थकले तुझे हे बाळ,
संजीवनी देण्या धाव माते,सोकु नये हा काळ ||८||

Group content visibility: 
Public - accessible to all site users