जगदंबेची प्रार्थना-१

Submitted by विनायक. दि.पत्की. on 8 March, 2013 - 03:50

जगदंबेची प्रार्थना-१
(अंबा जननी विश्वाची माया आदी पुरुषाची )
तव इच्छा म्हणोनी आलो मी भूवरी,
माझे न काही आता कृपा करी मजवरी.
मी दिन, मी दुबळा, आणी गलितगात्र ,
परी माझे बळ वाढवी तुझा नाममंत्र.||१||
संकल्पित कार्य घडावे ,मी तर नाममात्र .
तू कर्ता, आणि करविता, तुझी कीर्ती सर्वत्र .
मनी न व्हावी पाप बुद्धी, सज्जनंशीच व्यवहार.
सत्करमाला अडसर, त्या, दुष्टांचा करी संहार.||२||
वास्तवतेचे असावे भान, मती न व्हावी गुंग .
सहवासात मी तुझ्या मी, न व्हावे भंग.
मागणे असो काही, मन रहावे प्रसन्न.
खंत,भय,मनी नसावे .जरी मी मरणासन्न .||३||
असावे ज्ञानेन्द्रीय माझे, ज्ञानास उतावीळ.
षड्रिपू आणि अज्ञानाचा, मनी नको पिळ.
दु:सह हि वाट सरावी, दर्शनाने झडकरी .
मिष्टानाचा सुवास पुरे आई वाढ तू लवकरी.||४||
योग्यतेची जाण नसे मजला माय बाई,
योग्यता वाढवण्यासाठी योग्य करी आई
दिव्य शक्ती लाभो मज, जरी योग्य नाही .
दैन्य माझे,आता कासव दृष्टीने पाही ||५||
ममता तुझी अपार, मला न कळे बाई.
विलंबाने चुकेल वाट त्वरित ये आई.
तुझ्या दयेने व्हावे वत्स हे बलदंड,
नको पातळी सोडणे ,न व्हावे गुंड.||६||
जे मजला न सहे ते दु:ख नसावे,
विसर तुझा होईल ऐसे सुख नसावे.
संसाराच्या राड्या मध्ये,चिरडणे नको.
ईच्छा वीर मरणाची,तुझे दुर्लक्ष नको .||७||
जनसेवेसाठी जगावे, ठेवुनी तव स्मरण.
शांती समाधानाने ,वंदावे तव चरण.
दुष्टांशी झगडावे, शक्तीरूपी उरावे.
हे बोबडे बोल तुला पावन व्हावे ||८||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे !

जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते स्वतंत्रते भगवती......य ओळी आठवल्या,
उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर मागीतले आहे.मिळो ही प्रार्थना .