जगदंबेची प्रार्थना -३

Submitted by विनायक. दि.पत्की. on 15 March, 2013 - 05:38

जगदंबेची प्रार्थना-3 (मी परिपूर्ण साधक व्हावे )
(अंबा जननी विश्वाची माया आदी पुरुषाची )
बालक होतो निर्मळ मनाचा मी ज्या दिनी,
माझी साधना तेथुनी,आता न उरे अंधकार मनी.
दिनता सरो मनाची,व्हावे सबळ मी हे भय निवारिणी.
अडखळने पुरे आता,मार्ग दावी हे ज्योतीस्वरुपिणी ||१||
द्वंद्व मनाचे मजला करीतसे परेशान,
एक सखा,दुजा रिपू त्याने झालो मी हैराण.
रिपू माझा सखा करी,व्हावे द्वारपाल तयाने.
नष्ट करोनी दुष्ट वासना,हे मन भरावे प्रेमाने.||२||
तुझिया सेवेचा मी असे स्वार्थी साधक,
भय संसाराचे नसावे मजला बाधक.
साधनेस माझ्या असती मर्यादा अनंत,
घडो परी पूर्ण सेवा,मनी न राहो काही खंत.||३||
मी न ऋषी,मी न मुनी,मी संसारी हेच सत्य.
कर्तव्य रूपी कर्म माझे,जाण तुझीच सेवा नित्य.
मिळाले सर्व माते,ज्याची मला नव्हतीच अपेक्षा.
आता देशील तू सरसच, मागण्यापेक्षा.||४||
अहंकार,उन्माद,मी पण सरो मात्र,
होऊनी पुष्प गुणांचे,तव कृपेस मी असावे पात्र
योग्य वेळी योग्य ज्ञान,आता हीच अपेक्षा किमान.
दुर्गती टळण्या हवे बंधन,सेवेत असावे रणमान.||५||
नको भेद भाव आणिक चिंता, कल्पित विषयांची.
हे आदी शक्ती वंदन तुजला,तू जननी पुरुषार्थाची.
सानिध्य तव दूर करी,नर-नारी हा भेद भाव.
अद्वैत दृष्टी लाभो,भासो समान रंक आणि राव||६||
तू माझे आहे सर्वस्व,आता तारी अथवा मारी.
संतोषाने,नतमस्तक होण्या आलो तुझिया दारी.
आता नको नवे खेळणे,वा खाऊ नवा.
दर्शन होण्या झडकरी,घडो परिपूर्ण सेवा.||७||
आता नको परत फिरणे,नसे सीमा तव भक्तीला.
व्हावे उत्कृष्ट साधन,हीच विनंती आदी शक्तीला.
जरी सीमा करतील आता माझी साधना अपूर्ण,
आशा माझी,तू करशील साधक मजला परिपूर्ण ||८||

Group content visibility: 
Public - accessible to all site users