आता कशाला शिजायची बात- प्रभा- गोपालकाला

Submitted by प्रभा on 1 September, 2014 - 13:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पोहे दोन वाटी, दही अर्धी वाटीपेक्षा थोड जास्त, साखर अर्धी वाटी, भिजवलेले शेंगदाणे व चना दाळ [भिजवलेली] प्रत्येकी पाव वाटी, आंबा व लिंबाच लोणच प्रत्येकी ५-६ फोडी खारासहित. आवडत असल्यास डाळिंबाचे दाणे, काकडीच्या फोडी.. आवडीनुसार प्रमाण कमी-जास्त करु शकतो. एखादी हिरवी मिरची.

क्रमवार पाककृती: 

चना दाळ व शेंगदाणे १-२ तास भिजवुन ठेवावे. व काढुन निथळावे. पोहे, दही, साखर, भि. दाळ, दाणे, लोणच, मिरचीचे तुकडे सर्व एकत्र करुन घ्याव. चांगल मिक्स झाल्यावर काकडीचे तुकडॅ मिसळावे. गोपालकाला तयार प्रसादासाठी.

वाढणी/प्रमाण: 
अंदाज नाही. भरपुर करावा म्हणजे पुरेल.
अधिक टिपा: 

तिखट प्रसादाचा प्रकार.. न शिजवता.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमंतिनी तुझ्या सांगण्याप्रमाणे गोपालकाला-- प्रमाण देते आहे.
दोन वाटी पोहे. अर्धी ते पाउन वाटी दही, अर्धी वाटी साखर, पाव वाटी चना दाळ व शेंगदाणे.[१-२ तास आधी भिजवुन ठेवावे.] एखादी मिरची तुकडे करुन, आंबा व लिंबाच लोणच आवडीनुसार [ प्रत्येकी ५-६ फोडी खारासहित] आवडत असल्यास डाळिंबाचे दाणे, काकडीच्या फोडी घालु शकतो.
हे सर्व साहित्य एका बाउल मधे घेवुन छान मिक्स करुन घ्याव.. चविष्ट गोपालकाला प्रसादासाठी तयार.
[आवडीनुसार कमी- जास्त प्रमाण घेता येइल.]