मायबोली गणेशोत्सव २०१४ : आता कशाला शिजायची बात! (पाककृती स्पर्धा) - प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत

Submitted by संयोजक on 18 August, 2014 - 01:12

pakakruti poster_Ata kashala shijaychi bat_2.JPG

गणपती बाप्पा मोरया!
आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये "क्विक अँड फास्ट" खाद्यपदार्थांची चलती आहे. रांधायला लागणार्‍या वेळेची बचत व्हायला हवी, पदार्थ चविष्ट हवा आणि पोषणमूल्येही योग्य प्रमाणात हवी याकडे लक्ष दिले जाते. अशा पदार्थांत अनेक चटपटीत भारतीय पदार्थ किंवा सॅलेडसारख्या पाश्चात्य पदार्थांचेही पर्याय उपलब्ध असतात.
चला तर मग यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने चटकदार, पौष्टिक, करायला सुटसुटीत शिवाय पोटभरीच्या अश्या 'न शिजवलेल्या' पदार्थांच्या पाककृती लिहूया.

स्पर्धेचे नियमः
१. घटकपदार्थ कच्चे असावेत. घटकपदार्थांवर निवडणे, सोलणे, भिजवणे,धुणे, वाळवणे, गार करणे, फ्रिज करणे, खारवणे, मुरवणे ह्या प्रक्रिया केलेल्या चालतील. मात्र या घटकांपासून तयार झालेला पदार्थ तळणे, भाजणे, उकडणे, शिजवणे, ग्रिल/बेक/ब्रॉईल करणे ह्या प्रक्रियांशिवाय खाण्यायोग्य झाला पाहिजे.
२. त्यावर चवीला फोडणी घालू शकता, सोबत चटणी, केचप, सॅलाड ड्रेसिंग, कडेन्स्ड मिल्क, फळांचे पल्प वगैरेचा वापर चालू शकेल. पण हे पदार्थ 'मुख्य घटक' नसावेत. फक्त गार्निशिंग साठी किंवा तोंडी लावण्यापुरते वापरले जावेत.
३. तयार पदार्थाच्या चवीवर बंधन नाही. तिखट किंवा गोड कसाही चालू शकेल
४. कोणताही एक तयार कोरडा पदार्थ घटकपदार्थ म्हणून वापरता येईल. उदा. पाव, बिस्कीटं, पापड्या, शेव, चुरमुरे, फुटाणे, पोहे वगैरे. मात्र असा एकच पदार्थ घटकपदार्थ म्हणून वापरता येईल. बाकीचे घटकपदार्थ नियमक्रमांक १ नुसार असावेत.
५. सामिष पदार्थ वापरता येणार नाहीत. पाककृती संपूर्ण शाकाहारी असवी. (अंडेही नको.)
६. गॅस, ओव्हन, मायक्रोवेव्ह ओव्हन, बार्बेक्यूग्रिल, सौरचूल ह्यांचा वापर चालणार नाही - अपवाद: उन्हात वाळवणे. फ्रिजर, रेफ्रिजरेटर, मिक्सर, ग्राईंडर, चॉपर वगैरे वापरले तरी चालेल.
७. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१४' या ग्रुपाचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. (ह्यासाठी मायबोली सदस्यत्त्व आवश्यक आहे.) हा ग्रुप गणेशचतुर्थीच्या दिवशी (म्हणजेच २९ ऑगस्ट २०१४, भारतीय प्रमाणवेळ) खुला होईल.
८. मायबोलीकरांच्या आग्रहावरून या नियमात बदल करण्यात आला आहे. सुधारीत नियम पुढीलप्रमाणे: एक आयडी जास्तीत जास्त दोन प्रवेशिका देऊ शकतो, चवीवर बंधन नाही. विजेतेनिवड मतदान पद्धतीने होणार असल्याने एकाच स्पर्धकाच्या दोन्ही प्रवेशिका निवडून आल्यास कुणाचीही हरकत नसावी.
९. आपली प्रवेशिका 'मायबोली गणेशोत्सव २०१४' ह्या ग्रूपामध्ये गणेशचतुर्थीच्या दिवसापासून (म्हणजेच २९ ऑगस्ट २०१४, भारतीय प्रमाण वेळ) अनंतचतुर्दशीपर्यंत (म्हणजेच ९. सप्टेंबर २०१४, अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) कधीही प्रकाशित करावी.
१०. मायबोलीवर पूर्व प्रकाशित पाककृती येथे देता येणार नाही.
११. धाग्याचे शीर्षक- <आता कशाला शिजायची बात>-<सदस्यनाम>-<पदार्थाचे नांव>असे असावे.
१२. पाककृतीबरोबर तयार पदार्थाचे प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे. जर काही गोष्टी व्हिडीयोवर दाखवणे गरजेचे असेल तर संयोजकांशी संपर्क साधावा.
१३. विजेत्यांची निवड मतदान पद्धतीने केली जाईल. मतदान करण्याकरता मायबोली सदस्यत्व आवश्यक आहे.

फक्त काय कोशिंबीरी/ भेळ / चिवडे च खायला(पहायला). मिळणार काय? ज्यास्तीत ज्यास्त सँड्विचेस.

वजन. कमी करायचं मनावर घेतल वाटतं बाप्पाने.

मायबोलीच्या प्रताधिकाराविषयीच्या धोरणांचा आदर राखून चित्रे बदलत आहोत.
तसदीबद्दल क्षमस्व!

एक आयडी एकच प्रवेशिका प्रकाशित करू शकतो. <<< संयोजक ह्यात दोन किंवा तीन प्रवेशिका करु शकता का??? भरपूर रेसिपीज मिळतील स्पर्धेच्या निमिताने. Happy

@आरती., पौर्णिमा:
कृपया सुधारीत नियम क्रमांक आठ पाहा.

@मृदुला:
एक प्रवेशिका घटकपदार्थ नियमात न बसल्याने बाद झाली तर दिलेल्या मुदतीच्या आत तुम्ही दुसरी प्रवेशिका देऊ शकता.

अल्पना@:
दुध, दही,मैदा, गव्हाचं पीठ हे सगळं सुद्धा प्रोसेस्ड मध्येच येईल का?

<<< नाही, हे घटक पदार्थात वापरता येतील. "प्रोसेस्ड" चा अर्थ शब्दश: घेऊ नका. तयार पदार्थ म्हणजे थोडक्यात "खाऊ" म्हणून वापरतो ते. Happy तरीही काही शंका असल्यास जरूर विचारा.

.

मी पा कृ टाकू का आता ?
मी मायबोली गणेशोत्सव २०१४ ग्रूपचे सभासदत्व घेतले आहे . या ग्रूप मध्ये नवीन पाककृती वर टिचकी मारल्यास अजून जरा थांबा असं ही दिसत आहे आणि अगदी खालती मायबोली गणेशोत्सव २०१४ ग्रूप असे ही दिसत आहे.
मी टाकलेली पाकृ गणेशोत्सव २०१४ मध्ये जाईल की आहार अणि पाककृती मध्ये या बाबतीत गोंधळून गेले आहे
कृपया खुलासा करावा.

@मनीमोहोर, तुमची शंका आपोआप दूर झालेली दिसते. 'जरा थांबा..' सूचना लवकरच काढली जाईल.
@मामी, पाककृती थेट मायबोली गणेशोत्सव २०१४ गृपमध्ये नवीन पाककृती मध्ये लिहायची आहे. हा धागा त्या गृपमध्ये असण्याची आवश्यकता नाही.
धन्यवाद!

हो, मी मागच्या वर्षीचा गणेशोत्सवाचा धागा पाहिला आणि त्या प्रमाणे केले आणि बरोबर झाले ही. फक्त "जरा थांबा " दिसत होतं म्हणून श़ंका वाटत होती.
तुम्ही एवढ्या कमी वेळात इतर सगळी व्यवधानं संभाळून हे सारं करता आहात याबद्द्ल तुमचे खूप कौतुक वाटते आहे.

Namaskar Sanyojak,

Kahi clarifications...

1. Padarth banavatana UkaLate paNi vaparata yiel ka? Aani kuthalya niyamat yiel jar vaparale tar?

2. Cream cheese, dahi, thickened cream he niyam 1 first sentence ki second sentence madhe basatat?

3. Bhajlele masale vaparale tar te kuthalya niyamat?

Dhanyavaad Happy

@लाजो,
१. नियम क्र. १ व ६ नुसार गरम पाणी वापरता येणार नाही.
२. दही कच्चा पदार्थ आहे व बाकीचे प्रोसेस्ड किंवा तयार पदार्थ असल्याने त्यापैकी एकच वापरता येईल. याबद्दल वर शंकानिरसन झालेले आहे.
३. मसाले वापरु शकता नियम क्र. २ नुसार.

धन्यवाद.

Dhanyavaad Happy

Pan garam paNi kettle madhe garm karun padarth banavayacha aadhi vaparale tar? Mhanaje samaja me paav ha ek ghatak padarth vaparanar asen pan to naram Karayala Mala ukalate paNi laganar asel tar? Kinva kahi viraghalavanyasathi ukalate paNi vaparayache asel tar? Shijavayala nahi.

नाही चालणार. मागच्या पानावर 'पदार्थ नुसता गरम केला तर चालेल का' याचे उत्तरही नाही असे दिले आहे. नियम क्र. ६ मध्ये पदार्थ गरम करणार्‍या साधनांची जास्तीत जास्त नावे दिली आहेत. काही राहून गेली असल्यास 'कोणत्याही प्रकारे पदार्थाला उष्णता वापरायची नाही' असा नियम लक्षात ठेवा. धन्यवाद.

Ok. Dhanyavaad Sanyojak.
Me tayar padarthasathi ushnata vaparanar ase mhantale navhate. Tari harakt nahi.
Apun kaayatari dusari idya shodhega Happy
Parat ekada thanks Happy

>>> मायबोलीवरची पूर्वप्रकाशित स्वतःची किंवा दुसर्‍याने टाकलेली आणि त्यात स्वतः बदल केलेली पाककृती चालणार नाही.<<

ह्या नियमानुसार इथे प्रकाशित झालेली पाकृ चालणार नाही असे आहे मग इतरत्र (इंटर्नेट ) ठिकाणावरून वरून उचलून इथे पाकृ टाकली तर चालेल का ? असे असेल तर चिक्कार सॅलड, सँडविच सारख्या पाकृ आहेत त्या इथे टाकलया तर चालतील का?

संयोजक,
तुमचे नियम एकदमच काटेकोर असलयाने आलेलय पाकृकृतीत पाहून कलपक्ता व नाविन्य कमीच वाटतेय.
असो.( हे एक निरिक्षण आहे). कोणावर टिका नाहीये. Happy

या स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारणे आता बंद करत आहोत.
आत्तापर्यंत या स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिका खालील प्रमाणे -

१) आता कशाला शिजायची बात - मंजूडी - आंब्याची डाळ (लिंबू पिळून) - http://www.maayboli.com/node/50664
२) आता कशाला शिजायची बात - मनीमोहोर - बनाका ( अर्थात बदाम, नारळ, काजू लाडू ) - http://www.maayboli.com/node/50565
३) आता कशाला शिजायची बात- पौर्णिमा- हाय फाईव्ह! - http://www.maayboli.com/node/50638
४) आता कशाला शिजायची बात- प्रभा- गोपालकाला - http://www.maayboli.com/node/50614
५) आता कशाला शिजायची बात - प्रभा- अंजीर बर्फी [खारीक खोबरे घालुन] - http://www.maayboli.com/node/50613
६) आता कशाला शिजायची बात- पौर्णिमा- पौष्टिक खाकरा भेळ - http://www.maayboli.com/node/50637
७) आता कशाला शिजायची बात- तृप्ती - ...आधी 'केल'ची पाहिजे! - http://www.maayboli.com/node/50622
८) आता कशाला शिजायची बात- मंजू चॉचॉमो चॉकलेटी चॉकलेट मोदक/पंचखाद्य मोदक - http://www.maayboli.com/node/50636
९) आता कशाला शिजायची बात - मंजूडी - पॉवरपॅक! - http://www.maayboli.com/node/50667
१०) आता कशाला शिजायची बात - अल्पना - कुल काकडी सलाड - http://www.maayboli.com/node/50670
११) आता कशाला उद्याची बात - अरुंधती कुलकर्णी - मिंटी फ्रूट सॅलड - http://www.maayboli.com/node/50672
१२) आता कशाला शिजायची बात - कामिनी८- लज्जतदार बाईट - http://www.maayboli.com/node/50676
१३) आता कशाला शिजायची बात - कामिनी ८- रंगीत प्रसाद - http://www.maayboli.com/node/50678
१४) आता कशाला शिजायची बात - आरती.- मस्तानी पान - http://www.maayboli.com/node/50681
१५) आता कशाला शिजायची बात - मनीमोहोर - सेलर बोट्स ( Sailor Boats) - शिडाच्या होड्या - http://www.maayboli.com/node/50683
१६) आता कशाला शिजायची बात- सायली- आगळे वेग़ळे पंचामृत (मखाण्याचे) - http://www.maayboli.com/node/50684
१७) आता कशाला शिजायची बात - बाईमाणूस - रंगीनी - http://www.maayboli.com/node/50715
१८) आता कशाला शिजायची बात- प्रीति- स्पायसी अवाकाडो सूप - http://www.maayboli.com/node/50695
१९) आता कशाला शिजायची बात - लाजो - 'खळ्यात-मळ्यात' - http://www.maayboli.com/node/50714
२०) आता कशाला शिजायची बात - संपदा - कलिंगड सॅलड. - http://www.maayboli.com/node/50700
२१) आता कशाला शिजायची बात- मंजू - पुर्णान्न दहीवडे चाट - http://www.maayboli.com/node/50711
२२) आता कशाला शिजायची बात -- सुलेखा -- " अबूझ " [तिखट पदार्थ ] - http://www.maayboli.com/node/50706
२३) आता कशाला शिजायची बात -- सुलेखा -- :"अपूप." [ गोड पदार्थ. ] - http://www.maayboli.com/node/50704
२४) आता कशाला शिजायची बात - sadho - तारातोर (कूल काकडी सूप ). - http://www.maayboli.com/node/50701
२५) आता कशाला शिजायची बात- सायो- अवाकाडो स्मॅश - http://www.maayboli.com/node/50694
२६) आता कशाला शिजायची बात - अल्पना - डेट अ‍ॅपल मिनी पाय - http://www.maayboli.com/node/50717
२७) आता कशाला शिजायची बात - आरती. - पौष्टीक आणि पोटभरीची मूग डाळीची कोशिंबीर - http://www.maayboli.com/node/50713
२८) आता कशाला शिजायची बात - साक्षी - ओपन सँडविच - http://www.maayboli.com/node/50722
२९)आता कशाला शिजायची बात - लाजो - फ्रोझन - http://www.maayboli.com/node/50726
३०)आता कशाला शिजायची बात - बाईमाणूस -<3 <3 प्यार भरी कटोरी <3 <3 - http://www.maayboli.com/node/50725
३१) आता कशाला शिजायची बात- प्राजक्ता-बून्दी कोशिंबिर- http://www.maayboli.com/node/50738
३२) आता कशाला शिजायची बात- जागू - टोमॅटो बास्केट सलाद - http://www.maayboli.com/node/50737

नजरचुकीने एखादी प्रवेशिका राहुन गेली असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे.

मायबोलीकरांच्या आग्रहावरून या नियमात बदल करण्यात आला आहे. सुधारीत नियम पुढीलप्रमाणे: एक आयडी जास्तीत जास्त दोन प्रवेशिका देऊ शकतो, चवीवर बंधन नाही. विजेतेनिवड मतदान पद्धतीने होणार असल्याने एकाच स्पर्धकाच्या दोन्ही प्रवेशिका निवडून आल्यास कुणाचीही हरकत नसावी.>>> यावरुन असं वाटत आहे की एक मतदार दोन प्रवेशिका निवडून देऊ शकतो. पण दुसर्‍या प्रवेशिकेला मत देता येत नाहीये. काही प्रॉब्लेम आहे की एकच प्रवेशिका निवडू शकतो? कृपया खुलासा करावा. तसेच काल असं ही वाचल्याच आठवतय की मतदान ओपन असे पर्यंत तुम्ही तुमची निवड बदलु शकता. शेवटची निवड फायनल धरली जाईल. ते ही आत्ता श्क्य होत नाहीये. कृपया खुलासा करावा.

संयोजक सांगतीलच. पण मतदानाने टॉप ३-४ प्रवेशिका निवडल्या जातील. त्यात एकाच स्पर्धकाच्या दोन प्रवेशिका असतील तर चालेल असा त्याचा अर्थ आहे.

मनीमोहोर, प्रत्येक मतदाराला केवळ एकाच प्रवेशिकेला मत देता येईल. मिळालेल्या मतांवरुन पहिले ५ क्रमांक काढले जातील. त्या पहिल्या पाच क्रमांकांमधे एखाच आयडीच्या २ प्रवेशिका असतील तर कोणी हरकत घ्यायला नको कारण विजेते निवड ही मायबोलीकरांनी दिलेल्या मतांनुसार होणार आहे. एकदा दिलेले मत बदलता येणार नाही.

Pages