२०४८

Submitted by बन्या on 21 August, 2014 - 03:16

येथे कोणी २०४८ गेम खेळता का?

मला हा गेम कसा खेळायचा तेच समजत नाही , फुल अंदाजपंचे खेळतोय
१० हजार च्या वर अजून स्कोर गेलेला नाही

हा गेम खेल्णार्यांसाठी हा धागा Happy

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधीही वरच्या दिशेने स्वाईप करायचे नाही. म्हणजे काय तर जी आपण बेरीज करीत जाणार आहोत त्यातील जी सर्वात मोठी संख्या असेल ती चौथ्या रांगेत असेल. आणि नवीन येणारी संख्या त्यात मिसळत जाणार. प्रयत्न करा.

डावीकडून उजवीकडे, आणि वरुन खाली असा बेसिक सिक्वेन्स ठेवा.. आणि काही झाले तरी छोटे आकडे खाली आडकू देऊ नका.. ते आडकले की गेम लवकर संपतो..

डावीकडे बेरीज करत जा. डावीकडचे चार चौकोन भरले तर ते लॉक होतात. म्हणजे तुम्ही स्वाइप करताना कधीही डावीकडून उजवीकडे करायचे नाही. एकतर उजवीकडून डावीकडे किंवा वर खाली. ४०९६ सुद्धा गाठता येते.