मायबोली गणेशोत्सव २०१४ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू -पंचमहाभूते "

Submitted by संयोजक on 25 August, 2014 - 10:44

गणपती बाप्पा मोरया!

त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः |
भूमि(जमिन), आप(जल/ पाणी), अनल (अग्नी), अनिल (वारा) आणि नभ (आकाश) ही पंचमहाभूते म्हणजे तूच! अशी आपण गणेशाची प्रार्थना करतो. सृष्टीच्या निर्मितीमध्ये ज्यांचे अढळ स्थान आहे, इतकेच नाही तर रोजच्या आयुष्यातही ज्यांच्याशिवाय आपले पानही हालत नाही अशी ही पंचमहाभूते! सृष्टीच्या निर्मितीमध्ये सहभाग असणारी ही पंचमहाभूते सृष्टी उध्वस्त करण्याचीही ताकद बाळगतात. यांची रूपे जितकी सुंदर तितकीच रौद्रही!
चला तर मग, झब्बूच्या खेळानिमित्त ह्या पंचमहाभूतांची विविध रूपे पाहूया.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. एका प्रकाशचित्रामध्ये पंचमहाभूतांपैकी किमान दोन महाभूते समाविष्ट असायला हवीत. प्रचिसोबत तुमच्या प्रचिमधील महाभुतांचा उल्लेख करा.
३. जी दोन महाभूते आधीच्या प्रकाशचित्रामध्ये येतील, ती तुमच्या झब्बूमध्ये टाळावीत. (आधीच्या प्रकाशचित्रातील दोन पैकी एक महाभूत आणि एक वेगळे, असे चालेल).
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
७. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
८. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

उदाहरणार्थ :
IMG_1428 copy.jpg
प्रचिश्रेय साभार - जिप्सी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आप, नभ

Pages